आपला मुलगा देवाचा भक्त असावा दाता असावा किंवा शुर असावा

आपला मुलगा देवाचा भक्त असावा दाता असावा किंवा शुर असावा

 आपला मुलगा भक्त असावा दाता असावा किंवा शुर असावा


प्रत्यक्ष पाहिलेली सत्य घटना 

बंधुनो! आजकाल लग्न झालेल्या मुली प्रायव्हसीच्या नावाखाली आपल्या सासुला घराबाहेर काढतात हे केवढे मोठे पाप आहे. हेच जर कोणी त्यांच्या आईसोबत केले तर त्यांना ते सहन होईल का? हे केवढे मोठे महापाप आहे.

 एक महात्माजी पंजाब देशात धर्म प्रचारासाठी केले होते त्यांच्या सोबत त्यांच्या शिष्य होता. ते एका शहराच्या प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत बाकड्यावर बसले होते. जवळच एक म्हातारी मळके कपडे, फाटलेली साडी तीही गुडघ्यापर्यंत नेसलेली. खोल गेलेले डोळे चेहऱ्यावर हातांवर सुरकुत्या अशा प्रकारची तब्येतीने अशक्त तशी म्हातारी तिथे बसून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांकडे हात पसरत होती भीक मागत होती. बहुतेक ती दोन तीन दिवसाची उपाशी असावी. पंजाब देशातली गुलाबी थंडी होती सकाळी सकाळी सगळे प्रवासी स्वेटर टोपी घालून थंडीने कुडकुडत ये जा करीत होते.

तेवढ्यात एक एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर आली. थांबली त्यातून प्रवासी उतरू लागले. त्यातच एक जोडपे ते बहुदा ड्युटीवरून रजा घेऊन किंवा सुट्टी मिळाली म्हणून आपल्या घरी आलेले असावेत. सकाळी सकाळी ट्रेनमधून उतरून कडाक्याच्या थंडीत आणि गारव्याला तोंड देत प्लॅटफॉर्मवर पुढे जात होते. त्यांनी महात्माजींना बाकड्यावर पाहून नमस्कार केला व जवळ आले विचारले बाबा कुठून आले व कुठे जातात महात्माजींनी सांगितले महाराष्ट्रात जात आहे. महात्माजींनी हि त्यांची विचारपूस केली तुम्हाला उपदेश कोणाचा व तुम्ही कुठून आले?' प्रवासी जोडप्याने आपला पत्ता वगैरे सांगितला फोन नंबर दिला. 

तेवढ्यात त्या बाईचे लक्ष त्या घाणेरड्या म्हातारीकडे गेले. आणि तिचे डोळे तिथेच खिळले. दोघींची नजरानजर झाली आणि म्हातारी ने लगेच नजर चोरून दुसरीकडे मान फिरवली.    

क्षणभर दोघांचेही डोळे भिडले होते. ती बाई साशंक नजरेने त्या म्हातारीकडे पाहत होती. त्या म्हातारीने पुन्हा वळून पाहिले आणि ती बाई आपल्याकडे पाहत आहे असे लक्षात येताच लगेच तोंड दुसरीकडे वळवले. 

 प्रवासी जोडप्यातली ताई एक-दोन पावले पुढे गेल्यावर अचानक थांबली. व स्वगतच बोलली “आई? नाही, असे होऊ शकत नाही” असे स्वागत पण इतरांना ऐकू जाईल असे शब्द पुटपुटत मागे वळली, आणि तिने म्हातारीकडे निरखून पाहिले, व तिला धक्काच बसला तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना”   

तेवढ्यात पतीदेव ओरडत म्हणाले "अरे!...गीता आपल्याला पुढे जायचं आहे, पुन्हा मागे का गेलीस?"

  कोणत्या गीता ताईच्या कानावर पती देवांचे शब्द तर पडत होते पण ते ऐकू येत नव्हते. त्यांच्या बोलण्याची पर्वा न करता ती म्हातार्‍या महिलेपर्यंत पोहोचली क्षणभर तिच्या चेहऱ्याकडे बघून रडतच म्हणाली आई तुझी ही म्हणाली, "आई!... तुझी अशी अवस्था?" तिच्या डोळ्यातून अश्रूंचा पुर वाहत होता. 

   त्या म्हातारीचाही डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले.

तीही रडतच म्हणाली, "मी काय करू बेटा? माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता."

   गीता स्वतःला थांबवू शकली नाही, तिने तिच्या आईला मिठी मारली.

   तेवढ्यात तिचा पती ही तिथे आला. त्यानेही ओळखली अरे ह्या तर आपल्या सासू राधाबाई आहेत. 

आजूबाजूने जाणारे प्रवासी सुद्धा भिकारीण बाईची आणि पेहरावा ने श्रीमंत दिसणाऱ्या सुशील बाईची गळाभेट पाहून थबकले गर्दी जमायला लागली.    

गर्दी जमा होताना पाहून गीता बाईंच्या पतीने म्हटले “इथे लोक गोळा होत आहे आपण आईंना घरी घेऊन जाऊ व तिथेच सगळे सविस्तर विचारू” गीताने ते मान्य केले व घाईघाईने आपल्या अंगावर असलेली शाल आईच्या अंगावर घातली. आणि आईला आधार देऊन उठवले पतीनेही मदत केली. 

जमा झालेल्या लोकांना काही समजण्यापूर्वीच पति पत्नी व सासूसह तिथून निघून गेले.

नंतर काही दिवसांनी महात्माजींनी शिष्याला सांगितले, “रेल्वेस्थानकावर भेटलेल्या व्यक्ती चा फोन नंबर तू घेतला होता त्यांना फोन लावून बघ त्या दिवशी नेमके काय घडले होते?” 

शिष्याने फोन लावून महात्माजींनी कडे दिला तेव्हा यजमानांनी पूर्ण कहाणी महात्माजींकडे सांगितली ती पुढीलप्रमाणे

   राधा बाईंच्या पतीच्या निधनानंतर सुनेने त्यांचे हाल सुरू केले.. सुरुवातीला अनेक महिने सून दिवसभर ढोरासारखे काम करवून घेत. दोन वेळची भाकरी देत ​​राहिली. पण पुढे राधाबाईंना म्हातारपणामुळे गुडघेदुखी सुरू झाली आणि तब्येतही जास्तच बिघडली. त्यामुळे तिला घर काम करणे अशक्य झाले. सासुला काम करता येत नाही, अशा स्थितीत सूनेला सासु ची काळजी घेणे जीवावर आले. चिडचिड करत तिची सेवा करू लागली. सारखे टोमणे मारू लागली. दोन वाईट शब्द भेटल्याशिवाय म्हातारीला दोन भाकरी मिळत नव्हत्या. पुढे सोन्याचे वाईट बोलणे जास्त वाढले ती सासऱ्यांना म्हणजे म्हातारीच्या नवऱ्याला शिव्या देऊ लागली 'त्या थेरड्याचे आमच्यासाठी काहीही संपत्ती सोडली नाही ना पैसा, ना जमीन, ना प्रॉपर्टी, काहीच नाही मग मी या म्हातारी ची जबाबदारी कशाला घेऊ कमावता माणूस एकच आहे आणि खाणारी तोंडे जास्त आहेत, काम ना धाम ही म्हातारी दिवसभर पसरून राहते आणि आईते खायला मागते.' असे काहीही बोलू लागली. मी हिची जबाबदारी कशी घ्यायची? असंही ती म्हणू लागली. कमी पगारात आपल्या मुलांची परवरीश कशी करू?' .

   राधा बाईने आपल्या एकुलत्या एक मुलाला मोठ्या प्रेमाने आणि स्नेहाने वाढवले होते. त्याला कधीच आर्थिक चणचण भासू दिली नव्हती. तीने नेहमीच त्याच्या सुखसोयींची काळजी घेतली होती. पण आता अशा परिस्थितीत सोन्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत तिने मौन धारण केले होते.

राधाबाईंना सुनेचे शब्द जिव्हारी लागत होते. त्या खूप दुखावल्या जात होत्या. एकट्याच गादी मध्ये तोंड खुपसून रडत होत्या त्यांना हे रोजचे भांडण अजिबात आवडत नव्हते पण नाईलाजाने सर्व सहन करत होत्या. पण असे किती दिवस सहन करणार? 

सुरुवातीला तर मुलगा त्यांची बाजू घेऊन सोन्याची दोन-तीन वेळा भांडला पण नंतर त्यानेही मौन राहायला सुरुवात केली तो बायकोचा बैल बायकोचे म्हणणे खरे मानु लागला. पण आईला वाईट वाटेल म्हणून तो काहीही बोलत नसे   

एके दिवशी त्या मूर्खाने बायकोचे ऐकून आईला म्हटले, “ आई इथून पुढे मी तुला सांभाळू शकत नाही तू तुझ्या राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था तू तुझी कर माझा पगार खूप कमी आहे आणि माझ्या कुटुंबाला तो पुरत नाही म्हणून तुझी जबाबदारी मी घेऊ शकत नाही” 

हे ऐकल्याबरोबर जणूकाही राधाबाईंचे हृदय फाटले. आणि संयमाची भिंतही कोसळली. पण या जिवंत दिसणाऱ्या मृत माणसांसमोर बोलून काही उपयोग नव्हता. त्या हो म्हणाल्या आणि गप्प राहिल्या. आणि त्यांनी जाण्याचा निश्चय केला व निघाल्या. सासूने पाय घराबाहेर काढल्याबरोबर सुनेने धाडकन् दरवाजा बंद करून घेतला. तेव्हाही तो तिचा अधम मुलगा काहीही बोलला नाही. जणू काही त्याची या सर्व प्रकाराला मूक संमती होती. अप्रत्यक्षपणे मुलाने आईला घरातून हाकलून दिले होते. 

दरवाजा बंद करण्याचा आवाज ऐकून राधाबाईंचे डोळे पाणावले पण त्या कठोर हृदयाने निघाल्या.

      शेवटी ही सर्व घटना सांगणारे शेखर भाई अर्थात राधाबाईंचे जावई त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही घरी पोहोचल्यावर राधाबाई दरवाजाच्या चौकटीजवळ थांबल्या. व आत प्रवेश करावा की नाही हा विचार करू लागल्या त्यांना भीती होती की पुन्हा काही दिवसांनी तसला प्रसंग आपल्यावर नको यायला? '

त्यांना दारातच थबकले पाहून मुलीने म्हणजे गीता बाईने मध्ये येण्यास विनंती केली. 

   त्यांची मनःस्थिती द्विधा होती म्हणून त्या क्षणभर तिथेच थांबल्या.

हे जावई शेखर भाईंच्या लक्षात आले व त्यांनी म्हटले, "तुम्हीपण माझी आईच आहात...! निसंकोचपणे आत या!"

ही सर्व घटना सांगताना शेखर भाई फोनवर रडत होते.   

बंधूंनो आणि भगिनींनो!! ही गोष्ट सांगण्याचा हेतू असा की, आपण इतरांशी जसे वागतो तसेच कर्म आपल्या वाट्याला येत असते ते कर्म आपला पिच्छा सोडत नाही पुढे त्या सुनेचे काय झाले असेल हे सांगायला नको? तिचे कर्म तिला दहा पटीने जास्त दुःखासहीत भोगवले जाणार आहेत. राधाबाईंनी आता जरी काहीही वाईट केलेले नसले तरी त्यांचा तो मागील कोण्यातरी जन्मीचा भोग होता तो अशाप्रकारे त्यांच्या वाट्याला आला. 

म्हणून कधीही कुणाला दुखवू नका कोणाचाही छळ करू नका. 

राधाबाई सारखा मुलगा कोणत्याही मातेला नसो. अशा मुलाला जन्म देण्यापेक्षा माता वांझ राहिलेली बरी. 

एका दोह्यात म्हटलेले आहे. 

जननी जने तो भक्त जन, या दाता या शुर । 

नहीं तो जननी बांझ रहे, क्यो खोवे है नुर ।।

कोणत्याही मातेने मुलगा जन्माला घालावा तर तो एक तर परमेश्वराचा भक्त असावा किंवा कर्णासारखा दानशूर असावा किंवा छत्रपती शिवाजीराजांसारख्या पराक्रमी शूरवीर असावा. या तीन पैकी एकही गुण नसलेला पुत्र जन्माला घालण्यापेक्षा ती माता वांझ राहिलेली चांगली. कारण अशा नालायक मुलासाठी तिने आपले सौंदर्य कशाला गमवावे?





1 Comments

Thank you

Post a Comment
Previous Post Next Post