या ४ कारणांमुळे महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही.

या ४ कारणांमुळे महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही.

 या ४ कारणांमुळे महिलांना स्मशानभूमीत जाऊ दिले जात नाही. 


मित्रांनो! 

प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना अपार स्वातंत्र्य दिलेले आहे. या ग्रंथांमध्ये कुठेही असे लिहिलेले नाही की महिलांनी स्मशानभूमीत जाऊ नये किंवा स्त्रीयांनी मृत कुटुंबातील सदस्यांचा अंतिम संस्कार करू नये. परंतु काही विशिष्ट कारणांमुळे महिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत जाण्यापासून वर्ज्य केले जाते. जाणून घ्या कोणती आहेत ही खास कारणे.

(१) स्त्रियां मुळातच हळव्या मनाच्या असतात असे मानले जाते. स्त्रियांना कोणत्याही गोष्टीची सहज भीती वाटू शकते. अंत्यसंस्कार करताना, मृत शरीर कधीकधी कर्कश आवाज करत जळते, त्या भयानक आवाजामुळे महिला घाबरू शकतात. याशिवाय, मृत व्यक्तीची कवटी फुटण्याची क्रिया अतिशय भीतीदायक असते त्या मुळे महिला आणि लहान मुले अत्यंत भयभीत होऊ शकतात म्हणून त्यांना अंतिम संस्काराच्या वेळी स्मशानात येऊ दिले जात नाही.


 (२) स्मशानभूमीत मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करताना शोकाकुल वातावरण असते. त्या वेळी लोक रडतात सर्वत्र उदास आणि निराशा जनक वातावरण असते आणि ते अतिशय हृदयद्रावक दृश्य असते टज्याचा महिला आणि लहान मुलांच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यामुळे महिलांना भयपानासारखे भय लागण्याची शक्यता असते त्यामुळे महिला आणि लहान मुलांना स्मशानभूमीत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


 (३) काही लोकांच्या मते स्मशानभूमीत, अतृप्त मृत आत्मे फिरत असतात. हे आत्मे सजीवांचे शरीर काबीज करण्याची संधी शोधत राहतात. लहान मुले आणि मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना भूत लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी महिला आणि लहान मुलांनाही स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे.


 ४) काही लोकांच्या मते, एखाद्याच्या मृत्यूमुळे घर अशुद्ध होते. त्यामुळेच जेव्हा मृत व्यक्तीचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जाते, तेव्हा घराची देखभाल करताना धार्मिक स्वच्छता करण्याची जबाबदारी घरातील महिलांना दिली जाते. महिलांनी स्मशानभूमीत गेल्यास ही गृह शुद्धी पूर्ण होणार नाही.

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post