संस्कृत सुभाषित रसग्रहण Sunskrit Subhashit
शरीरस्य गुणानां च दूरमत्यन्तमन्तरम्।
शरीरं क्षणविध्वंसि कल्पान्तस्थायिनो गुणाः।।
शरीर व गुण ह्यांच्यामध्ये अतिशय मोठे अंतर आहे. शरीर हे क्षणभंगुर असते तर गुण हे कल्पान्तापर्यंत टिकणारे असतात. गुणांना मरण नाही. मेल्यावरही माणसाचे गुण म्हणजे कीर्ती चिरंतन राहते.
शरीर हे डोळ्यांना दिसते. गुण हे अनुभवाला येतात. वाढत्या वयानुसार शरीर झिजत जाते. आणि गुण वाढतच जातात. गुण म्हणावे कशाला? बुद्धि, प्रज्ञा, क्षमा, शौर्य, धर्म, अधर्म, भावना, शील इत्यादी हे सर्व गुण आहेत.
मग शिक्षक म्हणाले - "मुलांनो! या मातीत हा मनमोहक वास कसा आला माहीत आहे का? खरतर या मातीवर गुलाबाची फुले गळत राहतात, त्यामुळे या मातीत गुलाबाचा वास येऊ लागला आहे, असाच परिणाम चांगल्या संगतीचा आहे आणि जसा गुलाबाच्या पाकळ्यांच्या संगतीमुळे या मातीतून गुलाबाचा सुगंध येऊ लागला. त्याच प्रमाणे जो माणूस चांगल्या लोकांच्या सहवासात राहतो, त्याच्यामध्ये तेच गुण येतात.