माळिनीचे श्रीकृष्ण प्रेम

माळिनीचे श्रीकृष्ण प्रेम

  10-10-2021

माळिनीचे श्रीकृष्ण प्रेम




गोकुळ वृंदावनाच्या शेजारील गावी राहणारी एक माळिन गोकुळात भाजीपाला आणि फळे आणि फुले विकण्यासाठी येत असे.

            जेव्हा जेव्हा ती गोकुळातील गोपीकांच्या घरी फुलेफळेतुळस वगैरे देण्यासाठी जायची तेव्हा तिथल्या गोपींकडून श्रीकृष्णांच्या लीळा ऐकायची.

            गोपिकांनी त्या माळीनीला सांगितले कीनंदराजाची राणी यशोदा श्यामसुंदर अशा श्रीकृष्णाला घराच्या अंगणात नृत्य करवत आहेआणि श्रीकृष्णाच्या त्या बाललीला पाहून आनंदाने टाळ्या वाजवत आहे. आणि मधुर आवाजात गाणे म्हणत आहे.

            श्रीकृष्णाच्या पायातले नुपूर खुळखुळ वाजत होते आणि कंबरेला बांधलेला सोन्याचा कडदोरा त्यात बसवलेल्या लहान लहान घुंगरूंचा मंजुळध्वनी ऐकून मन आनंदीत होते. श्रीकृष्णाच्या छोट्याछोट्या तळपायांना इतकी लालिमा लालसरपणा होता की एक पिकलेले डाळिंबही त्या लालिमेची बरोबरी करू शकत नव्हते.

            बाळ श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा यशोदेचे गाणे ऐकतोतेव्हा तो स्वतःही गाणयला सुरूवात करतो. आणि यशोदेला टाळ्या वाजवताना पाहून तो स्वतःही टाळ्या वाजवू लागतो.

            तो जगाचा स्वामी बाळरूप धारण करून नाचत असताना गळ्यात घातलेली सुंदर अशी वाघनखे अशी चमकतातजणुकाही द्वितीयेचा चंद्र ढगांमध्ये प्रकाश स्फारत आहे.

            श्रीकृष्णांचे काळेशार कुरळे केस जेव्हा कपाळावर येतात तेव्हा असे वाटते कीजणू चंद्राच्या मध्यभागी तारे चमकणारे तारे आलेले आहेत.

श्रीकृष्णांचा सुंदर गळामधुर असे दातलालसर ओठ हे सर्वच अतिशय सुंदर आहे.

            यशोदा आपल्या मुलाच्या अप्रतिम अद्वितिय अशा सौंदर्याचा आनंद घेत होती आणि त्याला नृत्य करवत होती. गोपिका त्या माळिनीला म्हणतात कीश्रीकृष्णांच्या श्रीमूर्तिचे सौंदर्य आमच्या मनात इतके ठसलेले आहे की त्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही.

            गोपिकांकडून अशा श्रीकृष्णाच्या लीळा ऐकल्यानंतर माळिनीला वेध उत्पन्न झाला. तिला लीळा ऐकण्याचे व्यसनच लागले. ज्या दिवशी गोपिकांकडून श्रीकृष्णाच्या लीळा ऐकल्या नाही त्या दिवशी तिला चैन पडत नसे. कुठेच मन रमेना. ‘‘आजा श्रीकृष्णाने असे केलेआज श्रीकृष्णाने तसे केले’’ हे रोज ऐकून तिला श्रीकृष्णांबद्दल अत्यंत आवडी निर्माण झाली. श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे अशी इच्छा तिव्रतेने उत्पन्न झाली.

            ‘श्रीकृष्ण’ हे नाव अत्यंत अद्भूत असे आकर्षण आहे. ज्याच्या हृदयात ते श्रीकृष्ण नाम सामावले त्याला दुसरे काहीही ऐकण्याची इच्छा उरत नाही. श्रीकृष्ण-नामाने तिच्यावरही मोहिनी टाकलीती अत्यंत वेधली.

            गोपिकांकडून श्रीकृष्णाचे सुंदर रूप-माधुर्य ऐकूनती लहानपणापासूनच श्रीकृष्णांच्या सावळ्या लोभस अशा मुखचंद्रावर प्रेम करायला लागली. आणि त्या दिवसापासून तिचे वागणेबोलणेचालणेसर्व बदलले.

            देवाची श्रीमूर्तिची तिच्या हृदयसिंहासनावर अष्टौप्रहर विराजमान होती. ती श्रीकृष्णांना भावभक्ती हीच फुले अर्पण करून नित्यदिनी त्यांची मानस पूजा करू लागली.

            एकदा माळिनीला श्रीकृष्णाच्या दर्शनाची तीव्र उत्कंठा निर्माण झालीती थेट गोकुळात येऊन नंदराजाच्या वाड्याच्या दारात उभी राहून विचार करू लागली कीश्रीकृष्ण बाहेर येईल मग मी त्याचे दर्शन घेईन. एकीकडे तिला श्रीकृष्णांच्या दर्शनाची तीव्र इच्छा होतीआणि दुसरीकडे तिच्या मनात ऐहिक विषयसुखाची लालसाही होती. सांसारिक उपभोगांपासून तिचे मन विरमलेले नव्हते. आणि जोपर्यंत मनुष्याच्या मनात सांसारिक विषयसुखाची लालसा असते तोपर्यंत तो देवाच्या दर्शनास पात्र होत नाही. त्यादिवशी तिला श्रीकृष्णांनी दर्शन दिले नाही. बऱ्याच वेळ ती उभी राहिली पण देव बाहेर आले नाहीत. शेवटी ती कंटाळून निघून गेली.

            दुसऱ्या दिवशीही ती तशाच उत्कंठेने आली. पण शेवटी निराश होऊन परत गेली. असा तिचा नित्यक्रमच सुरू झाला पण जेव्हा जेव्हा ती माळिन नंदराजाच्या वाड्यासमोर येई तेव्हा तेव्हा श्रीकृष्ण माजघरात जाऊन बसतआणि ती जाईपर्यंत बाहेर येत नसत.

            बरेच दिवस वाट पाहूनही श्रीकृष्णांचे दर्शन तिला झाले नाही.

            श्रीकृष्ण तिच्या भावना सर्वज्ञपणे जाणत होते. पण तिचे स्नेह वाढवण्यासाठीच त्यांनी तिला दर्शन दिले नाही.

            ती जेव्हा जेव्हा ती यायचीतेव्हा तेव्हा श्रीकृष्ण खेळाच्या बहाण्याने बाहेर निघून जायचे किंवा घरात बसून राहायचे. आणि ती खुप दुःखी व्हायची.

            प्रेमाची रीत सुद्धा किती विचित्र आहे ना. प्रियकर जितका जितका तिच्याकडे दुर्लक्ष करतो तितके तितके त्याच्याबद्दलचा स्नेह वाढते.

            दर्शनाची उत्कंठा तिच्या आनंदात भर घालत होती. श्रीकृष्णाचे दर्शन होत नाही हे शल्य तिला नेहमी असायचं. पण शेवटी तिची ‘दर्शनाची उत्कट इच्छा’ तिला तिच्या परम प्रियकराकडे घेऊन जाणारच.

            त्या माळिनीचे मन सतत श्रीकृष्णात गुंतून होतेआणि नंदभवनाच्या प्रांगणात भटकत होते.

            श्रीकृष्ण तिला कसा भेटेलया चिंतेने तिने धीर गमावला. ती स्वतःशीच बडबळ करायला लागली, ‘ हे श्यामसुंदरा! तू इतका क्रूर कसा आहेसमाझ्याकडे इतके दुर्लक्ष्य का करीत आहेसजे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यापासून तू दूर का जातो. आणि ज्यांना तुझा तिरस्कार होता त्या पुतनादि राक्षसांना तु घरी येताच दर्शनही दिलेआणि त्यांचा उद्धारही केला. तुझ्या या विरूद्ध वागण्याचे खरे रहस्य काय आहेते कोण जाणू शकेल.’’ असे म्हणून ती रडू लागली.

            अंतःकरणापासून केल्या जाणाऱ्या प्रार्थनेत अफाट शक्ती असते. देवतांनाही पाझर फुटतो आणि त्याही आपल्या भक्तांच्या संकटात धावून येतात. मग इथे तर ज्यांच्यासाठी माळिनीने प्रार्थना केली आहेतो तर परम दयाळु आहेकृपेचा समुद्रच आहेजीव कितीही विपरीत वागला तरीही त्याच्याबद्दल त्या परमकृपाळु परमेश्वराची करुणादयाक्षमा आणि कृपा कधीच कमी होत नाही.

मग तो परमेश्वर या प्रार्थनेचा स्वीकार का करणार नाहीदेव भावाचा भुकेला । भक्तासाठी सर्वही सांडुनि धावला ।।

            एके दिवशी ती माळिन गोपिकांना म्हणालीअरे गोपिकांनो! तुम्ही म्हणता कीकन्हैया प्रेमळ आहेपण मी त्याला दिसत नाही. कन्हैयाची कृपादृष्टी माझ्यावर पडेल असा काहीतरी मार्ग सांगा.

            गोपिका माळिनीला म्हणाल्या - ‘‘हे सुखदे! श्रीकृष्णाचे दर्शन होण्यासाठी तुला काहीतरी व्रत नियम घ्यावा लागेल.’’

            माळिनी म्हणाली, ‘‘गोपिकांनो! मी खूप गरीब आहे. सांसारिक गरजा भागवण्यापुरतेही द्रव्य माझ्याकडे नाहीमला असे एखादे व्रत सांगा की ते मी संयमाने पाळू शकेन.’’

            गोपिकांनी सांगितले, ‘‘हे अबलेतू कितीतरी दिवसांपासून श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी नंदबाबांच्या दारात उभी आहेसत्याऐवजी तू नंदराजाच्या भुवनाच्या प्रदक्षिणा का करत नाहीसआजपासून नंदभुवनाच्या एकशे आठ प्रदक्षिणेचा नियम घे. आणि प्रदक्षिणा करताना तू श्रीकृष्णाला प्रार्थना कर की, ‘‘हे माझ्या सावळ्या प्रियकरा! विश्ववेधका मला तुला भेटायचे आहे.’’

            माळिन रोज नियमानुसार प्रार्थना करीत नंदबाबांच्या महालाच्या एकशे आठ प्रदक्षिणा करायला लागली. प्रदक्षिणा करत असताना, ‘‘हे श्रीकृष्णा ! मधुरतम देवा! नंदकुमारा! एकदा बाहेर येमला तुझे मंगळ दर्शन होऊ दे. अशी प्रार्थना तिने सुरू केली.’’

            अशी दैनंदिन परिक्रमा प्रार्थना सुरू होती. हळूहळू तिचे सांसारिक वासनांनी भरलेले अशुद्ध मन शुद्ध होऊ लागले. आहे. आता तिचे मन श्रीकृष्णदर्शनासाठी तळमळू लागले..

            प्रदिक्षणा करून ती फळे आणि भाजीपाला विकायला मथुरेला जायची पण तिचे मन मात्र गोकुळात नंदभुवनात घुटमळायचे.

            सकाळी उठल्याबरोबर ती आपल्या मनमोहनाच्या शोधात गोकुळात परत यायची आणि स्वतःला विसरून प्रार्थनापूर्वक प्रदिक्षणा करयाची.

            काही दिवसातच श्रीकृष्णाला पाहण्याच्यास्पर्श करण्याच्या इच्छेने कळस गाठलाआता तिला जगात श्रीकृष्णाशिवाय काहीच दिसत नव्हते. ती पूर्णपणे श्रीकृष्णमय झाली होती.

            आज माळिनीने ठरवलं की ‘श्रीकृष्णाच्या दर्शनाशिवाय पाणीही पिणार नाही.

            डोक्यावर सुंदर-गोड फळांची टोपली ठेवूनश्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तिचे चिंतन करतती गोकुळात आली आणि ओरडली - ‘‘फळे घ्याफळे घ्या’’

            तिचे शब्द श्रीकृष्णाच्या कानापर्यंत पोहोचले. श्रीकृष्ण देवाने विचार केला कीही माळिनी वासनांपासून मुक्त नाहीदर्शनास पात्र नाहीपण तिची भक्ती बळकट करण्यासाठीतिला दर्शन दिलेच पाहिजे. सर्व कर्मांचे आणि उपासनेचे फळ देणारे भगवान श्रीकृष्ण फळे खरेदी करण्यासाठी घराबाहेर आले.

            श्रीकृष्ण खूप सुंदर दिसत आहेत. यशोदामातेने त्यांना पितांबर परिधान करवला आहे. त्यांनी कंबरेला सोन्याचा कडदोरा घातलेला आहे. डोक्यावर मोर-मुकुट घातला आहेत्याच्या हातात छोटी बासरी आहे. त्याच्या करुणामय नेत्रांमध्ये अत्यंत प्रेम आहे. श्रीचरणांमध्ये बांधलेले सोन्याचे नुपुर ते छम-छम निनादत आहेत आणि उत्साहाने तिच्याकडे धावत येत आहेत.

            तो मोहक असा श्यामसुंदर लाल लाल हातांच्या छोट्याशा ओंजळीत मावेल तितके धान्य घेऊन घाईघाईने माळिनीकडे धावला.

            त्यांच्या छोट्याशा करातील बरेच धान्य वाटेतच विखुरले गेले आणि ओंजळीतमध्ये राहिलेले थोडेसे दाणे त्यांनी माळिनीच्या टोपलीत टाकले.

            तो सर्वदाता प्रभु त्या माळिणी कडून फळे घेण्यासाठी अधीर होता. त्या सर्वांच्या प्राण असलेल्या मधुरतम अशा परमेश्वराला आपल्याकडे येताना पाहून तिचे प्रेम ओसंडून वाहू लागले.

            अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली होतीज्याच्या एका ओझरत्या दर्शनासाठी तिने जीवाचे रान केले तो साक्षात्‌ तिच्या समोर उभा राहून दर्शनानंदाची धवधनी करत होता. ती स्वतःला पूर्ण विसरली. त्या माळिनीला आठ मुली होत्यापण एकही मुलगा नव्हता. तिचे मातृहृदय जागृत झाले. श्रीकृष्णाला पाहून तिच्या मनात अशी भावना निर्माण झाली की, ‘‘मलाही असाच मुलगा झाला तर किती बरे होईल! या श्रीकृष्णाला हातात जेव्हा यशोदमाता कडेवर घेऊन खेळवते तेव्हा तिला किती बरं आनंद होत असेलमला तसा अद्वितिय आनंद कधी मिळू शकेल काहे कान्हा तु माझ्या कुशीत येशील कामी कसं म्हणू की तू मला पुत्रपणाचा सोहळा अनुभवू दे’’ इत्यादि विचार करता करता तिच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले.

            भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी आहेतसर्वज्ञ आहेतमाळिनीचा मनोधर्म त्यांनी जाणलातिच्या मातृ हृदयाच्या भावनांचा स्वीकार करत तो सर्वांना आनंदविणारा परमेश्वर तिच्याच्या मांडीवर येऊन बसला.

            आता माळिनीच्या मनात असे पूत्रप्रेम निर्माण झाले की श्रीकृष्णाने एकदा मला ‘आई’ म्हटले तर किती चांगले होईल असे तिला वाटू लागले.

            श्रीकृष्णाला माळिनीची दया आली. जीवाच्या भावनेनुसार त्यांच्यावर प्रेम करणारा तो देव तिला म्हणाला, ‘‘हे माते!मला फळे दे.’’ : ‘‘माता’’ शब्द ऐकून माळिनीला खूप आनंद झाला. ती विचार करू लागली कीमी या सुंदर बाळाला काय देऊ?’’ तिने आपले मनच देवाला समर्पित केले होते.

            श्रीकृष्णाच्या अत्यंत दुर्मिळ कोमल अशा श्रीकरकमळांना स्पर्शण्याचा आनंद मिळवण्यासाठी अधीर झालेल्या त्या माळिनीने त्यांचे दोन्ही श्रीकर फळांनी भरून दिले.

            श्रीकरात फळे येताच श्रीकृष्ण भगवान धावतच घरात निघून गेले. आणि त्यांच्या मागे माळिनीचे मन देखील गेले.

            ती वेडी झाली आणि उठता-बसता स्वप्न पाहू लागली की श्रीकृष्ण माझ्या मांडीवरच बसला आहे.

            त्या वेळी माळिनीच्या मनाची अवस्था कोण वर्णन बरं करू शकेलतिने सर्वकाही श्रीकृष्णासाठी समर्पित केले होते.

            आता माळिनीला घरी जाण्याचीही इच्छा उरली नाही. पण घरी तर जावेच लागणार होते. तिने डोक्यावर टोपली ठेवली आणि श्रीकृष्णाची आठवण करत करत घरी गेली.

            घरी गेल्यावर तिने टोपली ठेवलीआणि तिच्या लहान मुली धावत आल्या व विचारू लागल्या, ‘‘आई खाण्यासाठी काय आणलेआम्हाला भुक लागलीये काहीतरी दे,’’ तिने खिन्न होऊन त्यांच्याकडे पाहिले कारण आज सर्व फळांच्या बदल्यात तिने फक्त धान्याचे मुठभर दाणे आणले होते. ती उदास झालीतिने टापेलीतले वस्त्र बाजुला केले आणि आ वासून पाहतच राहिलीकारण सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या भगवान श्रीकृष्णाने तिची रिकामी टोपली प्रेमाच्या अमूल्य रत्नांनी भरली होती. मुठभर धान्याच्या जागी अमूल्य हिरे आणि मोती होते.

            श्रीकृष्णाने माळिनीची टोपली रत्नांनी भरली होती आणि त्या रत्नांचा प्रकाश संपूर्ण झोपडीत पसरला आणि त्या प्रकाशात माळिन फक्त कन्हैयालाच पाहत होती.

            समोर श्रीकृष्णमागे श्रीकृष्णउजवीकडे श्रीकृष्णडावीकडे श्रीकृष्णआत श्रीकृष्णबाहेर श्रीकृष्ण. तिला श्रीकृष्णाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते.

            या कथेतून आपल्याला एक महत्वाची गोष्ट कळली पाहिजे कीमाणसाची बुद्धीही टोपलीसारखी आणि भक्ती रत्नासारखी असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपले सर्व कर्म श्रीकृष्णाला समर्पित करतेतेव्हा त्याची टोपलीरूपी बुद्धी भक्ती रत्नांनी भरलेली असते.

            जेव्हा मनुष्य त्याच्या चांगल्या कर्मांची फळे कलत्रसंपत्तीमुलगानातू इत्यादी सुखापुरती मर्यादित मानतो म्हणजेचजेव्हा आपल्याला काही चांगल्या कर्मांच्या बदल्यात देवाकडून कोणतीतरी इच्छापूर्ती करायची असतेतेव्हा आपण आपली चांगली कर्मे जणुकाही विकत असतो. म्ह. काहीतरी हवे आहे म्हणून भक्त करणे हा तर व्यवहार झाला. म्हणून कोणतेही कर्म करताना श्रीकृष्णार्पण’ भाव ठेवणे हेच श्रेयस्कर आहे. सर्व देवताभक्ती टाकूनसर्व देवतांची कर्मे टाकून परमेश्वरभक्ती निष्काम भावनेने केली तर त्याचे फळ तो परमेश्वर आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही.

म्हणून संत म्हणतात -

येन केन प्रकारेण मनकृष्णे निवेशयेत् ।

सर्व प्रकारे मग श्रीकृष्णाच्या भक्तीत लावावे.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post