मनाचा संयम संसारातून सुटका!!
धर्म म्हणजे धारण करणे, सात्विक कर्तव्ये पार पाडणे,
काम म्हणजे विषय सुखाचा आनंद मिळवण्यासाठी आपल्या वैयक्तिक आणि इतरांच्या इच्छा पूर्ण करणे.
अर्थ म्हणजे आपल्या अन्न वस्त्र निवारा या मूलभत गरजांच्या पूर्तीसाठी आणि वासना इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे आणि इतर संसाधने मिळवणे.
आपण सर्व कलियुगाप्रमाणे हिन युगात आहोत ज्यात फक्त आणि फक्त इच्छा आणि पैसा द्रव्य कमावण्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो. पण काही बुद्धिमान मनुष्य देखील असे देखील आहेत जे आपले धर्माचे आचरण करण्यासाठी करण्यासाठी पुढे सरसावतात. नामधारक धर्माचे पालन करतात.
परंतु या चक्रातून कायमचे सुटण्यासाठी म्हणजे मोक्षा बद्दल मोक्षाबद्दल (म्हणजे ईश्वरप्राप्तीबद्दल) कोणी दूरदूरपर्यंत विचार करत नाही. तर मोक्ष मिळवणे हे आपल्या मानवी जीवनाचे सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. कारण परमेश्वराचे यथातथ्य ज्ञान झालेला हा एकमेव जन्म आहे ज्यामध्ये आपल्याला कर्म करण्याचे स्वातंत्र्य आहे. (इतर सर्व जन्मांना भोग योनी मानले जाते ज्यात कर्म करण्याचे इतके स्वातंत्र्य नाही. )
आपल्या पूर्वजांनी मोक्षप्राप्तीला अधिक महत्त्व दिले आहे. प्राचीन काळी आध्यात्मिक प्रगती ही खरी प्रगती मानली जात असे. परंतु या कलियुगात, सांसारिक प्रगती ही सर्वकाही मानली जाते, तर कोणीही आध्यात्मिक प्रगतीकडे पाहत नाही, त्यामुळेच आपले पतन सुरू झालेले आहे.
प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. मेंढ्या आणि बकऱ्यांसारख्या अंध शर्यतीत सामील झाला आहे. मुकी बिचारी कुणीही हाका । अशी मेंढरे बनवू नका । या संसाराच्या रंगभूमीवर देवता आपल्याला हवेत अशा नाचवत आहेत आणि आपणही इंद्रियांच्या पूर्तीसाठी वासनेच्या आहारी जाऊन तसे नाचत आहोत.
आपण मानवांनी सांसारिक प्रगती केली आहे. पण त्याचबरोबर आपण त्यांच्याशी निगडित अनेक दुःखांचे बळी ठरलो आहोत. आणि पुढेही ठरत राहू. एकूण एक संताने हे मान्य केले आहे की संसारात सुख पाहता जवा पाढे । दुःख पर्वताएवढे।।
हे तटस्थ होऊन सिंहावलोकन केल्याने ज्ञान पूर्वक विचार केल्याने आपल्या लक्षात येईलच. या गोष्टीचा स्वतः अनुभव घ्यावा. आणि पाहावे की आपण दुःखी आहोत की त्यापेक्षा जास्त आनंदी आहोत. सांसारिक सुखांची व्याप्ती केवळ बाह्य जगापुरती मर्यादित आहे. आणि सर्व सांसारिक सुख हे नश्वर आहेत हे आपण जाणूनच आहोत कळते पण वळत नाही अशी आपली अवस्था
जर खरा आनंद, शांती आणि समाधान मिळावयाचे असेल तर आपल्याकडे आध्यात्मिक प्रगतीशिवाय दुसरा मार्ग नाही. आम्हाला आमच्या मुलांना डॉक्टर इंजिनिअर बनवायचे आहे, पण कोणालाही महात्मा बनवायचे नाही, देवाचा भक्त बनवायचे नाही कोणीही संसारीक सुखांचा या नश्वर जगाचा त्याग करून भगवंताची प्राप्ती करण्याची प्रेरणा देत नाही, हा आमचा सर्वात मोठा कमकुवत मुद्दा आहे, कारण आम्ही ममतेने ग्रासलेले आहोत मुलांची बायकापोरांची आई-वडिलांची ममता आमच्या नखशिखांत भरलेली आहे.
आणि आपण आपल्या मुलांचे हितचिंतक शुभचिंतक समजतो आणि त्यांना संसारामध्ये ढकलून नरकाच्या वाटेला लावतो. जर आपल्याला या सांसारिक दु:खातून मुक्त व्हायचे असेल तर ऐहिक प्रगतीबरोबरच आपण आपली आध्यात्मिक प्रगती सर्वोच्च स्थानावर ठेवली पाहिजे.
(जर आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर प्रथम आपल्याला आपल्या सांसारिक इच्छा हळुहळु सोडून द्याव्या लागतील.)
(इच्छा काय आहेत? त्या किती प्रकारच्या आहेत? आणि त्यांचे मूळ कोठे आहे? याबद्दल आपण खोल विचार केला पाहिजे. गुरुजनांचे जवळ जाऊन प्रश्न विचारले पाहिजे. वरवडे पाहता, संसार सुखाची इच्छा सोडून द्या" हे लिहिणे खूप सोपे आहे, परंतु ते आचरणात आणणे, अंमलात आणणे खूप कठीण आहे.
जर तुम्हाला विषयवासना सोडायची असेल तर तुम्हाला खूप ज्ञान, आत्म-विश्लेषण आणि आत्म-संयम आवश्यक आहे. जेणेकरून निरोगी मन ठेवून, परमेश्वराचे नाम आठवण स्मरण करणे गुरुं जवळ जाऊन ज्ञान काढणे आणि मार्गाची साधुसंतांची सेवा करणे यांचे यथोचित करता येईल.
सांसारिक सुखांचा त्याग करणे आणि धर्म कार्यात मन गुंतवणे सोपे नाही. त्यासाठी मजबूत आत्मविश्वास आणि सर्वोच्च मनोबल आवश्यक आहे. जर आपल्याला सर्वोच्च मनोबल मिळवायचे असेल तर सर्वप्रथम मन काय आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की, आपल्यासाठी या गोष्टी समजणे थोडे कठीण आहे पण काळजी करू नका, सर्वकाही प्रयत्न करून आणि सरावाने घडते. यासाठी चार गोष्टी करणे फार महत्वाचे आहे,
१) पहिला परिच्छेद, नाम धारकाने अनीति मार्गाने द्रव्य कमावण्याच्या सप्त दुर्व्यसनांचा पूर्णपणे परिच्छेद केला पाहिजे. वासनिकाने हिंसा रूप, विकल्प रूप कर्म करून पोट भरण्याचा परिच्छेद केला पाहिजे. शक्यतो त्याने अहिंसक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा निर्वाह केला पाहिजे.
२) दुसरा प्रार्थना, आपल्या संसारिक इच्छा कमी होण्यासाठी अनुसरण घडण्यासाठी ममता तुटण्यासाठी रोज देवाला प्रार्थना केली पाहिजे.
३) तिसरा प्रायश्चित्त, आपल्याला दैनंदिन जीवनात जे काही पाप कर्म घडतात कोणाचे मन दुखावले जाते सूक्ष्म जीवजंतूंची हिंसा होते पाल, उंदीर, सरडे, गोगलगाय, मुंग्या इत्यादी जीव जंतू मारले जातात त्याचे प्रायश्चित रोज केलेच पाहिजे. देवपूजा समोर पाच दंडवत घालून दिवसभरात जे काही हिंसा रूप कर्म आपल्याला घडले ते मनात आठवून देवाजवळ मुक्त करून त्याचे प्रायश्चित केले पाहिजे.
४) चौथा प्रयत्न, हळूहळू ममता तोडण्याचा जास्तीत जास्त धर्माचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे (वारंवार सराव आणि अलिप्तता) या दोन गोष्टी आपण करू आपल्याला साधतील तेव्हाच आपण पूर्वोक्त या चार गोष्टी करू शकू, जेणेकरून आपले मन असेल देवामध्ये स्थीर होईल.
आपले मन नियंत्रित, संयमित करण्याचा प्रयत्न करा!!