"कृष्णं वंदे जगद्गुरुम्"
वाढदिवस साजरा करण्याचे महत्व
"वाढदिवस "हा परस्परात परमप्रीती व भेटकाळ घडवणारा आहे असे वाटते. वाढदिवस निमित्ताने पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण हे पुढीलासाठी परमप्रीती चे प्रमाण व या दुःखमय प्रपंचात एक मायेची फुंकर आहे. हे आपले आप्तस्वकीय मित्र परिवार व कामाचे ठिकाणी असलेले सहकारी वर्गाचे आत्मिक प्रेम आहे.
"वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द लिहितांना पूर्वीच्या लोकांच्या काही श्रूत गोष्टी आपल्या डोळ्या समोर उभ्या राहातात. या दृष्टिकोणातून काही विचार प्रस्तूत करावे. म्हणून लिहिण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहे.
"वाढदिवस "हा बहुतांशी पूर्वी राजे लोकांचा होत असायचा, राज्यातील सारी जनता हे माझे कुटुंब आहे. अशी राजाची भावना असायची, आपल्या "राजाला "दीर्घआयुष्य, व उत्तम आरोग्य, लाभो ! म्हणून राज्यातील सारी जनता परमेश्वराला प्रार्थना करायची, म्हणून "राजाचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने साजरा करायचे, असे राजे लोकांचे वाढदिवस राजदबरात संपन्न व्हायचे.
अलीकडच्या काळात "वाढदिवसाने चांगलाच जोर धरलेला पाहाण्याला मिळत आहे. असा हा वाढदिवस" तळागळातल्या माणसा पर्यंत पोहचलेला आहे. व पोहचत आहे. कारण घरात एखादे लाहन मुल आहे. ते मुल आपल्या कुटुंबाचे आधार आहे. व कुटुंबाचा कुलदिपक आहे. या दृष्टिकोनातून वाढदिवस संपन्न होतांना दिसत आहे. त्या निमित्ताने आपले आप्तेष्ट व नातेवाईक मंडळी अतीशय प्रेमाने एकत्र येतात, या माध्यमातून "भेटकाळ "होत असतो, व विचारांची देवाण घेवाण होत असते.
"वाढदिवस "कुटुंबाचा भेटकाळ घडविणारा आहे. प्रेम निर्माण करणारा, कुटुंबाची "एकात्मता" व सलोखा घडविणारा आहे असे वाटते. आजच्या काळात सोशल मिडीया मार्फत जे लोक अभिष्टचितंन, तथा शुभेच्छा देतात. हे एक प्रेमाचे प्रतीक आहे. अशा धकाधकीच्या काळात काही व्यवसायाच्या निमित्ताने दुर असतात. पण ते फोन करतात. तथा सोशलमिडीयाच्या माध्यमातून आपली प्रत्येक्ष भेट जरी झाली नाही. ते शुभेच्छा पाठवत असतात. तरी या माध्यमातून ते आपल्याला भेटलेले आहे. असा अनुभव अनुभावयला मिळत असतो.
एखाद्या व्यक्तीला शब्दाने शुभेच्छा देणे. हे हृदयातील पवित्र भावनेचे एक दर्शन असते. कारण भगवंत म्हणतात. जीवाने जीवन जगत असताना परस्परात परमप्रीती ठेवली पाहिजे. वाढदिवस शुभेछा मधून समाज आपल्यावर प्रेम करत आहे. याचे ते दर्शन घडत असते. त्यामूळे सहाजीकच समाजाची आपल्यावर आदर्श जीवन जगण्याची जबाबदारी पडत असते, समाज वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित राहून आपल्यातील उत्तम गुणांना प्रोत्साहीत करत असतो.
*शब्दांकन -प.पु. महंत श्री जयराज बाबा शास्री!(जि.पुणे. साळवाडी )*