वैराग्य मूर्ति सोमनबास व त्यांच्या तीन इच्छा कोणत्या?

वैराग्य मूर्ति सोमनबास व त्यांच्या तीन इच्छा कोणत्या?

 

आमचे पूर्वज

वृद्धाचार

सोमनबास

            विसावे शतक पूर्ण झाले असून एकविसाव्या शतकाचा पहिला प्रहर आला आहे. शतकाच्या आणि सहस्रकाच्या मध्यंतरामध्ये काळाचे भविष्य दडले आहे. वर्तमान परिस्थिती लक्षात घेता भविष्याच्या कल्पनेनं अंग शहारून जातं. भूतकाळाच्या विचाराअंती पूर्वजांच्या आठवणीत मन हरवून जातं एकूणच परिस्थितीच्या गांर्भीयतेची परिसीमा ओलांडलेली दिसत आहे.

     परंतु 'इच्छा तिथे मार्गया विचाराच्या आडोशाला उभे राहून परिक्षण केले तर पूर्वजांचा सदाचार दृष्टीस पडतो. आणि मनाला विरंगुळा मिळतो. आज सर्वत्र न्यायनितीधर्मसदाचारसहिष्णुता या सर्व वैश्विक मूल्यांची पायमल्ली होत आहे. अन्याय भ्रष्टाचाराला उधाण आले आहे. तरूण पिढीमध्ये भोगवाद घर करून बसला आहे. याचे कारण महानुभाव पंडितांनी फार पूर्वीच सांगितले आहे. 'कळी म्हणजे आकळी' 'सत्वाते धर्मातेम्हणजे कलियुगात सत्वगुण आणि धर्मबुद्धी आकूंचन पावते. कलीयुग शद्वाची व्याख्या करतांना वरील विचार महानुभाव पंडितांनी मांडले आहेत. ते सर्वतोपरी सत्य आहेत. 

सत्वगुण आकुंचन पावत आहे. धर्मबुद्धीचा प्रकाश तेल संपलेल्या दिव्याप्रमाणे मावळत आहे. कळपातून चुकलेल्या मेंढराची परिस्थिती व्हावी तसा हा मानव अज्ञानाच्यास्वार्थाच्याअसत्याच्या अरण्यात दिशाहीन होऊन भरकटत आहे. परंतु हेही तितकेच खरे आहे की या सर्व भवार्णवातून सावरण्यासाठी तोच समर्थ आहे. कारण विवेकबुद्धी मानवाकडेच आहे. 

बुद्धीस्वातंत्र्याने विचारं करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि म्हणून आजच्या मानवाने भूतकाळात जाऊन महानुभाव महानुभाव पूर्वजांच्या आकाशगंगेत अनेक तारे आहेत. उदा. श्री नागदेवाचार्यमहीमभट्टभास्कर भट्टकेशीराज व्यासआनेराज व्यासपरशराम व्यास आणि सोमन बासदेमनबास. परंतु सोमनबास आणि देमनबास यांच्या जीवन चरित्राचे सिंहावलोकन केले तर त्यांच्या जीवनाला एका साधारण घटनेनं कलाटणी मिळून जीवनात अमुलाग्र बदल झालेला दिसतो.

     सोमनबास आणि देमनबास हे सख्खे भाऊचांगले जमिनदार होते, परंतु त्यांचे परस्परांमध्ये कट्टर वैर होते.  दोघांनी एकमेकांचे तोंड न पाहण्याची जणुकाही प्रतिज्ञा घेतली होती. पुढे हे त्यांचे वैर वाढत जाऊन ते एकमेकांचा वध करण्यापर्यंत पोहचलेदोघांतून कुणीच माघार घेण्यास तयार नव्हते. दोघेही एकमेकांना संपविण्याचा कट रचत होते. दरम्यानच्या परिस्थितीत महानुभाव पंथाचे पारमांडल्य आम्नायाचे आचार्य  श्रीआनोबास  त्याच गावच्या  शिवारात आपल्या शिष्य मंडळीसह उतरले होते.

     प्रातःकाळी आनेराजबास आपल्या शिष्यांना हिंसा निषेधाविषयी निरूपण करीत होते. निरूपणाचा विषय होता 'मनुष्याने मनुष्याची हिंसा केली तर काय होते?' इकडे त्याचवेळी सोमनबास-देमनबासापैकी वडील बंधू सोमनबास प्रातर्विधीसाठी त्याच ठिकाणी येऊन पोहचले. महात्माजींचे निरूपण अंतिम सिद्धांतापर्यंत येऊन पोहचले होते. महात्माजींनी निर्वाळा दिली की मनुष्याने मनुष्याची हिंसा केल्यास तो जीव महाभयंकर घोर नरकामध्ये पडतो. 

कित्येक शतके त्याचे दु:खामध्ये निघून जातात. आणि हे सर्व निरूपण स्तब्ध होऊ न सोमनबास झाडाच्या आडोशाला उभे राहून ऐकत होते. हिंसेबद्दल शेवटचा निर्णय सोमनबासांनी ऐकला. त्यावेळेस तुफान वादळी पावसामध्ये ढगाळलेल्या अंधाऱ्या रात्री अकस्मात एखादी विज कडकडावी आणि त्या प्रकाशामध्ये सर्व आसमंत उजळून निघावे असाच प्रकार सोमनबासामध्ये घडला होता.        

आनेराजबासांचे निरूपण ऐकून सोमनबासाचे हृदय पश्चातापदग्ध झाले. पाषाणाला पाझर फुटावा तसे सोमनबास अनुताप करीत आनोबासांच्या जवळ येऊन नतमस्तक झाले. आणि तेच निरूपण पुन्हा करण्यास सांगितले. यावर आनोबासानी सांगितले की, 'बाबा रे! महानुभावाचे शास्त्र निरूपण ऐकण्यासाठी सप्त व्यसनांचा त्याग करून अधिकृतरित्या गुरूमंत्र घ्यावा लागतो. त्याशिवाय हे शास्त्र सांगता येत नाही. सोमनबासाने हे सर्व मान्य केले व आपल्या भावाशी असलेले वैरही कथन केले. त्याला मारणार होतो ही कबुलीसुद्धा त्याने त्या संतासमोर दिली. 

परंतु आनोबासांनी त्यांना एक अट घातली की तुम्ही तुमच्या भावापुढे क्षमा मागावी आणि नंतर आमच्याकडे यावे. दुसऱ्या दिवशी सोमनबासांनी आपले दोन्ही हात दोराने बांधले आणि तोंडात गवताची काडी धरून लहान भावाची क्षमा मागण्यास त्याच्या वाड्यावर गेले. वडिल भा अशप्रकारे आलेला पाहून लहान भावास गहिवरून आले आणि गळ्याला मिठी मारून त्याने विचारले, 'अरे दादा ! सांग तुझ्यावर असे कोणते संकट आले आहेकी तू हात बांधून माझ्या दारात आलासमला फक्त आज्ञा कर. मी ते संकट दूर करण्याचा प्रयत्न करीन.'

             उत्तरधृव आणि दक्षिणधृव एका ठिकाणी आले होते. न घडणारे अघटित घडले होते. सोमनबासांनी मागील सर्व परिस्थिती देमनबासापुढे कथन केली. दोघेही पश्चातापदग्ध होऊन आनेराजबासांकडे आले आणि महानुभाव पंथाचा उपदेंश घेतला. तेच दोघे बंधु पुढे महानुभाव पंथाचे थो चर्यावंत झाले. सोमनबासांनी झाडीतळी देह क्षेपले. जे शब्द त्यांनी आता ऐकले होते ते यापूर्वी कित्येकवेळा ऐकले असतील. परंतु या शब्दाला तपश्चर्येची धार होतीशुद्ध चारित्र्याची झालर होती. निर्गुणत्वाचा ओलावा होताहा आदर्श आमच्या तरूणपिढीमध्ये रूजला तर निश्चितच स्नेहवात्सल्यअहिंसाप्रिती निर्माण होईलयात यत्किंचितही शंका नाही.

      संपूर्ण शास्त्राभ्यास करून सोमनबास नित्याटनाला निघालेअटन करत असताना अत्यंतिक वैराग्यामुळे त्यांचे देह क्षीण झाले व त्यांनी पराकोटीचे वैराग्य केलेव ते एका गावी क्षीण होऊन पडलेयोगायोगाने पंथाचे ४थे आचार्य श्रीपरशरामबास त्याच भागात अटनक्रमे आले होतेविजनासाठी बाभळीचे झाड शोधत असताना कोणीतरी श्रीपरशराबासांना सांगितलं की तुमचे एक महात्मे इथं बाभळीखाली क्षीण होऊन पडलेले आहेतपरशरामबास त्यांना पाहायला गेलेपाहिलेदंडवत केला

सोमनबासही अभ्यागत आले म्हणून उठण्याचा प्रयत्न करू लागले पण अशक्तीमुळे उठवेनात्यांनी तसाच लवून दंडवत केलापरमशरामबासांच्या लक्षात आलं की हे पुरुष परमेश्वराच्या स्वीकारात पडलेले आहेतयांना देवानं नेलं कसं नाहीयांच्या काही तरी इच्छा अपूर्ण राहून गेल्या असाव्यातम्हणून त्यांनी सोमणबासांना विचारलं,

‘‘आपण देवाच्या वचनाप्रमाणे देह क्षेपले आहेपण चर्या पुर्ण केली आहेआपली काही इच्छा असेल तर मला सांगा’’‍

     सोमनबास म्हणतात, “माझी कशातच आसक्ती नाहीपण तीन इच्छा आहेत.”

     “कोणत्या?”

रिद्धपूरचं महाद्वाराची रचना शी आहे?

) तापी काठी असलेल्या चांगदेवाच्या मंदिराच्या जगतीच्या सोंडीवर श्रीचक्रधरप्रभू त्रिभंगी उभे होतेती त्रिभंगी मूर्ती कशी असेल?

३) आणि आमचे गुरु श्रीआनेराजव्यास निरूपण करतांना म्हणत असत, ‘परशरामाचं बोलणं गगना गवसणी’ इतके ते परशरामव्यास ज्ञानी आहेत, तर ते परशरामबास कसे असतील?”

     केवढा उत्कट क्षणज्या परशरामबासांच्या दर्शनासाठी सोमणबासांचे प्राण घुटमळत होते ; तेच साक्षात त्यांच्यासमोर उभे होतेपण सोमनबासांनी त्यांना पाहिलेले नसल्यामुळे त्यांनी त्यांना ओळखले नाही.

परशरामबास म्हणाले, “मी तुमच्या त्या इच्छा पूर्ण करतोपण आधी आपल्या ठिकाणी मला काही अन्नप्रवेशन होऊ द्या.” मग त्यांना एका झाडाखाली व्यवस्थीत बसवून परशरामबास भिक्षेला गेलेभिक्षा आणून त्यांना त्यांना खाऊ घातलंमग चांगदेवला श्रीचक्रधरप्रभू त्रिभंगी कसे उभे राहिले असतील ते दाखवलंपरशरामबासांजवळ काष्ठांची पेटी होती. त्या काष्ठांची त्यांनी महाद्वाराची रचना करून दाखवली. लीळांसहीत यथोक्त वर्णन करून सांगितलं. सोमनबासांना खुप समाधान वाटलं. 

आणि शेवटी त्यांनी सांगितलं - परशराम तो मीच!  सोमनबासांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांना परशरामबासांना भावपूर्वक निजल्या निजल्याच दंडवत केला. आणि देवाचे नामस्मरण करत महाद्वार आणि त्रिभंगी मूर्ती आठवतच त्यांनी देह सोडले. धन्य ते दोन्ही थोर महापुरुष! परशरामबासांनी त्यांचा शुश्रुषा विधी केला. व पुन्हा अटन सुरू केले.

असा हा थो महानुभावांचा पुण्यपावन इतिहास

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post