बोधकथा - सकारात्मक विचार, चिंतांवर प्रहार
motivational
आजकाल आपण आपल्या अवती-भवती निरीक्षण केले
तर दहामधून पाच लोक संसाराच्या, भविष्याच्या काळजीने ग्रासलेले असतात. चांगल्या सुविधांनी
संपन्न आयुष्य असुनही भविष्याच्या चिंता मरून
वर्तमानात जगण्याचे विसरून जातात. कसं होईल? काय होईल? हे विचार त्यांना निराशेच्या
गर्तेत नेऊन सोडतात. असे लोक इतरांशी प्रेमाने बोलण्याचे देखिल विसरून जातात. यातून
बाहेर कसे पडावे?
एक व्यक्ती बऱ्याच काळापासून तणावाने ग्रस्त होती, ज्यामुळे तो खूप
चिडचिड करायचा आणि रागावलेला असायचा. कोणाशीच त्याचा व्यवस्थीत संवाद होत नव्हता. त्याच्या मनात सतत हेच
विचार चालत असत की, घरचा सगळा खर्च मलाच उचलावा
लागेल, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे, घरात सतत कोणीतरी
नातेवाईक रोज भेटायला येतच असतो, रोजचा खूप खर्च करावा लागतो’, वगैरे वगैरे काळजी त्याला सतावत होती.
याच
गोष्टींचा विचार करून तो बर्याचदा अस्वस्थ व्हायचा, अनेकदा
आपल्या मुलांना रागवायचा, शिव्यादेखिल द्यायचा आणि काही ना
काही कारणाने तो त्याच्या बायकोशी भांडायचा. असेच दिवसामागून
दिवस जात होते. घरातले वातावरण एकदम बिघडलेले होते. मुलांवर त्याचा नकारात्मक परिणाम
होत होता.
एके दिवशी त्याचा लहान मुलगा त्याच्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘बाबा कृपया
माझ्या शाळेचा गृहपाठ करण्यासाठी मला मदत करा.’’ तो माणूस आधीच तणावाखाली होता, म्हणून त्याने मुलाला
जोरदार बरसला, रागावला, शिवीगाळ केली. छोटा मुलगा खुप
घाबरला. रडत निघून गेला. थोड्या वेळाने त्या मनुष्याचा राग शांत झाला, व मुलावर रागावल्याचा पश्चाताप झाला. तो लगेच मुलाकडे गेला, त्याने
पाहिले की, मुलगा रडत रडत गाढ झोपी
गेला होता आणि त्याच्या हातात त्याच्या गृहपाठाची एक वही होती.
बापाने वही घेऊन खाली ठेवण्याचा प्रयत्न करताच त्याची नजर गृहपाठाच्या शीर्षकावर
पडली. गृहपाठाचे शीर्षक होते. ‘आम्हाला
सुरुवातीला न आवडणाऱ्या गोष्टी पण नंतर चांगल्या असतात.’ या शीर्षकावर मुलाने लिहिलेला परिच्छेद लिहिला होता.
उत्सुकतेपोटी त्याने मुलाचे लिखाण वाचायला सुरुवात केली. मुलाने लिहिले होते...
‘‘मी
माझ्या अंतिम परीक्षेचे खूप आभार मानतो कारण सुरुवातीला वार्षिक परिक्षा अजिबात चांगली वाटायची नाही नाही. पण त्यानंतर शाळेला सुट्ट्या पडतात. म्हणून मला ती परिक्षा छान वाटते.’’
‘‘आणि मी वाईट चवीच्या कडू औषधांचे खूप आभार मानतो कारण सुरुवातीला
ते कडू असते पण नंतर ते मला आजारातून
बरे करते.’’
‘‘मी त्या सकाळच्या अलार्म
घड्याळाचा खूप आभारी आहे जे मला दररोज सकाळी सांगते की, ‘मी जिवंत आहे.’’ आणि मी देवाचे
सुद्धा खूप आभार मानतो ज्याने मला असा चांगला बाप / पिता
दिला. कारण पप्पाच्या रागावण्याचे मला सुरवातीला
खूप वाईट वाटायचे पण आता ते मला खेळणी
आणतात, फिरायला नेतात आणि मला चांगल्या
चांगल्या गोष्टी खायला देतात, चॉकलेट घेऊन येतात. आणि मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट आणखी सांगतो की, मला खुप आनंद आहे की माझ्यावर वडलांचे छत्र आहे. देवाचे खुप आभार, कारण माझा मित्र राजू त्याचे वडील या जागत नाहीत.’’
आपल्या सानुल्याचा गृहपाठ
वाचल्यानंतर, तो मनुष्य जणुकाही अचानक झोपेतून जागृत झाला.
डोळे भरून आले. त्या दिवसापासून त्याची विचारसरणी बदलली. मुलाने लिहिलेले शब्द
त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घोळत होते. विशेषतः ती शेवटच्या
ओळीने. त्याची झोप उडवली
होती. मग तो आपल्या रूममध्ये येऊन थोडा वेळ बसून आपल्या चिंताबद्दल विचार करू लागला. त्याने स्वतःलाच प्रश्न
विचारायला सुरूवात केली?
मित्रांनो हे प्रश्न तुम्ही सुद्धा स्वतःला विचारू शकता,
‘मला घराचा सर्व खर्च उचलावा लागतो, म्हणजे देवाच्या कृपेने माझ्याकडे घर तरी आहे आणि ज्या बिचाऱ्यांकडे घर नाही त्यांच्यापेक्षा मी चांगल्या स्थितीत आहे. मग मी का एवढी काळजी करतोय?’
‘मला संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलायची आहे, याचाच अर्थ देवाच्या कृपेने, मला एक कुटुंब आहे, पत्नी आहे, एक छानसे गोंडस मूल आहे आणि ज्यांना कुटुंब नाही आणि जे जगात पूर्णपणे एकटे आहेत त्यांच्यापेक्षा मी अधिक भाग्यवान नाहीं का?’’
‘‘माझ्या घरी कोणीतरी मित्र किंवा नातेवाईक येत राहतात, याचा अर्थ माझा काहीतरी सामाजिक दर्जा आहे आणि माझ्याकडे सुख-दु:खात मला साथ देणारे लोक आहेत. कित्येक असे श्रीमंत आहेत की, त्यांच्याकडे कुत्रंही फिरकत नाही. पैसा असून माणसं जोडली नाहीत. मग मी त्यांच्यापेक्षा भाग्यवान नाही का?’’
‘‘मी खूप खर्च करतो,
घरातील सुखसुविधांवर बराच पैसा जातो, याचा अर्थ माझ्याकडे चांगली नोकरी
आहे, आणि जे लोक
बेरोजगार आहेत किंवा गरीब आहेत ते पैशांच्या अभावामुळे अनेक आरामदायक गोष्टी आणि सुख सुविधांपासून वंचित आहेत मग त्यांच्यापेक्षा मी भाग्यवान
नाही का?’’
‘अरे
रे मी इतके दिवस निष्कारण सर्वांवर रागावलो, चिडलो, सर्वांना माझ्यामुळे किती
त्रास झाला, देवा! भगवंता! तुमचे खूप खूप
धन्यवाद मला माफ करा, मी तुमची कृपा ओळखू शकलो नाही.’
यानंतर त्याची विचारसरणी अचानक बदलली, व त्याचे
सर्व त्रास, त्याच्या सर्व चिंता लवकरात लवकर संपल्या. तो
अचानक बदलला. नंतर तो धावतच आपल्या
मुलाकडे गेला आणि झोपलेल्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले,
त्याचा गोड पापा घेतला. आणि आपल्या मुलाचे आभार मानले.
या घटनेचे तात्पर्य
असे की, मित्रांनो…. आपण असाच सकारात्मक विचार केला तर आपली विचारसरणी लगेच बदलेल, आपल्या सर्व चिंता,
सर्व त्रास, सर्व ताणतणाव लगेच दूर होतील आणि आपल्याला अडचणीतून बाहेर पडण्याचे नवीन
नवीन मार्ग दिसू लागतील. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करावा.
आजच्या युगात माणूस नेहमीच विविध चिंतांनी ग्रासलेला असतो. काहींना पैशाची तर काहींना कुटुंबाची चिंता आहे. काहींना प्रेमप्रकरणांमुळे तर काहींना अभ्यासाची चिंता असते. याचा अर्थ असा आहे की प्रत्येकजण आपल्या चिंता दूर करण्यात व्यस्त आहे, कोणत्या ना कोणत्या चिंतेमुळे आपले सुख समाधान विसरत आहे. आणि मोबाईल टीव्ही यासारख्या मनोरंजन करणाऱ्या साधनांच्या आहारी जाऊन सुख शोधत आहे पण यातून सुख कधीच मिळणार नाही, त्यामुळे नशिबात लिहिलेले दुःख कमी होणार नाही. आणि आपण नशिबाला दोष देत राहू नेहमीच.
परंतु जो मनुष्य चिंतेचे परिणाम आणि परिमाण
विसरून सर्वस्व देवावर सोडतो, तो सुखी राहतो. चिंता,
सुख आणि दु:ख या सर्व ईश्वराच्या माध्यमातून मानवाच्या परीक्षा
आहेत. देव जे काही करतो ते माणसाच्या भल्यासाठी करतो, असा
विचार करणारेच सुखी होऊ शकतात. म्हणून तुमची चिंता देवाला समर्पित करा आणि
जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. 84 कोटी योनींमध्ये
जन्म घेतल्यावर कुठेतरी मानवी जीवन आहे, त्यासाठी सदैव
देवाचे आभार माना.
आजच्या युगात माणूस नेहमीच विविध चिंतांनी
ग्रासलेला असतो. काहींना पैशाची तर काहींना कुटुंबाची चिंता आहे. काहींना प्रेमप्रकरणांमुळे तर काहींना अभ्यासाची चिंता असते. याचा अर्थ
असा आहे की प्रत्येकजण आपल्या चिंता दूर करण्यात व्यस्त आहे, कोणत्या ना कोणत्या चिंतेमुळे आपले सुख समाधान विसरत
आहे. आणि मोबाईल टीव्ही यासारख्या मनोरंजन करणाऱ्या साधनांच्या आहारी जाऊन सुख
शोधत आहे पण यातून सुख कधीच मिळणार नाही,
त्यामुळे नशिबात लिहिलेले दुःख कमी होणार नाही. आणि आपण नशिबाला दोष देत राहू नेहमीच.
परंतु जो मनुष्य चिंतेचे परिणाम आणि परिमाण
विसरून सर्वस्व देवावर सोडतो, तो सुखी राहतो. चिंता,
सुख आणि दु:ख या सर्व ईश्वराच्या माध्यमातून मानवाच्या परीक्षा
आहेत. देव जे काही करतो ते माणसाच्या भल्यासाठी करतो, असा
विचार करणारेच सुखी होऊ शकतात. म्हणून तुमची चिंता देवाला समर्पित करा आणि
जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. 84 कोटी योनींमध्ये
जन्म घेतल्यावर कुठेतरी मानवी जीवन आहे, त्यासाठी सदैव
देवाचे आभार माना.