"वंदे श्रीचक्रधरम्"
[सामाजिक विचार!]
"उष्टावानपेक्षा निष्ठावान होणे, केंव्हाही उत्तम!
या संसारातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निष्ठावान माणूस मिळणे,फार महत्त्वाचे मानले जाते,कारण समाजात निष्ठावान माणूस मिळणे,फार दुर्मिळ होत चालले आहे,
अलिकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात! मग ते सामाजिक क्षेत्र असो की,राजकीय क्षेत्र असो!सामाजिक क्षेत्र असो! किंवा धार्मिक क्षेत्र असो!आदि सर्वच क्षेत्रात "निष्ठावान" माणसांचा फार तुटवडा निर्माण झालेला आहे.
एखाद्या व्यक्तीला जवळ केले, किंवा आसरा दिला,तर निष्ठेने राहील याची खात्री राहिलेली नाही.तो कधी निधीरूपी हात मारील,किंवा धोका देईल, विश्वासघात करेल,याचा विश्वास राहिलेला नाही.
जो निष्ठावान माणूस असतो, त्याचा समाजावर एक वेगळाच दरारा,वचक,सामर्थ्य असलेले पाहावयास मिळते.
निष्ठेचे एक वेगळेच बळ तथा उर्जाअसते.नैष्ठिक धार असते. "निष्ठा"माणसाची ताकद असते, निष्ठेत आपलेपणा,जिव्हाळा, प्रेम,इत्यादी सूक्ष्मभाव दडलेले असतात.
"उष्टावान"माणसाची सारखी धरसोड चाललेली असते, कोणत्याच क्षेत्रात टिकून राहिल याची खात्री राहिलेली नसते. तो प्रत्येक क्षेत्रात फिरत असतो,
मग ते राजकीय क्षेत्र असो की, सामाजिक क्षेत्र असो !
तो मर्कटचेष्टा करण्यात पटाईत असतो.तो कधी इकडे तर कधी तिकडे उड्या मारून उष्टावान करून टाकील हे सांगता येत नाही.
अलिकडच्या काळात धन लोभाने तथा पदप्रतिष्ठेने उष्टावानांची इकडेतिकडे उष्टावान करणाऱ्यांची संख्या फार वाढत चाललेली आहे. "उष्टावान"माणसाला समाज म्हणावी तितकी किंमत देत नसतो,तो पैशाच्या जोरावर किंमत प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो."उष्टावान"माणूस स्वार्थांत पुरेपूर बुडालेला असतो. वैचारिक निष्ठेची त्याची कधीच भेट झालेली नसते, त्याच्या ठिकाणी फार हाव वाढलेली असते,
“उष्टावान"माणसाच्या ठिकाणी "निष्ठा"नसते,तो दिलेला शब्द कधी फिरवील याचा भरवसा नसतो,पैशासाठी चमचेगीरी, लोचटगीरी,करण्यात फार चतूर तथा "उष्टावान" झालेला असतो, जिकडे पैसा दिसेल,तिकडे तो सतत झूकलेला असतो,म्हणून त्याला येणे अर्थी उष्टावान म्हटलेले आहे,म्हणून असे उष्टावान जीवन जगण्यापेक्षा निष्ठावान होऊन जीवन जगणे केंव्हाही उत्तम असते,शेवटी लोक निष्ठावानाचे नाव घेत असतात.धार्मिक सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या निष्ठावान असणे,अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशा पवित्र निष्ठेने माणासाचे मनोबल अतिशय सुदृढ असते,
व्यवहारीक क्षेत्रात"निष्ठावान" माणूस बहुतांशी प्रत्येकाला आवडत असतो,
तसेच धार्मिक क्षेत्रातून विचार केला,तर निष्ठावान माणूस देवाला देखील फार फार आवडत असतो, तसेच साधूसंतांना देखील आवडत असतो.कारण त्याची देवावर, धर्मशास्रावर,गुरूवर फार निष्ठा असते.म्हणून निष्ठावान माणसाचा ऊद्धार होतो. निष्ठावान राहाण्यासाठी अतिशय मुल्याधिष्ठीत जीवन जगावे लागते,निष्ठावान जीवन एक खडतर तपचर्या आहे.
"निष्ठावान"राहाण्यातच मानवाचे इहलौकिक,तथा पारलौकीक कल्याण आहे.
असो! दंडवत प्रणाम
*महंत श्रीजयराज शास्री!*
खुपच छान लेख आहेत दंडवत प्रणाम 🙏🏽🙏🏽
ReplyDelete