संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit
अर्थ :- शीतोष्णादि. अनुकूलप्रतिकूलतादि
द्वंद्वं सहन करा
निरर्थक, निष्प्रयोजन, व्यर्थ, निरुद्देश बडबड करू नका..
बोलू नका.. avoid
loose talking
चिंतन..
जीवनात अनेक प्रकारचे प्रसंग अनुभवायला मिळतात. पण साधकानं आपला
साधकधर्म. आपलं साधककर्तव्य सोडता कामा नये!
सुखमें फूलें नहीं दुखमें भूलें नहीं
प्राण जाएँ मगर धर्म भूले नहीं।
सुखदुःख, मानअपमान, गार गरम, योग्य अयोग्य, भरती ओहोटी इ. अनेक प्रकारची द्वंद्वं वाट्याला आली तरी साधकानं चुकूनही पथभ्रष्ट
होऊ नये,
मार्ग सोडू नये उलट घेतलेल्या मार्गावर सतत चालतच रहावं.. पुढे पुढे चालल्याशिवाय ईप्सित स्थळ गाठणार कसं?
विषह्यताम् नाम विशेषेण सह्यताम् सामान्य द्वंद्वांना सहन करायला सामान्य सहनशीलता पुरते. पण
साधनामार्गावर जसजसं पुढे जावं तसतसं अधिक कसोटी लागते. कठोर परीक्षा घेतली जाते. आयुष्यात
आता पर्यंत न अनुभवलेले अनेक सुखदुःखाचे, उत्साहवर्धक वा निराशाजनक प्रसंग उभे राहतात. अशा वेळी साधकानं
विशेष आत्मिक बळ वापरून. अप्रतिकारपूर्वक. विशेष सहनशीलता दाखवत सामोरं जाऊन त्यांच्या पार जायचं असतं!
अर्थात त्यासाठी स्वीकृत ध्येयावर अविचल, अव्यभिचारी निष्ठा लागते! ही द्वंद्वं सहन करत असताना आपल्या सुख - दुःखांची, आध्यात्मिक अनुभूतींची
सार्वजनिकरीत्या चर्चा करण्याचा मोह निर्माण होऊ शकतो! असा मोहच साधकाला खड्ड्यात घालू शकतो. नव्हे घालतोच घालतो! कारण अशा चर्चेतून एक तर साधकाकडे अनेकजण आकर्षित होऊन आपल्याला
प्रापंचिक दुःखातून सोडवण्यासाठी त्याचा वापर करून घेतात.
मानसन्मान, पदप्रतिष्ठा, फळ फळावळ, पैसा प्रसिद्धि इ. सर्व
काही साधकासमोर ओततात आणि त्यातून साधकाचा अहंकार फुलत जातो. साधना हळुहळु लयास जाते, स्वतः निष्प्रभ
होऊन लोकांसाठी निरुपयोगी ठरत शेवटी लयाला जातो. किंवा ज्यांचा या गोष्टींवर मुळीच विश्वास नाही त्यांच्याकडून
टिंगलटवाळी,निंदानालस्ती होते. आत्मविश्वास नाहीसा होतो. निराशाहताशा, निरुत्साह, हतोत्साह इत्यादींनी साधनामार्ग
अर्धवट सोडण्याकडे प्रवृत्ति वाढून आत्मघाताची वेळ येते.
म्हणून आचार्य सांगतात साधकानं उगीच इकडे तिकडे वाटेल तसं बोलू
नये! निरर्थक,
निष्प्रयोजन बडबड करू नये. शब्द नेमकेपणानं वापरावेत. मला असं
म्हणायचं नव्हतं अशाप्रकारची सारवासारव करण्याची वा पश्चात्तापाची वेळ आपल्यावर येणार
नाही इतकं जपून विचारपूर्वक बोलावं. मनातले विचार भावना
अनुभव नेमक्या नीटस अचूक शब्दयोजनेतूनच प्रकट होतील इतकी सावधगिरी दक्षता बाळगली गेली
पाहिजे! अनावश्यक,
अस्थानी,
अयोग्यवेळी, अयोग्य व्यक्तिसमाजापुढे
बोलण्यानं शक्तिक्षय होतो. साधना व्यर्थ ठरते. कालापव्यय होतो व पुनश्च ‘श्रीकृष्ण शरणं मम’ म्हणत पहिल्या पासून साधनेला सुरवात करावी लागते! शास्त्रीय
संगीतातले चांगले शिक्षक,
गुरु आपल्या शिष्यांना मोठ्यानं, उंच आवाजात आणि अनावश्यक बोलण्यापासून परावृत्त करतात. त्यांच्यावर
प्रतिबंध घालतात. कारण अशामुळे होणारा शक्तिक्षय टाळून शक्तिसंचय व्हावा उपलब्ध काळ
संगीताच्या चिंतनातच खर्च करता यावा व गळ्यातून सांगीतिक प्रतिभा जेव्हा जशी सौंदर्यस्थळं
दाखवण्यासाठी प्रकट व्हायला हवी त्यावेळी कोणताही अडसर उभा राहू नये!
हेच पथ्य अन्य सर्व कला क्रीडा कौशल्य यांच्याही साधनेसाठी आवश्यक
आहे. ते ज्यांनी अखेरपर्यंत प्राण पणाला लावून पाळलं ते कीर्तिशिखराच्या, यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झाले, स्थिरावले व ज्यांनी ते पथ्य मधेच सोडून दिले ते उपेक्षेच्या.
विस्मृतीच्या अंधारात असे व इतके गायब झाले की जगानं त्यांची दखलही घेतली नाही! कालचे चमकते तारे आज व आजचे चमकते तारे उद्या अवकाशातून निखळून
सहज जमीनीवर पडतात आणि नामशेष होतात. हा अनेकांच्या
बाबतीतला अनुभव आहे.
ज्या उद्देशानं पारमार्थिक साधना आरंभली असेल तिचं अंतिम टोक
गाठण्यासाठी तिसर्या चरणातील हा उत्तरार्ध अत्यंत अपरिहार्यतः व अनिवार्यतः आवश्यक
आहे.म्हणून आचार्य सांगतात. शीतोष्णादि विषह्यतां न तु
वृथा वाक्यं समुच्चार्यताम् ।
--------