"वंदे श्री चक्रधरम्"
"सामाजिक विचार"
"चव" आणि "चावी" एक "गूढ" विचार"!
"चव" म्हणाले की, समाजताल्या प्रत्येक माणसाची "चव" मात्र वेगवेगळी असते, कोणाला कशाची "चव"! तर कोणाला कशाची "चव"!
"चव शब्दाचा अर्थ होतो रुची, गोडी, स्वाद,"
कोणाला चटकदार पदार्थ खाण्याची "चव"!
तर कोणाला "धन मिळविण्याची "चव"!
तर कोणाला मानसन्मानची "चव"!
कोणाला सौंदर्यची निहाळण्याची "चव"!
तर कोणाला इंद्रियार्थ विषयरूप पदार्थ मिळविण्यात "चव" असते, कोणाची साहित्य , संगीतात "चव"!
असंख्य लोकांच्या असंख्य "चवी" पाहावयास मिळतात. अशा वेगवेगळ्या "चवीची" लालसा पूर्ण करण्यासाठी सोननाणे, धनसंपत्ती आदि वस्तू गोळा करीत असतो. लालसेने गोळा केलेली धनसंपत्तीला ताथा सोनेनाण्यांना ठेवण्यासाठी मोठमोठ्या खर्चाची तिजोरी, किंवा भरभक्कम कपाटाची गरज लागते,
भरपूर धन संपत्तीने, तथा सोने नाण्याने भरलेले कपाट कोणी उघडून ऐवज लंपास करू नाही, म्हणून कपाटाला कुलूपाची गरज लागते, ते कुलूप उघडण्यासाठी "चावीची" गरज लागते, कारण "चावी" शिवाय कुलूप उघडू शकत नाही. प्रत्येकाच्या कौटुंबिक घरात अथवा इतर सामाजिक संस्थेच्या ठिकाणी कुलूप उघडण्यासाठी "चावीची" गरज लागते.
"चवी" मुळेच चावीची निर्मिती झालेली दिसते, "चवच चावीला कारणीभूत आहे. "चवच" जर नसती, तर चावीच गरज लागली नसती,हे मात्र तितकेच खरे आहे,
समाजातल्या प्रत्येक माणसाला जितक्या जितक्या "चवी"! तितक्या तितक्या प्रकारच्या माणसाला चाव्या ठेवाव्या लागतात.
"चव" आणि चावीचे" फार जवळचे नाते असलेले दिसते, आजच्या वर्तमान काळात बिगर चावीचा माणूस मिळणे मुश्कील आहे, आजचा समाज भौतिक "चव" आणि "चावीतच" बहुतांशी अडकलेला दिसत आहे, भौतिक "चव" आणि "चावीने" माणसाचे स्वास्थ्य हारपून टाकलेले दिसत आहे,
म्हणून माणसाने त्रीगुण "चव" आणि चावीत आडकून दुःखात सापडण्यापेक्षा निर्गुण निराकार असलेला, परब्रम्ह परमेश्वर जीवाला आनंद देण्यासाठी सावेव साकार झाला.
अशा परब्रम्ह परमेश्वराचे "नाव" घेण्यातच जीवाचे खरे कल्याण एवं "चव" गोडी, स्वाद, आहे. हे मात्र शाश्वत खरे आहे.
असो!
महंत श्री जयराज शास्त्री ! (साळवाडी)