कलीयुगात कलीचे राज्य कसे आले??
द्वापर युगाच्या शेवटच्या क्षणी भगवान श्री कृष्णाने द्वारकेत जाहीर केले की, उद्या द्वापार युग संपणार आहे. अन् आम्ही उद्या द्वापर युग संपायच्या आधी निजधामास गमन करणार आहोत. आमचा अवतार द्वापर युगापुरता असल्यामुळे कलीयुगात आमचे दर्शन होणार नाही. भगवंताची ही घोषणा सगळीकडे वाऱ्याच्या वेगाने पसरली.
श्रीकृष्णाचे फक्त उद्याचाच दिवस दर्शन होणार आहे. परवाच्या दिवशी कलीयुग लागणार आहे. व कलीयुगात भगवंत दर्शन देणार नाहीत म्हणून जो तो द्वारकेत येऊ लागला. द्वारकेत गर्दी झाली. प्रत्येकजण दर्शन घेत होता. दर्शन घेणाऱ्याला भगवान श्रीकृष्ण वर देत होते. कुणाचे मनोरथ पूर्ण करीत होते. कुणाला धन-संपत्ती देत होते. कुणाचे विघ्न निवारण करीत होते. तर कुणाच्या इच्छा पूर्ण करीत होते. दर्शनाला येणारा प्रत्येकजण होऊन आपापल्या ठायाला निघून जात होता. दिवसभर दर्शनाला येणाऱ्यांची वर्दळ होती. संध्याकाळ झाली. गर्दी थोडीसी ओसरली. अन् या संध्याकाळच्या वेळी कलीराज (चित्रागंद राक्षस) भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला आला.
अत्यंत विनम्रतेने भगवंताला दंडवत करुन हात जोडून म्हणाला- “परमेश्वरा, तू या जगाची माता आहेस. हे जग तू निर्मीले आहेस. आज तू निजधामास गमन करणार आहेस. देवा, आज तुझे सगळे लेकरे तुझ्या दर्शनाला येत आहेत. तू तुझ्या लेकरांना त्यांनी इच्छिलेले फळ देत आहेस. त्यांचे मनोरथ पूर्ण करीत आहेस. देवा, मी ही तुझेच लेकरु आहे. मला ही तूच जन्म दिला आहेस. मी दुष्ट आहे. अध्दम आहे. निच आहे. अधर्मी आहे. मी कसाही असलो तरी देवा, मी तुझेच लेकरु आहे. माझी सुध्दा इच्छा आज पूर्ण कर. मलाही एक वरदान दे. विसरु नकोस की, तू सुध्दा एक आईच आहेस.
कलीराज म्हणाला. कलीराजाचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले "कलीराज, तुमच म्हणणे खरे आहे. हे जग आम्ही निर्माण केले आहे. तुम्हालाही आम्हीच जन्म दिला आहे. म्हणून तुम्ही सुध्दा आमचेच लेकरु आहात. आज आम्ही निजधामास गमन करीत आहोत. आमच्या लेकरांनी आज जे काही आमच्याकडे मागितले ते त्यांना देणार आहोत. तेव्हा तुम्हाला जे काही हवे असेल ते नि संकोच पणे मागा. आम्ही तुम्हाला ते आवश्य देऊ. हा आमचा शब्द आहे.
भगवान श्रीकृष्णांनी कलीराजाला (चित्रांगद राक्षसाला) शब्द दिला. कलीराजाने क्षणभर विचार केला. अन् हात जोडून म्हणाला " देवा, मला कलीयुगात राज्य करण्याचे वरदान द्या. बस्स एवढेच मागणे तुमच्या श्रीचरणी मागत आहे." देव विचारमग्न झाले. विचार करुन नंतर कलीराजाला म्हणाले "ठिक आहे. कलीराज तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तुम्हाला कलीयुगाचे राज्य देत आहोत. तुम्ही कलीयुगाचे राजे होऊन कलीयुगावर राज्य करा."
भगवान श्रीकृष्णांची ही अभयवाणी ऐकून कलीराज आनंदाने न्हाऊन गेला. त्याच्या हृदयात आनंद मावेना. थोड्या वेळा नंतर त्याने स्वतःला सावरले. त्याच्या मनात विचार चक्र फीरु लागले अन् पुन्हा निराशेची सावली त्याच्या चेहऱ्यावर व्यापून गेली. खिन्न मनाने तो श्रीकृष्णाला म्हणाला
"देवा, तुम्ही मला राज्य दिले. परंतु त्या राज्यावर माझी निरकुंश सत्ता चालू नये. अशी व्यवस्था करुनच राज्य दिलेत. देवा, माझ्यावर अन्याय होतो आहे." विचारले. “कलीराज तुम्हाला नेमकं काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांगा" श्रीकृष्णांनी
"देवा, कलीयुग लागल्यावर तुम्ही दिलेल्या वरदाना प्रमाणे मी कलीयुगाचा राजा होईल. कलीयुगात माझे कायदे लागू होतील. माझ्या कायद्या प्रमाणे राज्य व्यवस्था चालेल. माझ्या राज्यात असत्य, अनाचार, हिंसाचार, भ्रष्टाचार, अधर्म माजेल. सप्तव्यसनाचा सर्वत्र महापूर येईल. सगळीकडे धर्म लोपून अंधार पसरेल. पाप वाढेल, ओस पडलेली यम नगरी पुन्हा गजबजून जाईल.
देवा, माझ्या राज्यात अशा प्रकारे अधःपात चाललेला असतांना तुमचे ज्ञानी भक्त माझ्या राज्यात भर वस्तीत-बाजारात उभे राहून लोकांना तुमचे ब्रम्हविद्या ज्ञान सांगतील. माझ्या विरुध्द सत्याचा जगाला प्रकाश दाखवतील. लोकांना हा ज्ञान-प्रकाश आवडेल, व ते माझे अंधाराचे कायदे पायदळी तुडवून तुमच्या ज्ञानी भक्तांच्या उपदेशा प्रमाणे वागतील. माझे कायदे पाळणार नाहीत माझ्या विरोधात वागतील.
म्हणून देवा, हा माझ्यावर अन्याय आहे.” श्रीकृष्णाच्या श्रीचरनावर मस्तक ठेऊन कलीराज रडू "कलीराज, माझे वरदान कधीही व्यर्थ जात नाही. बोला, तुमची काय इच्छा ? तुमची इच्छा मी अवश्य पूर्ण करीन." श्रीकृष्ण म्हणाले. ""देवा, कलियुगात माझी निरंकूश सत्ता चालावी या साठी तुम्ही तुमच्या ज्ञानी भक्तांना आज्ञा करा, त्यांना सांगा की, माझ्या राज्यात तुमचे ज्ञान गुप्त ठेवा. जाहीर पणे ते बाजारात मांडू नका, बस्स प्रभू, एवढी एकच आज्ञा त्यांना करा. म्हणजे माझे राज्य सुखाने चालेल. व तुम्ही दिलेले वरदान सत्य होईल." कलीराज काकूळतीने म्हणाला.
भगवान श्रीकृष्ण विचारात पडले, थोडावेळ विचार केला. व नंतर गंभिर होत म्हणाले "ठिक आहे, कलीराज आम्ही आमच्या भक्तांना आज्ञा देत आहोत. हे भक्तांनो माझे हे ज्ञान रहस्यमय आहे. ते तसेच गुप्त ठेवा. तप रहित व भक्ती रहित, ज्याला माझे ज्ञान जाणून घ्यायची इच्छा नाही अशा मनुष्याला व माझ्या बाबतीत दोष दृष्टी बाळगणाऱ्या तमोगुणी, नास्तीक व व्यसनी माणसाला माझे हे ज्ञान कधीही सांगू नका. कलीयुगात माझे ब्रम्हविद्या ज्ञान गुप्त ठेवा. कलीराज तुमच्या राज्यात माझे भक्त माझी ही आज्ञा कधीही भंग करणार नाहीत." भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
आपल्या मना प्रमाणे सर्व काही घडून आल्याचा कलीराजला (चित्रांगद राक्षसाला) आनंद झाला. साष्टांग दंडवत घालून तो जाण्यास निघाला. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत त्याला म्हणाले "कलीराज, आम्हाला वचन द्या. अन् मग जा." म्हणाला. द्वारकाधिश, काय वचन देऊ. आज्ञा करावी." कलीराज हात जोडून “कलीराज, आज द्वापार युगाचा शेवटचा दिवस. आम्ही सोन्याची द्वारका नगरी समुद्रात बुडवून आज निजधामाला जाणार आहोत.
उद्या पासून कलीयुगाला प्रारंभ होणार आहे. आमच्या वरदानाने कलीयुगावर तुमचे राज्य येईल. तुमचे कायदे लागू होतील. कलीराज, आम्हाला आमच्या प्रिय भक्तांची काळजी वाटते. तुमच्या राज्यात आमच्या प्रिय भक्तांचा तुमच्या कडून छळ होणार नाही व त्यांना तुमचा कुठलाही त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. असे आम्हाला वचन द्या. मगच जा." भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
"देवा, त्या बद्दल निश्चीत रहा. जे भक्त तुमचे नामस्मरण करित, करित आपले जीवन व्यतीत करतील अशा नामस्मरणनिष्ठ भक्तांना माझ्या राज्यात सन्मानाने वागविल्या जाईल. असे भक्त माझ्या दृष्टिस पडल्या बरोबर मी त्यांना साष्टांग दंडवत करेन, त्यांचा योग्य तो मान सन्मान ठेवीन. माझ्या कडून त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. देवा, असे मी तुम्हाला वचन देतो!" देवाच्या श्रीचरणावर आपला उजवा हात ठेवून कलीराजाने वचन दिले व निघून गेला.
भगवान श्रीकृष्ण त्याच दिवशी आपले अवतार कार्य संपवून निजधामाला निघून गेले. द्वापर युग संपले. कलीयुग लागले. कलीयुगाची अधिष्ठात्री देवतांनी कलीयुगाची सत्ता हाती घेतली. कर्मभूमी, अष्टोदेवयोनी व अंतराळ स्थानीच्या देवता कलीयुगात सर्वत्र संचार करु लागल्या. नरकाचा अधिपती चित्रांगद राक्षसाला कलयुगात मोकळे रान मिळाले. प्रत्यक्ष भगवंताने त्याला मोकळीक दिली असल्यामुळे तो कलीयुगात जन्माला येणाऱ्या मनुष्याला आपल्या यमपूरीला नेऊ लागला. कलीयुगात जन्माला येणाऱ्या मनुष्यावर त्याने चौकडीच्या नरकाचा कर (टॅक्स) बसविला.
कलीयुग लागले. कलीयुगाचे वारे वाहू लागले. सर्वत्र अधर्म वाढू लागला. धर्म व सत्व हळू-हळू कमी होऊ लागले. या कलीयुगात जो मनुष्य परमेश्वराचे नामस्मरण करेल तो या कलीच्या हातून सुटून परमेश्वर प्राप्तिला जाऊ लागला. ईतर मनुष्य मात्र बळीचे बकरे बनून कलीराजाच्या चित्रांगद राक्षसाच्या यमपूरीला वाजत-गाजत जाऊ लागले व चौकडीचे नरक दुःख भोगू लागले. (संदर्भ ग्रंथ - विचार बंद, लीळाचरित्र, सुंदर वैराग्य)
लेखक :- महंत प. पू. प. म. प्रज्ञासागर बाबा महानुभाव
Nice post🙏🙏🙏🌹🌹
ReplyDelete