श्रीदत्ताच्या 15 आरत्या - श्रीदत्त आरती लिरीक्स dattachi 15 aarti lyrics in Marathi

श्रीदत्ताच्या 15 आरत्या - श्रीदत्त आरती लिरीक्स dattachi 15 aarti lyrics in Marathi

 श्रीदत्ताच्या 15 आरत्या - आरती संग्रह लिरीक्स - श्री dattachi aarti in Marathi

प्रात:काळ श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्रमांक 01

बाप्पा तु उठ रे उठ श्रीदत्तात्रेया । उठ स्वामीराया । 

जटा मुगुट करी नीट माता अनुसुया । बाप्पा .. .. ॥धृ.॥

प्रात:काळ झाला अरुणाचा उदयो । 

सुरवर ऋषीवर दायक तिष्ठती रुप पाहाया । 

इंद्र चंद्रादिक आले पुष्पे ओळगाया । 

हरीहर ब्रह्मादिक आली चैतन्य माया ॥१॥ 

मातेच्या वचनी दत्तात्रेय उठले । 

अवलोकिता जीवाचे भव बंधन तुटले । 

कल्पकाळीचे दोष त्यापासुनी सुटले । 

पवित्र पर्वत पहाता, सैह्याद्रि पर्वत पहाता पाप सिंधु आटले ॥२॥ 

दंडकमंडलु चर्चुन हाती विभुतीचा गोळा । 

चरणी पादुका ले बा जा मेरुवाळा । 

जडचर जडजीव पिडले येऊ दे कळवळा । 

तप्त तापले तुजविण कोण वेल्हाळा।।३॥ 

वाराणीसीचे स्नान कोल्हापुरी भिक्षा । 

गंगेतटी येऊनिया स्वामीची भिक्षा । 

आत्मतीर्थ चरणाकिंत तटीमुठीची साक्षा। 

ध्यानस्थ बैसोनी स्मरणस्थ बैसोनी पर्वतासी लक्षा ॥४॥ 

अव्यक्तीहून व्यक्त झाला प्रार्थिला देव । 

सैह्याद्रि पर्वता पाहाता मनी ठसला भाव । 

ज्याचा जैसा भाव त्याला तू पाव । 

मागतो गणेशा प्रार्थिती परमेशा दे नीजपदी ठाव ॥५॥

=========== 

श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 02

अत्रीनंदना विशाल नयना दयाळू तु अफाट देवा दयाळू तु अफाट। 

सकळ क्रमुनी नेई माझ्या जीवनाचा घाट रे ओऽऽ जीवनाचा घाट रे।

जीवन सकळ मम समूळ आता विफल जातसे हे भगवंता । 

पावन करुनी घे या पतिता, नासुनी दुःख विराट ओ ऽऽ नासुनी ॥२॥

तुच जीवाचा प्राण विसावा, तुझ्या जवळ ना हेवा दावा । 

करुणाघन तू आहेस देवा, विश्वाचा सम्राट ओ विश्वाचा सम्राट ॥२॥

आनंद कंदा कृपाळुवाजी, अमोघ दर्शन देऊन प्रभूजी । 

दामोदर म्हणे तुझीन माझी बांधी रेशमी गाठ ओ SSS बांधी रेशमी गाठ ॥३॥

============
श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 03
 भजन
श्री दत्तराया साह्य कराया। असो कृपेची छाया आम्हावरी ॥धृ०॥ 
अज्ञानी मी व्यर्थ ज्ञानी । नाही लागलो ईश्वर भजनी । 
अन्य देवते शरण जावूनी । दुःख भोगिले हे देवराया ॥१॥ 
अनेक जन्मी आलो फिरुनी। परी न ओळख तुझी अजुनी । 
तुच कृपेचा सागर असुनी । आम्हा दर्शन देई देवराया ॥२॥ 
श्याम मंडळीची हीच आशा। पुरवी स्वामी श्री जगदिशा । 
चुकलो जरी आम्ही सेवा कराया । घेई पदरी श्री दत्तराया॥३॥
======+==

=========

श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 04

भजन 
येई दत्त प्रभुराया, करीतो नमन तुझ्या पाया । 
देई मती गुण गाया स्वामी राया स्वामी दत्तराया ॥धृ.॥
प्रभु तु बहुता वर देसी, तरी का मजवर रुसलासी । 
जरी मी झालो बहुदोषी, तुझ्याविन जाऊ कोणापासी । 
मला का धाडीतोसी वाया ॥१॥ स्वामी राया..
यदुराजासी ज्ञान दिधले, अरळकासी शांतीविले । 
सहस्त्र अर्जुना वर दिधले, नासोनी पाप दुःख हरीले, 
छेदी तु माझी मोह माया ॥२॥ स्वामी राया..  
विनवी दास तुला कृष्ण, चरणी झालो तुझ्या लीन । 
मागतो तुला हेची दान, देई तू मज वरदान । 
धरी तु माझ्यावरी छाया ॥३॥ स्वामी राया..
============
श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 05

कधी तुझ्या येता जवळी दिनाने काय मागावे । 
मला वाटे श्री दत्तप्रभु इथेची जीवन कंठावे ॥धृ.॥
तुझ्या राऊळांचा सेवक, मनीषा हेत ही व्हावा । 
नको मज लागु दे काही, तुझा सहवास लाभावा । 
गडाची पायरी एक, मी होऊन चरणांची लागावे ॥१॥ 
घडावी संताची संगत, भजनी किर्तनातुन ती । 
जवळ करण्याही पुरती मला दे नित्यक तु मुक्ती । 
मनाची भागावी तृष्णा, हे जीवन सार्थकी व्हावे ॥२॥ 
जराचा कुंभ होऊनी, तव चरणात स्पर्शावा । 
पवित्र पदकमलावरती, मनोभावे तो अर्पावा । 
कृपाळू श्रीदत्तात्रेय प्रभू, मनोरथ हेची जाणावे ॥३॥ 
अनाथे तुझविना नाही, महानुभाव पंथांची ग्वाही ।
तुझी किर्ती दिशा नाही, मलीन स्तवनातुन गायी 
म्हणुन धाव लवलाही, पांचाळेश्वर जाऊन रहावे॥४॥
==========
श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 06
अत्रिनंदन स्तवन 
धन्य धन्य स्वामीया अवधुता । योगीया मुनिवरा । 
सकळ साक्षी तू असशी गुरुकुळा । चिदूपचिन्मयवरा ॥
पूर्णब्रह्म परधाम परात्पर । मुनिरंजन अच्युता ॥ 
भवार्णवी बुडता तारी तू । संसृतीमूळ छेदका ॥ 
भक्ततिल्लका अत्रिकुमरा । वसशी सैह्यंगिरी ॥ 
सकळा जना पावसी कृपाळा । प्रेम देई झडकरी ॥ 
अगम्य अगोचर अनाम गुणमय। अगम्य गुणस्थिता ॥ 
देववृंद मुनिवृंद चिंतित । पार नसे तवं रुपा ।। 
बद्रिकाश्रमी तत्वज्ञान तू । कथिसी योगी जना ॥ 
स्नान काशिचे सारुनी राया। आत्मतीर्थी भोजना ॥ 
मातापूर हे पवित्र स्थान । निद्रेला वारिसी ॥ 
प्रेम सुखाचा दुर्ग उगवला । ठाव देई मजसी॥ 
हे कल्पमा अनुपमा । संकष्टी पाव आम्हा ॥ 
भव ऋषीकुलोत्पन्ना। सुंदरा प्रेमधामा ॥ 
दास तुझा मी ठाव द्यावया। विसरु नको प्रभूवरा।।
भक्त वत्सला ब्रिद तुझे हे। वदती गुण गंभीरा ॥
हे अत्रिसुता गुरुदत्ता। पावसी जना अवधुता प्रभूवरा ॥ 
हे पाप ताप दैन्याते । वारी भवहरी दुःखाते प्रभूवरा ॥ 
करुणाब्धि करुणावंता । हे प्रभो । दयाघन त्राता प्रभूवरा।।
कैवल्यसुखाचा धाम । आत्मयाराम सकळ जगतासी ॥ 
अमृतदास चरणासी प्रभूवरा । गोविंददास चरणासी प्रभूवरा ॥
===============
श्रीदत्तात्रेयप्रभू स्तवन क्र. 07
श्री जगद्गुरु महाराज । सुखाचा दानी । 
नांदतो सैह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ॥धृ.॥
ऋषी अत्रि पिता अनसूया जयाची जननी । 
तो पूर्णब्रह्म अवतार व्यक्तला अवनी । 
अतिशुभ्र उटी चंदनादी परिमळ भरुनी। 
रेखीला टिळा मृगनाभिज मिश्रीत करुनी । 
तू प्रेम सुखाचा दानी प्रभूवरा । 
तवपदी ठाव नित्यानी प्रभूवरा । 
मागतो तुला निर्वाणी प्रभूवरा । 
हे भक्त वत्सला ज्ञानधनाचा तरणी। 
अज्ञान तमी करी प्रकाश तव तेजानी । 
श्री जगद्गुरु महाराज । सुखाचा दानी। 
नांदतो सैह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ॥
===========
श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 08
श्री दत्तराज महाराज करितो मी आज नमन मी तुजला ।
सुख शांती देई तू मजला ॥धृ.॥
तू पूर्ण दयेचा सागर रे । तू साह्य कारी माझा रे ॥ 
तुजवीन नसे मज, कोणी जगीया आपुला ॥१॥ 
तू विश्व जनाचा अधिकारी । नित भक्ताचे श्रम दुःख हारी ।
भव क्लेष दोष अपयश नासुनी आजला ॥२॥ 
म्हणे दामोदर हे जगदानी । ही हाक दीनाची ऐकूनी । 
घे धाव पाव त्वरे नाव जाऊ दे कडेला ॥३॥
=====+===+======
श्रीदत्तात्रेयप्रभू भजन क्र. 09

स्तवन 
किती किती दत्तात्रेया आळऊ तुला रे आळऊ तुला रे किती
रिझवु तुला रे, प्रभु निर्मला रे ॥धृ.॥
प्रभु सुख शांती देई अखंड मनाला । 
भव भय नासुनी नेसी सुखाला । 
चिरानंद देई तुझा माझ्या जीवाला रे, प्रभु निर्मला रे ॥१॥ 
यदुराज भक्तांची ती भक्ती बघुनी । 
मुक्तचि केले भव पाशातुनी। 
निजबोध कस्नी नेले अढळ पदाला रे, प्रभु निर्मला रे ॥२॥
भक्ततील्लका तू आता धाव पाव देवा । 
अविरत करीतो आपुला धावा । 
दामोदर उत्सुक झाला तुझ्या दर्शनाला रे, प्रभु निर्मला रे ॥३॥
==========
श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 10
श्री दत्तात्रेय प्रभू आरती ।।
अवधुत प्रभुराया जय जय अवधुत प्रभुराया।
वंदीन तुमच्या पाया पाया ॥धृ.॥
ऋषीवंशी प्रभु अवतरलासी । भक्त तारावया ॥१॥ 
परमार्गासी आदी गुरु जो तू श्री दत्तात्रेया ॥२॥ 
खांद्या कावड पारधी वेष । अमोघ दर्शन राया ॥३॥ 
सहा चार अठरा वर्णितो तुजला । श्रमली वेदमाया ॥४॥ 
कुमरांकित मुनी कृष्ण सुधाकर । संतु लागे पाया ॥५॥
 =======++=

श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 11
आरती दत्तात्रेयाची 
चहुयुगी श्री दत्तात्रेया नमन तुला ॥धृ.॥
बद्रीकाश्रमी पुराण कथीसी, नित्य काशीचे स्नान करीसी। 
कोल्हापुरीची भिक्षा घेसी। पांचाळेश्वरी भोजन करीसी । 
देवदेवश्वरी झोपाया स्थान तुला ॥१॥ चहुयुगी ..  
गारगोटीची भात शिजवूनी, त्रीदेवासी बालक करुनी । 
अधीन केले माते लागुनी, रत्नजडीत पाळणा घालुनी । 
झोका देतसे अनुसया , जसा तुला ॥२॥ चहुयुगी ... 
। पाचशते अर्पनी वारूला , शांतविले त्वा रुषी रुचिकाला । 
वनसाळीचा भात शिजवला । भोजन केले वनदेवाला । 
ऋषीजन मेळा घेवुनिया पंगतीला ॥३॥ चहुयुगी ..  ।
देवल ऋषीने लिंग स्थापिले । वाढत वाढत नभी पोहचले। 
ब्रम्हादिकासी संकट पडले, चतुराक्षी त्वा खचुनी पाडीले ।
औट हात शीरी ठेऊनिया धरणीला ॥४॥ चहुयुगी .. । 
आकाश पंथी नाथ झोळी खाली पाडीली त्वा वनमाळी । 
गोरक्षाचा मध प्रक्षाळी , धन्य धन्य बा ती मंत्रावळी । 
किती गाऊ तव गुण सखया बहुमोला ॥५॥ चहुयुगी .. 
परशुरामा कोरी भुमीका , दाखवुनी मग दहन रेणुका । 
त्रीताप हिन केले अर्ळका , वर शंकराचार्या निका 
। दिधला तक्त स्थापाया प्रेम तुला ॥६॥ चहुयुगी .. ।
ज्ञान देऊनी यदुभुपाला । पोहचविले त्या अढळ पदाला । 
ऐसा बाप्पा तू कनवाळा प्रेमदास म्हणे भाव भोळा । 
वंदन करीतो शुभ पाया प्रेम तुला ॥७॥ चहुयुगी ...
============
श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 12 
आरती श्री दत्तात्रेयाची 
श्री देव दयाकरी दत्त सगुण गुणवंत ।
ओवाळू श्री अवधुत मंगलमुर्ती॥धृ.॥
जडांतुल कृपा शक्ती माऊली । 
जीवाचे दुःखास्तव झळंबली । 
परात्पर वस्तू घेऊनी आली ।
॥चाल॥ त्रेतायुगात, ऋषी वंशात, 
प्रगट नटधारी त्या सैह्यांचळ स्विकरी । 
अनुसया उदरी, मानवा कृती अवतार, 
दिगबंर धारी जीव उध्दरी नानापरी क्रिडा करी व्यक्त ॥१॥
जटाजुट मुगुट शोभे शिरी, कमंडलु दंड घेऊनी करी, की चर्चुनी विभूती अंगावरी, 
॥चाल ।। पादुका पदी, दया हो निधी, देखुनी विधी, 
बहुत ठकठेला सुरसेना घेऊनी आला, वंदी चरणाला, 
आसनी दत्त पुजीला, गजर मांडीला तु न कळसी कवनाला, तारी निज भक्त ॥२॥
जळता निवविले अळका, स्थापिली मुळपिठी रेणुका, की ज्ञान दिधले यदुतिल्लका, 
॥चाल ॥ कार्तिका गजा, बंध पूर्वजा, देऊनी भुजा, 
अमळ मुळ कंदा ज्या चिंतींत मुनिजन सदा, 
विसरुनी धंदा करी लिळा नाना विधा, 
छेदी भवबंधा त्या देखुनी चिन्मयसदा, जडा जड सक्त ॥३॥
जयासी तुझी कृपा लाभली, तयाची संसृती चुकली, काळ विजाची वाट खुंटली, 
॥चाल । असा सोयरा, नाही दुसरा धन्य तू खरा,
 सकळ सुखदानी तू माय बाप निर्वाणी, स्मरा नित्यानी, 
राघवा वर देऊनी, लावी तू भजनी 
दे शरणांगत निर्वाणी, प्रेमपद तक्त ॥४॥
मिरविला गलफ हरित जरीचा, मर्दिला गंध केशराचा । जडित वर लोड जोड विभुचा । गायीला प्रभू मगंल वाचा । स्तविती तव दास बाल गोविंदर नाशी भवबंध, प्रेम मुळ कंद, अनुसया नंद देई मज कवितेचा धंदा । पुरविसी भक्त काम छंदा ॥४॥
===========
श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 13
आरती श्रीदत्तात्रेयाची ॥
ओवाळू आरती श्रीदत्तराया वंदन करुनी विनम्र पाया ॥धृ.॥
अत्री अनुसया कुशी जन्मनी । चहुयुगी हे चिरायु असोनी। 
सैह्याद्रि वरती क्रिडा करीती । अमोघ दर्शन देई जीवा या ॥१॥
पूर्णब्रम्ह पर मंगल मुर्ती । जटा जुट शिरी चर्तुभुज ती ।
कोमल कांती चर्चिली विभुती । अवधुत नट धरी जीवोध्दरा या ॥२॥
अनंत जीवाचे दुःख भवबंधन । छेदुन देतो सुख ऋषीनंदन । 
यतिमुनी ध्याती सुरगण स्तविती । ब्रम्ह हरी हर चैतन्य माया ॥३॥
आनंदघन प्रभू पूज्य जनासी । आदिकारण या परमार्गासी । 
दामोदरमुनी आरती ओवाळुनी । अभिवंदन करी कर जोडूनिया ॥४॥
====++++++=====
श्रीदत्तात्रेयप्रभू आरती क्र. 14
श्री दत्तात्रेयांची आरती ॥
जय श्री अत्रिकुमार तेरी जय हो । जय हो जय तेरी जय जय जय । 
हे सुखसागर करुणामय । जय श्री अत्रिकुमार तेरी जय हो ॥धृ.॥
जो चल आवे सो फल पावे । मिटे नरक का भय ॥१॥ प्रभुजी.... 
संकट हारक विज निवारक । दूर करो सब भय ॥२॥ प्रभुजी.. .. 
पाप मिटावो ताप हटावो । करा सदा निर्भय ॥३॥ प्रभुजी.. 
तनसे मनसे किये वचनसे । पाप करो सब क्षय ॥४॥ प्रभुजी.... 
दर्शन पावु महिमा गाऊ २। रहू भजनमे लय।॥५॥ प्रभुजी.. 
ग्यान शक्ती दो अनन्य भक्ती दो । मुक्ती मिले अक्षय ॥६॥ प्रभुजी.. 
सुरवर मुनीवर नारद तुंबर ।। संत कहे जय जय ॥७॥ प्रभुजी.. ..
============
श्रीदत्तात्रेय प्रभू आरती क्र. 15
आरती माध्यान्हकाळ 
माध्यान्ह काळ झाला श्री दत्त दिगंबर आला ॥धृ०।। 
सह्यगिरीवर माय बसायो। श्रीदत्तात्रेय प्रभूनाम धरायो। 
आंगपर कपडे भरजरया। गले मोतियनकी माला॥१॥
 सासार्जुन रूंड कल्हावे। दत्तात्रेय  प्रभू धरणी धरावे। 
आगर चंदन और धूप चढावे । लेत भूजकर आला देवा ॥२॥ 
शाकमर्ण ऋषि को दीयो । यदुराजको ज्ञान बतायो ।
आरलक के त्रैताप मिटायो। मुक्त कियो तत्काल देवा ॥३॥ 
सुरनर मुनिजन तुझे धियावे । जो वांछित सोवो फल पावे । 
हरीहर ब्रह्मा पूजन आये । इच्छित फळ सो त्याला देवा ॥४॥ 
दासन दास तेरा यश गाये । दासार्जुन मुनीरंक कल्हायो । 
चीतचंपके फुल चढायो। चरण पुजुं त्रैकाल ॥ देवा ॥५॥



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post