चार प्रकारच्या नीति कोणत्या? Neeti ke 4 prakar

चार प्रकारच्या नीति कोणत्या? Neeti ke 4 prakar

5-6-2022

चार प्रकारच्या नीति कोणत्या? 

Neeti ke 4 prakar 

What are the four types of policies?

विद्येविना मती गेली मतिविना नीती गेली 

नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले

विद्याविना शुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले." माणसा माणसातील नातं कसं असाव हे ठरणारे नियम म्हणजे 'नीती' होय. हे नियम माणसाने माणसासाठी केले आहेत. नीती म्हणजे वैचारिक दृष्टिकोन. नीतीची दुसरी बाजू म्हणजे प्रिती होय. परंतू, ह्या परस्परे दोन विरोधी बाजू आहेत. नीतीमधून आजुबाजूची परिस्थिती, मनुष्याचे जीवन, प्रत्येकाचा स्वभाव त्यांचे दर्शन घडते नीती मूल्यांचे पालन प्रितीने केले तर ती नीती मनुष्यास जीवन जगण्यास शिकवते. परंतु तिच नीती दुष्ट बुद्धीने उपयोगात आणली तर ती एखाद्याचे किंवा आपलेच आयुष्यही उध्वस्त करते. 

जगामध्ये अनेक नीती आहेत. परंतु अनेक नीतीपैकी जगप्रसिद्ध अशा तीन नीती आहेत व त्या तीन नीतीमधूनच मनुष्य आपल्या जीवनाला दिशा देत असतो. किंवा दिशाभूलही करीत असतो.

१. कूटनीती : म्हणजेच मनुष्य आपल्या बुद्धीने जगातील रहस्यमय विषयांवर रहस्यमय नीतीचे विवेचन करतो. याचे प्रत्यक्ष उदा. शकुनिमामा. त्याने आपल्या दुष्ट बुद्धीने कौरव पांडवांचे कूटनितीच्या सहाय्याने आपसांतील वैर अधिकच दृढ करण्यात घातली. द्युतातील डावपेच तो चांगल्या प्रकारे जाणत होता. म्हणूनच या खेळामध्ये धर्मराजाला व त्याच्या भावांना गुंतवून आपल्या रहस्यमय डोवपेचांनी त्याने त्या पांडवांचे सर्वस्व हिरकावले. अशा प्रकारे काही लोक गुप्त रहस्यातून अनेकांचे अहितच चिंततात. 

परंतु, काही लोक नीतीचा चांगल्यासाठीही उपयोग करतात. त्याचे प्रत्यक्ष उदा. म्हणजे अक्रूर. याने कौरवांनी दुष्ट बुद्धिने रचलेल्या पांडवांविरूद्धच्या नीतीची मोड केली. कौरवांनी पांडवांच्या राहण्यासाठी लाखेपासून तयार केलेल्या महालात आपल्या बुद्धीने एक मोठे भुयार खोदून जेव्हा त्या महालाला आग लावली त्या आगीतून कुंती व तिचे पाच पुत्र यांचे प्राण वाचवले. नीती एकच पण एकाने तिचा उपयोग चांगल्यासाठी केला तर दुसऱ्याने वाईटासाठी. हे माणसावर अवलंबून नव्हे तर त्याच्या स्वभावनितीवर होय.

२) चाणक्यनीती : या नीतीमध्ये कुठल्याही गोष्टीचा फापट पसारा सोडून फक्त ज्ञानाचा समावेश असतो. पुष्कळ लोक धर्माचा खुप अभ्यास करतात, शास्त्र व वेद वाचतात. तरी त्यांना स्वतःचे ज्ञान होत नाही. काहीजन नुसते पक्वान्ने खातात. त्यातील चव व स्वाद त्यांना मिळत नाही. याचे कारण रोजच्या व्यवहारात कळत नकळत खुप चुका करतो. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात खुप त्रास होतो. म्हणून त्या चुका कशा टाळाव्यात याबाबत आर्य चाणक्य सांगतात, धैर्य धरून प्रयत्न केल्यास दारीद्र्य नाहीसे होते. कोणतेही काम निट विचारपूर्वक करावे. 

ज्याला कष्ट करायचे नाही त्याला विद्या कशी येणार; विद्या हवी असेल तर चैन, उनाडक्या सोडल्या पाहिजे. चाणक्यनीती आपल्याला हे शिकवते, ज्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यापासून त्रास होतो, आपल्याला सतावणारे लोक जिथे असतात, जिथे दुष्काळ पडण्याची शक्यता असते व शेजार पाजार वाईट असतो अशा व्यक्तीच्या जवळपास राहू नये आणि शेवटी चाणक्यनीतीतून आपल्याला एक बोध मिळतो की, धावण्याची दिशाच चुकलेली असेल तर धावण्याचा वेग वाढत जातो. 

गीतेच्या पहिल्या अध्यायातील अर्जुनाची अवस्था बाह्य समाजाला प्राप्त होते. अशा वेळी त्याच्या मुलभूत शंकाचे अचूक समाधान करणे त्याला आत्मस्वरूपाचे बाण आणून देणे आणि त्याद्वारे त्याच्या गलीतगात्र अस्तीत्वात पुरुषार्थाचा संचार करविणे निकडीचे असतात. पण ते एखाद्याच समयज्ञ श्रीकृष्ण भगवंतालाच साध्य होऊ शकते. नियतीच्या शापांनी आधीच अवसान गळालेल्या कर्णाला मानसिकदृष्ट्या अधिक हतबल करण्याचे काम शल्यनीती बजावत असते. 

तर प्रत्यक्ष रणांगणावर धीर सुटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण पुन्हा आपल्या उद्देशाने प्रबल करीत असतो. त्यासाठी अर्जुनाच्या मनातील ह्या समाजाची दुर्विचाराची कोष्टके त्याला साफ करावी लागतात. तेव्हा कुठे प्रेरणेची किरणे त्याच्या अंतरमनात प्रकाश पाडू शकतात. या सर्वांमुळे माणसा माणसात आत्महिनतेची जाणीव निर्माण होऊ लागली आहे. त्याबद्दलची अभिमानास्पद ऋषीवृत्ती होण्याऐवजी तिटकारा व उपहासबुद्धी प्रत्येकामध्ये प्रबळ होत आहे. अज्ञानजटा तुच्छताच वाढविते आहे. आत्मकेंद्रीतता व सुख लोलुपता यांची चटक प्रमाणाबाहेर वाढत आहे. आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या शल्य गोत्राच्या उपदेशकाची संख्या शिरजोर बनत आहे. 

त्यामुळे भ्रांत झालेल्या राष्ट्राला स्वरुपाचे स्वशक्तीचे व स्वकर्तव्याचे भान आणून देणाऱ्या त्रिकाळज्ञ श्रीकृष्णाची तेवढी वाणवा आहे. “कार्पण्य दोषो पहत स्वभाव: । पृच्छामि त्वां धर्म सम्मुढचेताः । यच्छ्रेय: स्यान्निश्चितं बृहीतन्मे । शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥: वाढवण्यात काहीही अर्थ नाही. नीतीचे नियम आदर्श वचनावरून केवळ ठरत नसतात. ते जीवनातील जागत्या अनुभवावरून ठरत असतात. त्या नीतीचा प्रत्येकाला अनुभव येतो.

३) राजनीती : या राजनीतीबद्दल म्हणायचे तर संपूर्ण राजकारणच. या राजकारणात समाज, उच-नीच, गरीब-श्रीमंत, शहाणा-वेडा, ज्याला कळतं, ज्याला कळूनही काही कळत नाही अशा सर्वांचा समावेश होतो. या नीतीमध्ये आपले मित्र कोण व शत्रू कोण याचा ठावठिकाणा लागणे फारच कठीण. जगामध्ये होत असलेल्या सर्व स्तरांवरील बदल नव्हे तर एक प्रकारचा भ्रष्टाचारच या नीतीमध्ये मोडतो. 

प्रत्येक माणूसही आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याचा गळाचेप करतो; मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी त्याच्याकडून हे सर्व करून घेत असतात. त्याला अनेक कारणे आहेत. कोणाला सत्तेची लालसा आहे. तर कोणाला पैश्यांची हौस असते. पण शेवटी काही ना काही कारण आहे. जे माणसाला माणसापासून नव्हे तर माणूसकीपासून दुरावत आहे. 

याचे अनेक परिणाम समाजावरती दिसायला लागले. या नीतीने दुर्बलाची दुर्बलता वाढवली बेकारीची समस्या निर्माण केली. आर्थिक विषमता वाढवली याचा उपाय एकच. आपल्याला प्रत्येकाला आपल्या भवितव्यांसाठी आधीच जगण्यावर प्रेम केले पाहिजे. प्रत्येकासाठी एकच भावना बाळगली पाहिजे. ती म्हणजे जगाच्या कल्याणा देह कष्टवावा। कारणी लावावा सत्यासाठी ॥ या व्यतिरिक्त आणखी काही नीती आहेत. त्या पुढील प्रमाणे. संघर्ष काळात 

४) शल्यनीती : शल्यनीतीचा प्रयोग करण्यात अनेक शहाणे लोक आपल्या व्यासंगाचे व बुद्धीमत्तेचे कृत्यकृत्यता मानतात. त्यामुळे समाजाच्या मनाची मरगळ या सर्व नीतीच्या निष्कर्ष केला असता एकच बाब लक्षात येते. या सर्व समाजातील भ्रष्टाचाराला सर्व भांडणांना युद्धे निर्माण होण्याला कारण म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे प्रितीची कमतरता. श्रीकृष्णाने समाजाला न्याय, नीती व मानवता या शाश्वत तत्त्वांची जाणीव करून दिली. मनुष्य जन्माने, जातीने वा धनाने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नसून तो आपल्या कर्माने श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरतो. तो स्वतःच आपुल्या भाग्याचा नियंता आहे अशी त्याची धारणा होती. 

त्यानुसार भगवान श्रीकृष्णांनी बुद्धीप्रामाण्य समता नी मानवता यावर अधिष्ठित अशा सामाजिक पुनर्रचनेचे निशाण फडकावले. "मानवता धर्म। सत्यनीती हीच" असे सांगून त्यांनी “सत्याविन नाही अन्य धर्म" असा सत्याचा गौरव केलेला आहे आणि हेच सर्व श्रेष्ठ नीतीतत्त्वावर होय. त्यासाठी जगातील सर्व आखिल मानव जातीच्या कल्याणासाठी एकच नीतीतत्त्व बाळगवायचे आहे ते म्हणजे खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।

लेखिका :- त. वैशाली ताई विद्वांस

------------


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post