दुःख मे स्मरण सभी करे सुख में करे न कोय
छंद :- शिखरिणी
सदा ध्याती मा ते ह्रदय कमळी जे स्थीर मनी ।
तया देहांती मी अमित सुख देतो हरी म्हणे ।।
म्हणुनी पार्था तू निशिदिनी करी ध्यान भजन ।
मिळोनी मद्रूपी मग चुकवीशी जन्म मरण ।।
जे साधनवंत सदा म्हणजे नेहमी, माते म्हणजे माझे जे स्थीर मन करून आपल्या हृदयात ध्यान करतात. त्यांना मी देहांती म्हणजे मरण समयी अमित सुख देतो असे हरी म्हणजे श्री कृष्ण भगवंत म्हणतात. म्हणून हे पार्थ म्हणजे अर्जुनाला तो निषेध देणे म्हणजे रात्रंदिवस माझे ध्यान करीत भजन कर. माझ्या स्मरणात मुळे तू मला येऊन मिळशिल आणि मदृप होशील म्हणजे माझ्यासारखा होशील त्यामुळे तुझी जन्ममरणाच्या चक्रापासून सुटका होईल.
===========
दुःख मे सुमरण सब करे । सुख मे करे ना कोई ।।
जो सुख मे सुमरण करे। तो दुःख काहे को होय ।।
प्रत्येक जीवाला असेच वाटते की जीवनात कधीही दुःख नको, सुख मिळवणे हा माझा जन्म सिध्द अधिकार आहे. समजून जगातला प्रत्येक जण सुख मिळविण्याचा मागे लागलो. असे चित्र आपण रोज पाहतो. आपण सुध्दा त्याचा एक घटक असतो. सुख नको दुःख हवे. असे म्हणणारी व्यक्ति आज शोधून ही सापडायची नाही.
सुख मागून मिळत नसतं दुःख मागून मिळत नसतं दुःखा मध्ये सुख मागायचे असते. आनंद आणि सुख यात खुप फरक आहे. ज्या सुखामध्ये दुःखाची मिश्रता आहे त्याला सुख म्हणतात. त्याला दुःखाची ओळखच नाही देवाचा विसर पडू नये आहे. सुख देवासी मागावे कारण ते दुसरा कोणी देऊ शकत नाही. मनापासून वाटते की आयुष्यात दुःखाचे क्षण नसावेत सुखी जीवन हे केवळ पुण्याईचे फळ असते. याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. जीवनामध्ये दुःख असल्याशिवाय सुखाची चव तर वाढेलच पण सुखाचे खरे मुल्य कळेल असे मला वाटते. इतरांना दुःख देण्यापेक्षा स्वतःला दुःख घेतल पाहिजे. म्हणून त्याला माणूसकी म्हणतात. काही माणसाला काही गोष्टी अपेक्षीत असतात. की जीवनामध्ये दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी असल्या तर माणसं सहज जगू शकतात.
तुम्हाला काय कळणार आमचं दुःख. सुखाचा मेकअप करून सुखी होण्याचा मार्ग सापडला असता तर काय हवं असतं.
एक वाटसरू रस्त्याने जात असता त्यांच्या विरूध्द दिशेने एक सज्जन माणूस येत होता, त्या सज्जन माणसाने वाटसरूला थांबविले व उपदेश केला. “बाबा रे तू ज्या वाटेने चालला आहेस ती वाट वाटते तीतकी सरळ नाही काही ठिकाणी खोल खड्डे आहेत व जरा बेसावधपणा केलास तर खड्यात पडून जबर दुःखापत होण्याचा संभव आहे.” “मी तुम्हाला विचारले होते का ! मग तुम्हाला हा उपदेश करण्याचा चोंबडेपणा करायला कोणी सांगितले?”
वाटसरू च्या अशा उद्धट बोलण्याने तो सज्जन मनुष्य मुकाट्याने पुढे निघाला वाटसरू काही अंतरावर गेल्यावर त्याच्या पायाला ठेच लागली व तो पडला शरीराला जबर दुःखापत झाली व मोडलेल्या पायातून भयंकर वेदना सुरू झाल्या त्याच क्षणी त्याला त्या सज्जन माणसाचे बोल आठवले व त्याचे मनात तात्काळ विचार आला अरे रे किती मी अविचारी आहे. तो सज्जन माणूस जीव तोडून माझ्याच हितासाठी मला उपदेश करीत होता मी माझे मूखाने त्याचा अपमान करून व त्याच्या उपदेशाकडे काना डोळा भरून हे भयंकर संकट स्वतःच्या हातानी स्वतःच्यावर ओढवून घेतले स्वतः चुका करीत करीत दुःख भोगीत भोगीत खड्यात पडून पाय मोडून घेत घेत मग त्या स्वानुभवातून शहाणपणा शिकणे हा एक प्रकार तर दुसऱ्यानी केलेल्या चुका लक्षात घेत घेत थोरांनी त्यांच्या स्वानुभवाच्या आधारावर केलेल्या ज्ञानाचे चिंतन मनन करीत गेली. उपदेश हे ज्ञानाचे प्रक्षेपण आहे. उपदेशच नको झाल्यावर ज्ञान कसे मिळणार ज्ञान मिळाले नाही तर अज्ञानी लोकांना वळण कसे लागणार वळण नाही तर समाजाची बिघडलेली घडी किंवा रूळावर कशी येणार !
एखादा मनुष्य जर चुकीच्या रस्त्याने जात असेल तर त्यामुळे त्याला किती कष्ट खर्च व वेळ यांचे मोल द्यावे लागले. याची कल्पनाच करणे बरे ! पण अशा वेळी जर एखादा सज्जन मार्ग दर्शक भेटला. व त्याने त्याला योग्य रस्ता दाखवून व्यवस्थित रितीने त्या रस्त्याने जाण्याचा उपदेश केला व त्या उपदेशा प्रमाणे तो प्रवासी वागला तर त्यांचे त्यांत ऐवढे कल्याण आहे. साधा रस्ता चुकला तर ही गत तर जीवनाचाच रस्ता चुकला असं माझ्या मनाला वाटत. जीवनाच्या प्रवासातली वाट चुकलेले वाट सुरूच आहेत. सुख पहाता जवापाडे । दुःख पर्वता एवढें ।।
म्हणून मला असं म्हणाव वाटंत म्हणूनच याच दुःख सुख सहन करता आल पाहिजे. इतरांना त्रास दिल्याने त्यांना जे दुःख प्राप्त होते. सुखी जीवनाचा लाभ होण्यासाठी माणसाला पुण्य संपादन करण्याचे व खर्ची पडलेली पुण्याई पुन्हा भरून काढण्याचे काही सुलभ मार्ग उपलब्ध आहेत का! असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याला उत्तर निश्चित आहे हे होय त्यासाठी तीन सुलभ मार्ग उपलब्ध आहेत. त्याचा आपण आता थोडक्यात विचार करू हा मार्ग म्हणजे आपण इतरांना सुखाने जगू देणे हा होय हीच गोष्ट मला समजली, जागेपणी शंभर वर्षे जगण्या पेक्षा क्षणिक स्वप्न किती मोलाचे असते. हे अनुभवायला भाग्य लागते जागेपणी जे जमले नाही ते स्वप्नात साकारले श्रीगुरुवर्यांच्या रूपाने परीस मिळाला,
स्मरणाचे महत्व श्रीगुरुंनी समजावून सांगितले पण तरीही स्मरणात बसल्यावर मनी मागे मनी देव माझा धनी या उक्तीप्रमाणे हातातली माळ फिरत राहते तोंडात नाम फिरत राहते आणि मन मात्र तीसगाव चाळीसगाव भटकते
अनंत हस्ते कमलावरने । देता किती घेशील दो कराने ।।
देव आनंद हातांनी देतात ते जीव दोन हातांनी काय काय घेईल?
परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला अनंत जन्म दिले तुम्ही मला फक्त आपला एक जन्म देऊन बघा त्याला अपेक्षा आहे. भाव भोळ्या भक्तीची अढळ श्रध्देची असली पाहिजे.
श्रीगुरूचे म्हणजे बाबाचे आमच्यावर फार फार उपकार आहेत. त्याची उतराई खरोखरच या जीवनात होऊ शकत नाही.
स्मरण करताना परमेश्वरावर ची श्रद्धा आणि विश्वास कसा असावा याविषयी एक एक जुनी गोष्ट सांगितली जाते.
एका गावामध्ये एक महात्माजी आपल्या शिष्यांसह आश्रमात राहत होते. ते जन्मल्यापासून आंधळे होते.
त्यांच्या नेहमीच्या नित्यक्रमात दोन कार्ये आवर्जून केली जात असत, एक तर आपल्या शिष्यांना आणि आश्रमात आलेल्या भक्तांना नियमितपणे धार्मिक प्रवचन देत असत.
दुसरे कार्य म्हणजे ते संध्याकाळच्या वेळेला नियमितपणे एकटेच टेकडीवर फिरायला जात असत.
त्यांच्या अनेक शिष्यांपैकी एक शिष्य त्यांच्या या गोष्टीने खूप अस्वस्थ व्हायचा, जोपर्यंत महात्माजी डोंगरावरून परत येत नाहीत तोपर्यंत तो काळजीत असायचा.
एके दिवशी त्याने गुरुजींना म्हटले की तुम्ही नेहमी एकटेच टेकड्यांवर का फिरायला जाता? त्या डोंगराच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे, सतत पाणीही वाहत असते, त्यामुळे घसरण तयार झालेली आहे तुम्हाला पडण्याची भीती वाटत नाही का?”
शिष्याच्या या प्रश्नावर महात्माजींनी काहीच उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी महात्मा जी संध्याकाळी डोंगरावर फिरायला निघाले. त्यांनी आपल्या त्या जिज्ञासू शिष्याला बोलावून सोबत येण्यास सांगितले. आणि
त्या शिष्याला म्हटले की, तू माझ्याबरोबर टेकडी चढत राहा आणि खोल खड्डा आला की मला सांग.
चालता चालता खोल खड्डा आल्यानंतर, शिष्याने महात्माजींना सांगितले की, समोर एक खंदक आहे” यावर गुरु म्हणाले की, तू मला या खड्ड्यात जोरात ढकलून दे”
हे ऐकल्यावर शिष्य संभ्रमात पडला आणि म्हणाला की, “ आपल्याला या खड्ड्यात ढकलणे माझ्याकडून कदापि शक्य नाही, मी हे करू शकत नाही.”
महात्माजी म्हणाले की, “तू माझ्या बोलण्याची अवज्ञा करीत आहेस माझा शब्द टाळल्याने तुझे पुण्य नष्ट होऊन तुम्हाला नरकात जावे लागेल...”
शिष्य म्हणाला, “मला घोर नरकात जावे लागले तरी काही हरकत नाही आपण माझे गुरुवर्य आहात त्यामुळे मी आपल्याला या खड्ड्यात ढकलू शकत नाही. आणि तुम्ही माझ्यासोबत असताना मी कधीच नरकात जाणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे.”
यावर गुरुजी प्रसन्न झाले आणि म्हणाले की, तू मला सर्व काही माहीत असूनही दरीत ढकलू शकत नाही, तसाच माझा देवही मला दरीत पडू देत नाही, जेव्हा मी फिरायला निघतो तेव्हा माझा देव श्रीकृष्ण भगवंत माझे रक्षण करतो.
असेच पूर्ण समर्पण आपले देवाविषयी असेल तर तो देव पदोपदी आपल्याला साहाय्य करून संकटांपासून आपले रक्षण करतो परंतु आपले मन सांसारिक धर्मांमध्ये गुंतलेले असते म्हणून आपण देवाची मनापासून प्रार्थना करत नाही जर आपण मनापासून देवाची प्रार्थना केली तर आपल्यालाही निश्चित सहाय्य होईल.
आयुष्यात पदोपदी फक्त देवालाच पाठवा देवालाच शरण जा.
=========