सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिन महोत्सव तथा अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिक
नाशिक येथे दिनांक २९ ते ३१ ऑगस्ट २०२२ रोजी होत असलेल्या देश पातळीवरील सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवतार दिन महोत्सव तथा अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिक
निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्ताचे आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत दंडवत...sd
"माडूतही उठले तरंग: इथे शरण आलेया......."
"सत्व, रज, तम" या गुणांच्या वृत्तीच्या सहाय्याने ह्याने मानवी जीवन फुलत फलत आणि जळून भस्मही होतं म्हणूनच संत कबीर म्हणतात.......
"अहं अगनी ही रदे जरे, गुरु सौ चाहे मान"
"तिंनको जम नौता दिया, ही हमारे मिहभान."
मानवी मनात त्यांच्या हृदयात अंतकरणात अहंकाराचा अग्नी जळतच राहतो, असा अहंकारी, गुरुकडून देखील मान सन्मानाची अपेक्षा करतो, अशी व्यक्ती निश्चितच आपल्या अंताला आमंत्रित करत असते. असं समजायला हरकत नाही. म्हणजेच तो स्वतःच स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देत असतो. मानवी स्वभावाचं वर्णन संत कबीरांनी या दोह्यातून मोकळेपणाने केलेले आहे. म्हणूनच मानवाला संस्कारक्षम बनवण्यास खऱ्या श्रीगुरुजी नितांत आवश्यकता असते. गुरुचे महात्मे या दोह्यात सांगतात...
" गुरु महिमा गावत सा, मन राखे अती मोद"
"सो भव फिर आवै नहीं, बैठे प्रभू की गोद."
जे लोक गुरुच्या गुणांचे गान करीत करीत कौतुक करीत करीत सदैव आनंदी राहतात. ते या लोकातील, जगातील प्रपंचातून मुक्त होऊन परमेश्वराचे सत्य स्वरूप प्राप्त करतात. म्हणजेच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. मानवी हृदयाला अपार शांती प्राप्त करून देणारा असा हा दोहा आहे...
या दोह्याच्या अनुषंगाने तेरावे शतकातील त्या अवतारी महात्म्याचे वर्णन झाल्याशिवाय राहत नाही. श्रीगोविंद प्रभू आमचे चौथे पंचकृष्ण अवतार रिद्धपुर येथे वास्तव्य करून दीन दुबळ्यांवर कृपादृष्टीचा वर्षाव करून त्यांच्या दुःखाला शितल करीत. आमचे पाचवे पंचकृष्ण म्हणजेच सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांनी श्रीगोविंद प्रभू कडून परावर शक्ति स्वीकारली. त्यांनी ती सुद्धा "शेंगोळे" च्या प्रसाद माध्यमातून सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभुंना हे नावही दिले ते श्रीगोविंद प्रभूंनी ....
"हा तर म्हणे या चक्रया होय" ...... होय चक्रियाच होय. या घटने पर्यंत हरीपाळ देव होते भडोचचे राजपुत्र...
तेव्हापासूनच त्यांनी श्रीगोविंद प्रभुंना हृदयात आगळ्यावेगळ्या भावाने सामावून घेतलं आणि त्यांनी सालबर्डी ची वाट धरली. अतिउदासी प्रभाव वाढला मनात व स्वीकारलं मौनत्व स्वीकारलं. कि र्र जंगलातून विहरण चाले, परंतु मनाला ध्यास वेगळाच लागला. एकाकी भटकंतीनंतर पुन्हा ते श्रीगोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी रिद्धपूरी आलेत. त्यांच्या दृष्टीने रिद्धपूर म्हणजे परमेश्वर पूरच होतं. काही दिवस ते रिद्धपूर येथे राहिलेत. यावेळी श्रीगोविंद प्रभू साठी एक शेतकरी शेतातील हुरडा, सोलाना, निंबूर असे खाद्यपदार्थ आणि, पाणी आणून ठेवीत असे. श्रीगोविंद प्रभू बरोबर त्यांनी तो प्रसाद त्यांचा म्हणून सेवन केला कबीर यांच्या भाषेत सांगायचं झालं तर....
"गुरु मुरती गती चंद्रमा, सेवक नैन चकोर"
"आठ प्रहर निखत रहे, गुरु मुरती की और."
गुरुमूर्तीला चंद्रासारखे आणि शिष्याच्या डोळ्यांना चकोरा समान म्हटलं आहे. ज्याप्रमाणे चकोर भावाने व्याकुळ होऊन चंद्राला न्याहाळत असतो. त्याप्रमाणे शिष्याने देखील आठही प्रहर म्हणजेच सदैव श्रीगुरुचरणी समर्पित राहावयास हवे.
यातील "भाव" महत्त्वाचा आहे. कारण श्रीगोविंद प्रभूच्या सानिध्याची श्रीचक्रधर प्रभूंची ओढ वाढतच होती. हा त्यांचा सुरुवातीचा काळ होता. उदासीनतेचा प्रवास होता. श्रीगोविंद प्रभूंच्या या भेटीनंतर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी प्रभू पुन्हा विराज झाले. त्यांनी जंगलाची वाट धरली. सालबर्डीच्या त्या किर्र.. जंगलात एकांकी विहरू लागले. काटे, गोटे तुडवत अनवाणी फिरत होते. "एक राजकुमार सामान्य जीवांच्या कल्याणासाठी आपल्या अमूल्य विलासी जीवनाचा त्याग करून नदी, नाले, दर्या, दरकुटे, डोंगरात काहीतरी शोधत होते काहीतरी शोधत होते." कुणाला न कुणाला काही देणे असतेच ही मानवी संस्कृती. परंतु सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूनी तर अखिल जीवाच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला होता. श्रीगोविंद प्रभूंनी दिलेल्या प्रसादातून त्यांनीही भाव-भावना प्राप्त झालेली होती...
सालबर्डीच किर्र......., दाट जंगल, झाडांना वेढून वाढलेल्या वेली, बोरी, बाभळीची काटेरी झुडपं, त्यातून चालत राहण. दिसतील त्या वनपुत्राशी दृष्टीभेट त्यांनी जी कंदमुळे हातावर ठेवलीत तीच खायची. नदी ओढ्याचं वाहत जल पाषाण करायचं. या जंगलातील खाच ख, आता तशी सवय झालेली. मौनी अवस्थाच ती.........
एक दिवस असाच उजाडला. एका डोंगर माथ्यावर शांतपणे सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू "मौनी" बसलेले होते. सृष्टीतील जीवांसाठीच चिंतन करीत. समोर मांडू नदीचे निर्मळ पात्र. त्यातील जल आपल्या वेगाने झरझर वाहत होतं. मधूनच एखादा प्राणी जिवाच्या भीतीने पाण्यावर तहान भागवण्यास यायचा, मार्गी लागायचा, बगळ्याचं भिरभिरणं पाण्यातील "मौन" वर नजर ठेवून सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू आपल्या चिंतनात...
जंगलात शिकारी पारध्याचे ढोल वाजत होते. शिकारी कुत्री त्यात जोरजोरात भुंकत होती. एक युवलासा जीव, जीव मुठीत घेऊन जीवाच्या आकांताने शिकाऱ्याच्या तावडीतून सुटण्यासाठी धावत होता. ती शिकारी कुत्री त्यांच्या मार्गावर होती. कुत्र्याचे भुंकणे आणि ढोलाचा कर्कश्य संपूर्ण जंगलाला हादरून टाकणारा तो आवाज...! हा ईवलासा पांढरा ससा.. पळतोय..... पळतोय.... झाडा झुडपांमधून रस्ता शोधतोय. संरक्षणासाठी जागा हवी आणि त्याला जागा मिळाली. तो सरळ सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या मांडीखालीच येऊन शांत झाला. त्याला विश्वास आला. आता आपलं कोणी काही बिघडवू शकत नाही. तो धावून धावून थकला होता.
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूनी हळूच त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला आश्वासित केलं. तोपर्यंत शिकारी कुत्री भुंकत$$$$ भुंकत त्या ठिकाणी पोचली पोहोचलीत. मागोमाग शिकारी पारधी पोहोचलेत. आणि सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंना ते सशाची मागणी करू लागले. "आमची ती शिकार आहे आम्हाला देऊन टाका." सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी त्यांच्यावर नजर टाकीत त्यांना विचारलं.... हा तर अतिशय गरीब प्राणी, त्यांना असं कोणतं नुकसान केलंय की तुम्ही त्याच्या जीवावर उठलात... तसं नाही शिकार हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्ही वनात जीवन कंठणारे, आमचे जीवन इथल्या वनातल्या संपत्तीवर चालतं. हा ससा या वनातील आहे. आमची तो शिकार आहे. आपण त्याला आमच्या स्वाधीन करावं...
तेव्हा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू म्हणतात... "या सृष्टीत सर्वांनाच निर्भयतेने जगण्याचा अधिकार आहे". आपल्या कुणालाच कुणाच्या जगण्याचा अधिकार हिसकावून घेता येत नाही. अन हा अधिकार तर निरूपद्रवी प्राणी जितक्या निर्भयतेने तुम्ही जगता आहात तेवढ्याच निर्भयतेने त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. आणि तसा तो आमच्याकडे आला संरक्षणासाठी तेव्हा. काय आमच्या शर्यतीच्या तो ससा शिकार आहे. आम्हाला तो हवाच अशा प्रकारे शिकारी तसे हाताला पेटले होते.
पण जी शिकारी कुत्री आपल्या भुंकण्याने संपूर्ण जंगलाला हादरून टाकीत होती. ती सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या समोर येतात चूप झाली होती. ज्या सशाच्या पाठीमागे ती पळत होती. ती कुत्री समोर ससा असूनही चुपचाप सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या चेहऱ्याकडे पहात तिथे बसली. कदाचित त्या चार पायाच्या प्राण्यांना सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंची भाषा कळली असावी. पण शिकारी...... त्यांना आपली शिकारच दिसत होती...
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी त्यांना आपल्या मधुर वाणीने सांगितलं हा ससा आता आमच्याकडे रक्षणासाठीच तर आलाय. तो तुम्हाला कसा मिळेल..? "इथे शरण आलेया काई मरण असे"... हे वाक्य निसर्गाने केलेलं हा तर आमच्या जवळ आलेला. त्याचं रक्षण करणं हे आमचं आद्य कर्तव्यच आहे. "इथे शरण आलेया काई मरण असे"... हा उद्घोष त्या अरण्याने ऐकला सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंचे जे चिंतन ध्यास घेऊन चालले होते. ते होतं प्राणीमात्रांचं रक्षण. प्राणी मात्रावर दया करा, त्यांची हत्या कारण नसताना करू नका. हा महत्त्वाचा संदेश त्यांनी मानवाला दिला. त्या पारध्यांनीही ते पटलं.
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या श्रीमूर्तीच्या दर्शनाने आणि त्यांच्या उपदेशाने शिकारी पारध्यांची "हिंसक" वृत्ती पालटली. क्षणभर ते स्तंभित होऊन पाहताच राहिले. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या चेहऱ्यावरील दया, करुणा पाहून पारधी नतमस्तक झालेत. त्यांच्या मनावर सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या त्या प्रेमळ वाणीचा परिणाम झाला. त्यांच्या वाणीतील दया दर्तेचा झरा पारध्याच्या मनाला ओलाचिंब करून गेला. आणि त्यांच्या हृदयात सात्विक तेच बिजारोपण झालं. ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे सेवक बनले...
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंच्या मुखातून निघालेलं सालबर्डीच्या जंगलातील ते अमर वचन, अमृतमय वचन विश्वातील संपूर्ण मानव जातीला जागृत करून गेलं. आज त्या वचनाची सत्यता मानवाच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी सशाचं रक्षण करत असतानाच जंगलातील प्राण्यांना अभय दिलं एक प्रकारे, सोबतच वनराज्यातील संतुलनाला यामुळे मदत झाली. पर्यावरण संतुलन शब्दाविना राखण्याचा संदेश मिळाला. म्हणूनच आजच्या काळात शासनाने ही जंगली प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घातलेली आहे. जंगलातील वृक्षतोड कायद्याने बंद करण्यात आलेली आहे. यासर्व कृतीची "बीज" रुजली आहेत ती सालबर्डीतील सुमारे आठशे वर्षांपूर्वी स्वामींनी दिलेल्या संदेशात "इथे शरण आलेया काई मरण असे"...
हिंसा आपल्या हातून कधीच घडू नये हे श्रीचक्रधर प्रभूंच शाश्वत तत्त्व मानवी जीवनाला मांगल्याची झालं लावणार आहे. आपल्या हातून कुठलंही वाईट कर्म घडू नये, स्वामी तर सांगतात तुम्ही चुकूनही कुणाची कटू बोल बोलू नका. मन दुखवू नका, शस्त्र चालवून कुणाला घायाळ करणं, त्याला इजा पोहोचवणं हे तर दूरच दूर...
सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी त्यांना आपल्या मधुर वाणीने सांगितलेलं... "हा ससा आता आमच्याकडे रक्षणासाठीच तर आलाय, तो तुम्हाला कसा मिळेल ? इथे शरण आलेया काई मरण असे" !SSSS हे वाक्य निसर्गाने पेललं. हा तर आमच्या जवळ आलेला. त्याचं रक्षण करणे हे आमचं आद्य कर्तव्यच आहे. इथे शरण आलेया काई मरण असे" ! हा उद्धघोष त्या आरण्याने ऐकला. स्वामींचे चिंतन ध्यास घेऊन चाललं होतं ते होतं प्राणीमात्राचे रक्षण.
सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा महानुभाव धर्म म्हणजेच "मानवतेचा धर्म" त्यांची आजच्या या हिंसक वृतीच्या काळात नितांत गरज आहे. त्यांच्या निदान पाच वचनांना धरून जरी जो आचरण करत असेल, तरी समस्त मानव जातीकडून कल्याण साधं जाईल. म्हणूनच तर अंत करणी रुजावीत ती वचन जी प्रत्यक्ष सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभूंनी आचरलीत आणि रुजवीलीत म्हणूनच ती "परमेश्वरोक्ती" आहेत परमेश्वर मुखातून निघालेली आहेत. म्हणून मानवी जीवन कल्याणासाठीच ती प्रसारित होण्याची आवश्यकता आहे. काळाला ओळखूनच मानवाने आज स्वीकार करावीत....
अशी आजच्या या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव तथा अखिल भारतीय महानुभाव संमेलन नाशिक आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी प्रार्थना...
लेखन... परमार्ग सेवक श्रीसुरेश देवराम डोळसे,