थोर महानुभाव व त्यांचे कर्तृत्व महंत श्री भिमराज दादा लखापति महानुभाव कवीश्वर mahanubhav

थोर महानुभाव व त्यांचे कर्तृत्व महंत श्री भिमराज दादा लखापति महानुभाव कवीश्वर mahanubhav

 थोर महानुभाव व त्यांचे कर्तृत्व

Mahanubhav 

 ई. महंत श्री भिमराज दादा लखापति महानुभाव कवीश्वर यांचा अल्प परिचय 

संताचे चरित्र वाचता ।  पापे नासति सर्वथा ।


वन्दे श्रीचक्रधरम्

          महानुभाव पंथाचे थोर संत कै. परम दरणीय महोपदेशक पुजनींय ई. महंत श्री भिमराज दादा लखापति महानुभाव कवीश्वर यांचा अल्प परिचय व भावपूर्वक विनम्र अभिवादन

         


इ. स. १९१४ साली विदर्भात अंचलवाडी
, ता. जि. अमरावती येथे एका समृद्ध तेजस्वी व चारित्र्यवान क्षत्रिय मराठा जाधव कुळात पितें श्रीकृष्णराज लखापति महानुभाव यांचे पासून माता मनाईचे पोटी भिमराज दादा लखापति यांचा जन्म झाला. बाळपणी संगोपन संवर्धन मराठी चवथ्या वर्गापर्यंत शिक्षण स्वगृहीच झाले. नंतर पुढील मॅट्रीक पर्यंत शिक्षण चांदुर बाजार येथे काका श्री डॉ. प्रभाकरराव शेवलेकर यांचे येथे झाले. नंतर पूर्व दैवयोगाने व अत्त्युच्च संस्काराच्या प्रभावाने त्यांनी वडिलांचे व मातोश्रींच्या आज्ञेने आजी आई महान तपस्वीनी यमुनाबाई यांना निमीत्त करून अमरावती राजा पेठ, महानुभाव आश्रम येथे प. म. पु. श्री मुरलीधर दादा उर्फ कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा यांच्या हस्ते महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञान मंतव्यानुसार स्वेच्छेने संन्यास दिक्षा सन १९२९ साली घेतली नंतर ब्रम्हविद्येचा (महानुभाव तत्त्वज्ञानाचा) सांगोपांग अभ्यास या आश्रमात व (प. पु. प. म. श्री गोविंदराज बाबा उर्फ दर्यापुरकर बाबा मुरलीधर पंजाब यांचे आश्रमात) दादा उर्फ शेवलेकर व प. म. प. पु श्री बाबा यांचे आश्रमात राहून पूर्ण केला नंतर धर्मप्रचारार्थ ते बाहेर पडले. (जालना) डूननळवाडी ता. दिंडोरी (नाशिक) येथे ते लोकाग्रहास्तव स्थायीक झाले. या महाभागाला पूर्वभाग्याने व ईश्वरी महान एक छंदी प्रज्ञा सुद्धा लाभली होती आणि विशेष अद्वितीय महान अधिकरणांचे सेवा सान्निध्यात लाभल्यामुळे त्यांना पुर्ण परावरज्ञान आत्मसात झाले व ते आचार विचारांतही निष्णांत झाले. ते एक महानुभाव पंथाचे विख्यात पंडित म्हणून प्रसिद्धी आले त्याच्या अंगी अनेक सद्‌गुनांदत होते. त्या पैकी विशेष निराभिमानता, नम्रता, निर्भेळ, शुद्ध प्रेम, भावुकता, उदारता, सरळता व अमृततुल्य गोड सुभाषित बोलून आलेल्या व्यक्तिना ते शांत करीत होते. व स्वधर्माचा जाज्वल्य अभिमान व स्वधर्म प्रचाराची तथा प्रसाराची अहोरात्र तळमळ हे गुण प्राधान्याने त्यांचे ठायी वसत होते.

          त्यांच्या या महान सद्गुणाच्या प्रभावाने जनमत त्यांच्याकडे न कळत सहजच आकृष्ट होत असे व पुनः गीता भागवत महाभारत महानुभाव तत्वज्ञान यांचा उपदेश ते आपल्या अमृततुल्य गोड वाणीने जनतेला करीत असत त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांना फारच आपुलकी व प्रेमादर वाटून त्यांचे म्हणणे ते त्वरीत ऐकायला तयार होत अशी त्यांचे ठाई लोक आकृष्ट करण्याची अजबकला व देवीसामध्ये होते त्यामुळे असंख्य शिष्य त्यांचे नाशिक विभागांत झाले.

          नळवाडीचें श्रीदत्त मंदीरात ४०० वर्षाचा बृहद ग्रंथ श्रीकृष्ण लिलामृत हा चाईच्या भक्ष्यास बळी पडला होता तो पाहून श्रीमहंतजीचे मन व्यथीत झाले तो पुनः लिहून काढला श्रीदादांनी गांवोगांवी फिरून शुद्ध प्रति मिळविल्या व शुद्ध ग्रंथ लिहून काढला तनमनाने धनाने झीजून हे परोपकाराचे धर्म सेवेचे हे महान ग्रंथ जिर्णोद्धाराचे कार्य त्यांनी केले. तो ग्रंथ अजून पर्यंत नळवाडी क्षेत्रात विद्यमान आहे ग्रंथ जो पर्यंत आहे तो पर्यंत आमचे दादा अभिनंदनास पात्र आहेत.

          परम पुज्य श्री दादांच्या सहवासात जे जे शिष्य राहिले त्यांना त्यांचे महान दैवीं सद्गुण प्राप्त झाले. त्यापैकी प्रमुख शिष्य ननाशीकर भक्त शिरोमणी सद्भक्त पांडूरंग चिमणाजी गायकवाड यांनी तर आपल्या श्रीगुरुच्या पावलावर पावूल ठेऊन श्रीगुरुच्या आदेशाप्रमाने मोठ्या धडाडीने कोकण विभागात मुंबईपर्यंत व वायव्य दिशेस सुरत गुजरातपर्यंत महानुभाव धर्माचा जागोजागी सभा सम्मेलने घेऊन व चर्चा मंथन करुन सपाटून प्रचार केला व प्रतिस्पर्धाचा खपुंस समाचार घेतला हे सर्वत्र प्रसिद्ध आहे.

          कमीतकमी १००० तरी शिष्य गण त्यांनी धर्माचे बाळकडू पाजून पक्का महानुभाव पंथाचा बनविला काही जरी कोणी धर्मावर संकट आणले किंवा धर्माचा कोणी उपहांस केला तर श्रीपांडूरंग दादा तेथे धावून जातात व प्रतिस्पर्धाला शास्त्रचर्चेने नमवितात व जय घेतात असा त्यांचे श्रीगुरुचा त्यांचे मस्तकावर अभय वरद हस्त आहे. त्यामूळे त्यांच्यावर महाराज श्रीचक्रधर स्वामी रोम-रोम खुष आहेत या परमेश्वर धर्माच्या प्रचाराने व प्रसाराने परमेश्वर श्रीचक्रधर स्वामी त्यांना प्रेमदान देणार हे निश्चित कारण त्यांना प्रेमाच्या चौदा उपाया पैकी हा एक प्रेमाचा उपाय घडला म्हणून सांगतो वास्तविक हे पुर्वी वारकरी पंथाचे कट्टर अनुयायी होते. पण हे सत्य संशोधक व चिकित्सक बुद्धीचे असल्यामुळे त्यांना पुर्वीच्या बलवान सुसंस्काराने या धर्मात सत्य परमेश्वर कोण आहे. हे तत्व सांपडले म्हणून त्यांनी या धर्माचा स्विकार केला. व या सत्य धर्माचा ते हिरिरिने प्रचार व प्रसार करून राहिले आहेत. त्यांना हे महान परमार्थाचे पवित्र कार्य करण्यास परब्रम्ह परमेश्वर श्रीचक्रधर महाराज चीर रोग्य व उदंड आयुष्य देवो असे अशी प्रार्थना करतो. सर्व श्रेय त्यांच्या श्रीगुरुलाच आहे हे उघड व निर्विवाद आहे.

          तसेच श्री दादांचे दुसरे प्रिय शिष्य एकनिष्ट गुरुभक्त व दैविसंपत्तींनी नटलेले सदाचार संपन्न सद्भक्त यशवंत सुकदेव नाईक उमराळे येथील आहेत पण ते सुशिक्षित असल्यामुळे व सर्विसमुळे नाशिकलाच स्थायीक झाले आहेत. हेही मोठे धर्माभिमानी विद्वान संशोधक चिकित्सक आहेत व उदार हृदयी सौज्यन सिंधू आहेत यांनीच आपल्या श्री गुरुंच्या स्मरणार्थ या ग्रंथ प्रकाशनाची जबाबदारी स्विकारली असे दोन्ही हि हे शिष्य श्री दादांची धर्माची परंपरा उज्वल रितीने चालवित आहेत धन्य ते गुरु व धन्य हे शिष्यद्वय श्रीदादा अमरावतीला १९७२ साली कैवल्यवासी झाले. त्यांच्या निधनाने हा नाशिक जिल्हा पोरका झाला. एका महोपदेशकाला अंतरला अजून सुद्धा त्याच्या विराट पर्व निरुपणाची अजब शैली व मंजुळ अमृततुल्य गोड आवाजाची तान माझ्या कर्णेंद्रियात व हृदयात घुमत आहे व मनास रंजन करित आहेत. अशा या महान ईश्वर भक्ताचे गुण कितीक वर्णन करावेत, वर्णन केले तितके थोडेच आहेत.

          त्यांच्या आठवणीने अजून देखील माझे हृदय दुःखाने भरुन येते ते अंतःकाळी सुद्धा शुद्धोवरच होते शेवटी श्रीचक्रर नामाचे स्मरण करित करितच त्यांनी देहाचा त्याग केला व असती परिच्या स्वामित ते मिळाले अशा त्या महापुरुषास भाव पुर्वक शतशः विनम्र अभिवादन.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post