श्री दत्ताचा पाळणा - महानुभाव पंथिय कविता संग्रह- palana shree dattacha

श्री दत्ताचा पाळणा - महानुभाव पंथिय कविता संग्रह- palana shree dattacha

 श्रीदत्तात्रेयप्रभू पाळण संग्रह 



श्री दत्ताचा पाळणा - महानुभाव पंथिय कविता संग्रह

श्रीदत्ताचा पाळण क्र. 01

जो जो जो जो जो जो बा दत्त वेल्हाळा, हलवित माता जाय झोपी राजस बाळा ॥धृ.॥ 

बद्रीकाश्रमी । ऋषी मेळी भुवनी । 

पतीवृतांत अनूसया तयाची राणी । 

तीयेची उदरी व्यक्तला परावर दानी । 

हलविता भार्या पालखी बाळ निजोवोनी ।

वर्षती पुष्प सुर मिळोनी वेळोवेळा ॥१॥ 

जडीत नव रत्नी केला ग बाई पाळणा । 

वर चांदवा बहु दिसतो गोजिर वाना । 

घोष रत्नाचे डोलती तु छरविजना । 

मिळाल्या नारी हालविती सुराचा राणा । 

संगऋषी ऐसे ठेविले नाव सुरपाळा ॥२॥ 

ब्रह्मा, विष्णु, महेश आले कपटाने सत्य ढाळाया। 

नम्र होऊनिया जेवू वाढी सत्वपाळा । 

संकटी माता पडताची जाणुनी त्या काळा । 

श्रीकर ठेऊनिया केले बाळ लावी खेळाया। 

विधी सुत सांगे कैलासी जाऊनी त्यावेळा ॥३॥ 

विनंती अंगीकारी देव सुराचारणा । 

देव देवेश्वरी येऊनी देवलस्थाना । 

देवोनी दर्शन तारीले भक्तजन नाना । 

स्थापी रेणुका रुचीकासी अश्वकरी दाना ॥ 

कार्तिविर्यासी कर सहस्त्र दे कृपाळा ॥४॥ 

शंकराचार्या वर देवोनी मान्य स्वामी । 

ज्ञान यदुराया गोरक्ष बोधीला नामी । 

आर्लकासी निववोनी नेसी निजधामी । 

सदा स्मर जिवा होवोनी निष्कामी सिवनीकर विनवी तुज दीन पाळा ॥५॥

============

श्री दत्ताचा पाळणा क्र.02

बाळा जो जो अनंता । अत्रि अनुसयासुता । 

माता हलविती अनुसया। निज बा दत्तात्रेया ॥ध्रु.॥ 

पाळणा जडित अमोल । हिरे जोडीले वेल्हाळ । 

त्यामध्ये प्रभू वेल्हाळ । गुरु दत्तात्रेय बाळ । बाळ ॥१॥ 

पाळणा लांबला अंतरीक्ष पर्वत साक्ष मोक्ष त्यामध्ये प्रभु निजले । वेल्हाळ दत्तात्रेय बाळ ॥२॥ 

अनंत सृष्टीचा पालक । तू जगदीश । 

नारी मिळुनिया सकळीक । हलवित ब्रह्मादिक । 

बाळा जो जो रे अमोलिक । परब्रह्म तिलक बाळा ॥३॥ 

जन्म झालासे पौर्णिमा मार्गशीर्ष महिना । 

सखया गीत गाती । वनमाळी कवतुक दृष्टी पाहे ॥४॥ 

आल्या तिघी जणी ऋषीसहनी । रेणुका अंगणी । 

बाळा पाहु का पुजोनि । श्रीदत्ता भेटुनी भाळा ॥५॥ 

सरी बनिले अनलाल । वाघनखे गळा । 

कुचीले हरण सोज्वळ पुजीला सावळा बाळ ॥६॥ 

बास केले बहु सरस । कैवल्य नाईक ।

केवळ रत्न विनविले । त्यामध्ये प्रभूजी निजले ।

बाळा अवधुता श्रीकर ठेवी माथा बाळा ॥७॥

===========


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post