संस्कृत सुभाषित रसग्रहण मराठी श्लोकार्थ
sunskrit Subhashit
शिवास्ते सन्तु पन्थानो मा च ते परिपन्थिनः ।
आगमाश्च तथा पुत्र भवन्त्वद्रोहचेतसेः ।।
- 'आरण्यकपर्व',
महाभारत.
अर्थ :- हे पुत्रा ! तुझे सर्व मार्ग
कल्याणकारी होवोत व तुला जीवनपथावर कोणतीही बाधा (अडथळ) येऊ नयेत. तसेच आगामी
किंवा भविष्यातील सर्व घडामोडी तुला अद्रोहकारक म्हणजेच द्रोहशून्यता (सुशीलता)
प्रदान करणाऱ्या सिद्ध होवोत.
टीप- मूळ शुभास्ते पन्थानः सन्तु हे चरण असलेले
सुभाषित अथवा श्लोक मला मिळाला नाही परंतु या शोधात असताना शिवास्ते सन्तु
पन्थानः। असे
चरण समाविष्ट असणारा वरील श्लोक मात्र मिळाला.
वरील
श्लोकासंदर्भात एक पाठभेदही आढळतो तो असा,
आगमाश्च तथा पुत्र भवन्त्वद्रोह्चेतसेः ।
आगताश्च तथा पुत्र भवन्त्वद्रोहचेतसेः ।।
हा श्लोक ज्या परिस्थितीचे वर्णन करतोय
तो महाभारतामधील प्रसंग मात्र मनाला करुण्याने हेलावून टाकणारा आहे. नवजात
वसुषेणाला (कर्णाला) टोपलीत ठेवून नदीच्या प्रवाहात सोडून देतांना हृदयवर दगड
ठेवून माता कुंती त्याच्या आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देते आहे. त्या
अर्भकाच्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवातच अनिश्चित आणि जिवावर बेतणारी आहे, हे दिसत
असूनही त्याची असहाय्य कुमारी माता कुंती अतिशय दुःखमय आणि विषण्ण अंतःकरणाने, नशीबापुढे
हतबल होऊन हे बोल बोलतेय.
आरण्यक पर्वामधे या
प्रसंगी अजूनही काही श्लोकांमधून कुंतीमातेच्या मुखातून या मुलाच्या उज्वल
भविष्याबद्दल व त्याच्या कल्याणार्थ चिंताग्रस्त होऊन आशीर्वचनपर श्लोकोक्ती
आलेल्या आहेत. सामान्यतः कोणी एखाद्या लांबच्या अथवा दीर्घ प्रवासाची तयारी करुन
प्रवासाला निघाले की त्याचा प्रवास सुखाचा होण्यासाठी त्याचे सर्व स्नेहीजन
शुभेच्छांची बरसात करतात. प्राचीन काळी ’शुभास्ते पन्थानः सन्तु।’ असे याच अर्थी
म्हटले जायचे व आजही म्हटले जाते.
Happy journey., हॅप्पी जर्नी
आपला
प्रवास सुखाचा होवो.,
Bon voyage!, बॉन वॉयाज,
(फ्रेंच)
शियावासेना
ताबी, (जपानी)
आपकी
यात्रा सुखमय हो।
शिवास्ते
सन्तु पन्थानः।
शुभास्ते
सन्तु पन्थानः।
इ.इ.
शुभेच्छांनी प्रवास मंगलमय,
सुखकारक आणि निर्विघ्न पार पडण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते.