स्तब्धस्य नश्यति यशो विषमस्य मैत्री नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्मः संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

स्तब्धस्य नश्यति यशो विषमस्य मैत्री नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्मः संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

 संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit

स्तब्धस्य नश्यति यशो विषमस्य मैत्री

नष्टक्रियस्य कुलमर्थपरस्य धर्मः।

 विद्याफलं व्यसनिनः कृपणस्य सौख्यं

राज्यं प्रमत्तसचिवस्य नराधिपस्य॥

हिंदी अर्थ :- जड बुद्धिवालों का यश नष्ट हो जाता है, कुटिल पक्षपाति इन्सान की मित्रता नष्ट हो जाती है, आचाररहित इन्सान के कुल का नाश हो जाता है, अर्थप्राप्ति को ही मुख्य मानने वाले का धर्म नष्ट हो जाता है, व्यसनी इन्सान के विद्या के फल का नाश हो जाता है, कृपण का सुख नष्ट हो जाता है और प्रमादी मंत्रि हो ऐसे राजा के राज्य का नाश हो जाता है।

मराठी अर्थ :- जड बुद्धि असलेल्यांचे यश नष्ट होते, कुटिल पक्षपाति व्यक्तिंची मित्रता नष्ट होते, सदाचारविहीन व्यक्तिच्या कुळाचा नाश होतो, अर्थप्राप्तिलाच सर्वस्व मानणाऱ्यांचा धर्म नष्ट होतो, व्यसनी व्यक्तिच्या विद्येचे फळ नाश पावते, कृपण (कंजूस) चे सर्व सुख नष्ट होते आणि प्रमादि मंत्री असेल तर अशा राजाचे राज्य नष्ट होते....

आपन्ननाशाय विबुधै: कर्तव्या सुहृदोऽमला: ।

 न तरत्यापदं कश्चित् योऽत्र मित्रविवर्जित: ॥

मराठी अर्थ :- संकटाचे, विघ्नांचे निवारण करण्यासाठी शहाण्या सज्जन मनुष्याने चांगले मित्र जोडावेत. या जगात ज्याला मित्र नाहीत असा कोणीही मनुष्य संकटातून तरून जात नाही. मित्र शब्दाचा अर्थच संस्कृत भाषेप्रमाणे संकटातून तारणारा असा होतो.

अप्रियाण्यपि पथ्यानि ये वदन्ति नृणामिह ।

 त एव सुहृद: प्रोक्ता अन्ये स्युर्नामधारका: ॥

मराठी अर्थ :- अप्रिय पण हितकारक असे वचन जे राजांना सांगतात त्यांना सुहृद असे म्हतले जाते, इतर केवळ नावाचेच मित्र असतात.

यस्य मित्रेण सम्भाषा यस्य मित्रेण संस्थिति: ।

मित्रेण सह यो भुङ्क्ते ततो नास्तीह पुण्यवान् ॥

मराठी अर्थ :- ज्याचे मित्राबरोबर संभाषण होते, जो मित्राबरोबर रहातो, मित्राबरोबर जो जेवतो त्याच्यापेक्षा या जगात कोणी पुण्यवान नाही.

इच्छेच्चेद्विपुलां मैत्रीं त्रीणि तत्र न कारयेत् ।

वाग्वादमर्थसम्बन्धं तत्पत्नीपरिभाषणम्॥

मराठी अर्थ :- जर पुष्कळ मैत्रीची इच्छा असेल तर तीन गोष्टी करू नयेत. १) शब्दकलह २) द्रव्याचा संबंध ३) त्याच्या पत्नीशी संभाषण

मित्रेण कलहं कृत्वा न कदापि सुखी जन: ।

 इति ज्ञात्वा प्रयासेन तदेव परिवर्जयेत् ॥

अर्थ - मित्राबरोबर भांडून लोक कधीही सुखी होत नाहीत. हे लक्षात घेऊन प्रयत्नपूर्वक याच गोष्टी टाळाव्यात.

तत्र मित्र न वस्तव्यं यत्र नास्ति चतुष्टयम् ।

ऋणदाता च वैद्यश्च श्रोत्रिय: सजला नदी ॥

मराठी अर्थ :- हे मित्रा, जेथे ऋण देणारा, वैद्य, वेदवेत्ता ब्राह्मण व पाण्याने युक्त नदी या चार गोष्टी नसतील तेथे राहू नये.

दुर्मन्त्रिणं कमुपयान्ति न नीतिदोषाः

सन्तापयन्ति कमपथ्यभुजं न रोगाः।

कं श्रीर्न दर्पयति कं न निहन्ति मृत्युः

कं स्वीकृता न विषया ननु तापयन्ति ॥

हिंदी अर्थ :-  दुष्ट मंत्रीवाले कौन से राजा को न्याय-नीति के दोष प्राप्त होते नही? कौन से अपथ्य भोजन करने वालों को रोग त्रस्त करते नही? लक्ष्मी आने से किस को अभिमान उत्पन्न नही होता? मृत्यु किसको मारती नही? और स्विकार/ग्रहण किया हुआ विषय किसको संताप नही देता?

मराठी अर्थ :- दुष्ट मंत्री असलेल्या कोणत्या राजाला न्याय-नीति चा दोष प्राप्त होत नाही? अपथ्य भोजन करणाऱ्या कोणाला रोग त्रस्त करीत नाही? लक्ष्मी (धनसंपदा) येण्याने कोणाला अभिमान उत्पन्न होत नाही? मृत्यु कोणाला मारत नाही? आणि स्विकार/ग्रहण केलेला विषय कोणाला संताप उत्पन्न करीत नाही?

प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरवक्त्रदंष्ट्राङ्कुरात्

समुद्रमपि सन्तरेत्प्रचलदूर्मिमालाकुलम् ।

भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत्

न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥ (नी.श.)

मराठी अर्थ :- (एखादा मनुष्य) मगरीच्या जबड्यातील दाढेच्या तीक्ष्ण टोकातून रत्न बाहेर काढू शकेल, हलणार्‍या लाटांच्या मालिकांनी भरलेला (क्षुब्ध झालेला) समुद्र सुद्धा ओलांडू शकेल, रागावलेला साप सुद्धा फुलाच्या माळेप्रमाणे डोक्यावर धारण करू शकेल, परंतु कोणी दुराग्रही मूर्ख मनुष्याचे मन संतुष्ट करू शकणार नाही.

लभेत सिकतासु तैलमपि यत्नत: पीडयन्

पिबेच्च मृतृष्णिकासु सलिलं पिपासार्दित: ।

कदाचिदपि पर्यटन् शशविषाणमासादयेत्

न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधयेत् ॥(नी. श.)

मराठी अर्थ :- प्रयत्नपूर्वक भरडून वाळूमधून सुद्धा कोणी तेल मिळवू शकेल, तहानेने व्याकूळ झलेला मनुष्य मृगजळातील पाणी पिऊ शकेल, इकडे तिकडे हिंडून मनुष्य कदाचित सशाचे शिंग सुद्धा मिळवू शकेल, पण कोणी दुराग्रही मूर्ख मनुष्याचे मन संतुष्ट करू शकणार नाही.

यदि वाञ्छसि मूर्खत्वं वस ग्रामे दिनत्रयम् ।

अपूर्वस्यागमो नास्ति पूर्वाधीतं विनश्यति

मराठी अर्थ :- जर तुला मूर्खत्वाची इच्छा असेल तर गावामधे (खेड्यामधे) तीन दिवस रहा. तेथे अपूर्व गोष्टींचा आगम नाही व पूर्वी शिकलेल्या गोष्टीचा नाश होतो.

माता शत्रु: पिता वैरी येन बालो न पाठित: ।

न शोभते सभामध्ये हंसमध्ये बको यथा ॥

मराठी अर्थ :- जे आपल्या मुलाला शिकवत नाहीत ती आई व वडील त्या मुलाचे शत्रु आहेत. जसा हंसांमधे बगळा शोभून दिसत नाही त्याप्रमाणे तो मुलगा सभेमधे शोभून दिसत नाही.

मूर्खचिह्नानि षडिति गर्वो दुर्वचनं मुखे ।

विरोधी विषवादी च कृत्याकृत्यं न मन्यते

मराठी अर्थ :- गर्व, मुखात अप्रिय वचन, विरोध करणे, कठोर बोलणे, चांगले वाईट न ओळखणे ही मूर्खाची सहा लक्षणे आहेत.

वित्तेन किं वितरणं यदि नास्ति दीने

किं सेवया यदि परोपकृतौ न यत्नः।

किं सङ्गमेन तनयो यदि नेक्षणीयः

किं यौवनेन विरहो यदि वल्लभायाः॥

हिंदी अर्थ :- जो वित्त दीनजनों को देने के कार्य में नही आता ऐसे वित्त का क्या उपयोग? जिसमें दूसरों पर उपकार करने का प्रयत्न ना हो ऐसी सेवा का क्या उपयोग? अगर अच्छा पुत्रमुख ना देखने मिले ऐसे समागम से क्या? और अगर प्रिया का विरह ही पाना है ऐसा यौवन किस काम का?

मराठी अर्थ :- जे वित्त दीनजनांना देण्याच्या कार्यांत येत नाही अशा वित्ताचा उपयोग काय? ज्यामध्ये इतरांवर उपकार करण्याचा प्रयत्न नसेल अशी सेवा काय कामाची? जर चांगले पुत्रमुख बघण्यांस मिळणार नसेल असा समागम काय कामाचा? आणि जेथे प्रियेचा विरहच सहन करायचा आहे अशा यौवनाचा काय उपयोग?

किं भूषणं सुदृढमत्र यशो न रत्नं

 किं कार्यमार्यचरितं सुकृतं न दोषः।

किं चक्षुरप्रतिहतं धिषणा न नेत्रं

 जानाति कस्त्वदपरः सदसद्विवेकम्॥

हिंदी अर्थ :- इस लोक में सदा स्थिर रहे ऐसा कौन सा आभूषण है? यश! नही के रत्न। सत्पुरुषों का आचरने योग्य आचरण कौन सा? उनके सत्कृत्य! नही के उनके दोष। जो दृष्टि कहीं भी अटके नही ऐसे नेत्र कौन से? बुद्धि! नही के आँख। और सच और झुठ का विवेक इन्सान के खुद के सिवाय अन्य कौन जानता है? कोई भी नही! इन्सान खुद ही यह विवेक जान सकता है।

मराठी अर्थ :- या जगांत स्थिर आहे असा अलंकार कोणता? यश! रत्न नाही. सत्पुरुषांचे आचरण करण्यायोग्य आचरण कोणते? त्यांचे सत्कृत्य! त्यांचे दोष नाही. जी दृष्टि कोठेही अटकत नाही असे नेत्र कोणते? बुद्धि! डोळे नाही. आणि सत्य-असत्याचा विवेक व्यक्ति शिवाय अन्य कोण जाणू शकतो? कोणीही नाही. व्यक्ति स्वतःच स्वतःचा विवेक जाणू शकतो.

प्राप्ताः श्रियः सकलकामदुघास्ततः किं

दत्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम्।

सम्प्रीणिताः प्रणयिनो विभवैस्ततः किं

कल्पं स्थितं तनुभृतां तनुभिस्ततः किम्॥

हिंदी अर्थ :- सकल कामनाओं की पूर्ण करने वाली लक्ष्मी प्राप्त कर ली इससे क्या? शत्रुओं के मस्तक पर पैर रख दिया (शत्रुओं को झुका दिया) इससे क्या? वैभव से प्रियजनों को प्रसन्न कर लिया इससे क्या? और देहधारी जीव को देह के साथ कल्पांत तक रहने को मिलता है, (जींदा रहता है) इससे क्या?

मराठी अर्थ :- सर्व मनोकामना पूर्ण करणारी लक्ष्मी प्राप्त झाली त्याने काय? त्याने शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवले (शत्रूंना नतमस्तक केले) त्याने काय? वैभवामुळे प्रियजनांना प्रसन्न केले, त्याने काय? आणि देहधारी जीवाला देहा सोबत कल्पांता पर्यंत राहण्यास मिळाले, (जीवंत राहतो) त्याने काय?

 

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post