अद्वैत मत खंडन अंभग आणि श्रीचक्रपाणीप्रभु जन्माख्यान

अद्वैत मत खंडन अंभग आणि श्रीचक्रपाणीप्रभु जन्माख्यान

 महंत मुरलिधर दादा पालिमकर विरचित

अद्वैत मत खंडन अंभग आणि श्रीचक्रपाणीप्रभु जन्माख्यान


Shree chakrapani maharaj

 (अभंग क्र. १)

नको नको करु वितंड तो वाद नव्हे तो संवाद सिद्धांत वा ।।१।।

करि करि द्वैत अद्वैवाचा भेद । जेणे ज्ञान बोध । से जीवा ।।२।।

जरि म्हणशी तु जीव शीव एक तरी कुंभि पाक का भोगावे ।।३।।

जरि बोलशी तू ब्रम्ह अंश मीच तरी कां ना एकचि । राजा रंक ।।४।।

जरि म्हणशी तू अवघे एक ब्रम्ह तू तरी गुरु नेम । धर्म कां तो ।।५।।

जरि बोलशी हा जीव शीव ब्रम्ह । तरी पाप कर्म का भोगावे ।। ६।।

म्हणे पालिमकर । ब्रम्हवादी थोर । तरि त्यांनी उत्तर द्यावे आम्हा ।।७।।

( अभंग क्र. २ )

नको म्हणू रे एक अनेक झाले । स्वेछे ते रिगाले । कैसे भवा ।।१।।

तरी सुखदुःख कवणासी झाले । स्वयंब्रम्ह भले कैसे भ्रमले ।।२।।

विचार हो सांचा करा या प्रश्नांचा । गुरु विणे कैचा । मार्ग दिसे ।।३।।

मुनी पालिमकर । म्हणे मुरलीधर । उघडा सुनेत्र । सावध व्हां ।।४।।

 

पूर्णद्वैत मत मंडन

( अभंग ३ क्र. )

ऐसे अज्ञान ते महान्यथा ज्ञान । फेडाया दयाघन । अवतरे ।।१।।

आपुल्या भक्तास । संत महात्म्यास । करि उपदेश । संत ज्ञा नाचा ।।२।।

द्वैत सिद्धांताचे मंडन तो करी । अद्वैताचे भूवरी । करी खांड ।।३।।

तेचि द्वैत ज्ञान श्री हंसावतारे । सनकादिका प्रवरे । सांगीतले ।।४।।

तेचि तत्वज्ञान । श्रीदत्तात्रेयानं अलंका देवून उद्धरिले ।।५।।

शुद्धाति शुद्ध द्वैत मत सिद्ध होय गीता विविध ज्ञानाने हो ।।६।।

पालिमकर म्हणे अहंकार सोडा एक भक्तिने जोडा कृष्ण देव ।।७।।

 

( अभंग क्र. ४ )

तीच ब्रम्ह विद्या श्रीकृष्णावतारे । अर्जुनोद्धवात्वरे । निरुपीली ।। १।।

तेचि मोक्ष शास्त्र । महद्ज्ञान अस्र दिल भट्टावत्र श्री चक्रधरे ।।२।।

ऐसे द्वैतपर शुद्ध ज्ञान पर। आले येथवर । जाणावे हो ।।३।।

म्हणे पालिमकर दुराग्रह थोर । सोडूनी घ्या खरं । उद्धराया ।।४।।

 

।। श्रीचक्रपाणीप्रभु जन्माख्यान प्रारंभ ।।

 ।। परब्रम्ह परमेश्वरास भावपूर्न वदंन व त्यांचे स्तवन ।।

(भंग १ ला)

चैतन्याच्या पार माझा चक्रधर । वंदू निर्वीकार बहुभावे ।।१।।

निर्गुण स्वरुप । शुद्ध ते अमुप अच्यूत परम निरा कार ।।२

अनंत जीवाला । निजानंद दिला असे जो जीव्हाळा प्रेमाचा ।।३।।

अनंत शक्तिचा अनंत गुणाचा किती वर्णं वाचा । मंदावली ।।४।।

स्वामितो सूहूद थीर सदानंद द्यावा नित्यानंद । जीवाशी या ।।५।।

अखंड घरित । उद्धारा निमीत्त अवतारानंत । कृपावंत ।।६।।

पालिमकर त्याला शरण रिगाला अनन्य भावाला । धरुनिया ।।७।।

 

।। व्यक्त परमेश्वरावतार श्रीकृष्ण चक्रवर्तीचे स्तवन व नमन ।।

( अभंग २ रा )

ते द्वापरी सावळे सुंदर धरीले रुप ते वेधले तिन्ही लोक ।।१।।

ऋक्मिणी देवीला । उद्धव देवाला । कुंतीआऊसाला प्रेम दिले ।।२।

मुकुंद राजाला । अर्जुन देवाला दिली ज्ञान कळा । प्रभूने ज्या ।।३।।

सुदाम देवाला । हेम नगराला । दिले औदा र्याला । दाविले ज्या ।।४।।

पांडव भक्ताला । तारुनी राज्याला दिले ज्याने बाळा रक्षियले ।।५।।

सति दौपदीला । सभेत पा वला । वस्त्रभार तिला पूरवि जो ।।६।।

 गोवर्धन हस्ता । धरुनि या भक्ता । वाचवी प्रमत्ता । हारविजो ।।७।।

द्वारका सुवर्णाची । अब्धिवरसाची वसविली ज्यांची शक्ति महा ।।८।।

पालिमकरदास तथा सद्गुणास स्मरी अंतरास । निशीदिनी ।।९।।

 

(अभंग ३ रा )

असा प्रेमवंत । स्वसामर्थ्यवंत। बहु कृपावंत रक्षिभक्ता ।। १।।

गोपिका राधिका आणि ती कुब्जीका त्या विदूरादिका । उद्धरी जे ।।२।।

सोळा सहस्र त्या वर अष्टराण्य । भोगून पूर्ण त्या । ब्रम्हचारी ।।३।।

दुष्टांचा निःपात । होऊनी सतंप्त । केला ज्याने भक्त । उद्धरीले ।।४।।

गीता ब्रम्हविद्या । थोर राज विद्या । पार्थ पंडित त्या निरुपीली ।।५।।

चक्रवर्तीला त्या परब्रम्हाला त्या किती स्तवू तया । भाग्यवंत ।। ६।।

लिळा त्या अनंत । पोवाडे अनंत । जीवोद्धारानंत केला ज्या ने ।।७।।

तया श्रीकृष्ण देवा श्रेष्ठ ज्ञान देवा । धरुनी सद्भावा । वंदितसे ।।८।।

मुनी पालिमकर दास मुलिधर । देवाचा किंकर शरण त्या ।।९।।

 

श्रीदत्तात्रय प्रभूस वंदन व त्यांचे स्तवन : तयाचा

(अभंग ४ था)

अत्रिचा सुपुत्र सत्य परात्पर । जो विश्वाधार । जगद्गुरु ।।१।।

ज्याने अलकाचे । तिन्ही ताप साचे दुर केले वाचे क्षणा धति ।।२।।

सासार्जुने हस्ता । इंगळे संतप्ता प्रसन्न जो घेता झाला देव ।।३।।

सहस्रभूजा त्या राज्य देवूनिया । केला तो बळीया । पृथ्वीपती ।।४।।

ऋचिक ऋषीला । अडणीच्या वेळा पंचशतबळा वारु जो दे ।।५।।

पालिमकरवासा वरदे परशा । भाळी करुणेशा । हस्त ठेवी ।।६।।

 

(अभंग ५ वा )

परशूरामाला । पारधी रुपाला दावूनि पावला कृपाळू जो ।।१।।

अनंत जो लीळा । करि सह्याद्रिला । उद्धरी जिवाला । चहुंयुगी ।।२।।

ज्याचा महिमा थोर । न वर्णवे पर ज्याचा हो आधार । कविजना ।।३।।

त्रीगुणा वेगळा त्रीमूर्ती वेगळा । चिरायू जो झाला । परब्रम्ह ।।४।।

तया श्रीदत्ताला आदी कारणाला । कुल दैवताला । भावे बंदू ।।५।।

दास पालिमकर । मुनी मुलिधर । ध्यायी निरंतर । तथा देवा ।।६।।

 

(अभंग ६ वा)

श्रीचक्रपाणी अवतारास नमन व त्याचे स्तवन

फलटणकार । परमेश्वर सर्व । केल्या लीळा थोर । उद्धराया ।।१।।

नाना विद्याभार । रंगशीळेवर । अभ्यासिल्या फार । जयांनी हो ।।२।।

पान पेखण्याला संबंध दिधला । महा तिर्थ स्थळा केले ज्यांनी ।।३।।

फलटण काशी जया श्रीपरेशी । केली गुणराशी । क्रीडूनीया ।।४।।

वेनुसार कर्म क्षितीवर । दान दे प्रवर जीवासी जो ।।५।।

द्वारावतीयेला । गोमती तीराला । अनंत जीवाला उद्धरीले ।।

ते श्रीयोगेश्वर । द्वारावतीकार । वंदी पालिमकर । सर्व भावे ।।७।।

 

।। श्रीगोविंदप्रभूस नमन व त्यांचे स्तवन ।।

( अभंग ७ वा )

निर्गुण ब्रम्ह जे साकारले हो जे । जीव उद्धारी जे मंगळ जे ।।१।।

क्रीमी ब्रम्हपदा । पाठवि आनंदा । देत मोक्षानंदा । नित्यानी जो ।२।।

अनंत जीवाचा उद्धार हो साचा । केला वऱ्हाडाचा । ज्या मुक्ती दे ।।३।। 

सव्वाशे वर्षे हो । क्रीडा करुनी हो । रिद्धपूराची हो । काशी केली ।।४।। 

निर्वीकल्प क्रिडा । जैसा ब्रम्हवाडा । तैसा श्वपचवाडा । मानूनीया ।।५।। 

तारीले अनंत । जीव भाग्यवंत । सुखानंद देत । सर्वांशी जो ।।६।।

पालिमकर दास करि स्तवनास देईजो वरास प्रसन्न हो ।।७।।

 

( अभंग ८ वा )

 

वन्हऱ्हाडीचे हो । श्रेष्ठ दैवत हो । झाले पूज्यजे हो। मान्य वर ।। १।।

निराधारासी हो। आधार ज्यांचा हो । अशी माता ना हो । जगामाजी ।।२।।

 लीळा ही अनंत । पोवाडे अनंत । चरित्र अनंत । ज्यांनी केले ।।३।।

अनंत जनांची । श्रीचक्र धरांची। महानुभावांची माऊली जे ।।४।।

राजमढ धन्य । केला सर्वमान्य झाला जगद्वंद्य । तिन्ही लोका ।।५।।

 तथा ब्रम्हरुपा । सर्वज्ञ स्वरुपा। नमो आर्य रुपा। प्रभूवरा ।।६।।

मुनी पालिमकर । दास मुलिधर । ध्यायी अहोरात्र । तया देवा ।।७।।

 

 (अभंग ९ वा )

।। श्रीचक्रधरस्वामीस नमन व त्यांचे स्तवन ।।

चांपे गौरवंती सुंदर श्रीमुर्ती सर्वा वेधवंती । तेजस्वी जे ।।१।।

जळचरे व्याघ्र । गोवृंद तो थोर । शशक तो पर उद्धरी जो ।।२।।

स्थावर सर्पादी । चाषतुरंगादी । पर्वती गौडादी । उद्धरी जो ।।३।।

अवतार पूर्ण धरूनि प्रभून । जीवोद्धार व्यन । स्विकारी जो ।।४।।

अनवाहनी जो । हिंडे देव भू जो । उद्धरी जीवा जो बहु कृपे ।५।

पालिमकरदास । करि तुझी आस । देई दर्शनास । स्वामीराया ।।६।।

 

(अभंग १० वा )

अनंत तारीले । जीवा ज्ञान दिले । प्रेम सुखापिले । अधिकार्या ।।१।।

ज्याचा अधिकार सर्वा विश्वावर तो करी उद्धार । तरी होये ।।२।।

सम्राटपदाचा मान ज्या देवाचा । सर्वावतारांचा । महंत जो ।।३।

भट्टा-बाईसांचा भांडारेकराचा । महादेवबांचा । रुपांबेचा ।।४।।

तो श्रीचक्रधर । श्रेष्ठ अवतार । ब्रम्हपरात्पर । वंदू प्रेमे ।।५।।

मुनी पालिमकर तथा चरणा वर ठेवी भाळ दे कर जोडूनिया ।।६।।

 

।। मूळपीठीका व श्रीकृष्ण नाम लीळांचे महात्म्य ।।

(अभंग ११ वा)

गुरु निमीत्ताला । चहु साधनाला । साधनदात्याला भावे नमू ।।१।।

श्रीचक्रधरकृत । श्रीचक्रपाणीचरीत । जन्मलिलांमृत पूत स्थान हे ।।२।।

अभंग छंदात । असे मी स्तवीत । भक्तजनगात । असो सदा ।।३।।

व्यासादि सहित । भुलले समस्त । नाही झाले शांत मन त्यांचे ।।४।।

जेव्हा कृष्णस्तुती केली भागवती । तेव्हा व्यासमती उजळली ।।५।।

म्हणे पालिमकर खरा परमेश्वर । श्रीकृष्ण तो चित्पर भजा त्यासी ।।६।।

 

(अभंग १२ वा )

श्रीकृष्ण लीळा त्या परिक्षितिने ह्या भावे ऐकुनिया । मुक्त झाला ।।१।।

जन्मेजयाचिया अठरा ब्रम्हहत्या नष्ट झाल्या पुरत्या आणाध्यानी ।।२।।

म्हणूनी प्रेमेची । श्रीकृष्ण नामाची तया चरित्राची किर्ती गावी ।। ३।।

पालिकर मुनी म्हणे शुद्ध मनी एकाग्र चित्तानी । कृष्णा घ्यावे ।।४।।

 

(अभंग १३ वा )

महापापराशी । ऐकिल्या विशेषी । जाती हो निःशेषी । जीवाचीया ।। १।।

श्रीकृष्णा वांचुनी । उद्धारक कोन्ही । नाही दुजा कर्णी । परीसावे ।।२।।

म्हणूनी आपुल्या हिता जाणूनिया प्रबंधकरण्या प्रवर्तलो ।।३।

पालिमकर म्हणे । सोद्धार करणे । परोद्धार करणे । महा इष्ट ।।४।।

 

महान परमेश्वरावतार पंच श्रीकृष्ण हे सिद्ध करण्यास संदर्भग्रंथ

( अभंग १४ वा )

सृष्ट्यारंभकाळी । कृतयुगभाळी । महाभाग्यशाली । धर्मऋषी ।।१।।

सति मायादेवी उभ्या सदैवी गृही पर रवी व्यक्त झाला ।।२।।

झाले पंच पुत्र ते सर्व अवतार । ईश्वराचे थोर । जगन्मान्य ।।३।।

दशोपनिषदी । हे पंचकृष्णादी सांगितले वेदी । ईश्वरोक्ती ।।४।।

तेचि पंचकृष्ण प्रतियुगी जाण । अवतार घेवून उद्धरिती ।।५।।

मुनी पालिमकर म्हणे कविश्वर । धन्य मातापितर । श्रीकृष्णांचे हो ।।६।।

 

।। फलटण नगरीचे महात्म्य व महाराष्ट्राची थोरवी ।।

 (अभंग १५ वा )

पृथ्वीतळावर महान महाराष्ट्र थोर सगुन ।।१।।

पुणे चाकण प्रांतात असे हे नगर विख्यात ।।२।।

पुरंदराचळी तळवटी । बाण गंगेच्या हो काठी ।।३।।

थोर विशाल सुंदर फलेठाण हे नगर ।।४।।

तेथे गोपुरे धवळारे नगराशी चार द्वारे ।।५।।

नानाविधे मढ मंडप चित्रे देऊळे आमूप । ६।।

ऋषिमुनींचा रहिवास संत महंत संतोष ।।७।।

राहाती अखंड प्रमोदे । गाती प्रभू लिळा स्वानंदे ।।८।।

मुनि पालिमकर हा म्हणे । प्राप्त प्रभूजी सन्मार्गाने ।।९।।  

 

परमेश्वर क्षेत्राचे श्रेष्ठत्व व जीव देवता क्षेत्रांचे कनिष्ठत्व -

(अभंग १६ वा )

दूजी वाटे द्वारावती । सर्व वैभवे नटली ती ।।१।।

महापापांचे क्षाळण । होता दर्शन महान ।।२।।

कां जे परमेश्वर क्षेत्र अति श्रेष्ठ ते पवित्र ।।३।।

जीवा देवतेच्या क्रीडेने । क्षेत्र होत संबंधाने ।।४।।

जगी असती असे अनंत । जीवा पावती  फळे देत ।।५।।

परि दुःखाचा पापांचा नाश ना होय कर्माचा ।।६।।

म्हणे मुनी पालिमकर। एक भक्ति भजा ईश्वर ।।७।।

 

(भंग १७ वा )

ते ईश्वरची हो करीत । किंवा त्याने निर्मिलेत ।।१।।

तिर्थक्षेत्रे अतिव पुणित । सेवेलिया दुःखे नासत  ।।

म्हणुनीच ईश्वरा भावे । शरणागत व्हां अनुभवे ।।३।।

जाणा पालिमकर हा म्हणे । नका फिरु आडराणे ।।४।।

 

 (अभंग १८ वा)

( नमनाच्या अभंगाची चाल )

श्रीचक्रपाणी स्वामी कोण्या कुळात अवतरिले त्या कुळाचे मुळ पुरुष कोण व कसे होते व फलटण नगरी कशी होती ?

तेथे रिद्धी सिद्धी । सकळ समृद्धी होत असे वृद्धी । सुखाची हो ।।१।।

नाही दैन्य रोग दरिद्री मातांग दिले अष्ट भोग । विभोने ते ।।२।।

सकळहि जन सुखी समाधान असती संपुर्ण नितीधर्मे ।।३

तेथे पश्चिमेस । ब्रम्ह नगरीस । थोर ते आदर्श । पुण्यश्लोक ।।४।।

राजनायक हो । गर्भ श्रीमंत हो । महापंडित हो । ग्रामामान्य ।।५।।

त्यांच्या भायें नाव राजाई स्वभाव । चांग असे भाव । पुर्णाजीचा ।।६।।

सति पतिव्रता देनी सविता । जणू वाटे योषिता जगातारी ।।७।।

दास पालिकर । म्हणे पुण्यथोर फळा आलं भूदर एक सरे ।।८।।

 

(अभंग १९ वा)

त्या दांपत्य कुळी झाले सप्ता भली । सुपुत्रे तोषली माता पिता ।।१।।

सप्तपुत्र ते । ख्यात नाम ही ते । महा विद्वां ते । किर्तीमंत ।। २।।

ग्रामा जगामान्य । असती सन्मान्य पुजीती अग्रगण्य म्हणूनिया ।।३।।

सर्व तेजस्वी ती आनंदे नांदनी । सर्वसुखे असती । तयांसी हो ।४।।

 

(अभंग २० वा )

रुपनायक ते । वडील पुत्र ते त्यांना आपत्य ते दोन असती ।।१।।

रेमाईसा थोर । कन्या ती सुंदर जनक प्रवर । कुलवान ।।२।।

जनक नायेक ते व्यवसायिक । पुण्याशी ग्राहक । असे त्यांचे ।।३।

तया निमित्ते ते पुणे नगरी ते । राहाति अखंड ते । जाणिजे हो ।। ४।।

त्यांच्या भायें नाव जनकाई जाणाव । माहेर ते समजाव चाकण ते ।।५।।

नायकांच्या कुळी । पुत्ररत्न कळी । नसे मन कमळी । दुःखीत ते ।।६।।

संसार नश्वर । म्हणे पालिमकर धोका अहोरात्र । जीवाशी या ।

 

( अभंग २१ वा )

म्हणूनी नवसीली । पुत्रेच्छे ते बळी देवता सावळी चांगदेव ।।१।।

पुर्णातापी तीरी संगमी प्रवरी चांगदेव भारी । दैवत ते ।।२।।

तसि चाकणीची चक्रपाणीसाची देवता जगाची । नवसीली ।।३।।

पुत्र हेतुने ही । आजे नवसीलीही जनकाई पिते ही भावपूर्ण ।।४।।

दोन्ही देवतांनी अभय देवूनी । दोन्हीच्या वचनी । मान दिला ।।५।।

परमेश्वर स्वामी । सकलांतर्यामी जाणी आत्मारामी । भक्त हेतु ।।६।।

परमार्गदास पालिमकर आस । करि स विशेष प्रभू तूझी ।।७।।

 

(अभंग २२ वा)

।। श्रीचक्रपाणीस्वामींचा जन्म व जन्मशक ।।

परब्रम्ह देव । देनिया भाव । महान सदैव । पाहुनिया ।।१।।

जनकाईच्या कुशी । पहा हृषीकेशी । फलस्थ ग्रामाशी । व्यक्त झाला ।।२।।

शके दहाशे ते । वर त्रेपण ते । शालिवाहन ते समजावे ।।३।।

आश्विन तो मास वद्य नवमीस । त्या गुरुवारास प्रातःकाळी ।।४।।

अरुणउदयी । प्रभू जन्मा येई मानव नट घेई भूवरीया ।।५।।

दास मुलिधर मुनी पालिमकर तथा चरणावर भाळ ठेवी ।।६।।

 

(अभंग २३ वा)

परमेश्वर कशा करिता अवतरले ?

जीवा उद्धराया सुखासी द्यावया क्लेश हारावया प्रगटला ।।१।।

सुरवरांनी हो । दिव्य पुष्पांनी हों । केली वृष्टी तो हो । हर्ष भरे ।२।।

आणि रत्नांची ती । वृष्टी झाली अती । दिव्य स्तोत्रे गाती देवादिक ।।३।।

आनंदी आनंद झाला परमा नंद । माता पित्या सुखद म्हणूनिया ।।४।।

मुनी पालिमकर । म्हणे प्रभूवर । भावे विण थोर । न आकळे ।। ५।।

 

(अभंग २४ वा )

।। दोन्ही नवसाची फेड व दोन्ही नामाचा स्विकार करणे ।।

चांगदेव याचा सोनटक्के याचा एक सहस्त्रांचा जनकाने ।।१।।

फेडूनि नवस आणि प्रभूजीस दिधले नामास चांगदेव ।।२।।

याच नावाचा हो । स्विकार केला हो स्वामींनी तेंव्हा हो जाणावे हे ।।३।।

असाचि नवस तथा चाकणास । जाऊन विशेष । फेडियेला ।।४।

शते सोनटक्की पुजूनी स्थानकी । देवता भाविकी । चक्रपाणी ।।।।

तेचि नांव दिले । स्वामीराजा भले मातेने मंगले । जनकाईच्या ।।६।।

तेहि नाव देवे । हर्षे मनोभावे दोन्हीचा गौरवे मान केला ।।७।।

पालिमकर म्हणे । अनंत जन्माने मिळाला सुवासने प्रभू राव ।।८।।

 

 ( अभंग २५ वा )

कलीयुगाचा मुख्य व महान परमेश्वरावतार ।।

ईश्वरभक्तांचा नव्हे नास्तिकांचा पुरविदासांचा मनोरथ ।।१।।

रंभाई मावशी वागवी शेवेशी प्रेम आदराशी । मानूनीया ।।२।।

ऱ्हाडे ब्राम्हण कुळी प्रगटुन उद्धरी महान । जीव दीन ।।३।।

कलीयुगाचा हा अवतार महा । प्रशांत बोल हा । वेदशास्त्री ।।४।।

खरा परमेश । अवतार हंस । उद्धरी जीवास । आणा ध्यानी ।।५।।

सांगतसे रवा । पालिम कर बाबा हृदयी साठवा अवतार हा ।।६।।

 

( अभंग २६ वा )

बालपणी मावशीने । सप्रेमे रंभाईसाने ।। १।।

वागविले थोर ममत्वे भाग्य ना वर्णवे रवे ।। २।।

पुत्रत्वाचे सुख सोहळ । तथा ईश्वरे अपिले ।।३।।

माता पित्यांचे सत्कुळे परमेशे उद्धारिले ।।४।।

श्रीचांगदेव श्रीचक्रपाणी । हे द्वयनामे स्विकारुनी ।।५।।

केला भक्तांचा उद्धार या पर नामे अहोरात्र ।६।।

मुनी म्हणे पालिमक । स्मरा या नामे ईश्वर ।।७।।

 

(अभंग २७ वा )

देव परमेश्वर कोण्या उपायाने प्रसन्न होतो व मिळतो.

भावाचा भूकेला । मान्य केले तया वाक्याला ।।१।।

प्रभू भक्तांनी वश केला ना होय तो अनिकाला ।।२।।

सत् वचने सद्धर्माने सदभक्ती गुरुभक्तीने ।।३।।

होय प्रसन्न ईश्वर थोर । नाही चिता मग अनिवार ।।४।।

मुनी पालिमकर हा म्हणे । करा वश ईश्वर भक्तीने ।। ५।।

 

(अभंग २८ वा)

श्रीद्वारावतीकार स्वामी लौकिक दृष्ट्या या विश्वाचे एक थोर पंडीत झाले.

साता वर्षा मुंजीबंधन केले बहुं उत्सवानं ।।१।।

तदनंतर शास्त्राभ्यास । सांगोपांग वेदाभ्यास ।।२।।

केला पूर्ण सर्व विद्येचा झाला पंडीत या विश्वाचा ।।३।।

रंग शोळेवर बैसूनी सर्व कला पठन करुनी ।।४।।

केली पूणीत रंगशीळा । झाली वंद्य ती भक्ताला ।।५।।

पान पेखनि हो क्रीडूनी । थोर तिर्थ स्थळा करुनी ।।६।।

दास पालिमकर हा म्हणे किती स्तवू प्रभू गुण गाणे ।।७।।

 

(अभंग २९ वा )

स्वग्राम त्याग व सह्याद्रिस आगमन व श्रीदत्त प्रभूची भेट व शक्ती स्विकार

फलस्थ काशीला । अगणीत लिला । करुनी पित्याला । तोषविले ।।१।।

वर्ष पंचवीस । करुनी राज्यास । मग सह्याद्रिस । आले देव ।।२।।

करुं जीवोद्धार । तळमळ थोर म्हणूनी सत्वर । निघाले हो ।।३।।

सिंह पर्वताला । श्रीदत्त भेटला । व्याघ्र वेशे त्याला प्रभूवर ।।४।।

त्यांचे पासूनी ती । परावर शक्ती स्विकारुनी युक्ति । उद्धराया ।।५।।

म्हणे पालिमकर । बाबा कवीश्वर भजा परमेश्वर । हाचि असे ।।६।।

 

( अभंग ३० वा )

श्रीदत्तात्रेय प्रभूपासून गुरुत्व धारण करून सहामास देवदेवेश्वरलाच गुरु सन्निधानी राहणे.

देवदेवेश्वरी । श्रीदत्ताचे मंदीरी । वास्तव्य तो करी सहा मास ।।१।।

श्रीदत्तप्रभूला हो । गुरु मानुनी हो । भिक्षा करिती हो । गुरु आज्ञे ।।।।

भोजन तो करी । मेरुवाळा तीरी । अवधूत धरी वेशप्रभू ।।।।

असे सन्निधान सा मास करुन, श्रीदत्ताज्ञा मानुनी । अत्यादरे ।।४।।

पालिमकर संत । तथा शरणा गत जोडूनिया हस्त नमीतसे ।।।।

 

श्रीगुरुदत्तात्रय प्रभूंची आज्ञा व अवधूत वेश स्विकारुन द्वारावतीस गमन आणि तेथे सूर्पमार्जनी क्रीडा करु न अनंत जीवाचा उद्धार करणे

( अभंग ३१ वा )

निघाले तेथून । श्रीदत्ताज्ञा घेवून । गेले ते चालून । द्वारावती ।।१।।

द्वारावतीला हो । गोमती तीरा हो पाताळ गुंफेत हो राहाती ते ।।२।।

ब्रम्हचर्य व्र । खडतर पाळीत क्रिडे अवधूत वेशे देव ।।३।।

सूर्पमार्जनि ते । क्रीडा करीती ते । कृमी किकाटे । उद्धरीती ।।४।।

मुनी पालिमकर । म्हणे महेश्वर । ओळखा सत्वर । भजा त्यासी ।।५।।

 

( अभंग ३२ वा )

सव्वा दोन प्रहर शुपमार्जनी क्रिडेचा नियम

सुर्योदय होता । निघे पाप हर्ता । ग्रामि विश्वपिता । प्रतिदीनी ।।१।।

द्वारावती महा । पुण्यक्षेत्र आहा । झाडी खराटे हा विश्वंभर ।। २।।

सुपामध्ये पुंजा भरी हस्त कंजा हर्ष हृदयी ज्या बहू असे ।। ३।।

गोमति नदीत । पुंजा तो टाकीत । असा तो क्रीडत जीवा काजा ।।४।।

प्रहर तो सव्वा दोन हो बरवा । व्यापार हा जीवा सौख्य द्याया ।।५।।

करि नित्य नेमा । मग भिक्षा क्रमा । साधिती सत्तमा कार्यासी या ।।६।।

मुनी पालिमकर म्हणे हा दातार भोजन सत्वर । करी प्रभू ।।७।।

 

( अभंग ३३ वा )

अनंतासिद्धी देणें व लोकांस वेधे सामर्थ्य आकृष्ट करणे

मग परतती गुंफेत हो जाती घेति ते विश्रांती थोडावेळ ।।१।।

येति दर्शनाला एकूनि किर्तीला भाविकांचा मेळा वाढतसे ।।२।।

होति किती शिष्य पहा तें असंख्य देखनी सामर्थ्य प्रभूचे हो ।।३।।

कित्तेकांना देवे । रिद्धी सिद्धी भावे । दिल्या अनुभवे । गर्जावया ।।४।।

शिष्य स्वामींचे हो । कित्येक पहा हो समुद्रावर हो चालती ते ।।५।।

श्चर्ये पाहाति अद्भूत ती शक्ती । लोक गाती किर्ती । स्वामींची हो ।।६।।

दास पालिमकर । म्हणे कवीश्वर । स्मरा निरतंर । तया देवा ।।७।।

 

(अभंग ३४ वा )

अनंतदिन जीवांना सुखाचा सुकाळ केला

अनंत सामर्थ्य । अनंत आश्चर्ये दाखवि ऐश्वर्ये । ओळखावया ।। १।।

 सर्व लोक गाती । प्रभुची सत्कीर्ती । साक्षात म्हणती । परब्रम्ह ।। २।।

अनंत जनांचे । अनंत पापांचे डोंगर दुःखाचे । नष्ट केले ।।३।।

अनंत सुखाचा । समूद्र जो साचा । ओळला जीवाचा । श्रमफेडी ।।४।।

थोर भाग्यवंत । जीव द्वारकेम्हणून क्रिडत । प्रभूवर ।।५।।

थोर आनंदाचा सुकाळ सुखाचा । केला ज्याने साचा । सर्वत्रासी ।।६।।

पालिमकर बाबा । म्हणे ओळखावा हृदयी स्मरावा । भक्ती भावे ।।७।।

 

( अभंग ३५ वा )

जोगरा गांवचा ठाकूर यास द्वापरीची सत्य सूवर्ण रत्न खचित द्वारका दाखवून शांत करणे व त्रिविध ताप महा पापे करणे व ज्ञान देऊन त्याचा उद्धार करणे

बावन पुरुषा । विद्या दे विशेषा । चौऱ्यांशी पुरुषा । सान्या विद्या ।।१।।

दिल्या सुखी होती । आनंदे हाती । स्वतंत्र क्रीडती । भूवर्ती ते ।। २।।

जोगरा ठाकूर तप्त दोषावर । होऊनी सत्वर । बहूं कष्टे ।।३।।

आला द्वारावती त्याला निववीती । दर्शन ते देति । लव-लाहे ।।४।।

द्वापरीची सत्ये । द्वारका दाविती तें । सूवर्णाचिच ते रत्नबद्ध ।।५।।

त्याला वाचवून  । शांतता देऊन ज्ञानहि देऊन  । उद्धरिले ।।६।।

पालिमकर मुनी । म्हणे विचारुनी । व्हावे सदाचरणी । नम्र सदा ।।७।।

 

(अभंग ३६ वा)

प्रयत्नाने दुर्जनांचा नाश केल्याने व सद्गुणाचा विकास केल्याने व अनन्य भक्तीने परमेश्वर मिळतो

गुण आकराची । सत्कीर्ती बापाची । सख्या सुहृदाची किती वर्णूं ।।१।।

अहोरात्र जीवा । देई जो विसावा । तोच ओळखावा । मायबाप ।।२।।

करुनिया यत्न । बहुधा सुरत्न । मिळवावे जान भक्ती गूणे ।।३।।

अनन्य भवतीने अनन्य श्रद्धेने अनन्य क्रियेने वश करा ।।४।।

शुद्धाचारे वाग । विचार ही चांग । ठेवि सतसंग बुडू नको ।।५।।

मी पण ते सोडी । दुर्व्यसन खोडी महादोष मोडी । विचारूनी ।।६।।

मुनी पालिमकर । म्हणे सुविचार । करि मार्गधर सत्याचा हा ।७।।

 

 (अभंग ३७ वा )

रुद्धपूरहुन श्री गोविंद प्रभूचे आगमण व परावर शक्ती स्विकार

द्वारावतीकार । श्रीचक्रपाणी थोर । प्रत्यक्षावतार । ईश्वराचा ।। १।।

किर्ती दशदिशा । फांकली विदेशा । स्वामी श्रीपरेशा:चिहो तेव्हा ।।२।।

म्हणूनि काशीचे प्रभूवर साचे मान्य वऱ्हाडीचे । त्वरे आले ।।३।।

दोही देवा भेटी । गोमतिये तीरी । शक्ती ती स्वीकरी । निमित्तत्वे ।।४।।

श्रीगोविंदप्रभूंनी । सहर्षेच स्वमनी । शक्ती स्विकरुनी । परदानी ।।५।।

द्वारावतीला ते । स्वामी जवळी ते । गुरुबुद्धीने ते । रहाती हो ।।६।।

दास मुलिधर । मुनी पालिमकर । म्हणे परात्पर । ओळखा हा ।। ७।।

 

( अभंग ३८ वा )

महात्म र्माची परंपरा श्रीगुरु दत्तात्रेयप्रभूपासून सत्याचाच जय खोट्याचा नव्हे व प्रभूची कीर्ती ऐकून कामाख्येचे आगमण

असे सन्निधानी । गुरुच्या राहूनी कित्येक दिवसांनी गेले प्रभू ।। १।।

गुरु अनुकरण केले श्रीप्रभूंनी । निर्विकल्प होउनि । क्रिडतसे ।।२।।

श्रीदत्तापासूनी परंपरा जाण गुरु आज्ञे पूर्ण आचरण ।।३।।

ली एथवर पूढे चालणार । सत्य टिकणार । खोटे नांही ।।४।।

कावरुळीची ती कामाख्या सत्कीर्ती ऐकूनी कणिती मानी धन्य ।।५।।

तेजस्वी ओजस्वी । ब्रम्हचर्य रवि । ऐकूनी लाचवी । मन तिचे ।।६।।

मुनी पालिमकर । म्हणे अविचार। दुर्बुद्धी ते थोर वाढवली ।।७।।

 

(अभंग ३९ वा )

हट्टयोगीनी ती । प्रसिद्ध जगती । श्रीदत्तोपासक ती । असे पूर्ण ।।१।।

भंगले बहुत । योगी मुनी संत ।  द्वारावती येत । बहु आशे ।।३।।

ब्रम्हचर्य वृत्त । ढाळायास हेत । धरुनि मनांत । अभिमाने ।।४।।

स्वामींच्या गुंफेशी । आली सहर्षेसी । विलोकी मुर्तीसी । सौंदर्यासी ।।५।।

प्रतिबिंबली ती । स्वामींची श्रीमूर्ती । हृत्सरोजी ती तिच्या जाणा ।।६।।

पालिमकर मुनी । म्हणे धरा मनी सन्मती लागूनी । अखंड हो ।।७।।

 

(अभंग ४० वा )

सत्याचा व धर्माचाच मार्ग तारक आहे आडमार्ग घातक व विनाशक आहे.

पुढीलाचा घात । महापाप पात । करणे सिद्धांत । बरा नव्हे ।।१।।

दुष्ट दुराचारी । स्वार्थासाठी भारी । पाप अहोरात्री । करीताती ।।२।।

पूढे जे होणार । नेनति पामर भोगिति भयंकर नरक मग ।। ३।।

चालती थोर । करि अत्याचार । करि अविचार जगामाजी ।।४।।

पापमाप पूर्ण झाल्यावर जाण । भोगि निशिदीन । दुःख महा ।।५।।

शिक्षा देतो देव । नव्हे तो मानव । तो मी पणा तव म्हणे मीच ।।६।।

पालिमकर बावा म्हणे हो बरवा मार्ग तो धरावा सत्याचा ।।७।।

 

(अभंग ४१ वा)

पूर्वानुसंधान । कामाख्या सुग्रण रूप ते बघुन । मनोहर ।। १।।

झेप घेऊ पाहे । गुंफे लवलाहे । द्वारि आली पाहे । प्रवेशाया ।। २।।

श्रीद्वारावतीकारे । महान ईश्वरे घात हेतु त्वरे । जाणुनिया ।।३।।

सत्वरे स्तंबीत । केलि अहो तेथ । स्वसामर्थ्यवंत स्वामी माझा ।।४।।

श्रीदत्तप्रभूची हो । आण घालूनी हो । केली संबद्ध हो । कामाख्या ती ।।५।।

मुनी पालिमकर । म्हणे साचोकार । नोळखी ईश्वर कामाख्या ती ।।६।।

 

(अभंग ४२ वा )

कामाख्या ट्टे देह त्याग करणे

असे जे अद्धम । जीव ते कुकर्म करीती स्वधर्म । न जाणती ।।१।।

ग्रह ते करी । रतीचा हो भारी । नव्हे तीची परी । मान्य देवा ।।२।।

देव बोले येथ । श्रीदत्ताची शपथ । असे दृढमत । आज्ञा नाही ।।३।।

कामाक्षा बहुत । हट्ट हो धरीत । दुराग्रह करीत । अहोरात्र ।।४।।

थोर मानवंती । न जाये हट्टे ती । सप्त अहोरात्री । उभी द्वारी ।।५।।

निरोध मुर्तीला । थोर तो जाहला । माझ्या स्वामीयाला । त्रस्त केले ।। ६।।

दास पालिमकर म्हणे देवेश्वर । त्यजी मायापूर । सातव्या दोनी ।।७।।

 

(अभंग ४३ वा )

कामाक्षेचे गर्वहरण

नंर गुंफे । गेली पाहे मुर्त । शोधी ब्रम्हांडात आत्मा नाही ।।१।।

खात्री झाल्यावर म्हणे वरावर । भेटले खंबीर । मला सत्य ।।२।।

थोर मजहून । असती सामर्थ्यान । केले जे प्रयत्न सर्व व्यर्थ ।।३।।

पुरुष हे थोर । हट्टी योगेश्वर । झाले गर्वघर । खाली तीचे ।।४।।

असे म्हणूनिया । गेली ती कामाख्या । अपेश घेऊनिया । दुष्ट बुद्धी ।।५।।

देवा धर्मावर । जे अत्याचार । करीती पामर दुराचारी ।।६।।

पास पालिमकर । म्हणे त्यांना घोर । नरक वास थोर । परलोकी ।।७।।

 

(अभंग ४४ वा)

श्रीद्वारावतीकार श्रीचक्रपाणी महाराजांचा शिष्यगण शोक सागरात बुडाला. शेवटी विधीपूर्वक पूजा-अर्चना करुन जलडाग दिला पण स्वामींची जीवोद्धारणाची ईच्छा अपूर्णच राहीली म्हणून दुसऱ्या देहाचा शोध करु लागले,

श्री द्वारावतीत । स्वामिंचे सद्भक्त । असति बहुत एक निष्ट ।।१।।

त्यांना झाले ज्ञात । थोर शोक ग्रस्त झाले ते समस्त । स्वामी काजा ।।२।।

आले धावूनिया स्वामी दर्शना त्या । शोक करुनीया । बहुतची ।।३।।

भक्तांचा आधार । मोडला हो थोर । म्हणूनि अनावर । रीति शोक ।।४।।

शेवटी भक्तांनी विधीसी पूजोनी । जळी निक्षेपुनी । स्वामी देहा ।।५।।

स्वामी हेतू थोर । होते तेची पुर । घरु अंगीकार । करुं त्याचा ।।६।।

परि ते शिष्यांनी स्वरे निक्षेपुनी मोठे अभिमानी । गुरुभक्त ।।७।।

जीवोद्धरणाचा स्वामी हेतुसाचा राहिला मनाचा अपूर्णची ।।८।।

मुनी पालिमकर म्हणे सर्वेश्वर । शोधी तो सुंदर देह युक्त ।।९।।

 

(अभंग ४५ वा)

श्रीद्वारावतीकार महाराज श्रीचक्रपाणी स्वामींचे गुणान्मोदन व त्यांची आतं व त्यांचे विषयी अप्राप्तीचे दुःख करणे

प्रभू द्वारावती । जीवोद्धार वृत्ती क्रीडले विरक्ती धरुनीया ।।१।।

चरित्र अनंत लिळाही अनंत । पोवाडे अनंत । केले ज्यांनी ।।२।।

अनंत जीवाचा उद्धारही साचा । केला पतितांचा । किती वाणू ।।३।।

जीवाची माऊली । सुखाची सावली । कशी दुऱ्हावली। दुष्कर्मे ती ।।४।।

कशि मिळेल तो । कृपेची श्रीमुर्ती । कधी पाहीन ती । दिव्य ज्योती ।।५।।

मुनी मुलिधर । म्हणे पालिमकर । सुहृद ईश्वर । सत्य जाणा ।।६।।

 

( अभंग ४६ वा )

द्वारावतीचा महीमा

पश्चीम दिशे ती । काशी द्वारावती केली परम ती प्रभूवरे ।। १।।

श्रीमुर्ती क्रीडेने । भूमी संबंधाने पवित्र गुणाने । अती झाली ।।२।।

त्रेसष्ट वरुसे । केले राज्य ईशे । थोर परमेशे । द्वारावती ।।३।।

म्हणूनी सर्वत्र द्वारावतीकार । श्रीचक्रपाणी थोर संबोधीती ।।४।।

पालिमकर बाबा म्हणे तोची ध्यावा । ना विसरावा कदापीही ।।५।।

 

(अभंग ४७ वा )

श्री द्वारावतीकार चक्रपाणी स्वामींनी पुनरावतार घेतला किंवा नाही ?

पुढील आख्यानी । स्वामि श्रीचक्रपाणी ।

कैसे क्रिडले जनी ऐका तुम्ही ।।१।।

पुनरपि अवतार । घेतला भूवर । कैसा प्रभूवर । व्यक्त झाला ।।२।।

अमृतमय लिळा । परिसाती विमला । जेणे पापमळा । नाश होये ।। ३।।

पालिमकर मुनी । म्हणे स्ववाचेनी । स्मरा अखंड मनी । परेशतो ।।४।।

 

इति श्रीद्वारावतीकार चक्रपाणी जन्माख्यान अपूर्व अभंगवाणीतील संपूर्ण.

इति परधर्मे महामोक्षैक साधने नागार्जुनोपदेशे कवीश्वराम्नाय दिक्षितमुनी मुलिधर महंत पालिमकर महानुभाव विरचित श्रीचक्रपाणी जन्माख्यान येथे संपूर्ण झाले ।।

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post