श्रीकृष्ण वनदेव मंदिर इतिहास
वरझडी ता. जि. संभाजीनगर
-: संचालिका:-
त. श्रद्धाताई गुरुदेमेराजबाबा कपाटे
* श्रीकृष्ण वनदेवाचे चमत्कारिक मांडलिक स्थान *
श्रीकृष्ण वनदेव इतिहास
महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत श्रीदत्तात्रेय प्रभु चरणांकित अनेक मांडलिक स्थाने आहेत. त्यात १२ खांडी, अंबाळी, आबासाहेब बाबासाहेब इत्यादी उपखांडी, शिंगवे, सौरंगा, काटाळवेढा ही स्थाने प्रसिद्ध आहेत. त्या अनेक अप्रसिद्ध स्थानामध्ये समाविष्ट असलेले श्रीकृष्ण वनदेव मंदिर वरझडी हे एक जागृत मांडलिक स्थान आहे. वरझडी गावाच्या चहुकडून डोंगररांगा आहेत. गावाच्या उत्तरेला उंच टेकडीवर हे देवस्थान आहे.
गावातील भक्त मंडळींच्या माहितीप्रमाणे हे मांडलिक स्थान बरेच पुरातन आहे. पूर्वी येथे एक वडाचे झाड होते. पुर्वी देऊळ चुना-दगडांनी बांधलेले होते. या देवळात श्रीदत्तात्रेय प्रभु महाराज चरणांकित पाषाण आहेत. येथे श्रद्धापूर्वक दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे मनोरथ पुरतात. पुर्वी महानुभाव पंथाचे विरक्त साधुसंत इथे अनुष्ठान करीत असत.
खुप वर्षांपुर्वी असेच एक महानुभाव पंथाचे महात्मे अनुष्ठान करण्यासाठी इथे वास्तव्यास राहिले. रोज सकाळी पश्चात प्रहरी उठून परमेश्वराचे ध्यान करायचे. दिवसभर श्रीदत्तात्रेय प्रभुंच्या नाममंत्राचा जप करायचा. तिसऱ्या प्रहरी भिक्षा मागायची देवाला उपहार दाखवायचा आणि भोजन करायचे. अशाप्रकारे त्यांचा नित्यक्रम होता. काही दिवसांनी अनुष्ठान पुर्ण झाल्यावर त्यांनी स्थानांतर करायचे ठरविले.
सकाळीच उठून नित्यविधीचे अनुष्ठान करून निघणार, पण त्यांना त्यांच्या जवळील गवसणी(पिशवी) अचानक खुप वजनदार आहे असे लक्षात आले. ती गवसणी अतिप्रयत्नानेही त्यांच्याकडून उचलली गेली नाही. शेवटी त्यांनी जायचे रद्द केले. दुपारी भिक्षा मागून देवाला उपहार दाखवून भोजन केले. व वामकुक्षीसाठी आंग टाकले. आणि त्यांना सुचिक झाले. त्यांच्याजवळच्या देवपूजेत श्रीदत्तात्रेयप्रभु चरणांकित विशेष होता. तो विशेष त्यांना स्वप्नात येऊन म्हणतो, ‘“मला इथेच राहायचे आहे, मला नेऊ नको” आणि त्यांना लगेच जाग आली. ईश्वरेच्छा लक्षात घेऊन त्यांनी तो विशेष तेथे आसनावर ठेवला व निघाले. गावातील उपदेशी मंडळींना त्यांनी ही गोष्ट सांगितली व ग्रामांतर केले.
या घटनेनंतर त्या स्थानाचे महत्त्व लोकांना प्रकर्षाने जाणवले. उपदेशी मंडळी नित्यनेमाने देवपूजा करण्यासाठी येऊ लागली. नंतर औरंगजेब बादशाहच्या काळात यवनांचे राज्य असल्याने जिकडे तिकडे राजकीय उपद्रव खुप होता. म्हणून गावातील उपदेशी मंडळींना, महिला वर्गाला नित्यनेमाने देवपूजेला येणे होईना. म्हणून सर्वानुमते ठरवून मंदिरातील देवपूजा गावात नेऊन तेथे प्रतिष्ठा करण्यात आली.
नंतर काही वर्षांनी १९७२ साली गावातील उपदेशी परभतराव पठाडे आणि भागाजीराव पठाडे काही कामानिमित्त बैलगाडीने पांचाळेश्वर जवळ असलेल्या आपेगावला सोंगणीसाठी गेले. येतांना पांचाळेश्वरचे स्थान नमस करण्यासाठी आले, तिथे उटी उपहार केला, तिथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास निघताना स्थान नमस करून निघावे म्हणून स्थानावर कपाळ ठेवले, तर त्यांचे कपाळ तिथेच चिटकले, त्यांनी प्रयत्न करूनही ते कपाळ त्यांना स्थानावरून उचलता आले नाही.
मग त्यांनी देवाला प्रार्थना केली, ‘‘देवा! आमच्याकडून काही चुकभूल झाली असेल तर क्षमा करा, पण आम्हाला जाऊद्या’’ : प्रार्थना करूनही कपाळ उचलता येईना. मग त्यांनी देवाला पुनश्च प्रार्थना केली, ‘‘देवा! आम्हाला जाऊ द्या, आम्हाला उशीर होतोय, नाहीतर आपणच आमच्यासोबत चला.’’ आणि आश्चर्य त्यांना कपाळ उचलले गेले. व ते पाच दंडवत घालून ते गावी निघाले. तर त्यांना नकळत त्यांच्या बैलगाडीत असलेल्या कडब्याच्या पेंडीत आत्मतीर्थाचा विशेष आला.
ती कडब्याची पेंडी आधांतरी तरंगत येत होती. प्रवास करीत ते त्यांच्या गावाजवळ आले. गावशिवारात काही वडखं गावचे गुराखी गुरं चारीत होते. त्या गुराख्यांचे लक्ष्य यांच्या बैलगाडीकडे गेले. त्यांना असे दिसले की, बैलगाडीच्या मागे एक कडब्याची पेंडी आधांतरी चालत येत आहे. ते पाहून गुराख्यांना आश्चर्यमिश्रीत भीती वाटली. त्यातील एका काकडे आडनावाच्या गुराख्याने हाक मारून गाडी थांबवली. आणि तो म्हणाला, ‘“भागाजीबाबा! तुमच्यावर काहीतरी करणी कौटाळ झालेले आहे. तुमच्या बैलगाडी मागे मागे ते येत आहे” भागाजीबाबा गाडीच्या खाली उतरले. आणि मागे जाऊन पाहिले आणि ती पेंडी खाली पडली. त्यांनी उचलून बैलगाडीत टाकली. आणि पुन्हा निघाले घरी आले. रात्री जेवण खाऊन करून ते झोपी गेले.
दिवसभराच्या प्रवासाच्या थकव्यामुळे त्यानं लगेच झोप लागली. आणि पहाटे त्यांना सूचिक पडले, ती पेंडी तो विशेष दिसतो आणि कोणीतरी बोलत आहे की, “मी पांचाळेश्वरहून तुमच्यासोबत आलेलो आहे. मला वनगडावर नेऊन ठेव, मला तिथे राहायचे आहे.” आणि ती पेंडी दिसली त्यांनी लगेच उठून पेंडी तपासली, त्यात आत्मतीर्थचा विशेष दिसला, त्यांनी त्या विशेषाला स्नान घातले. व तो विशेष वनगडावर नेऊन स्थापना केली. काळाच्या ओघात ते देऊळ पडले होते. आणि तिथेच चार पत्रे टाकून स्थानावर सावली करण्यात आली. पुन्हा त्या पत्र्याच्या देवळात देवपूजेचा वहिवाट सुरू झाला. लोक दर शुक्रवारी उटी उपहार करू लागले. पण ते मंदिर पूर्ण पडले. मग सावली म्हणून तिथे चार पत्र्यांची सावली करून भोवती तारांचे कुंपन केले.
कालांतराने वांबोरी स्थानाचे बांधकाम झाले. तेथील जुने ओटे जवळच असलेल्या चिंचेच्या झाडाखाली काढून ठेवले होते. नवरात्रासाठी गावातील शांताबाई पठाडे मुख्य करून गावातील अनेक सद्भक्त स्मरणाला तिथे गेले होते. शांताबाई पठाडे खूप भाविक होत्या. तिथे वरझडी पासून जवळच असलेल्या नाणेगावचे साधू आहेत. त्यांचे नाव उद्धवराज दादा मराठे ते शांताबाईंना आपल्या लेकीसमान मानीत असत. एके दिवशी शांताबाईंनी त्यांना म्हटले, “बाबा मला एक लुगडे द्या” बाबांनी म्हटले, “बाई, नवरात्र संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी देतो.”
नवरात्र संपल्यावर शांताबाईंनी पुन्हा म्हटले बाबा आपण मला लुगडे देणार होते. बाबा म्हणाले, लुगडे तर नाही, पण हे पैसे घ्या आणि गावात जाऊन दुकानातून विकत घेऊन या” त्या म्हणाल्या, “बाबा मला गावातल्या दुकानातले लुगडे नको, मला तिथे चिंचेच्या झाडाखाली एक माणूस लुगडे घेऊन बसला आहे, त्याच्या जवळचे लुगडे द्या” त्या बाबांनी पाहिले तर तिथे कोणीच नव्हते, ते बाबा म्हणाले, “चिंचेच्या झाडाखाली तर कोणीच नाही, तू कस काय मागते” त्या बाईंनी बाबांना तिथे नेले व ओट्याकडे बोट दाखवून म्हटले की, “हे लुगडे मला पाहिजे, हेच माझे लुगडे आहे,” ते बाबा म्हणाले, “स्थानाचे जुने ओटे आहेत, ते आम्ही तुम्हाला कसं काय देणार.” ती म्हणाली, “बाबा मला एक ओटा पाहिजेच, मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुम्ही मला मुलगी मानता, मुलीचा एवढा हट्ट पुर्ण करा, आमच्या गावात टेकडीवर वनदेवाचे जुने देऊळ आहे.
त्या देवळाचा जिर्णोद्धार करावा असे अनेक लोकांना सुचिक पडले आहे म्हणून त्या देवासाठी मला हा ओटा द्याच” म्हणून त्या बाईंनी आग्रह घेतला. शेवटी बाबांनी एक ओटा दिला. गावातल्या लोकांनाही आनंद झाला, त्यांनी तो ओटा श्रीकृष्ण वनदेवाला आणला. आणि तिथे स्थापना करून मंदिर बांधायचे ठरवले. त्या वेळी गावातल्या अनेक लोकांना स्वप्न पडायचे की, श्रीकृष्ण वनगडावर भव्य देऊळ बांधलेले आहे, लखलखीत कळस आहेत. आणि सगळ्यांनी लवकरात लवकर आणि ऐपतीप्रमाणे चार पत्रे टाकून केली आणि भोवती तारकंपाउंड केले.
आणि लोक आपल्या सवडीने देवळात येऊन उटी उपहार देव देवपूजा करू लागले. पुरुषाचेनि करणिये उज्रंभे या न्यायाने तेथील स्थानाचा देवाला विशेष अभिमान आहे. अनेक लोकांच्या भूतबाधा तिथे दूर होतात. पंचक्रोशीत अनेक मंदिरावरचे धरणकरू आणि भूतबाधेने पीडित असलेले लोक वनगडावर धावतच येतात आणि त्याची बाधा दूर होते. अनेक लोकांना संकट प्रसंगी सुचिक पडते की, ‘“तु वनगडावर जा” तेथे खेटा केल्या की संकट दुर होते. मनोरथ पुर्ण होतात. अशा अनेक घटना आहेत. त. श्रद्धाताई कपाटे इथे राहायला आल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने, गावकऱ्यांच्या मदतीने मंदिराचे बांधकाम झाले. त्यांनी पै-पै जमा करून मंदिर बांधले.
गावातल्या सद्भक्तांनी आपसात चर्चा करून ठरवले की, आपल्याकडून देवाची पाहिजे तशी सेवा होत नाही म्हणून देवाची सेवा करायला कोणीतरी साधु पाहिजे. म्हणून साधुचा शोध सुरू झाला. नंतर गंगापूरचे एक उपदेशी सद्भक्त ते वरझडीचे जावई स.रामभाऊ दसपुते म्हणून गृहस्थ आहेत, त्यांची आणि श्रद्धाताईंची धर्मबंधु म्हणून ओळख होती. त्यांनी ताईंचे नाव सुचविले, की ताई चांगल्या धर्मवान तपस्वीनी आहेत. त्या इथे राहतील तर आपले भाग्यच! आणि देवाची सेवाही व्यवस्थित होईल.
सगळ्यांना ते पटले. आणि दोन गाड्या भरून मंडळी त. श्रद्घाताईंना वनदेव येथे वास्तव्य करण्याची विनंती घेऊन त्यांच्याकडे आली. सगळ्यांनी दंडवत करून आपला विनंतीवजा प्रस्ताव मांडला. ताईंनी सुरवातीला नाकारले, पण नंतर ईश्वरहेतू लक्षून व त्यांच्या आग्रहपूर्वक विनंतीला मान देऊन वनदेवाला आल्या. त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली. देऊळ जरी व्यवस्थित असले तरी तिथे पाहिजे तशी स्वच्छता नव्हती. राहण्याची काहीच सोय नव्हती. पत्र्याच्या देऊळ वजा शेडमध्ये विजेचा एकच दिवा होता. ताई चिंतेत पडल्या की, गावही थोडे लांबच आहे, एकट्या तपस्विनीने इथे कसे राहावे.
पाणीही लांबून आणावे लागते. मग गावातील मंडळीनी म्हटले की ताई तुम्ही चिंता करू नका, आम्ही पाणी घेऊन येत जाऊ. सुरवातीला नवरात्रात स्मरणासाठी २०० लोक येत. नंतर ती संख्या तीनशेवर गेली. लोकांनी काही दिवसांनी ठरविले की, ताईंची राहण्याची सोय म्हणून आश्रम उभारणी करायची. त्यानुसार दोन खोल्या बांधल्या. मग मंदिरही जुन्याच ठिकाणी बांधावे म्हणून पाया खोदला. तर उत्खणनात दोन मोठे दगडी दिवे, एक झांज इत्यादी वस्तु निघाल्या. ते पाहून उपदेशी लोकांचा भाव दुणावला. त. श्रद्धाताईंनी गावकऱ्यांच्या मदतीने पै-पै द्रव्य जमा करून मंदिराचे बांधकाम केले. द्रव्या अभावी घुमटाचे काम बाकी आहे. वनदेवला लांबून लांबून लोक दर्शनाला येतात. लोकांचे दुःख दुर होते, नवस पुर्ण होतात.
एक पैठण तालुक्यात पैठण जवळ मुरूम बोडखा नावाचे गाव तेथील बाईंना भूतबाधा होती. त्या जयपूरला धरणे धरून बसल्या होत्या. एक दिवस त्यांच्या आंगात आले. त्या धावतच वनगडावर आल्या, मंदिरात आल्या. स्थानाजवळ त्यांची भूतबाधा दूर झाली.
आश्चर्याची बाब म्हणजे स.भ. गयाबाई दामोधर पठाडे या बाईंचा कँन्सर हा भयंकर आजार वनदेव येथेच बरा झाला. गयाबाई कँन्सर आजाराने, त्रस्त होत्या. बराच दवाखाना करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. शेवटी डॉक्टरांनी सांगितले की, यांना घरी घेऊन जा, या आता शेवटच्या घटीका मोजत आहेत. घरचे खुप दुखी झाले. पण त्यांच्या पतीदेवांची वनदेवावर नितांत श्रद्धा! होती. त्यांनी देवाला साकडे घातले. देवा! ‘हीचा आजार बरा झाला तर मी नित्यनेमाने हीला आपल्या दर्शनाला घेऊन येईन अथवा पाठवेन.’ गयाबाईंनीही देवाला प्रार्थना केली माझा कँन्सर बरा झाला तर मी दर शुक्रवारी उटी उपहार करेन.
आणि लगेचच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास सुरुवात झाली. हळुहळु त्या पुर्ण बर्या झाल्या. ही गोष्ट पंचक्रोशीत पसरली. ते ऐकून आणखी दोन महिला बाळुबाई आणि भागुबाई पळशीकर यांनाही डॉक्टरांनी कँन्सरचे निदान केले होते. गरीब परिस्थितीमुळे त्या दवाखाना करू शकत नव्हत्या. म्हणून त्या देवाला शरण आल्या. काही दिवसातच त्यांचा आजार बरा झाला.
असे अनेक चमत्कार श्रीकृष्ण वनदेवावर घडतात. अनेक लोकांचे दुःख निवारण होते.
********************************
-: मंदिराची छायाचित्रे :-
।। स्थानाभोवती खोदकामात आढलेले प्राचिन पाषाणाचे दिवे व झांज ।।
श्रीकृष्ण वनदेव आश्रमातले देवपुजेचे आसन
हिंदी अनुवाद
भगवान श्रीकृष्ण वनदेव का इतिहास
महाराष्ट्र में, श्रीदत्तात्रेय प्रभु जी के चरणांकित कई मांडलिक मंदिर हैं। इनमें 12 खांडी, अंबाली, अबासाहेब बाबासाहेब आदि उप खांडी, शिंगवे, सौरंगा, काटालवेढा ये प्रसिद्ध स्थान हैं। श्रीकृष्ण वनदेव मंदिर वरझडी उन कई अज्ञात स्थानों में से एक है। वरझडी गाँव के चारों ओर पहाड़ियाँ हैं। मंदिर गांव के उत्तर में एक ऊंची पहाड़ी पर स्थित है। गांव के भक्तों के अनुसार यह मांडलिक स्थान अत्यंत प्राचीन है। यहां एक बरगद का पेड़ हुआ करता था। पुराणा मंदिर चूना पत्थर से बनाया गया था। श्रीदत्तात्रेय प्रभु महाराज चरणांकित आत्मतीर्थ का विशेष, माहुर सर्वतीर्थ के विशेष, मंदिर में रखे हैं। यहां श्रद्धापूर्वक दर्शन करने आने वाले भक्तों की मनोकामनाएं पूरी होती हैं। पूर्व में महानुभाव संप्रदाय पंथ(जयकृष्णी धर्म) के महात्मा यहां अनुष्ठान किया करते थे।
कई साल पहले, ऐसे ही एक बैरागी महात्मा यहां अनुष्ठान करने के लिए रहते थे। हर सुबह उठकर वे प्रभु का ध्यान करते थे। दिनभर श्रीदत्तात्रेयप्रभु भगवान के नाम का जाप करते थे। तीसरे पहर गाँव में भिक्षा करके आते थे। भगवान को उपहार दिखाने के बाद स्वयं भोजन करते थे । उनकी दिनचर्या ऐसी ही थी। अनुष्ठान पूरा होने के कुछ दिनों बाद, उन्होंने जाने का फैसला किया। वह सुबह उठकर पूजा करके निकल पडे। लेकिन उन्हो ने देखा कि अचानक से उनके पास का झोला बहुत भारी लग था। बड़ी मशक्कत के बाद भी उनसे वह उठाया नहीं गया। आखिरकार उन्होंने जाना रद्द कर दिया। दोपहर में भीक्षा मांगने के बाद उन्होंने भगवान को उपहार दिया और भोजन किया। और वामकुक्षी सो गये। और उन्हे एक स्वप्न दिखा। उनके देवपूजा में श्रीदत्तात्रेय प्रभु जी का विशेष था। वह विशेष उन्हें सपने में कहता है, "मैं यहाँ रहना चाहता हूँ, मुझे मत ले जाना" और वे तुरंत जाग गये। भगवान की मर्जी ऐसा कहकर उन्होंने विशेष आसन पे रखा और चले गए। उन्होने यह कहानी गाँव के लोगोकों को सुनाई और गाँव छोड के चले गये।
इस घटना के बाद लोगों को उस जगह की अहमियत का अहसास हुआ। गाव के लोग नियमित रूप से भगवान की पूजा करने के लिए आने लगे। बाद में सम्राट औरंगजेब के शासनकाल में देश के विभिन्न हिस्सों में काफी राजनीतिक उथल-पुथल मची रही। इसलिए, गाँव में रहनेवाली महिलायें नियमित रूप से भगवान की पूजा करने के लिए नहीं आ सकती थी। अत: सर्वसम्मत निर्णय से मंदिर की पूजा-अर्चना कर गांव ले जाया गया और वहां प्रतिष्ठा स्थापित हुई।
कुछ साल बाद, 1972 में, ग्राम के लोगोने परभतराव पठाडे और भागजीराव पठाडे किसी काम के लिए बैलगाड़ी में पांचालेश्वर के पास आपेगांव गए। जब वे आए, तो वे पांचालेश्वर के स्थान को नमस्कार करने आए। वहॉ पे उटी उपहार कीया ।और गाँव जाने के लिए निकल पडे । जाने से पहले जैसे ही उन्होने स्थाना पें मथ्था रखा । वो चिपक ही गया। तब उन्होंने परमेश्वर से प्रार्थना की, "हे परमेश्वर! अगर हमसे कोई गलती हुई हो तो मुझे खेद है, लेकिन हमें जाने दो।" तब उन्होंने फिर से परमेश्वर से प्रार्थना की, "हे परमेश्वर! हमे जाने दो या फिर आप ही हमारे साथ चलो।" और ऐसा कहतें ही उनका मथ्था वहाँ से छुटा । और उन्होंने दण्डवत् किया। और निकल पडे ।
वह अनभिज्ञ थे कील आत्मतीर्थ का विशेष उनकी बैलगाड़ी में घास के जत्थे में आ गया हैं । और वह घास का जत्था बैलगाडी के पिछे पिछे जैसे हवा में चल रहा हो । ऐसे चल रहा था । यह एक अद्भुत अनुभव था। यात्रा करते हुए वे अपने गांव आ गए। गांव में कुछ ग्रामीण गाय चरानेवाले चराते थे। चरवाहों का ध्यान उनकी बैलगाडी के तरफ गया। उन्होंने देखा कि एक घास का जत्था बैलगाड़ी के पिछे पिछे हवां मे चल रहा था। चरवाहे हैरान और डरे हुए थे। उनमें से एक काकड़े नाम के चरवाहे ने भागाजी बाबा को आवाज दी और गाड़ी रोक दी। और उन्होंने कहा, "भागबीबाबा! आपकी गाडी को कुछ हुआ है। किसीने कुविद्या का प्रयोग किया है। यह घास तुम्हारी बैलगाड़ी के पीछे से आ रही है।'' भागजीबाबा गाड़ी से नीचे उतरे। और पीछे मुड़कर देखा तो वह गिर पड़ी। उन्होंने उसे उठाकर बैलगाड़ी में डाल दिया। और फिर घर चले गये। उन्होंने खाना खाया और सो गए। दिन भर की यात्रा से थककर वह तुरंत सो गये। और सुबह उन्हें स्वप्न दिखा, वह घास की पेंडी दिखी और कोई कह रहा है, “मैं तुम्हारे साथ पांचालेश्वर से आया हूं। मुझे वनदेव पे ले चलो, मैं वहीं रहना चाहता हूं।" और वे जाग गये : उन्होने तुरंत उठकर पेंडी को चेक किया। और उसमें एक विशेष था । उसे वनदेव स्थान पे ले जाकर स्थापित किया।
समय के साथ, मंदिर ढह गया। और वहां चार टीन डाले गए और उस स्थान को छायांकित कर दिया गया। उस टीन के मंदिर में फिर से भगवान की पूजा शुरू हो गई। लोग हर शुक्रवार को उटी उपहार देने लगे। लेकिन कुछ समय बाद वह मंदिर पूरी तरह से नष्ट हो गया था। फिर छाया के रूप में उन्होंने चार टीन की छाया बनाकर तार कंपाऊड किया।
समय के साथ, वांबोरी स्थान का निर्माण किया गया था। पुराने स्थान के ओटो को पास के एक इमली के पेड़ के निचे रख दिया गया था। शांताबाई पठाडे और गांव के कई श्रद्धालु वहां नवरात्र में स्मरण करने के लिए गए थे। शांताबाई पठाडे बहुत भावुक थीं। वहाँ पे नानेगांव के एक महात्मा हैं, जो वरझडी के पास के गाव केही रहनेवाले थे । उनका नाम उद्धवराज दादा मराठे था और शांताबाई को उन्होने पुत्री माना जाता था।
एक दिन शांताबाई ने उनसे कहा, "बाबा, मुझे कुछ कपड़े दे दो।" नवरात्र के अंत में शांताबाई ने फिर कहा, "बाबा, आप मुझे कपड़े देने वाले थे।" बाबा ने कहा, "कपड़े नहीं, लेकिन यह पैसा ले लो और गाँव जाओ और दुकान से खरीदो।" उसने कहा, "बाबा, मुझे गाँव में दुकान से कपड़े नहीं चाहिए। मुझे वो इमली के पेड के निचे रखे हुये कपडे चाहिए । उन्हो देखा तो वहाँ कोई नहीं था। बाबा कहा, "इमली के पेड़ के नीचे कोई नहीं है। तुम क्या मांग रही हो?" : तो भागाबाई ने कहाँ वहाँ पुराने ओटे हैं, वही मेरे वस्त्र हैं। वही मुझे चाहिए। तब उन्होने कहाँ, हम उन्हें कैसे दे सकते हैं? उसने कहा, "बाबा, मुझे एक ओटा चाहिए। मैं आपकी बेटी की तरह हूं। आप मुझे एक लड़की मानते हैं। लड़की की इस छोटीसी कांक्षा को पूरा करें। हमारे गाव के लोगों ने वनदेव मंदिर का जीर्णोद्धार करने का फैसला किया है, इसलिए मुझे उस भगवान के लिए यह ओटा दे दो, ” महिला ने जोर देकर कहा। अंत में बाबा ने एक ओटा दिया। गाँव के लोग भी प्रसन्न हुए, वे उस ओटा को श्रीकृष्ण वनदेव मंदिर के पास ले आए। और वहां एक मंदिर बनाने का फैसला किया। उस समय गांव के कई लोगों ने सपना देखा था कि भगवान श्रीकृष्ण वनदेव पर शानदार चोटियों के साथ एक भव्य मंदिर बनाया गया है। और सभी ने, जितनी जल्दी हो सके और जितनी जल्दी हो सके, चार टीन डालके स्थान को व्यवस्थित किया । और लोग मंदिर में आते और उपहार स्वरूप भगवान की पूजा करने लगे। वहां कई लोगों के भूत चले जाते हैं। आसपास के सारे गाव मे वनदेव की किर्तीसुगंध का प्रसार हुआँ । संकट के समय बहुत लोगो को यह स्वप्न ता की, "वनदेव में जाओ" अगर तुम वहाँ जाओगे, तो संकट दूर हो जाएगा। मनोकामनाएं पूर्ण होती हैं। ऐसी कई घटनाएं हैं।
त. श्रद्धाताई कपटे के यहाँ आने के बाद, मंदिर को गांववालो की मदद से मंदिर बनाया गया था। उन्होंने पैसा इकट्ठा किया और एक मंदिर बनाया।
गांव के भक्तों ने आपस में चर्चा की और निर्णय लिया कि चूंकि हम भगवान की सेवा नहीं कर रहे हैं, इसलिए भगवान की सेवा करने के लिए कोई महात्मा होना चाहिए। तो साधु की तलाश शुरू हुई। बाद में, गंगापुर के एक भक्त और वरझडी के दामाद रामभाऊ दसपुते नाम के एक गृहस्थ थे। वे श्रद्धाताई को धर्मभगिणी के रूप में मानते थे। उसने श्रद्धाताई का नाम गाववालों को सुझाया, ताई एक अच्छी धार्मिक तपस्वीनी है। अगर वे यहाँ रहते हैं, तो यह आपकी किस्मत है! और भगवान की सेवा वह सबसे बेहतर करेगी। सब राजी हो गए। और दो गाड़ियों के साथ लोक। वनदेव में रहने का अनुरोध लेकर उनके पास आईं। सभी ने झुककर अपनी-अपनी प्रार्थना की। उसने पहले तो मना कर दिया, लेकिन बाद में, भगवान के लिए, उसने उसके अनुरोध का स्वीकार किया। उन्होंने वहां का हाल देखा। कोई साफ सफाई नहीं थी। आवास नहीं था। टीन के मंदिर में केवल एक बिजली का दीपक था। ताई को इस बात की चिंता सता रही थी कि गाँव बहुत दूर है, यहाँ मैं अकेली कैसे रहूँ। पानी भी दूर से लाना पड़ता है। तब गांव वालो ने आपस मे बातचीत करके कहा, "ताई, आप चिंता मत करो, हम पानी लाएंगे।"
शुरुआत में 200 लोग नवरात्रि मनाने पहुंचे। फिर यह संख्या बढ़कर तीन सौ हो गई। कुछ दिनों के बाद, लोगों ने ताई के लिए एक आश्रम स्थापित करने का फैसला किया। उसके अनुसार दो कमरे बनाए गए। फिर पुरानी जगह पर मंदिर बनाने के लिए नींव खोदी गई। खुदाई के दौरान दो बड़े पत्थर के दीये, एक जिंगल आदि निकले। यह देख भक्तजनो की तादात मे और इजाफा हुआ। त. श्रद्धाताई ने गाववालो की मदद से धन इकट्ठा किया और मंदिर का निर्माण किया। सामग्री के अभाव में गुंबद का काम बाकी है। लोग दूर-दूर से वंदेव के दर्शन करने आते हैं। लोगों के दुख दूर होते हैं, मन्नतें पूरी होती हैं।
एक पैठण तालुका में, पैठन के पास मुरुम बोडखा नामक एक गाँव हैं । वहृ पे एक स्त्री को भूतबाधा थी। वह जयपुर के मंदिर में धरणा देकर बैठी थी । एक दिन वह वनदेव की तरफ भागी और मंदिर में आई। और स्थान के पास आते ही भुत निकल गया । और वो स्वच्छ हो गयी ।
हैरानी की बात यह है कि स.भ. गयाबाई दामोदर पाठक का कैंसर वनदेव में ठीक हो गया था। गयाबाई कैंसर से पीड़ित थीं। कई हस्पताल मे दिखाने के बावजूद उसकी हालत में सुधार नहीं हुआ। अंत में डॉक्टर ने कहा, इसे घर ले चलो, ये अब आखिरी सांसे गिन रही हैं। घरवाले बहुत उदास थे। लेकिन उनके पति की वनदेव में बहुत आस्था थी। उन्होंने भगवान को नवस किया। भगवान! 'अगर इसकी बीमारी ठीक हो गई, तो मैं उसे नियमित रूप से अपने दर्शन के लिए लाऊंगा या भेज दूंगा।' गयाबाई ने भी भगवान से प्रार्थना की कि अगर मेरा कैंसर ठीक हो गया तो मैं हर शुक्रवार को ऊटी उपहार करूंगी। और जल्द ही उसकी हालत में सुधार होने लगा। धीरे-धीरे वह पूरी तरह ठीक हो गई।
यह घटना आस पास के गावो मे आग की तरह फैल गई। डॉक्टरों ने दो अन्य महिलाओं, बालूबाई और भागूबाई पळशिकर को भी कैंसर का निदान किया। हालत खराब होने के कारण वह अस्पताल नहीं जा सकी। इसलिए वे भगवान की ओर मुड़े। कुछ ही दिनों में वह ठीक हो गया।
ऐसे कई चमत्कार भगवान कृष्ण के साथ होते हैं। कई लोगों के दुख कम हुए।