हे ९ गुण मनुष्याच्या ठिकाणी असलेच पाहिजे कोणते? ते जाणून घ्या manushyache 9 gun knowledgepandit

हे ९ गुण मनुष्याच्या ठिकाणी असलेच पाहिजे कोणते? ते जाणून घ्या manushyache 9 gun knowledgepandit

 हे ९ गुण मनुष्याच्या ठिकाणी असलेच पाहिजे कोणते? ते जाणून घ्या

१) सज्जनसंगमाची इच्छा

२) दुसर्‍यांच्या सद्गुणांचं कौतुक, प्रेम

३) गुरूंबद्दल आदरभाव, नम्रता

४) विविध विद्यांबद्दल आसक्ति, शिकण्याचीतीव्रलालसा

५) स्वपत्नीप्रति रति, निष्ठा

६) लोकापवादाची, लोकनिंदेची भीति

७) भगवान श्रीकृष्णांची भक्ति, उपासना

८) अंतर व बाह्य इंद्रियांवर संयम, नियंत्रण मिळवण्यासाठीची शक्ति

९) दुर्जन, दुष्ट लोकांच्या संगति संसर्गापासून मुक्तता

         हे नऊच गुण जरी जोपासले तरीही व्यक्तिगत जीवनात व समाजजीवनातही कल्याण साधता येईल! या गोष्टी व्यक्तीचं जीवन समृद्ध करणार्‍या आहेतच पण त्याच बरोबर त्या  समाजस्वास्थ्य पोषकही आहेत!... पर्यायानं राष्ट्रस्वास्थ्य जपणार्‍या व वाढवणार्‍या आहेत. यातील प्रत्येकावर विस्तारानं चिंतनात्मक लिहावं अशी खरं तर आजची गरज आहे.

         या नऊ गोष्टी ज्यांच्या ज्यांच्या जीवनात पूर्णत्वानं आढळतात त्यांच्या पायाचं रोज नित्यनियमानं व वारंवार तीर्थ घ्यावं असा त्यांचा मोठेपणा आहे, अशी त्यांची थोरवी आहे! या नवातली किमान एक गोष्ट जरी पूर्णार्थानं आयुष्यभर जपली तरी जितं मया असं म्हणायला हरकत नाही! या सर्वच्या सर्व नऊ जरी नाही तरी यातल्या अधिकाधिक गोष्टी अधिकाधिक प्रमाणात जरी अंगी बाणवता आल्या तरी जीवन वेगळ्याच उंचीवर नेता येईल!

        वाञ्छा सज्जनसंगमे... सज्जनांची संगत, त्यांचा सहवास हवाहवासा वाटून त्यांच्याजवळ अधिकाधिक काळ राहणं... त्यांच्या विचारांवर चिंतन करणं... त्यांचे ग्रंथ नित्य वाचनात ठेवणं ही व्यक्तिविकासाची पहिली पायरी आहे! मनुष्य हा बह्वंशी अनुकरणशीलच असतो. लहानपणी तर असतोच असतो, पण मोठेपणीही अनुकरणशील असतो. लहानवयात कोणाचं अनुकरण करावं याचा विचार नसतो, बुद्धीही तितकीशी परिपक्व वा विकसित नसते. पण मोठेपणी हा विचार नक्कीच येऊ शकतो. सज्जनसंगम हा देहाचाच असावा असाही आग्रह धरण्याचं कारण नाही. किंबहुना तो धरूच नये! संत दिसतात कसे, वागतात कसे हे पहाण्यापेक्षा ते सांगतात काय याचा विचार करून तसं वागावं! कारण सज्जनांचा जरी झाला तरी देह त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्माप्रमाणेच त्यांना मिळालेला असतो. देहाच्या प्रारब्धाचा काही ना काही प्रभाव त्यांच्या आचरणावर पडलेला दिसतो व सामान्य माणूस तिथेच फसतो.

         तेव्हा संतसज्जन सत्पुरुष यांनी दिलेली उपासना, भक्ति, त्यांचा उपदेश चित्तात घट्ट धरून त्याप्रमाणे आपण आपलं आचरण ठेवावं, साधना करावी! संतसंगतीची इच्छा तेव्हाच निर्माण होईल जेव्हा माझ्या वाटेला आलेल्या दुःखसंकटांचा निरास करणं माझ्या हातात नाही ही प्रामाणिक जाणीव होईल! जेव्हा मला मिळणारे सुखोपभोग माझ्या इथल्या कोणत्याच कर्माचा. प्रयत्नाचा परिपाक नसून ते का मिळाले याची कारणमीमांसा मला माझ्या बुद्धीनं मांडता येणार नाही तेव्हा!

         जेव्हा मला माझ्या विविध बंधनांची जाणीव होईल, ती दुःखदायकच आहेत हे प्रामाणिकपणे पटेल व त्यातून सुटण्याचा मार्ग शोधण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा! कारण संत सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छपणे आपल्याला आपला मार्ग दाखवतात.  ते देवता असतात! बांधव असतात! इतकंच काय "आत्माहमेव च" असं प्रत्यक्ष भगवान उद्धवाला सांगतात असा श्रीमद्भागवताच्या ११व्या स्कंधातील २६व्या अध्यायात ३४ व्या श्लोकात स्पष्ट उल्लेख आहे! ते दीनवत्सल, करुणासागर असतात. भागवतात त्यांचं वर्णन अनपेक्ष, प्रशांत, समदर्शी, निर्मम, निरहंकारी, निर्द्वंद्व, निष्परिग्रह व भगवत्स्वरूप असलेले, भगवंतातच चित्त गुंतवलेले असं केलंय.

         संतसमागमे आत्मत्वाचा सुंदर उगवे मोड(अंकुर) असं अमृतरायही स्वानुभवानं सांगतात... क्वचित् प्रसंगी ते न बोलताही आपल्याला त्यांच्या आचरणातून मार्गदर्शन करतात! असं वासुदेवानंद सरस्वति म्हणतात

"उपदेश ते न देती । परि ऐकाव्या त्या गोष्टी ।।

तेचि उपदेश होती । तेणे कष्ट नष्ट होती ।।"

असं  अभंगातून सांगतात व म्हणतात

"सदा संतांपाशी जावे । त्यांच्या जवळी बैसावे ।।"

जे देहात्मबुद्धीच्या पलिकडे गेले आहेत, जे शोक, मोह, भय, चिंतामुक्त आहेत, जे सदैव वर्तमानातच जगतात तेच खरे संत! अशा संतांची संगत ज्याला नित्य हवीशी वाटते. त्या साठी जो सतत प्रयत्नशील असतो तोही सुभाषितकाराच्या मते वंदनीय, नमस्करणीयच असतो!

हिंदी

1) सज्जनों से मिलने की अभिलाषा,

2) दूसरे के गुणों में प्रेम.. आकर्षण,

3) गुरु के प्रति नम्रता,

4) विद्याप्राप्तीके विषयमें आसक्ति व्यसन,

5) अपनीही स्त्री में रममाण होनेकी आसक्ति,

6) लोकनिन्दा का भय,

७) भगवान श्रीकृष्ण के प्रति भक्ति,

७) आत्मसंयम की शक्ति

८) दुर्जन व्यक्तियोंके सहवाससे, संसर्गसे मुक्त करनेवाली तथा उनका परित्याग करनेवाली बुद्धि आदि गुण जिन सज्जन व्यक्तियों में है उन्हें नमस्कार है l

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post