अभंग 2022 - खरा परोपकारी निंदक
अभंग
2022 - खरा परोपकारी निंदक
अभंग
निंदक सांभाळीता समिप कळे
आपोआप सुपंथ तेथे
निंदकाविन चूक न पडे उघडी
। येणे ठेवावा तातडी। जवळी निंदक ।।१।।
निंदक हा गुरु कळावया
सुपंथ । प्रपंच
परमार्थ सार्थ ।
तेणे जो आपुले ते उणे । करी द्वेष मत्सर हेतूने ।।२।।
ते नीट करावे सुविचाराने
आपुले । आपण
आपुले जे व्यंग बाहेर बोले । जो यथासांग ।।३।।
ते निपटावे चांग बुद्धी
चातुर्याने जर
निंदक न पाखडी ।
आपुल्या चुकीची पुडी । तर आचाराची खडी । न सुधारे तेणे देहाची पासोडी । होई शुद्ध ।।४।।
निंदकाचा उपकार । अवघ्याहून थोर । हिताचा तो सार । घ्यावया ।।५।।
जो आपुली ती निंदा । करी
वेळोवेळी । लाभो अमर कला । तथा मार्कंडी जैसी ।।६।।
निंदकाचा उपकार मानावा
शिरी । भले होण्याची शिदोरी । हिच एक ।।७।।
निंदेवीन नाही गती । लाभावया चीर शांती । जगी थोर महत्ती । मिळे
तेणे ।।८।।
निंदक असावा शेजारी । हिच
प्रारब्ध थोरी । आनंद मानावा अंतरी । सर्वकाळ ।।९।।
निंदकावीन गती । जगी भले
नसे कोण ती । येणे निमुटपणे वागती । सांभाळून ।।१०।।
प्रपंच परमार्थाची सोय । एक तो निंदक होय ।
येणे धरावे तयाचे पाय ।
जवळ राहावया ।।११।।
आपली चूक निंदकाविन । न
कळे कवणा ।
वागावया सावधपणा । निंदक
गुरु ।।१२।।
आपुली ती आग । पाखडीतो चांग । मानावा न राग । त्याचा कधी ।।१३।।
आपुला खरा हितचिंतक ।
जाणा पा निंदक । नित्य करावे कौतुक । आपण त्याचे ।।१४।।
निंदकाचे दुःख मानिता । पळे सुख ।।१५।।
जडे मानसिक रोग तेने आपुली
निंदा होवो प्रतिदिनी ।
मागावे ईश्वरी कारणी ।
उभया आयुष्याची ।।१६।।
निंदक आपला गुरु । जगी
खरा तो उपकारू । निका व्हावया संसारु । हितक्ष जाण ।।१६।।
निंदेवीन हिता न हित । न
कळे काही ।
शास्त्र पुराण ग्वाही ऐसी
सांगे । खरा परोपकार हा निंदका ठायी ।।१७।।
शोधून तू पाही अंतरी
आपुल्या । हित न हित जरी न कळे ज्याचे त्याला ।
पण सांभाळता निंदकाला ।
कळे वेगी मार्ग चुकला ।।१८।।
तव निंदक बोंब मारी
चौहट्याला । तेणे
कळो येई आपुल्याला । आपुली चूक ।।
आपुला प्रपंच परमार्थी
जाण । एकच उपाय रामबाण ।
निंदक असो महान । शेजारी
आपुल्या । निंदकाचा हेतू जरी असो कुत्सित ।
परी त्यात आपुले हित ।
साठवले की । निंदकाशी दुःख देई तो मुर्ख ।
नाही कळला विवेक । त्यासी
जाण ।
जरी निंदकाचा हेतू असे
वाईट ।
परी तेणेच चोखट होय आपुले
।
सर्वाहून थोर निंदकाची
भिती फार ।
तरावया संसार । जगामाजी ।
निंदकाशी भिऊन । चूक घेई
सावरून ।
वागतो सांभाळून संसारी
आपुल्या । ज्याचे हाती सत्ता तेथे जर नसे विरोधी नेता । तर राज्य कारभार सरळता ।
चालेल का? नीट ।
तैसा संसार राजाचा नेता
निंदक जाणावा तत्वता । नाही संसार दक्षता ।
तयावीन । निंदकाचा संग ।
नित घडो देवा ।
हिताचा तो ठेवा । तया
ठायी ।
एकमेकाची निंदा । हा
मानवा ठायी धंदा ।
साधू न पडे फंदा । याच्या
कधी ।
मानवा अंगी गुण । येराचे
उणे होवो जाण ।
उत्सुकता पूर्ण । उणे
ऐकावया ।
आपुली ही निंदा । होईल
जनात ।
ऐसे जाणून मनात । वागावे
समाधान ।
आपुली व्हावया उन्नती ।
निंदकावीन नाही गती ।
हा शोध घेता आदी अंती ।
कळे तेव्हा । निंदकाशी वैर न करावा न लटका ।
बाहेर येती चुका आपुल्या
तेणे ।
चुक काढावया बाहेर
निंदकाचा असो शेजार ।
येणे काळजी ठेवी अपार ।
चूक न होवो ऐसी ।
निंदक कामाचा कामाचा ।
गडी आत्मारामाचा ।
निंदक आमुची गंगा । आमुचे
पाप करी भंगा ।
निंदक
आमुचा सखा । आमुचे कपडे धुतो फुका ।
निंदक आमुची काशी । आमुचे
सर्व पापे नाशी
निंदक आमुचा गुरु एका जनार्दनी आम्हा तारू ।
सावरावया चूक । निंदकाशी
मारा हाक । मागावी भिक ।
तया निंदेची । निंदक हा
नसे द्वेषी चूक पाहून खुषी
बोल ज्याचे त्याच्या पाशी
हर्ष भरे । निंदकावीन कैवारी ।
नाही दूजा या भूवरी । भले
व्हावया संसारी ।
त्याचे एक । एक तो निंदक
। खरा हितक्ष । अनुभव साक्ष । शोधीता कळे ।
सोहदराहून सोहदर । मानावा
निंदक । ही निवे दिली भाक ।
अनुभवे मागतो देवा एक । तुझे चरणी
भिक ठेवावा निंदक । मज शेजारी ।
जो आपुले उणे । सांगे
फिरुन जना ।
तो निंदक नव्हे । होय
आपुला पाहुणा ।
कै. शंकरराव कुशाबा भोसले
इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी