टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही marathi bodhakatha

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही marathi bodhakatha

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही 

marathi bodhakatha

 


लांबच्या प्रवासानंतर थकलेला एक कारागीर मूर्तिकार एका सावलीच्या झाडाखाली आराम करायला बसला. अचानक त्याला समोर दगड पडलेला दिसला. कारागिराने तो सुंदर दगडाचा तुकडा उचलला, समोर ठेवला. मूर्तीसाठी हा पाषाण योग्य आहे म्हणून त्यावर कोरीव काम करावे असा त्याने विचार केला. 

रत्नपारख्याला हिऱ्याची पारख असते तसे मूर्तिकाराला पाषाणाची पारख असते. कोरीव काम करण्यासाठी त्याने आपल्या पिशवीतून हातोडा छिन्नी  पहिला घाव देताच दगड जोरात ओरडला:- "अरे मला मारू नकोस."  दुसऱ्यांदा तो रडायला लागला:- "मला मारू नको, मारू नको... मारू नकोस"

कारागिराने तो दगड सोडला आणि त्याच्या आवडीचा दुसरा दगड घेतला आणि हातोडी-छिन्नीने कोरायला सुरुवात केली.

 त्या दगडाने छिन्नी-हातोड्याचे घाव शांतपणे सहन केले आणि बघता बघता त्या दगडातून देवाची मूर्ती आकारली गेली. ती मूर्ती तिथेच झाडाखाली ठेवून कारागीर त्याच्या रस्त्याने पुढे निघून गेला.

 काही वर्षांनी त्या कारागिराला पुन्हा त्याच जुन्या वाटेवरून जावे लागले जिथे त्याने मागच्या वेळी विश्रांती घेतली होती. त्याला आठवले मागच्या वेळेस आपण या प्रदेशात एका झाडाखाली विश्रांती घेत होते तेव्हा एक मूर्ती घडवली होती.

जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की त्याने बनवलेल्या मूर्तीची पूजा होते. गर्दी आहे, भजन आरती होत आहे, भक्तांच्या ओळी आहेत. जेव्हा त्यांच्या दर्शनाची वेळ आली तेव्हा तो जवळ आला आणि त्यांनी बनवलेल्या मूर्तीचा किती आदरातिथ्य केला जातो हे पाहिले. त्याला समाधान वाटले. 

मग त्याला आठवले की आपण एका रडणाऱ्या दगडाला बाजूला केले होते. तो रिजेक्ट केलेला पहिला दगड एका बाजूला पडून होता. लोक त्याच्या डोक्यावर नारळ फोडून मूर्तीला अर्पण करत आहेत.

कारागिराने स्वतःशी हसला व विचार करू लागला की, "आयुष्यात काहीतरी बनण्यासाठी, जर सुरुवातीला आपल्या जीवनाचे शिल्पकार (आई-वडील, शिक्षक, गुरू इ.) ओळखून त्यांचे ओरडणे मारणे सहन केले केले तर त्या विद्यार्थ्यांची मुलाची प्रगती होते. 

संस्कृत सुभाषितकारही म्हणतात,

लालनाद् बहवो दोषास्ताडनाद् बहवो गुणाः।

तस्मात्पुत्रं च शिष्यं च ताडयेत् तु लालयेत्।।

आई-वडिलांनी मुलांचे लाड केल्याने किंवा गुरूने विद्यार्थ्याचे लाड केल्याने त्याच्या ठिकाणी आळस सुस्ती माजरेपण इत्यादी अनेक दोष उत्पन्न होतात. आणि वेळोवेळी त्याच्या चुकीबद्दल त्याला शिक्षा केल्या जातो. म्हणून शिष्याला किंवा पुत्राला सतत चुकल्याबरोबर शिक्षा केली पाहिजे. 

आणि ते आई-वडील आणि गुरू आपल्या शिष्याच्या करतात त्याला वेळोवेळी आपण करीत नाही असे विद्यार्थी आयुष्याच्या परीक्षेत बहुतांश नापास होतात. जीवनात अनेक संकटे येतात त्या संकटांना तोंड देण्यासाठी त्यांच्या ठिकाणी धैर्य नसते. काटकसर नसते, सतत लाडाकोडात वाढल्यामुळे समजूतदारपणाही नसतो.

मुलाचे सगळ्यात पहिले गुरू आई वडील असतात म्हणून मुलाला कसे संस्कार लावायचे ते त्यांच्या हाती असते. मुलांचे फाजील लाड करायला नको हे आई-वडिलांनी लक्षात घेतले पाहिजे.

दैवरहाटीमध्ये लीळाचरित्र वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की, परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी श्रीनागदेवआचार्यांना त्यांच्या चुकांबद्दल वेळोवेळी शिक्षापण केले. वेळ प्रसंगी चमरीदंडाने ताडणही केले. त्यामुळेच न भूतो न भविष्यति असे आचार्य तयार झाले. चारही युगात असा आचार्य होऊन गेला नाही. 

कर्ममार्गातही जगातल्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींचे जीवन चरित्र आपण पाहू शकता. मोठे मोठे शास्त्रज्ञ मोठे मोठे उद्योगपती क्रिकेटर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, अब्दुल कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी प्रसिद्ध व्यक्तींची फार मोठी यादी आहे. या सर्वांचे जीवन चरित्र वाचल्यावर, पाहिल्यावर आपले असे लक्षात येते की त्या सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. त्या मेहनतीच्या जोरावरच ते प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. त्या सुरूवातीच्या मेहनतीमुळेच जगात आदराने त्यांचे नाव घेतले जाते. 

म्हणून जास्तीचे फाजील लाड न करता शिष्याला किंवा पुत्राला वेळोवेळी चांगले मार्गदर्शन करणे हेच गुरुचे आणि माता-पित्याचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे. 



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post