आबासाहेब बाबासाहेब स्थान महिमा
शिळोना खांडीवरून
आबासाहेब बाबासाहेब नावाचे स्थान, मंदिर ४-५ कि.मी. अंतरावर आहे. हे अंबाळीच्या पूर्वेस आहे. आबासाहेब
स्थानाजवळच बेलदरी नावाचे खेडेगाव आहे. तिथून आबासाहेब एक-दीड कि.मी. अंतरावर आहे.
एका बाजूने मुख्य रस्त्यावर सुकळी नावाचे गाव आहे. पुढे बाळबोथा वगैरे
छोट्यामोठ्या वस्त्या लागतात. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हे
तीर्थस्थान पंथीयांच्या माहितीत जवळजवळ नसल्यासारखेच आहे.
मंदिराची
जागा ही फार पुरातन आहे. कधीपासून आहे याची निश्चित माहिती नाही ; परंतु ती पुरातन आहे, ही गोष्ट सत्य आहे. मौखिक परंपरेने या स्थानाची, मंदिराची माहिती सांगण्यात येते.
नवरात्रात आमच्या श्रीमोठेबाबांना
(सर्वविद, आचार्यप्रवर
प.पू.प.म. श्री.मोठेबाबा अंकुळनेरकर, संस्थापक, संचालक श्रीदेवदत्त आश्रम, जाधववाडी, पुणे. हल्ली म
काम ब्राह्मणी, ता. उमरेड, जि. नागपूर) यांना त्यांच्या गुरुजींनी (कै.प.पू.प.म. श्री.
ऋषिराजबाबा उपाख्य म. श्री. मुरारीमल्लबाबा पंजाबी उपाख्य कवीश्वर कुलाचार्य
प.पू.प.म.श्री. दर्यापूरकरबाबा महानुभाव) तिथे स्मरणासाठी पाठविले होते. सोबत
प.पू.श्री.मराठेबाबा महानुभाव होते. अंबाळीला आल्यावर आमच्या श्रीमोठेबाबांना कळले
की,
इथे खाली सेनदरा नावाचे गाव आहे. सेनद दराचे सेनदरा झाले.
म्हणजे सेनद नावाचे गाव दऱ्यात आहे. त्या सेनद दऱ्याजवळ आबासाहेब बाबासाहेब नावाचे
स्थानमंदिर आहे.
दुर्गम
भाग असल्याने बहुधा लोक तिथे जाण्यासाठी कंटाळा करतात पूर्वीच्या काळात तिथे फारच
झाडी असल्याने जंगली श्वापदांच्या भयासोबत रस्ता चुकण्याची शक्यताही अधिक असायची.
पुढील हकिकत आमचे श्रीगुरुवर्य मोठेबाबांच्याच शब्दांत -
‘‘त्यानंतर दोनचार वेळेस अंबाळीस जाण्याचे प्रसंग आले. परंतु
आबासाहेब बाबासाहेब इथे जाणे आम्हाला जम ले नाही. एकदा आम्हाला सहज वाटले की, म्हणत आहेत तर जाऊ या तिथे. तसे वाटायचे कारण म्हणजे आमच्या
बाबांच्या सान्निध्यात चक्रपाणी नावाचे एक भिक्षुक होते. त्यांच्या देहाचे भाऊ
उद्धवराज नावाचे एक भिक्षुक होते. उंचगावचे
देशमुख होते. त्यांनी त्यांना झालेला दृष्टांत आम्हाला सांगितला. त्यामुळे आम्ही
म्हटल, मग तर जायलाच पाहिजे, पण जायचं कसं? कारण,
बाबांच्या सान्निध्यातून वेळ नसायचा. मग एकदा मला आठवण आली
की,
म.चक्रपाणीदादा (ओंकारव्यास बुवाजी) म्हणत होते, म्हणून निदान एकदा तरी जायला पाहिजेच पाहू त्या तर काय
प्रतीती आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर पाहिले तर चबुतरावजा ओटा
होता. परंतु त्याची अवस्था बिकट होती. तो कधीही ढासळेल, असे वाटत होते. चबुतऱ्यास, ओट्यास नेमके रूप, आकार नव्हता
फारी रचून ठेवल्यासारखा तो ओटा दिसायचा. त्यावर मांडून ठेवलेले विशेष, वंदनीय पाषाणही विस्कळीत अवस्थेत पडले होते. पड़ीक
अवस्थेतल्या या स्थानाच्या जीर्णोद्धारासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून सहज संकल्प केला आणि ते कार्य कला काय पाड पडले.
पुढे आपल्या मांगतिल्या भिक्षुकांनी ते अठरा दिवसांत उभे उभे केले.
जे काही केले ते
असे साधारणच होते. ते होते त्यानंतर तिथे आपले येणे-जाणे चालू झाले. दोन तीन वेळा आपला मार्गही (आश्रम)
चातुर्मासानिमित्त तिथे राहिला. त्यामुळे तिथे जाण्याचा वहिवाट पहून गेला पूर्वी
लोक जायचे; परंतु फार मोठ्या प्रमाणात
जात नव्हते. पळशी, बारा इत्यादी
दोन-चार गावांतील भाविक मंडळी तिथे नेहमी ये-जा करीत त्यांचे ते कुलदै कुलदैवतच
होते. म्हणून त्या मंदिराची या लोकांव्यतिरिक्त विशेष कोणालाच माहिती नव्हती.
संपूर्ण पंचास आत्तापर्यंत हे मंदिर माहीतही नव्हते.
सर्वांना
एकच वाटायचं की, इथे आहे काय? बारा खांडी आणि काही उपखाडी जशा मांडलिक आहेत, तसं हिलाही उपखांड समजा. परंतु, त्याला काही इतिहास आहे. यात काही शंका नाही. त्याशिवाय लोक
जात नव्हते. आम्हाला सर्वांत जास्त प्रामाणिक हे वाटले की, हे जुने आहे. निदान शंभर वर्षे तरी जुने असले पाहिजे.
कारण, पुसदला सारंगधर हिस्सा भरडे नावाचे एक भक्त होते. ते
बाळासाहेब बरडे यांचे वडील त्यांच्या देहाचे भाऊही होते. या बरडे भाऊंनी आम्हाला
सांगितले,
‘‘बाबा, आबासाहेब साहब
इथे मी सर्वात प्रथम आईच्या उदरात असताना गेलो होतो.’’
‘‘ते कसे काय?’’
‘‘आमच्या आईचे माहेर तिकडेच पाळी भागातील पहिले अपत्य म्हणून
बाळंतपणासाठी माहुरला नेले. मग जाताना आईला या मंदिरावर नेले. तिथे पाहल पुढे मग
आईच्या गावी माझा जन्म झाला. पण, मला हे नकी
आठवत आहे की, मला आईनेच सांगितले होते
की,
आम्ही आबासाहेब बाबासाहेबला गेलो, तेव्हा तू पोटात होतास. तेव्हा तिथे एक वैरागी साधू राहत
होते. फार कमी बोलायचे ते. ते फक्त भाकर खायचे आणि दिले तर दूध घ्यायचे. तेव्हा सासऱ्याने आणलेल्या भाकरी आणि योगायोगाने सोबत असणारे
दूधही त्यांना दिले. त्यांनी ते घेतले दूध घ्यायचे, सासुरवाशिणीला इतर माहिती काय असणार! आई वयाची शंभरी पार
करून काही वर्षे जगली त्यानिमित्त ने पुसदला सहस्रचंद्रदर्शन असा काहीतरी
कार्यक्रमही केला होता,
‘‘आता तुमचं वय काय आहे ?’’
‘‘आता मी निदान ७८ वर्षांचा तरी आहे’’
त्यांनी सांगितले या घटनेला आता ३५ वर्षे होऊन गेली. म्हणजे, शंभर वर्षांपासून हे मंदिर वहिवाटीखाली आहे. त्याही आधी
असेल,
पण तसा लिखित पुरावा काही आढळत नाही. म्हणून निदान शंभर
वर्षापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात आहे. त्याला हा पुरावा आहे. नव्हे, त्याही आधीपासून हे मंदिर अस्तित्वात होते, यासाठी थोडाफार पुरावा सापडला. मंदिराचे बांधकाम करण्यासाठी
परिसर स्वच्छता वगैरे केली. त्यात जुन्या काळातली सतराव्या शतकातली इंग्रजांच्या
राजवटीतली काही नाणी सापडली. पाच-सात पाव आणे सापडले, त्यावर पंचम जॉर्ज वगैरेंच्या प्रतिमा होत्या. आपण देवाला
जसे पैसे पाहतो, तसे त्या काळातही देवास
अशा प्रकारे पैसे वाहिले जायचे अशी ही पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. यात काही
शंका नाही. हा एक या मंदिराच्या प्राचीनत्वाचा पुरावा मानता येईल.
संशोधनाअंती निघालेला निष्कर्ष
आम्ही जुन्या लोकांना पुजारी लोकांना विचारायचो, ‘‘हे स्थान, मंदिर
कोणाच्या अखत्यारीत आहे?’’
मग त्यांनी सांगितले, ‘‘हे गगनमाळच्या पुजाऱ्याच्या अखत्यारीत आहे.’’
गगनमाळचे पुजारी हे जिंतुरकरांच्या (श्रीदेवदत्त आश्रमस्थ
एक भिक्षुक) नात्यातले आहेत.
मग गगनमाळच्या पुजाऱ्यांना विचारले,
‘‘तुम्ही कधी जाता तिथे?’’
‘‘आम्ही जातो वर्षातून एखाद्या वेळेस आमचे कुलदैवत आहे ते.’’ गगनाच्या पुजाऱ्यांनी सांगितले.
आम्ही त्यांना विचारले, ‘‘या मंदिराबद्दल स्थानाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ?’’
त्यांच्यातले एक
वयोवृद्ध पुजारी म्हणाले, ‘‘मला
माहिती नाही, पण मी तोंडोतोंडी ऐकले आहे
की,
हे स्थान, मंदिर मांडलिक
नसून संबंधित आहे. हे स्थान द्वारावतिकार महाराजांच्या श्रीचक्रपाणि महाराजांच्या
संबंधित आहे. फलटणहून देव निघाले. तिथून रिधोऱ्याला आले. रिधोऱ्याहून देव इथे आले.
इथून मग माहूरला गेले आणि माहूरहून द्वारकेला जाण्यासाठी निघाले, तेव्हा श्रीदत्तात्रेयदेव श्रीचक्रपाणी महाराजांना इथपर्यंत बोळवीत पोहोचवत आले.’’
ही माहिती लिखित स्वरूपात आढळत नाही. परंतु
मौखिक परंपरेने सांगण्यात येते. द्वारावतिकार महाराजांचे, श्रीचक्रपाणी महाराजांचे हे स्थान आहे, म्हणून त्यास आबासाहेब बाबासाहेब म्हणतात. आणि दोन्ही
अवतारांचा तिथे संबंध झाल्याने आबासाहेब म्हणजे श्रीदत्तात्रेयदेव आणि बाबासाहेब
श्रीचक्रपाणी महाराज होय. म्हणून या बंदिरास, स्थानास आबासाहेब बाबासाहेब म्हणतात. सातारा जिल्ह्यातील फलटण येथील
श्रीचक्रपाणी स्थानाला आबासाहेब बाबासाहेब म्हणतात म्हणून या स्थानालाही आबासाहेब
बाबासाहेब म्हणतात. अशी ही मौखिक परंपरेने सांगण्यात येणारी माहिती त्या वयोवृद्ध
पुजाऱ्यांनी सांगितली.
रिधोरा येथील अशाच प्रकारचे मंदिर
रिधोऱ्यालाही असेच स्थान आहे. तिथे भालेराव आडनावाची वतनदार
मंडळी आहे. ते चांगले भाविक उपदेशी आहेत. तिथेही अशीच दोन स्थाने असून, त्यांनाही आबासाहेब बाबासाहेब म्हणतात.
आम्ही
तिथे गेलो असता त्यांना म्हटले, ‘‘आम्हाला
स्थान दाखवायला या.’’ ते हमने आले.
पूजन-अर्चनाची काही सोय नव्हती म्हणून बॅटऱ्या घेतल्या. तिथपर्यंत आले. -
रात्रीच्या आठ वाजत आले होते. तिथे पोहोचलो तर किड्यांचा भरपूर सडा पडला होता. ते
चुकवत चुकवत आम्ही तिथले दोन्ही ओटे वंदन केले. तिथे ओट्यांवर विशेष मांडलेले आहेत
पुन्हा भालेरावांच्या घरी आलो जेवण तयार होते. जेवणानंतर झोपण्यासाठी परभणीला
जेमेराबुवांकडे निघून आलो.
उपसंहार
आपली जुनी स्थाने, मंदिरे आहेत. त्यांचे रक्षण, संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. म्हणून हे प्रयत्न केले. परंपरागत
बापजाद्यांच्या संपत्तीवरील हक्कासाठी प्रसंगी आपण भांडतोच ना! मग हे तर
आध्यात्मिक, धार्मिक कार्य आहे.
त्यासाठी विशेष प्रयत्न केलेच पाहिजेत. आणि हे मंदिर नवीन निर्माण झालेले नाही.
मुळातूनच आहेत. त्याची काळजी घेतलीच पाहिजे, संवर्धन केले पाहिजे, या भावनेतून
प्रयत्न करून मंदिराचा जीर्णोद्धार केला. आता महानुभावपंथात बऱ्याच लोकांना या
मंदिराची,
स्थानाची माहिती झालेली आहे. तिसऱ्या अवताराच्या, श्रीचक्रपाणी महाराजांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रमही इथे
साजरा केला जातो. भाविक भक्तांची वर्दळ सातत्याने या ठिकाणी असते. सांसारिक
अडीअडचणींच्या निवारणार्थ अनुष्ठानासाठी म्हणून गृहस्थाश्रमाची भाविक भक्त मंडळी
इथे ठाण मांडून, धरणे २ धरून वास्तव्यास
असतात. तसेच अनेक साधुसंतदेखील निवांत, एकांत स्थळ म्हणून स्मरणासाठी इथे वास्तव्याला न येतात.’’
ईशाधिष्ठीत महाराष्ट्र अधिकरण, परावर जाणते, प्रज्ञासूर्य, ज्ञानार्णव सर्वविद् आचार्य श्रीमोठेबाबा अंकुळनेरकर
श्रीदेवदत्त आश्रम (जाधववाडी, पुणे)