महानुभाव पंथ भजन लिरिक्स भाग ०२ - mahanubhav panth bhajan lyrics part 02

महानुभाव पंथ भजन लिरिक्स भाग ०२ - mahanubhav panth bhajan lyrics part 02

महानुभाव पंथ भजन लिरिक्स - mahanubhav panth bhajan lyrics part 02

आनंदोद्गार

(चाल :- माउली गुरु माउली)

माउली खरी माउली आमुची चक्रेश्वर माउली

आमुची परमेश्वर माउली ॥धृ०॥

जन्मोजनमी केला प्रतीपाळ।।

माते समान स्नेह लडीवाळ ॥

धरली प्रेमाची मजवरी सावली।

आमुची चक्रेश्वर माउली ॥१॥

माझ्यासाठी उभविली सृष्टी ।

खूप केली ज्ञानामृत वृष्टी ॥

ते मी आनुभव दृष्टी गमावली।

आमुची चक्रेश्वर माउली ॥२॥ 

माता त्रयोदशे हून वगेळी ।।

जगत जननी ममताच अगळी ॥

मोक्ष मार्गाची वाट मला दावली ।

आमुची चक्रेधर माउली ॥३॥

भानुबाळाची ऐकुनि हाक ।

योनी चुकविल्या चौऱ्यांशी लाख ।

सुख देण्यासी धावली आणि पावली ॥४॥

 

हितोपदेश विभाग

(ज्ञाना विने जे जे कळा । ते ते जाणी जे अवकळा ।)

मर्म शून्य कर्म

(चाल : बार बार तो हे)

मर्म जानुनि कर्म करावे । अंतरी लावुनि ध्यान ।

निजहीत सांगे अर्जुनासी तो भगवान ॥धृ०॥

जो तो म्हणतो कर्म करावे । कर्मा वाचुनि नाही गती ।

कर्मची तारक आहे म्हणुनि । भलभलते कर्म करती ।

सांडूनि मर्म करती कर्म । होती बहु हैराण ॥१॥

देव मिळावा म्हणून कोणी । उलटे टांगुनिया घेती ॥

कसाई जन बकऱ्यासी टांगीति । त्याची चुकेल का आधोगती ।

तिर्थक्षेत्र चहुधाम करीती । सोडुनि मार्मिक ज्ञान ॥२॥

देवासाठी शुद्ध व्हावया, नेहमी । पाण्यामध्ये बुडे ॥

मळ अंतरीचा नाही धुतला । कसा तयासी देव घडे ।

पाण्यातील जंतूच्या ऐसे । त्याचे वर वर स्नान ॥३॥

हात वाळवि देह सुकवि । सदा राहूनि उपवासी।

अष्टांगाचे साधन करिती । घालुनि आसने चौऱ्यांसी॥

एका पायावर उभेच रहाती । ते जंगली सैतान ॥४॥

स्वार्थ साधीती मौन धरिती । पाटीवर लिहून देती ॥

भानुकवि म्हणे कीर्तीसाठी । समाधी घेउनिया मरती।

मर्मकलेजा पाप जळेना । ते कोरडे पाषाण ॥५॥


धर्मरूपी नौका श्लोक :

धर्मोएव हतोहंती धर्मरक्षती रक्षतः ।

तस्मात धर्मोनहन्तव्य । मानो धर्म हवोवधीत् ।

(चाल : अब काहेकू धुम मचाते हो)

धर्मरूपी नौकेत बसा हो, जागृत होउनि सारे ।

आळसाते दूर करा हो, आळसाते दूर करा हो ॥धृ०॥

धर्मापासून दूर गेले । ते भव डोही बुडाले ।

धनंजया प्रती श्रीकृष्ण बोले । भक्तीमार्ग धरा हो ॥१॥

अखंड जो धर्माते रक्षी । धर्म ही त्याते रक्षी ॥

अमोल अमृत फळे ही भक्षी वंदेसुर असुरा हो ॥२॥

भव डोहातून तरून जाण्या । धर्माचरीतु प्राण्या ॥

परमसुखाचा नुभव घेन्या । श्री गुरुपाय धरा हो ॥३॥

सन्मार्गाची नौका मोठी । भवदर्यात लोटी ।

नेउनि भेटवी तो जगजेठी । शीघ्र करावी त्वरा हो ॥४॥

जन्ममृत्यूचा चुकवि धोका । धर्मरूपी ही नौका ॥

भानुकविश्वर सांगे ऐका । देउनि लक्ष जरा हो ॥५॥

 

मानवतेचा पुजारी

(चाल : शुभ मंगल सावधान सावधान)

राहे चांगले समाधान समाधान ॥धृ०॥

नको करू रे द्वेश कोणाचा ।

धरी सावरूनिया तोल मनाचा ॥

त्या प्रभुचे तू करी गुणगान ॥१॥

होय पुजारी मानवतेचा।

नाही भरोसा या नरतनुचा॥

तनमन आर्पण करी निजप्राण ॥२॥

देशभक्ती आणि ईशभक्तीचा ।

आम्मल करावा सदयुक्तीचा ॥

हिंडू नको बा तू आडराण ।।३।।

सद्गुरु वाचुनि सापडेना सोय ।

विवेकबुद्धी धरावेते पाय ॥

होईल तुजला खरे ब्रह्मज्ञान ॥४॥

सुबोध ऐकुनि भानुकविचा ।

ब्रह्मानंद घे सुरस चवीचा ।।

सोडुनि दे आहंता आभिमान ॥५॥


वेळेची किंमत

(चाल :- हे नासीवंत सुख सोडा)

गमविसी वेळ का ऐसा। भेटेल देव तो कैसा ॥धृ०॥

कधीना करसी ध्यान प्रभुचे ।

जे वाटेल ते करीसी मनचे

नासीवंत सुखाची आशा ॥१॥

कुकर्माचा करूनि संग।

प्रभु वचनाचा करीसी भंग।

देहाचा नाही भरोसा ॥२॥

सोडुनि द्यावी सर्वही आशा ।

मनी आठवावे सतत परेशा ॥

गुरुराज करील खुलासा ॥३॥

भानुकविची ऐकूनि हांक ।

चुकवा चौऱ्यांशीचा धाक ।

नाही तरी यमाचा फासा ॥४॥


बोधामृत

 (चाल : कीर्तनातील)

मानव जन्म तुला दिधला मानव जन्म तुला ।

जन्ममृत्यू यातना चुकउनि सार्थक करण्याला ॥धृ०॥

भोग आणि उपभोग सांडुनि प्रभू चरणाचे स्मरण करी ।

भवसागर हा तरून जाशील अमोल गंमत हीच खरी ॥

सावलीच्या तू मागे मागे धाउनि खूप श्रमला ॥१॥

सार नसे संसारक राया धडपडतोसी दिनरजनी ।

स्वार्थ सुखे परमार्थ बुडविसी लक्ष नसे त्या हरीभजनी ॥

तरून जाण्या भवभय हरण्या मार्ग तुझा चुकला ॥२॥

संसाराच्या बंदीशाळेतून धर्मशाळेमध्ये चाल जरा ।

धर्मगुरुचा गुरूमंत्र घे ब्रह्मज्ञानाचा बोध खरा ॥

झडकरी धरी आवरूनि धरी त्या मनरूपी चोराला ॥३॥   

भानुकवि म्हणे काय जिणे हरी भक्तीविणे या नर देही ।

आंधाऱ्या खोलीत जाउनी जावुनी पडला संदेही ॥

विचार नाही आचार नाही डाव तुझा फसला ॥४॥


मोहत्याग

(दोहा :- मर जायेगा मुररवा क्यो न भजे भगवान।)

झुटी माया जगतकी मत करना अभिमान ।।)

(चाल :- खरा तो एकची धर्म जगाला)

सोड ही सोड मोहमाया ।

नाही तर जासील की वाया ॥धृ०॥

जमीन धन दौलत लाखाची ।

तुझ्या ती नाही कामाची ।

जेथच्या तेथची तू राया

टाकूनि जाशील यमठाया ॥१॥

बकरी आणि कोंबडी त्यांचा ।

नको करू खून मनुष्याचा ॥

 नको व्याभिचार करू राया ।

समझ आई दुसऱ्याची जाया ॥२॥

तरूणपणी संसाराची बेडी ।

अंती तुज यम ओढून काढी ।

शरीर हे जाईल नासुनिया ।

भोगसील चौऱ्यांशी वाया ॥३॥

जसा आला नागवा जगती ।

तसा तू जाशील आंती ॥

भानुकवि सांगे गर्जुनीया ।

ईश्वर ध्यान धरी हृदया ॥४॥


शत्रूचा पराभव

(चाल : जब तुमही चले परदेश, बदल कर भेष)

तुम्ही बोलू नका जास्ती, खेळा कुस्ती, सुस्ती टाकूनिया ।

मन इंद्रिय घ्या जिंकूनिया ॥धृ०॥

मन लोभी लालची मन चोर ।

छल कपटी मन हे सीर जोर ॥

बलवान मोठा पहिलवान, पाडी उलथुनिया ॥१॥

मन इंद्रियांचा सरदार ।

करी दुष्ट मतीचा व्यवहार ॥

तारीतो म्हनुनि मारितो, फकीर अवलीया ॥२॥

षडविकार यांचे षड्यंत्र ।

बिघडवि जीवांचे ताळतंत्र ॥

लागले बुद्धीच्या पाठी जोर लाउनिया ॥३॥

अहंकार चित्त हे आनिवार ।

या सर्व जनांचा बडीवार ।

म्हणे भानु भक्ती मार्गात, येती आडवाया ॥४॥

 

तोडा मायाजाळ कहावत :

मायाका चकर मुक्कदर का फेर ।

मकडीके जाल में फंस गया शेर ।।

(चाल : कर्मगतीही चुकली नाही)

प्रभूपद घेण्यासाठी घ्या घ्या जिंकून मोहमाया ।   

मन इंद्रिय आवरूनि धरावे, काया जाईल वाया ॥धृ०॥

विषय सुखाची लाउनि गोडी हासवी रुसवी माया ॥

या संसारी बैलापरी त्या कसवि खसवी माया ।

रंग ढंग दाउनी जीवाला, सेवटी फसवि माया ॥१॥

रजो गुणाते खुलवि फुलवि, चित्त मन कलवि माया ॥

धर्मविराते हालवि डुलवि, मनासी घुलवि माया ॥

विषय विष पाजुनि जीवाला, सेवटी भुलवि माया ॥२॥

चालवूनी खेळवि घोळवि, लोळवि बोळवि माया ।

अहंकाराच्या घोड्यावर ते, बसउनि पळवि माया ।

स्वार्थासाठी नव्हते नव्हते, कळविवळवि माया ॥३॥

बहुरंगी बेढंगी नंगी, ऐसी असे ती माया ।

ज्ञानभक्ती वैराग्ये गुणाने, घ्या अकळूनि ती माया ॥

भानुकवि म्हणे झडकरी जावे, शरणागत गुरुराया ॥४॥


एक निष्ठ भक्ती

- (चाल : साधी)

ध्यान प्रभुचे करूनि स्मरा तो ।

एकचि देव खरा ॥धृ०॥

जो जग पिता विश्वविधाता ।

कर्ता हर्ता तोचि नियंता ॥

जाय धरी गुरुपाय नरा रे ।

सांगेल तोची खरा ॥१॥

नाना मार्गे भक्ती करीसी ।

कधी चुकेना ती चौऱ्यांशी ।

जाउ नको त्या आडमानि ।

धोपटमार्ग बरा ॥२॥

पतीव्रतेच्या परी असावे ।

मनात दुसरे काही नसावे ॥

भानुकविचा बोध हिताचा ।

हृदयी ठेव जरा ॥३॥


मथुनि नवनीता। तैसे घेइजे अनंता ।

वाया व्यर्थ कथा । दवडी मार्ग ।।१।। (ज्ञानेश्वरी) ।


(चाल - शेजारच्या घरात आलासी पाहूणा तू)

त्रिगुणाचा नका करू चिवडा।

देवाधी देव तो निवडा ॥धृ०॥...

परब्रह्म पराप्तर थोर ।

करी जीवा भवातूनि पार ॥ मायचा उठवि पगडा ॥१॥

देवता कठीण बहुकुर ।

नाही दया मया निष्ठुर ॥ जीवासी घाली यम खोडा॥२॥

 नित्य मुक्ती देई भगवंत ।

देवता फळे चूतमंत ॥ गीतेत आर्थ हा उघडा ॥३॥

भानुबाळ म्हणे रे बापा ।

जा शरण जीवाच्या बापा ॥ राहीला दिवस हा थोडा॥४॥

मोक्षदाता

(चाल : निया मिलनके खातर मै तो जोगन)

एका प्रभुविन तनमन दुसऱ्या आर्पण करसी हो ॥धृ०॥

भगवंताचे नाम न घेसी। क्षुद्र देवते कारे भजसी ॥

पीता जीवोद्धारक त्या सोडूनी, कैसा तू तरसी ॥१॥

अढळ पदाचा एकचि दाता । दीन पतितासी पावन करीता ॥

चिंता तुझी त्या निशीदिनी असता । त्यासीन का स्मरसी ॥२॥

जो देवांचा देव नियंता । भानुकविचा सर्वंही कर्ता॥

नाही दयाळू त्या विण दुसरा । चुकविल चौऱ्यांशी ॥३॥

निजधाम

(चाल : शेजारच्या घरात) नीजधाम नाही स्वर्गात।

ते मिळेल परमार्गात ॥धृ०॥

स्वर्गात गेला जो प्राणी । तेथून देती लोटोनी ॥

ते तया घाली नर्कात । चौऱ्यांशी योनी खर्गात ॥१॥

होय प्राप्ती भगवंताची । नाही भीती पुनर्जन्माची ॥

त्या प्रभुच्या दरबारात । होय तल्लीन सुख भोगात ॥२॥

देवाधी देव माहेर । देवता कठीण सासर॥

मिळे सार गीता आर्थात। जो वागेल निस्वार्थात ॥३॥

भानुची वाणी घ्या कानी ।  श्रीकृष्ण बोले गर्जुनि ॥

जो येईल सन्मार्गात। सुख मिळेल क्षणार्धात ॥४॥

 

सदोपदेश

(चाल : आनेसे उसके आए बहार)

आत्महिताचे शोधूनि पहाय । येउनि जन्मा केलेस काय ।

नको चौऱ्यांशी फिरू, भल्या मानसा ॥धृ०॥

हा तुला मिळाला नरदेह पूर्व सुकत्याने।

का अशा देहाची तू करीसी उपेक्षा हाताने ॥

जन्मभला, न मिळे तुला, नको आडमार्ग धरू ॥१॥

या जगी पहाता सुखशांतीचा लवलेश नाही ।

त्या सुखा करीता किती धडपड करितोशी पाही ॥

परंतु गडे, पदरी पडे, दुःखाचाची तो डोंगरू ॥२॥

या जिवा भवाचा असे धोका गड्या सर्वकाळ ।

त्यामुळे स्मरावा नंदनंदाचा कृष्ण गोपाळ ॥

आतातरी ध्यान धरी, सांगे भानुकविश्वरू ॥३॥

द्वेषमत्सर त्याग

(चाल :- ने से उसके आएबहार)

तुझ्या हिताचे तुझे तू पहाय, तुला दुसऱ्याहून राहिले काय।   

नको असा द्वेष करू, भल्या मानसा ॥धृ०॥

जो करी स्वईच्छा शास्त्रबाहय सदा स्वैराचार।

तो खरा प्रभुच्या दरबारी बहु गुन्हेगार॥

त्या आद्धमा, नाही क्षमा, त्याचा नको रुसवा धरू ॥१॥

जो कोणी कोनाचा द्वेषमत्सर करी सर्वकाळ ।

तो तया यमाजी नर्क कुंडात घाली तत्काळ ॥

करीतो भरी, अनेक परी, नको असे पाप करू ॥२॥

जो जगी सर्वांचे हितचिंतन करी सुस्वभावे ।

तो प्रभु तयाचे कार्य करण्यास त्यापाठी धावे ॥

सानुभवी, भानुकवि, म्हणे करी तू सद्गुरु ॥३॥


शांतीधाम

चाल :०- कर्मगती ही चुकली नाही

प्रभुविन कोठे शांती नाही शांती नाही मनाला।

त्या विण क्षणही न गमे मजला हे दुःख सांगू कोणाला ॥धृ०॥

राज्यभोग उपभोग असुनी, निशीदिनी चिंता जाळी ।

या संसारी कोणी न तारी । अघटीत संकटकाळी ॥

श्री चक्रधरतो स्वामी माझा, पदोपदी राखी दिनाला ॥१॥

संबंधीय सोईरे सहोदर, जानुनी करती टवाळी ।

मित्र विचित्र चित्रापरी ते, वाजवीताती टाळी ॥

स्वार्थासाठी धावत येती, हावुनी नेती धनाला ॥२॥

भवसागरी मम नाव बुडाली, या विषयाच्या पाई ।

लोभ धरूनी क्षोभ जोडीला, दोष अचरीले साही ॥

काय गती होईल कळेना, लागली आग तनाला ॥३॥

प्रभु वचनाचा भंग करूनि, खूप केली नासाडी ।

गुरू सुहृदा विसरून गेलो, करूनी चाहाडी लबाडी ॥

भानुकवि म्हणे आठवण झाली झाली वृद्धपणाला ॥४॥

 व्यर्थ संसार

(चाल :- अरे बाबा वेळही झोपायची नाहीए काळ तुला अचानक घेउनिया जाई रं)

अरे बाबा आपुलं जगी कोनी नाही रं ।

गीता ज्ञानेश्वरी सारी शोधुनिया पाहि रं ॥धृ०॥

तनमन आपूनि लाग गुरु पाई रं ।

संसारात सुख नाही करी चतुराई रं ॥

भावभक्ती वाढउनि उद्धरूनि जाई रं ॥१॥

आमोलीक देह तुझा मातीमोल होई रं ।

तुझ्या संगे कोणीसुद्धा येणारच नाही रं ॥

विषयाची गोडी सोडी प्रभुनाम घेई रं॥२॥

कवडीचं काम नाही मुखामध्ये नाम नाही ।

आशाने सांग तुझं पुढं कसं होई रं ॥

काळाचा काळ यम तुझा सुड घेई रं ॥३॥

कर्मकहानी लिहीता पुरेना शाई रं ।

नरदेह पुन्हा पुन्हा मिळणार नाही रं ॥

भानुकयि म्हणे तू प्रभुगुण गाई रं ॥४॥


सुखापाई दुःखभोग ....

(चाल :- सदर)

आरे बाबा संसारात सुख नाही नाही रं ।

सुखापाई दुःख भोग भोगतोसी लई रं ॥धृ०॥

सुक सुक करूनिया धोबी कपडे धुइरं ।

घाम गाळून कस ढसढसा पाणी पेई रं ॥

आळे पिळे देउनिया परेशान होइ रं ॥१॥

अन्न नाही वस्त्र नाही उघडा फिरे घाई घाई ।

शिळे ट्रकडे खाई म्हणे मला भूक नाही रं ॥

सर्वा परिवार रडे तोंडाकडे पाहि रं ॥२॥

मधमाशी मकरंद जमउनी ठेवि ठेवि।

एकलाची आचनक घेऊनिया जाई रं ॥

तैसे धन कण चोर एकलाची नेई रं ॥३॥

सुखासाठी कष्ट करी दादा आनी बाई रं ।

सुखाचा किंचित लवलेश नाही रं ।

भानुकवि म्हणे सुख प्रभु विन नाही रं॥४॥


संसारा सुख नाही

(चाल :- देखो दुनिया सारी माया के मारे)

संसारात नाही नाही रे सुख नाही नाही ॥धृ०॥

सुखदुःखाची मिसळ भेसळ न कळे या जीवाला ।

पदरचा घालुन घालुन मसाला, कडु कारल्याला खाई ॥१॥

कडू भोपळा खाऊन मोकळा म्हणतोय किती तरी गोड ।

कडू इंद्रावन गोड म्हनूनी चाखून चोखून खाई॥२॥

खाऱ्या आडाचे खारेच पाणी कितीही उपसुनि काढा ।

त्या उदकाला बळेच पेऊन म्हणतो इलाज नाही ॥३॥

भानुकवि म्हणे दुःख भोगुनी देतो सुखाची ग्वाही ।

दुःख जानुनी छातीतानुनी ताव मिशावर देई ॥४॥


दानाचे महत्व

(चाल : आब काहे कू धूम मचाते हों)

धर्म करा दानधर्म करा रे धनकण वाटूनी द्या रे।

देवाचे नाम स्मरा रे देवाचे नाम स्मरा रे ॥धृ०॥

दानधर्म आणि नाम प्रभुचे। दोन्ही बहुमोलाचे ।

पातक जळती जन्मांतरीचे। दूरकरीताती भवा रे॥१॥

दूर दूर पळती विघ्न संकटे। शत्रू भय जरी मोठे॥

नम्रची होती दुर्जन खोटे । लागती पाई तुझ्या रे॥२॥

आचरण करीता सन्मार्गाचे। सुखरूप जीवन त्यांचे।

दर्शन होईल भगवंताचे। आनुभव घेई नरा रे॥३॥

ब्रह्मज्ञान तुमचिया हिताचे। ऐका भानुकविचे।

प्रपंचात राहुनि जीवाचे। सार्थक होईल सारे॥४॥

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post