संस्कृत सुभाषित रसग्रहण हिंदी मराठी अर्थ - Sunskrit Subhashit hindi marathi artha
पुराणमित्येव
न साधु सर्वं
न चापि
काव्यं नवमित्यवद्यम् ।
सन्तः
परीक्ष्यान्यतरद्भजन्ते
मूढः
परप्रत्ययनेयबुद्धिः ॥
हिंदी अर्थ :- जो कुछ पुराना
है वह पुराना होने से अच्छा और विशुद्ध है यह कहना सच में संपूर्ण योग्य नही है, और जो कुछ नया है वह नया होने से अच्छा, विशुद्ध और सुन्दर है यह कहना भी सच में
संपूर्ण योग्य नही है। इसलिये सज्जन तो नया और पुराने में ठीक से समीक्षा करके ही
उसमें जो एक अच्छा है उसका ही स्वीकार करते हैं। और वहीं मूढ बुद्धि का इन्सान तो
दूसरों की मान्यता है उसके अनुसार ही खुद के बुद्धि को चलाता है।....
मराठी अर्थ :- जे काही पुरातन आहे ते पुरातन असल्यामुळे
चांगले आणि विशुद्ध आहे असे म्हणणे संपूर्ण योग्य नाही, तसेच जे काही नवे आहे ते नविन असल्यामुळे
चांगले, विशुद्ध आणि सुंदर आहे
असे म्हणणे ही संपूर्ण योग्य नाही. त्यामुळे सज्जन तर नविन आणि पुरातन ह्यांची नीट
सांगड घालून त्यात जे चांगले आहे त्याचाच स्विकार करतांत. आणि मूढ बुद्धिचा
व्यक्ति दुसऱ्याच्या मान्यतेनुसार स्वतःची बुद्धि चालवित असतो.
बालसखित्वमकारणहास्यं स्त्रीषु विवादमसज्जनसेवा।
गर्दभयानमसंस्कृतवाणी षट्सु नरो लघुतामुपयाति॥
हिंदी अर्थ :- बालकों के साथ या बालक जैसी बालबुद्धि वालों
के साथ मित्रता, बिना कारण हँसते
रहना, स्त्रीयों के साथ
वादविवाद, दुर्जनों की सेवा-संगत, गधे पर बैठना और असंस्कारी खराब वाणी बोलना
इन छः बातों से इन्सान हलका (छोटा) बन जाता है।....
मराठी अर्थ :- बालकांसह किंवा बालकांसारख्या बालबुद्धि असलेल्यांसह मैत्री, विनाकारण सतत हसणे, स्त्रियांसोबत वादविवाद, दुर्जनांची सेवा-संगति, गाढवावर बसणे आणि असंस्कारी वाईट वाणी बोलणे ह्या सहा गोष्टींनी माणून हलका बनतो....
वयसि गते कः कामविकारः क्षीणे वित्ते कः परिवारः।
शुष्के नीरे कः कासारो ज्ञाते तत्त्वे कः संसारः॥
हिंदी अर्थ :- उमर ढल जाने के बाद कामविकार अच्छे नही लगते, धन क्षीण होने पर कुटुंब-परिवार अच्छा नही
लगता, जल क्षीण होने पर सरोवर
अच्छा नही लगता और तत्त्व जान लेने के बाद संसार भी असार लगने लगता है।....
मराठी अर्थ :- वय निघून गेल्यानंतर कामविकार चांगले वाटत
नाही, धन क्षीण झाल्यानंतर
कुटूंब परिवार चांगला वाटत नाही,
जल
क्षीण झाल्यानंतर सरोवर चांगले वाटत नाही आणि तत्त्व जाणून घेतल्यानंतर संसार असार
वाटू लागतो....
जवो हि सत्त्वे परमं विभूषणं
त्रपाङ्गनायाः कृशता तपस्विनः।
द्विजस्य विद्या नृपतेरपि क्षमा
पराक्रमः शस्त्रबलोपजीविनाम्॥
हिंदी अर्थ :- वेग यह घोडे का
सबसे बडा आभूषण है, लज्जा यह स्त्री
का परम आभूषण है, शरीर की कृशता
यह तपस्वी का, द्विज
(ब्राह्मण) का विद्या, क्षमा यह राजा
का, और पराक्रम यह शस्त्रबल
पर जीने वालों का श्रेष्ठ आभूषण है।....
मराठी अर्थ :- वेग हा घोड्यांचे सर्वात मोठे भूषण आहे, लज्जा हे स्त्रीचे परम भूषण आहे, शरीराची कृशता हे तपस्वीचे, द्विज (ब्राह्मण) ची विद्या, क्षमा हे राजाचे आणि पराक्रम हे शस्त्रबल
धारण करणाऱ्यांचे श्रेष्ठ आभूषण आहे....
धनेन किं यो न ददाति याचके
बलेन किं यश्च रिपुं न बाधते।
श्रुतेन किं यो न च धर्ममाचरेत्
किमात्मना यो न जितेद्रियो भवेत्॥
हिंदी अर्थ :- जो याचकों को कुछ भी नही देता है, ऐसे धन का क्या उपयोग? जो शत्रु को दबाता नही उसके बल का क्या
उपयोग? जो धर्मानुचरण करता नही
उसके शास्त्रज्ञान का क्या उपयोग?
और
जो जितेंद्रिय नही बन सकता उसके शरीर धारण करने का और आत्मबल का उपयोग ही क्या है?....
मराठी अर्थ :- जो याचकांना काहीही देत नाही अशा धनांचा
उपयोग काय? जो शत्रुंचे
निर्दालन करीत नाही त्याच्या बळाचा उपयोग काय? जो धर्मानुचरण करीत नाही त्याच्या शास्त्रज्ञानाचा काय
फायदा? आणि जो जितेंद्रिय बनू
शकत नाही त्याच्या शरीर धारण करण्याला आणि आत्मबलाचा काय उपयोग?....
श्रुतेन बुद्धिर्व्यसनेन मूर्खता
मदेन नारी सलिलेन निम्नगा ।
निशा शशाङ्केन धृतिः समाधिना
नयेन चालंक्रियते नरेन्द्रता ॥
हिंदी अर्थ :- शास्त्रज्ञान, पाण्डित्य अथवा विद्वत्ता से बुद्धि की शोभा बढती है, व्यसन और दुःख से मूर्खता सुंदर लगती है, यौवन-मद से नारी सुंदर लगती है, चाँद से रात्री की शोभा बढती है, संतोष अथवा समाधान से धैर्य अच्छा लगता है
और न्याय या इन्साफ से राजा या राज्य की शोभा बढती है।....
मराठी अर्थ :- आत्मज्ञान, पाण्डित्य किंवा विद्वत्तेने बुद्धिची शोभा वाढते, व्यसन आणि दुःखाने मूर्खता सुंदर वाटते, यौवन-मदाने नारी लोभस वाटते, चंद्राने रात्रीची शोभा वाढते, संतोष अथवा समाधानाने धैर्य चांगले वाटते
आणि न्याय किंवा माणूसकी ने राजाचे किंवा राज्याचे सौंदर्य वाढते....
प्रकीर्णकेशामनवेक्ष्यकारिणीं
सदा च भर्तुः प्रतिकूलभाषिणीम्।
परस्य वेश्माभिरतामपत्रपाम्
एवंविधां योषितमाशु वर्जयेत्॥ -
हिंदी अर्थ :- जो बिखरे हुए
अव्यवस्थित बाल वाली है, विचार किए बिना
कार्य करने वाली है, हमेशा पति के
विरुद्ध बोलने वाली है, दूसरों के घर
में आसक्ति रखती है और लज्जाहीन है ऐसे नारी का तुरन्त त्याग कर देना चाहिए।....
मराठी अर्थ :- जी विखुरलेले अव्यवस्थित केस असलेली आहे, विचार केल्याशिवाय कार्य करणारी आहे, नेहमी पतिच्या विरोधांत बोलणारी आहे, दुसऱ्यांच्या घरांत आसक्ति ठेवणारी आहे आणि
लज्जाहीन आहे अशा नारीचा लगेच त्याग केला पाहिजे....
सतीमपि ज्ञातिकुलैकसंश्रया
यतोऽन्यथा भर्तृमतीं विशङ्कते।
अतः समीपे परिणेतुरिष्यते
प्रियाप्रिया वा प्रमदा स्वबन्धुभिः॥
हिंदी अर्थ :- स्त्री अच्छे
चारित्र्यवाली- सती हो, ज्ञाती या कुल
के ही आश्रय से रहती हो लेकिन अगर वह शादीशुदा है लेकिन पती के पास नही रहती हो तो
लोग उसके लिये अलग कुशंका पैदा करते हैं। इसलिये वह स्त्री उसके पती को प्रिय हो
या ना हो फिर भी उसके कुटूंबीजनों ने उसको उसके पती के पास ही रखना चाहिए।....
मराठी अर्थ :- स्त्री चांगले चारित्र्य असलेली-सती असेल, ज्ञाती किंवा कुळाच्या आश्रयाने राहात असेल
परंतु जर ती विवाहीत आहे परंतु पति सोबत राहत नाही तर लोक तिच्या बद्दल
शंका-कुशंका निर्माण करतात. त्यामुळे ती स्त्री तिच्या पतिला प्रिय असो वा नसो
तरीही तिच्या कुटूंबीजनांनी तिला तिच्या पतिकडेच ठेवले पाहिजे....
मनीषिणः सन्ति न ते हितैषिणो
हितैषिणः सन्ति न ते मनीषिणः।
सुहृश्च विद्वानपि दुर्लभो नृणां
यदौषधं स्वादु हितं सुदुर्लभम्। -
हिंदी अर्थ :- जो बुद्धिमान है वह हितैषि नही होता और जो
हितैषि है वह बुद्धिमान नही होता । हितैषि है और बुद्धिमान भी है ऐसा इन्सान इस
दुनिया में मिलना दुर्लभ है और स्वादिष्ट एवम् हितकर दवा मिलना भी दुष्कर है।
मराठी अर्थ :- जो बुद्धिमान आहे तो हितैषि असत नाही, आणि जो हितैषि आहे तो बुद्धिमान असत नाही.
हितैषि आणि बुद्धिमान ही आहे अशी व्यक्ति ह्या जगांत मिळणे दुर्मिळ आहे आणि
स्वादिष्ट तसेच हितकर औषध मिळणे पण दुष्कर आहे....
परोऽवजानाति यदज्ञताजडः
तदुन्नतानां न निहन्ति धीरताम्।
समानवीर्यान्वयपौरुषेषु
करोत्यतिक्रान्तिमसौ तिरस्क्रियाः॥
हिंदी अर्थ :- अज्ञानता की वजह से जड ऐसा पराया इन्सान
उन्नतजनों का अपमान करता है उस से वह उनकी धीरता का नाश नही करता; परंतु जो इन्सान वीर्य-पराक्रम, वंश एवम् पुरुषार्थ इ. में खुद के समान है
वह अगर उन्नत जीवों का अपमान करता है,
तब
वह तिरस्कार उनके धीरता का नाश कर देती है और उनको कोपायमान बना देती है।....
मराठी अर्थ :- अज्ञानांमुळे जड व्यक्ति उन्नत लोकांचा
अपमान करते, त्यामुळे
त्यांच्या धीरतेचा नाश होत नाही,
परंतु
जो व्यक्ति वीर्य-पराक्रम, वंश तसेच
पुरुषार्थ इ. मध्ये समतोल आहे त्याने जर उन्नत व्यक्तिंचा अपमान केला तर तो
तिरस्कार त्यांच्या धीराचा नाश करतो आणि त्यांना क्रोधी बनवितो....