या १३ सवयी तुमचे आयुष्य बदलू शकतात !!
१) पुस्तके वाचणे. श्रीमद्भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचे रोज एक श्लोक तरी वाचलाच पाहिजे त्यामुळे मनाला असीम शांतीचा अनुभव मिळतो.
२) रोज नवीन नवीन गोष्टी शिकणे.
३) ऑनलाईन शिक्षण. मित्रांनो! युट्युब, टेलिग्राम, गुगल असे लाखो शैक्षणिक संकेतस्थळे इन्टरनेटवर उपलब्ध आहे. त्यातून शिकण्यासारखे बरेच आहे. एखादाच विषय असा असेल की, ज्यावर युट्यूवर व्हिडिओ उपलब्ध नाही. बाकी सर्व विषयांचे व्हिडिओ आहेत. ते आपल्याला शिक्षणासाठी खुप उपयोगी आहेत.
४) रोज सकाळी उठून योगा करा, ध्यान करा. व्यायाम करा. सकाळी सकाळी दीड-दोन किलोमिटर धावणे हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते. व्यायामाने शरीरासहीत मनही प्रसन्न होते.
५) निरर्थक टाइमपास करून, चित्रपट, व्हिडिओ पाहून वेळ वाया घालवू नका. जास्त कंटाळा आल्यावरच चित्रपट पहा.
६) दरमहा बचत करा. काटकसरीने पैश्याचे व्यवस्थापन करा.
७) प्रत्येक महिन्यात गुंतवणूक करा.
८) वायफळ अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे
९) आपल्या आरोग्याची काळजी घ्या. काही आजार आल्यास शक्यतो घरच्या घरी आयुर्वेदिक उपचारांवर भर द्या.
१०) आपले दैनिक वेळापत्रक तयार करा. वेळेचे व्यवस्थापन करा. क्षणही वाया जायला नको.
११) सोशल मीडियावर योग्य गोष्टींचे अनुसरण करा.
१२) अध्यात्मिक जीवनाला वेळ द्या.
१३) आपल्या कमाईतला दहा टक्के हिस्सा दान धर्मावर खर्च करा. गरिबांना मदत करा.