श्रेष्ठ पुरुष संकटीही हिनाचार करीत नाहीत नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

श्रेष्ठ पुरुष संकटीही हिनाचार करीत नाहीत नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

 नीतिशतकम् - neeti-shatak subhashits

संस्कृत सुभाषित रसग्रहण 

श्रेष्ठ पुरुष संकटीही हिनाचार करीत नाहीत


श्रेष्ठ पुरुष संकटीही हिनाचार करीत नाहीत

भर्तृहरी संस्कृत श्लोक :- 

यदि नाम दैवगत्या जगदसरोजं कदाचिदपि जातम् । 

अवकरनिकरं विकिरति तत्किं कृकवाकुरिव हंसाः ।।


मराठी अनुवाद :- वामनपंडित 

जरी दैववशात जग कमलरहित असे झाले तरी हंस कोंबड्यासारखा कचऱ्याचा ढीग उकरील काय ? ॥


मराठी अनुवाद :- ल. गो. विंझे 

आर्या

जर कधिं दैवगतीनें कमलहीन जग बनेल हें साचें ।

तरि कोंबड्यापरी कां उकरिल हा हंस ढीग कचऱ्याचे ॥ 


गद्यार्थ - दैवाची गति फिरल्यानें, सर्व जग जरी कदाचित् कमलविरहित झाले तरी हंस हा कोंबड्याप्रमाणे काय कचऱ्याचे ढीग उकरील काय? नाही. (आपदग्रस्त झाले तरी थोर पुरुष आपल्या मोठेपणाला न शोमणारें हलके काम करण्याइतक्या नीच पदवीला उतरत नाहींत.) सिंहान्योक्तींत (क्षुत्क्षामोऽपि इत्यादि) गजान्योक्तींत (लांगूलचालनम् इत्यादि ) मानी स्वभावाचे श्लोक पुष्कळ आहेत.)


विस्तारित अर्थ :- समजा दुर्दैवामुळे कदाचित हे संपूर्ण जग कमल रहित झाले तरी काय हंस कोंबड्या प्रमाणे उकिरडा उकरेल का ?

मानी पुरुषाच्या वर्तन पद्धतीचे वर्णन करताना श्रेष्ठ व्यक्तीच्या जीवनात कितीही संकटे आली तरी तो आपल्या श्रेष्ठ अशी कशी तडजोड करत नाही, हे महाकवी भर्तृहरी हंस आणि कोंबड्याच्या उदाहरणातून उलगडून दाखवत आहेत.

कमळाच्या देठा मध्ये असणाऱ्या बारीक तंतूना बिसतंतू असे म्हणतात. हे बिसतंतू हंसांचे अत्यंत आवडते खाद्य असते. आपल्या रंगाप्रमाणे शुभ्र असणारा कमळाच्या ताटव्यासमान प्रसन्न निवासस्थानी राहणारा हंस अशा अत्यंत सुंदर आणि नाजूक खाद्याला पसंत करतो यात आश्चर्य ते काय ?

त्याच्या याच श्रेष्ठ आवडीचा विचार करत महाकवी भर्तृहरी म्हणतात अशी कल्पना करा की समजा काही कारणाने सगळ्यात जगातील कमळं अचानक नष्ट झाली, हंसाचे खाद्य नष्टच झाले तर त्याने काय करावे ?

सामान्य कोणी असेल तर जे मिळेल ते खाऊन कदाचित आपली भूक भागवेल. पण नेमकी त्याचवेळी आपल्याला योग्यतेची परीक्षा होत असते की ज्यावेळी आपण संकटात असतो. याच सिद्धांताला आपल्यासमोर ठेवत महाकवी म्हणतात, अशी अवस्था आली तर हंस काय कोंबड्या प्रमाणे उकिरडा उकरेल का ?

या सुभाषितातील काही शब्द मोठे मजेदार आहेत. पहिला म्हणजे अवकर निकर. अव उपसर्गा चा अर्थ आहे खाली. ज्या गोष्टी वाईट नसतात त्या आपण खाली टाकतो. त्यामुळे त्यांना अवकर असे म्हणतात. अशा सगळ्या गोष्टींचा निकर म्हणजे साठा अर्थात उकिरडा.

दुसरा शब्द म्हणजे कृकवाकु. आपण बोलण्यासाठी वेगवेगळ्या आठ अंगांचा उपयोग करतो. त्यापैकी गळ्याच्या माध्यमातून क वर्गाचा म्हणजे क् ख् ग् घ् ङ् यांचा उच्चार केला जातो. कोंबड्या च्या आवाजात देखील केवळ क वर्णाचा उच्चार असल्याने त्याला कृकवाकू असे म्हणतात.

उकिरडे यातील किडे कचरा खाणे हेच त्याचे काम. असे हंस कधीही करणार नाही हे सांगत महाकवी श्रेष्ठांच्या सन्माननीय जीवनपद्धतीला अधोरेखित करीत आहेत.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post