महानुभाव पंथ भजन लिरिक्स - mahanubhav panth bhajan lyrics

महानुभाव पंथ भजन लिरिक्स - mahanubhav panth bhajan lyrics

महानुभाव पंथ भजन लिरिक्स - mahanubhav panth bhajan lyrics 

भजन 01

श्रीदत्त प्रभुचा महिमा

(चाल : घुगटके पट खोल रे पिया तो मिलेंगे)

श्रीदत्त दीन दयाल

करीतो भक्तांचा प्रतिपाळ ॥धृ०॥

अनाथांचा नाथ मुराळी ।

आनंदाची करी दीपवाळी ॥

श्रीचक्रधर हरीपाळ ।

करीतो भक्तांचा प्रतीपाळ ॥१॥

जीवाशिवासी मुक्त करूनी।

सुखानंद दे अधमती हरूनी॥

दूरकरी भव जाल।

करीतो भक्तांचा प्रतीपाळ ॥२॥

श्री हरी सेवक निजदासाचा।

परम पिता तो भानुकविचा ॥

साय करी त्रय काल

करीतो भक्तांचा प्रतीपाळ ॥३॥

 

भजन 02 आदीगण

(चाल : ॐ परब्रह्मा श्री परेशा)

धावत यावे आदी गणराया ।

साह्य करावे प्रचार कार्या ॥धृ०॥

तव पदी माझे मानस रमले ।

म्हणुनि करीतो स्वागत आपुले ॥

मन सुमने ही आप्नी काया

वन्दन करीतो श्री प्रभुराया ॥१॥

ऋषीमुनि गाती तव गुण महिमा।

भुल पडली त्या हरिहर ब्रह्मा।

तुझे रूप ते गेली पहावया।

नेत्र तरळले आंधळी माया॥२॥

भक्त मीराची ऐकुनि गानि।

ऐकाया तू येसी धाऊनी ॥

मजवरी दुर का केली माया।

येऊनि जन्मा गेलो वाया ॥३॥

आम्ही लेकुरे सेवक तुमचे।

मान्य करावे निवेदन आमुचे॥

भानु कवि वरी धरी सुख छाया।

भवसागर हा पार कराया।

धावत यावे आदी गणराया।

भवसागर हा पार कराया ॥४॥

भजन लिरिक्स मराठी

 

भजन 03 श्रीदत्त प्रभुचा महिमा

(चाल : घुगटके पट खोल रे पिया तो मिलेंगे)

श्रीदत्त दीन दयाल । करीतो भक्तांचा प्रतिपाळ ॥धृ०॥

अनाथांचा नाथ मुराळी । आनंदाची करी दीपवाळी॥

श्री चक्रधर हरीपाळ। करीतो भक्तांचा प्रतीपाळ ।।१।।

जीवाशिवासी मुक्त करूनी । सुखानंद दे अधमती हरूनी ॥

दूरकरी भव जाल । करीतो भक्तांचा प्रतीपाळ ॥२॥

श्री हरी सेवक निजदासाचा । परम पिता तो भानुकविचा॥

साय करी त्रय काल । करीतो भक्तांचा प्रतीपाळ ॥३॥

 

भजन 04 आदीगण

(चाल : ॐ परब्रह्मा श्री परेशा)

धावत यावे आदी गणराया।

साहय करावे प्रचार कार्या ॥धृ०॥

तव पदी माझे मानस रमले।

म्हणुनि करीतो स्वागत आपुले ॥

मन सुमने ही आप्नी काया

वन्दन करीतो श्री प्रभुराया ॥१॥

ऋषीमुनि गाती तव गुण महिमा ।

भुल पडली त्या हरिहर ब्रह्मा ।

तुझे रूप ते गेली पहावया।

नेत्र तरळले आंधळी माया ॥२॥

भक्त मीराची ऐकुनि गानि ।

ऐकाया तू येसी धाऊनी ॥

मजवरी दर का केली माया ।

येऊनि जन्मा गेलो वाया ॥३॥

आम्ही लेकुरे सेवक तुमचे ।

मान्य करावे निवेदन आमुचे ॥

भानु कवि वरी धरी सुख छाया ।

भवसागर हा पार कराया ।

धावत यावे आदी गणराया ।

भवसागर हा पार कराया ॥४॥

 

भजन 05 नाटकारंभीचे नमनगीत

(चाल : हे शिवशंकरा गिरजा तनया)

जय जय जय श्री जयगोपाला।

करीतो आम्ही आज नमन तुला ॥धृ०॥

आज्ञ जनासी सुज्ञ कराया।

गरुडावरती बैसुनी राया।

मधूर स्वरांच्या त्या मुरलीला।

वाजुनी शांतवी तू सर्वाला ॥१॥

जन गण दिग्मोहीत कराया।

नटखटभव संसारी तराया॥

सुयश द्यावे शुभ कार्याला।

हीच विनंती तव पद कमला ॥२॥

खटपट करूनी पैशासाठी।

होय जीवाची माती मोठी।

या विषयावर नाट्यकला।

सादर करीतो मी आजला ॥३॥

प्रेक्षक बंधु आले पहावया।

शांत करावे त्यांच्या हृदया।

वरमती देउनी या आम्हाला।

विजयी करावी नाट्यकला ॥४॥

आम्हा बालकापोटी धरावे।

भानुकविचे ब्रीद राखावे॥

ध्वज फडफडतो क्षेत्राला।

प्रती वर्षी त्या चैत्राला ॥५॥

 

भजन 06 धावा श्रीकृष्णाचा

(चाल : उठा रे गड्या काळ बिकट पातला)

लवकरी धावत येई मुकुंदा ॥धृ०॥

आनंदकंदा परमानंदा ।

निजसुख देई छेदूनी बंधा ॥

आवड मला ही सदा ॥१॥

नम्र विनंती तुज गोविंदा ।

दर्शन द्यावे देवकीनंदा ॥

करूनि कृपा एकदा ॥२॥

तव गुण महिमा न कळे वेदा ।

भव हरूनि देसी मकरंदा ॥

अर्पनी त्या निजपदा ॥३॥

भानुकविच्या पुरवी छंदा ।

सुमती द्यावी अतीमती मंदा ॥

नमन तुला सर्वदा ॥४॥

 

भजन 07 लज्जारक्षण

(चाल : माहेरची साडी)

 गिरीधर माधव, द्रौपदी बांधव, सभेसी भूल पाडी।

नेसवि बहिणीला साडी ॥धृ०॥

करीती वलगणा कौरव नृपती।

वस्त्र सतीचे फेडा म्हणती॥

कठोर भाषण, करी दुशाषण, द्रौपदीला ओढी ॥१॥

धरूनि अहंता भक्ता वरीती।

दुर्जन बहुतचि खोड्या करीती॥

भ्रष्टमतीचे, द्रौपदी सतीचे, वस्त्र बळे फेडी ॥२॥

पडती ढीगावर ढीग वस्त्रांचे।

गात्र गळाले आंधसुताचे॥

पाहुनि थकले, तेथच रुकले लाज नसे थोडी ॥३॥

स्मरण करावे श्रीकृष्णाचे।

निरसन होईल मूळ प्रश्नांचे॥

दुष्कृत्याचे, भानुकविचे, भवबंधन तोडी।

नेसवी बहीणीला साडी ॥४॥..

 

भजन 08 श्री प्रभुकृपा

(चाल : माहेरची साडी)

माल्हणीनंदन, तोडली बंधन, भवातुनि काडी।

बैसवी अढळपदी गोडी ॥धृ०॥

सोडुनि दिधले व्यसन जुवाचे।

स्वीकार केले व्यसन जीवाचे॥

होउनि वैद्य, ज्ञाना औषधी दे, षडरिपु विष पाडी ॥१॥

पैलतीरावरी नेउनि सोडी।

आधिकारी जीवन अगणित कोडी॥

नासुनि कर्म, दावी स्वधर्म, प्रेमामृत वाडी ॥२॥

मोहमायेचे बळकट फासे।

तोडुनि टाकी लाउनि कासे ॥१।।

संकट दारुनि, विंध निवारुन, त्रय तापही धाडी ॥३॥

दोष अविद्या नासुनि मुळीचा।

चुकवि फेरा कर्म फळीचा॥

भानुकविची गती पूर्वीची, शोधुनिया मोडी ॥४॥

 

भजन 09 नम्र प्रार्थना

(चाल : कृष्ण माझी माता)

तुझी मला देवा घडो नित्य सेवा ॥धृ०॥.

मुखी वसो नाम तुझे गहन।

कानी पडो तुझे गुणगान। 

तुझ्या पाई लागो माझे ध्यान ।

नेत्री वसो तुझे रूप छान ॥१॥

घडो नित्य सुपात्र दान । पाई घडो तिर्थ आटन।

हेचि मज देई वरदान । घडो नित्य संत दर्शन ॥२॥

शरण आलो तुज भगवंता । दुरकरी माझी भय चिंता॥

तूच माझी माता आणि पिता। । तव पदी भानु ठेवि माथा ॥३॥

 

भजन 10 आराधना

(चाल : हो ओ मुझे किसीसे प्यार हो गया)

हो ओ धाव पाव चक्रस्वामीया, चक्र स्वामीया ।

साधन दातीया, हो ओ, धाव पाव चक्र स्वामीया ॥धृ०॥

साधशइसे गंगे बुडताची तारीले।

लळताईसे काळ स्पोड दुःख हरीले॥

सर्प दंश विष हरूनि, रक्षी माळीया ॥१॥

पेंधी वामनाचिया पत्नीस जीवविले।

दुःख हरूनी जोग नायकासी निवविले।

जीव्हारोग माळीनिचा, दूर करूनिया ॥२॥

पंचकुळाचार्या ग्रहातूनि सोडवि।

त्याचपरी सारंगपाणिचाही दवडवि॥

सालबर्डी सशीकतया, केले निर्भया ॥३॥

नित्य नासुनि द्विजवरा प्रेम दीधले ।

तैसे मज द्यावे प्रभु प्रेम आपुले ।

पापीया मी दोषीया मी, नर्कवासिया ॥४॥

चतुर्विध साधनाची आवडी गोडीना ।

हिंसा विकल्पादी विषयाते सोडीना ॥

भानु म्हणे दुर्लक्ष करा, दोष माझीया ॥५॥

 

भजन 11 दयाळु ईश्वर

(चाल सत्याची जाणीव नाही खोट्याला भाव)

देवाधी देवाची अघटीत माव।

करी प्रिय भक्तासी रंकाचा राव ॥धृ०॥

श्रीकृष्णरायाच्या भेटी सुदामा ।

आलासे आठवित श्रीकृष्ण नामा ॥

पोहे पसाभरी भक्षूनि प्रेमा ।

राज्याधिकारी केला सुदामा ॥

सोन्याच्या नगरीला द्वारकेचा भाव ॥१॥

चानुर कंसा सुरा मर्दुनि ।

उग्रसेना पटी स्थापन करूनी ॥

आंध सुतांचे खंडण करुनि ।

पंडुसुता दिली ती राजधानी ॥

एकनिष्ठ भक्तीचा सत्ये प्रभाव ॥२॥

गोपाल करीतो भुपाल जिवा ।

पाहूनि त्यांच्या सुभक्ती भावा ॥

मधुर मधुर वाजउनि पावा ।

शांती सुखाचा दे नित्य मेवा ।

भानुकवी म्हणे सोडी अहंभाव ॥३॥

 

भजन 12 मुक्ती मिळण्याचे साधन

(चाल : हो ओ मुझे किसीसे प्यार हो गया)

हो ओ मुक्ती मिळे भक्ती केलिया, भक्ती केलीया।

स्तुती केलीया हो मुक्ती मिळे भक्ती केलीया ॥धृ०॥

चार पदार्थाचे जीवा ज्ञान झालिया।

जिवदशा स्वार्थ नशा दूर केलीया॥

अंतरात संसाराचा, त्रस आलीया ॥१॥...

मानअपमान अभिमान गेलिया।

शत्रू मित्र गोत्र सम दृष्टी आलीया॥

रावरंक वाटे एक, फकिर आवलिया ॥२॥

हीन दीन लीन नम्रवृत्ती झालीया।

पाप ताप शाप तझा जाईल सविलया॥

दान धर्म पुण्यकर्म, सतत केलीया ॥३॥

सर्वधर्म त्याग करूनि शरण गेलीया।

प्रेमभरे नित्य नाम स्मरण केलीया॥

भानुकवि स्वानुभवी सांगे युक्तीया ॥४॥

 

भजन 13 नामाचा महिमा

(चाल : पाय तुझे गुरुराया हीच माझी देवपुजा)

नाम तुझे ते यदुराया यदुराया।

करि माझी खूप मजा ॥धृ०॥

नाम तुझे करी बहु क्रांती । जीवा सौख्य दे विश्रांती॥

जीवा सौख्य दे विश्रांती । जीवा सौख्य दे विश्रांती ॥१॥

नाम तुझे केंद्रबिंदु । पार करी हा भव सिंधू ।

पार करी हा भव सिंधु । पार करी हा भव सिंधु ॥२॥

नाम तुझे जगदिश्वरा ।  दूर करी विघ्ने बारा ।

दर करी विघ्ने बारा । दर करी विघ्ने बारा ॥३॥

नाम घेई लाउनि ध्यान चुके तया जन्म मरण।

चुके तया जन्म मरण। चुके तया जन्म मरण ॥४॥

भानुकवि देतो ग्वाही । हरी विना तारक नाही।

हरी विना तारक नाही । प्रभु विना तारक नाही ॥५॥

 

 भजन 14 अखंड ध्यान

(चाल : सांग कसा विसरू)

नाम नका विसरू, देवाचे नाम नका विसरू ॥धृ०॥

तो जगपिता भव भय हारता।

धन्ये दया सागरू ॥१॥

येउनि जन्मा स्मर घनशामा।

परब्रह्म परमेश्वरू ॥२॥

अमोल काया जाईल वाया।

नका खाउनि पसरू ॥३॥

सोडुनि धंदा भज गोविंदा। प्रार्थीतसे भास्करू ॥४॥

 

श्लोक

पुरे पुराणे स्मृती वेद शास्त्रे ।

आमोस्मीके वैद्यक कर्मतंत्रे ।।

जेणे तरे हा भव ते विचारी।

या वेगळी सर्व दुकान दारी ॥

 

भजन 14 तरावया भवपार

 (चाल : सांग कसं विसरू)

तरावया भवपार स्मरा हो यदुपती नंदकुमार ॥धृ०॥

नासीवंत हा देह आपुला ।

घेउनि जाण्या काळ ही टपला ॥ धरा मनी सुविचार ॥१॥

काम क्रोध आवरूनि धरावे ।

भूतमात्राचे प्रेम करावे ॥ चुके यमाचा मार ॥२॥

या संसारी असुनि नसावे ।

शांत सदा एकांत वसावे ॥ तरीच होय उद्धार ॥३॥

भानु कविची नम्र विनंती ।

नाही कोनाचे कोणी न जगती ॥ माविक हा संसार ॥४॥


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post