अतिमुर्खपणात व अती अज्ञानांत केलेल्या पापकर्माचे कृत्य, कधीही क्षमा याचनेत पात्र नसते
आम्ही धार्मिक कामानिमित्ताने फक्त श्रीमंत लोकांकडेच जातो असे नाही तर सर्वसाधारण, गरीब कुटुंबातील लोकांकडे झोपडीतही जातो. एक दिवशी असेच एका झोपडीत गेलो. तेथील वातावरण पाहून मनास थोडेसे वाईट वाटले. एवढ्याशा लहान झोपडीत स्वयंपाक करणे, तेथेच स्नान करणे, वगैरे एवढ्याशा जागेतच ते लोक भागत असे. दिवसात लोकांना कामामुळे वेळ मिळत नसल्याने रात्री ८ वाजता त्यांचे तेथे पारायण करण्यासाठी गेलो. तेथे जाऊन त्यांना आपल्या धर्मातील पुजापाठाची पद्धत तसेच पारायण कसे करतात, स्मरण कसे करावे हे सर्व समजावून सांगितले. २४ तासांपैकी आपण जास्तीत जास्त किती वेळ ईश्वरासाठी काढला पाहिजे याचे महत्व त्यांना पटवून दिले. त्यांना ८४ लाख योनींच्या नरकांचे दृष्य अनेक उदाहरणांनी स्पष्ट केले.
यामुळे मला अशी आशा होती की, यापैकी १००-१५० लोक ईश्वर भक्तीत लागतील. उपदेश घेतील परंतु त्यांना ईश्वर भक्ती करण्यासाठी नियम सांगितले- पैकी
१) देवी देवतांची पुजा न करणे, त्यांना शरण न जाणे,
२) मांस, मद्यपान (दारू) इ. व्यसनापासून दूर रहाणे.
हे सांगितल्यावर ज्यांच्या मनी धार्मिकतेविषयी ओढ निर्माण झाली त्या पैकी काही जण म्हणाले, " बाईजी आम्ही देवी देवतांना शरण जाणार नाही त्यांची पुजा वगैरे करणार नाही. परंतु दारू सोडणे, मांसाहार न करणे आम्हास जमणे कठीण वाटते.
हे ऐकून मला फार वाईट वाटले. त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले, "बाईजी, आमच्या येथे लग्न कार्य घरी असल्यावर आमच्या येथे नवीन नवरी ( सून) येते. तेंव्हा आमच्या येथे दरवाज्यावर बकऱ्यास बळी दिले जाते. त्या बकऱ्याच्या रक्ताने तळपाय भिजवून नवी नवरी ( सून) आमच्या घरात ' गृहप्रवेश ' करते आणि बकऱ्याचे मांस सर्वांना प्रसाद रूपाने वाटप केले जाते. त्यामुळे तो आलेला प्रसाद आम्हास खावा लागतो. जर आम्ही असे नाही केले तर आमच्या समाजातील लोक आम्हास जाती बाहेर टाकतात.
त्यांचे हे म्हणणे ऐकून आम्हांस त्यांच्या अज्ञानावर व मुर्खपणावर हसू आले. आम्ही त्यांना समजावयाचे ते समजावले. आम्ही आपणास तुमच्या जीवाच्या कल्याणासाठी जे सांगायचे आहे ते सांगितले यावर आपणच योग्य विचार करा आम्ही यापेक्षा तुम्हांस जास्त काय सांगावे ? हे सांगून झाल्यावर तीन भाऊ व दोन बहिणी असे कुटूंब शूर वीरपणे पुढे आले व म्हणाले, "बाईजी, आपण आम्हांस योग्य मार्ग दाखविला आहे. यातच आमच्या जीवाचे कल्याण आहे. आम्ही आपण सांगितलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करून धर्म आचरण करू. त्यासाठी आम्हांस आमच्या समाजाने जातीबाहेर जरी टाकलेतरी हरकत नाही. त्यासाठी ते जे काही दंड शिक्षा करतील ते आम्ही सहन करण्यास तयार आहोत.
त्यांनी प्रेमपूर्वक भावनेने आमच्याकडून मोक्षमार्गाचा उपदेश घेतला व ईश्वरभक्तीमध्ये लागले.
सुचना
मुलाच्या विवाहात व नवी नवरी घरी येण्याच्या खुशीत बकऱ्यांना बळी देणारे नरकातून कसे सुटू शकतील ते नरकांत आणखीणच गुंततील. तेंव्हा सावधान व्हा व जागरूकतेने नीट वागा.
जेंव्हा आपल्या चाळीत इन्स्पेक्टर व पोलीस येतात तेंव्हा आपण सर्वजण भयभीत होत असतो व विचार करतो की, कोणी तरी आपल्या चाळीतील लोकांनी काही तरी अपराध केला असेल म्हणूनच त्यांना दंड देण्यासाठी आलेले आहे.
माझ्या प्रिय भगिनिंनो आपण केलेल्या अपराध चुकविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा विचार करुन या पोलीसांच्या कचाट्यातुन सुटु शकतो. त्यांना परतवुन लावु शकतो परंतु आपल्या पापकर्मांच्या अपराधांच्या दंडातुन मात्र सुटण्यास कोणत्याच मार्गाचा उपयोग होणार नाही. त्यासाठी जी शिक्षा असेल ती शिक्षा भोगावीच लागेल. त्यासाठी क्षमा याचनेचा उपयोग होत नाही वेगवेगळे अपघात होतात त्यामध्ये कोणाचे पाय फॅक्चर होतात तर कुणाचे हात मोडतात तर कोणास मुका मार लागलेला असतो. यासर्व कारणांनी हॉस्पीटलमध्ये मोठ मोठ्याने ओरडण्याचा विवळण्याचा आवाज चालु असतो. लहान लहान ४ ते ६ वर्षाचे मुलेही हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केलेले असतात कुणांस उलट्या होतात तर कोणांस जुलाब लागतात तर कोणाचे पोट फुगते तर कुणाचे नाक कायम सर्दीने गळते हे. सर्व पुर्वकर्माचे जे भोग असतात ते भोगावे लागतात.
या गोष्टींवर जर आपला विश्वास नसेल तर आपणासारखे नासमज किंवा अज्ञानी आपणच आहोत असे आपणासच मानावे लागेल. कारण आपणच विचार करुन पहा की, या लहान लहान मुलांनी या भूतलावर अद्याप कोणते पापकर्म केले आहे. हे आपणांस शोधणेच कठीण आहे. मग तरी ते अशा पिडांनी गुरफटलेले का? याचे उत्तर मागील कर्माचेच भोग होय. हे जर आपण मानत नसाल तर आपण पूर्वजन्माप्रमाणेच जीवन जगत अहात व पापाचे भांडार भरुन अज्ञानाकडे वाटचाल करीत आहात.
म्हणून भगिनींनो ज्ञानाशिवाय आपणांस आपल्या जीवनात अंधारच अंधार सापडेल. आणि म्हणून ब्रम्हविद्या शास्त्र अवगत केल्याशिवाय श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेल्या वचनांचीही आपल्याला जाणीव होणार नाही.
१ हजारोवेळा आम्ही अनेक मोठमोठे नरक भोग भोगले आहेत की
२ किंवा आम्हांस हजारो वेळा कुत्रा, डुक्कर, गाय, बैल, यासारख्या हीन योनीमध्ये सडकांवर भुक्कं, नंग्यापायाने वनवन फिरावा लागते आणि वेळप्रसंगी अनेकवेळा दंडुक्याचा चोपही खावा लागतो. मागील पापकर्मानुसार आपण या योनींचेही भोग भोगुन आलो आहे कारण आपल्या पापपुण्याची कर्म फाईल ईश्वरीय देवताशक्ती जवळ आहेत त्या आपल्या गुन्ह्यांचे (पापांचे) वाचन करतात व आपणांस शिक्षा देण्याचे ठरवतात. शिक्षेच्या स्वरुपाप्रमाणे दंड देऊन आपले कंबरही वेळप्रसंगी मोडुन काढतात. या यातनांचा विचार करा व मनास बोध घ्या.
यातुन वाचण्याचा मार्ग श्रीचक्रधर स्वामींनीच स्पष्टपणे आपणांस दाखविलेला आहे. त्यासाठी त्यांनी मात्र अट आपणांस घातली आहे की, 'आपल्याला देवी-देवता, पीर-फकीर, गुरु या सर्वांना सोडुन माझ्याचरणी अनन्यभावे शरण यावे लागेल. आणि त्यासाठी प्रायश्चित्य करुन आपण आपले पापकर्मही नासावे लागतील.
शरण आल्यावर आपणांस फक्त ३ तांस श्रीचक्रधर स्वामीजींनी नाम स्मरण रुपाने संसारमोहातुन बाहेर पडुन मागितलेले आहेत. परंतु आज आम्ही अनेक वावड्या उठवुन वेळच नाही असे सांगुन वेळ निष्कर्माकडे निभाऊन नेतो. मग आपल्या पापांचा कर्मनाश कसा होणार. उलट आपण जास्त दंड भोग-भोगण्यास पात्र बनत जाणार. तो | चुकविण्यासाठी पहाटे ३ वाजल्यापासून ते ६ वाजेपर्यंतच्या काळ २ ते ३ तास माझ्यासाठी खर्च करावा असे स्वामी श्रीचक्रधर महाराजांनी अवाहन केलेले आहे.
दिक्षा घेणे जरुरीचे का आहे?
आपण या चराचर सृष्टीमध्ये युगायुगांमध्ये जन्म-मरणाच्या फेऱ्यातुन अनेक धक्के खाऊन आलो आहोत. यापुढेही सावध न झाल्यास तशाच चक्रव्युहात अडकुन पडणार आहोत. यासाठी भगवान श्रीचक्रधर स्वामींनी आपल्या संसार चक्राच्या मोहपाशातुन कायमस्वरुपाने मुक्त करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग दाखविलेला आहे. आपण जर या मार्गाचा स्वीकार केला तर परमेश्वरापासून "पूर्ण आनंद" मिळवण्यास पात्र होतो.
लग्न होण्यापूर्वी जर साधकास ईश्वरीय ज्ञान प्राप्त झाले तर आपले सर्वस्वी यौवन देह ईश्वरास अर्पण केले तर त्यास पूर्णआनंद लवकर प्राप्त होते. जर लग्न झाल्यावर ज्ञान प्राप्त झाले तर ४० प्रकारच्या व्याधींनी शरीर ग्रासले जाते. अशा मलीन व रोगांनी पोखरलेल्या शरीरालाही परमेश्वर सांभाळुन घेण्यास तयार असतात. असा स्वीकार वयाच्या ५६ व्या वर्ष पर्यंतच मात्र ईश्वर वाट बघतात. त्यानंतरच्या जीवाबाबत मात्र स्वामी उदासीन होतात.
माझ्या बन्धु भगीनींनो आता आपण अनेक ठिकाणच्या आश्रमात घरातील ही रहाणीमानापेक्षा चांगले राहुन ईश्वर संबंध प्राप्त करु शकता. आपण दिक्षा विधी न करताही २४ तास नामस्मरण करुन ईश्वरास शरण जावु शकता व आनंदच आनंद घेऊ शकता.
बन्धु भगिनींनो कदाचित दिक्षेसाठी आपणांस खुपच पैशा-पाण्याची आवश्यकता असते असे आपणांस वाटत असेल. परंतु असा विचार मनांतुन काढुन टाका. आपली जर इच्छा झाली तर आपण खाली हातानेही अंगावरील कपड्यानींशी येऊनही परमेश्वरास अनुसरु शकता. जर आपणांस विश्वास नसेल तर आपण पत्र व्यवहार करुन शंका निरसन करु शकता.
पाप कर्माचे फळ- दंडभोगही होय
२१ वर्षाच्या एका खुपसुंदर मुलीचे पत्र आम्हास आले की, बाईजी मी बी.ए. पास असून दिसण्यास सुंदर होते. माझे लग्न जमवुन २ महिन्यांनी लग्न होणार होते. परंतु मी घरी स्वयंपाक करीत असतांना कुकरचा स्पोट. होऊन माझ्या सुंदर चेहऱ्यावर व छातीवर भाजी उडून मी भाजले गेले. त्यामुळे माझा चेहरा विद्रुप झाला. डॉक्टरी इलाजही भरपूर केले परंतु त्यास यश आले नाही. त्यामुळे माझ्याशी विवाह बध्द होणाऱ्या मुलाने मला ठोकरुन (नाकारुन) दुसऱ्या मुलीशी विवाह केला.
घरील सर्व नातेवाईक भाऊ, बहिन व इतर आप्तजन ही आता माझी घृणा करू लागले आहेत. उलट ते माझ्या मरणाची सर्वजन वाट पहात आहेत. बोचक बोलणे ऐकून वाईट वाटत आहे. आता मलाही कळाले की नातं-गोतं हे मतलबी स्वार्थी असतात. “रुपाबाईजी, मी तर सतत दोन वेळा पुजा-पारायण नित्य नियमाने करत आहे. मग माझ्यावर असे संकट का कोसळले. भगवंतानी माझी रक्षा का केली नाही. मी या जन्मात काही पाप केले असेही मला वाटत नाही. म्हणून मी मनात सतत विचार करत असुन मी मनाने दुःखी बनत चालले आहे, मी यापेक्षा संपूर्ण जळून मरण पावले असते तर ते मला बरे वाटले असते. तेंव्हा मला जगण्यात रसही वाटत नाही. तेंव्हा बाईजी मला आपण योग्य मार्गदर्शन करुन उपाय सांगण्याचे करावे.”
माझ्या बन्धु भगीनींनो, ज्या भगवंतांना आपण "त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव" असे म्हणतो तर आपले मातापिता आपणास जाळतील का? आपल्या मुलांला जर काटा भरला तर सर्वप्रथम आपले आईवडील हवाल-दिल होतात व काटा काढेपर्यंत त्यांना चैन पडत नाही.
म्हणून माझ्या बन्धु भगिनींनो प्रत्येक जीवाने केलेल्या पाप कर्माचे कर्मभोग भोगुन घेण्यासाठी भगवंतांनी ८१ कोटी, सव्वा लाख दहा देवताना अधिकार दिलेला आहे. त्या भगवंताच्या अधिपत्याखाली हे कार्य करतात. त्यामुळे लहानांत लहान घटनेत सुद्धा त्या देवता क्षमा करत नाही.
आपण अनेक प्रकारचे जन्म घेऊन या सृष्टीत युगांयुगी जगत आलो आहोत. या योनीमध्ये आपण कळत न कळत कसे पापकर्म करत आलो आहोत आपण पुजा-पारायण करुन योग्य क्षमा याचना करून त्या पापकर्मापासून मोक्ष मिळवावा
प्रत्यक्षात आम्ही पापकर्म करताना कुणांस घाबरत नाही. उलट काही तरी विचित्र स्थिती भोगुन क्षणिक आनंद घेण्याचे समाधान मिळवतो आणि त्याचा पाप-दंड भोगताना मात्र ईश्वरास दोष देतो, शिव्या देतो, ईश्वराच्या नावांने रडत बसतो.
ecological Protection
भगवंत तर आपणास या संसारातुन मुक्त करुन संपूर्ण शांती व सुख प्रदान करण्यास आपली सदैव वाट पहात असतात. परंतु आम्ही मात्र नालीतील आळीप्रमाणे गटारात वळवळ करत या संसार पाशात दंग झालेलो आहोत. पापकर्माच्या दृष्ट चक्रातुन बाहेर पडण्यास तयारच नाही. पैसा (धन) जवानी (तारुण्य), सुंदरता, आयु, शिक्षण, पती-पत्नी, मुले हे सर्व मागच्या कर्माच्या नुसार मिळतात. कितीही लाखों प्रयत्नाने सुद्धा त्या बदलु शकत नाही. फक्त परमेश्वरच्या नावाचे स्मरण प्रायश्चित केल्यानेच बदल घडू शकतात.
माझ्या बन्धुभगीनींनो आम्ही श्रीचक्रधरस्वामींचे सुत्र पाठ मनपूर्वक व शांत चित्ताने पठण केलेले आहे. त्यांनी त्यांच्या अमृतमय वाणीने जीवास बोध दिलेला आहे. आपणावर कितीही मोठे संकट आले आणि जर काही उपाय मिळाला नाही किंवा खुप आजारी पडल्यावर डॉक्टरलाही उमज (कळले) पडले नाही तर तो "आता हा यातुन वाचत नाही'' असे सांगतो.. त्यावेळी मात्र आपण आपले जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करुन जर त्यांना वचन दिले की, मला यातुन बाहेर काढावे मी माझे उरलेले जीवन आपल्या सेवेत घालीन." तर भगवंत आपणांस या संकटातुन वाचवतात. भगवंतांना अनन्य भावे शरण जाण्याचे वचन देऊन खालील
गोष्टीचेही पालन करण्याचे वचन द्यावे.
१) आप्त जनांचा मोह सोडुन देणे.
२) खऱ्या तन-मन-धनाने मनोमनी शरणत्व पत्कारीन
३) ऐहिक सुख वस्तूंचा त्याग इत्यादी हे सर्व मनी ठरवुन परमेश्वरास संकल्प केला तर परमेश्वर आपणास वरील संकटातून वाचवतात.
१) मरता-मरताही त्या जीवास आपणाकडून आयुष्य प्रदान
२) मृतासही जीवन देतात.
३) मोठ्यात मोठ्या रोगापासून मुक्त करतात.
४) दुःख-त्रासातुनही शांती देऊन क्षमवितात.
५) त्या जीवाच्या सर्व गरजा (कपडा, अन्न, निवारा) इ. पुरविण्याची जबाबदारी घेतात.
वरील सर्व गोष्टींमुळे त्या जीवाची सर्व चिन्ता दूर होते. परमेश्वर या सृष्टीवरील कोणते असे कठीण काम आहे की, जे ते करु शकणार नाहीत ?
श्रीचक्रधर स्वामींनी त्यांच्या अनेक लीळांनी अशा असाध्य गोष्टी साध्य करुन दाखविल्या आहेत. त्या आपण त्यांच्या चरित्रात वाचु शकतात. तेंव्हा आपण आपल्या दुःखात निराश होऊन दूर जाण्यापेक्षा एकवेळ तरी यातुन सुटका करण्याचे अजमावुन पहावे. ईश्वर धर्मावर करतात.
निराश न होता त्याला अनुसरून भजावे.
त्यासाठी आमची शुभकामना आपल्या पाठीशी सदैव आहे.
आपली परमार्ग सेविका _त. गीताबाई पंजाबी, महानुभाव आश्रम