धर्मशास्त्रात केलेली कलियुगाची भविष्यवाणी
Kaliyug bhavishyawani
आपल्या धर्मग्रंथांमध्ये कलियुगाचे वर्णन किती अचूक आहे. कलियुगाच घडणाऱ्या घटना व जनरितींविषयी शास्त्रकारांनी आधीच नमूद करून ठेवलेले आहे की कलियुगात काय होईल?
१) कलियुगात लोकांचे वय कमी कमी होत जाईल आणि शेवटी शेवटी केवळ १६ वर्षे वय असेल आणि आणखी कमी होत जाईल होईल. शंभर वर्षे वय असणे हे केवळ स्वप्नासारखे असेल.
विश्लेषण :- आजच्या काळात इतके भेसळयुक्त व जंक फूड शिळे, केमिकलयुक्त विषारी पदार्थ खाऊन खाऊन आणि अनियंत्रित जीवन शैली खानपान कुठेही कोणीही बनवलेले अन्न खाऊन घेणे. अन निष्पन्न करणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणता गुण प्रधान आहे राजस गुण प्रधान आहे कि तामस गुण प्रधान आहे की सात्विक प्रधान आहे. त्याने कमावलेले पैसे कसे कमावलेले आहेत?
लोकांना लुबाडून लाचलुचपत खाऊन कमवलेले आहेत आणि तो ज्या अन्नाचा प्रयोग करतो ते अन्न कसे आहे? या सर्वांचा विचार न करता आपण ते खाऊन घेतो. त्यामुळे आज लोकांचे आयुष्य किती आहे? हे सगळ्यांना माहिती आहे. एखादीच व्यक्ती ऐंशी नव्वद वर्षपर्यंत जगते आहे. ऐन तारुण्यातच लोकं हृदय विकाराच्या झटक्याने मरत आहेत. कॅन्सरने मरत आहेत.
२) कलियुगात लोक डोंगर-दऱ्यांमध्ये जाऊन घरे बांधतील.
विश्लेषण :- आपल्या शास्त्रांमध्ये इतके अचुक वर्णन आहे की, पृथ्वीचे तापमान वाढेल, प्रदुषण खुप वाढेल आणि लोकं डोंगरी भागात जाऊन राहतील. आज-काल वर्तमानपत्रांमध्ये ऐकण्यात येते तिकीट मसूरी सारख्या हिल स्टेशनवर आठ हजार पर्यंत ट्राफिक जाम असते. फार जलदगतीने तिकडे फॉर्महाऊस, कॉलनी तयार होत आहेत. बख्खळ पैसा मिळवून लोक शांततेसाठी डोंगरी भागात जागा घेऊन घरे बांधत आहेत.
३) कलियुगात आकाशात सगळीकडे धुर-धुके-धुळीचे साम्राज्य होईल. आकाशातून तारे आणि चंद्रही गायब होतील.
विश्लेषण :- “हिंदू धर्मातल्या वैज्ञानिक ऋषिंना हे माहिती होते की, कलियुगात माणूस भौतिक सुखांच्या मागे लागून इतका आंधळा होईल की निसर्गालाही तो सोडणार नाही. सुख सुविधा निर्माण करण्याच्या नादात इतकं प्रदूषण होईल की आकाशातले तारे दिसणे बंद होईल आणि एक दिवस असा येईल की चंद्र सूर्य ही दिसणे बंद होईल.”
बऱ्याच लोकांना हे वाचून हसू येईल की, चंद्र-सूर्य दिसणे कसे काय बंद होईल? आम्ही लहान होतो तेव्हाही हे वाचून हसायचं की असं कसं काय चंद्र सूर्य तारे अदृश्य होऊन जातील? पण वास्तवता आपल्यासमोर आहे दिल्लीसारख्या शहरात प्रदूषणामुळे माणूस माणसाला दिसत नाही.
४) कलियुगात ब्राह्मणांची आणि सत्पुरुषांची दुर्गती होईल कोणीही ब्राह्मणांचा सन्मान करणारी नाही आदर करणार नाही, इतर लोक त्यांच्याकडून शास्त्रविरुद्ध कार्य करवून घेतील. सर्व लोक आपल्या गुण-धर्मांच्या विरुद्ध जाऊन कर्म करतील. ब्राह्मण आपलं ब्राह्मण धर्म विसरेल, क्षत्रिय आपला क्षात्रधर्म विसरून जाईल आणि इतर वर्णही आपापल्या वर्ण-कर्मानुसार वागणार नाहीत. नास्तिकवाद, भोगवाद पसरेल.
५) कलियुगात नद्यांचा प्रवाह थांबेल आणि सगळ्या नद्या मलीन होऊन मृतवत् होतील.
विश्लेषण :- नद्यांचा प्रवाह रोकने तर आपण पाहतच आहोत प्रत्येक नदीवर धरण बंधारे बांधून नद्यांचे पाणी अडवले जात आहेत. प्राकृतिक प्रवाह थांबल्यामुळे व अति वाळु उपस्यामुळे सगळ्या नद्या प्रदूषण होत आहेत. कित्येक नद्यांचे नाल्यात रूपांतर झाले. एक तलावांची शेती झालेली आहे. हळूहळू नद्यांचे अस्तित्वही संपून जाईल यात शंका नाही.
६) कलियुगात समुद्र आपला किनारा सोडून वाहू लागेल.
विश्लेषण :- आपल्या सर्वांना माहीत आहे की, glaciers विरघळून दरवर्षी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे त्यामुळे पृथ्वीवर समुद्री संकट कुठे ना कुठे डोकावते. आणि त्सुनामीसारखे महाभयंकर संकटही येऊन गेले आहे.
७) कलियुगात माणसाचे आयुष्य कमी होईल कुणीही पूर्ण शंभर वर्ष जगणार नाही प्रत्येकाला अपमृत्यू येईल.
विश्लेषण :- आपण सर्व जाणताच आहात, नाना प्रकारचे आजार रोग व्याधी आणि एक्सीडेंट यामुळे कोणीही आपले आयुष्य शंभर वर्षे पूर्ण करत नाहीये.
८) कलियुगात लोक फक्त भौतिक प्रगतीकडे लक्ष देतील आणि कोणीही आध्यात्माकडे किंवा आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष देणार नाही.
विश्लेषण :- आज प्रत्येकजण शरीराला सुख मिळावे म्हणूनच काम करत आहे आणि विषयसुखाच्या आनंदासाठी सतत प्रयत्न करत आहे. एखादीच दुर्मिळ व्यक्ती आपल्याला आढळेल, ज्याला हे माहिती आहे की तो शरीर नसून आत्मा आहे. आणि आत्म्याच्या उन्नतीसाठी मनुष्यजन्म मिळालेला आहे. या मनुष्य जन्मात परमेश्वराची भक्ती करून या चक्रापासून सुटण्यासाठी जो प्रयत्न करतो अशी एखादीच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. इतर सर्व विषयभोगांच्या सुखामध्ये मी कोण? काय? सगळे विसरून गेले आहेत.
आपले स्त्रीत्व आणि प्रतिष्ठा विसरून स्त्रिया पुरुषासारखे वागू लागतील आणि पुरुष आपले पुरुषत्व विसरून स्त्रीसारखे वागू लागतील.
बरीच लक्षणे लिहिली आहेत, परंतु आम्ही त्याच भविष्यवाणीविषयी बोललो जे प्रत्यक्ष घडत आहे, जे सध्या आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत.
तरीही लोक म्हणतात की आमचे धर्मग्रंथ निरुपयोगी आहेत!