माणसाची मनोवृत्ती

माणसाची मनोवृत्ती

 माणसाची मनोवृत्ती



जे सामाजिक शास्त्रे वर्जिले । तेचि आवर्जुन केले । 

ऐसे मनुष्य दुःखी झाले । ये संसारी ।।१।।

प्रत्येक माणसाची स्वाभाविक वृत्ती अशी असते की तो जे नाही सांगितले तेच आवर्जून करतो मग ते चांगले असो की वाईट असो ठेच लागल्याशिवाय माणूस सुधरत नाही पूर्वी एका राज्यातल्या स्त्रिया खूप दाग-दागिणे घालत असत साधे बाजार करायला जरी जायचे असले तरी अलंकारांनी म्हणून नटून-थटून जात असत. त्यामुळे राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले लोकांच्या तक्रारी राजाकडे जाऊ लागल्या शेवटी राजाने दागिने घालण्यास बंदी केली फर्मान काढले की इथून पुढे कोणीही दागिने घालायचे नाही. पण त्याचा काही विशेष फायदा झाला नाही. उलट स्त्रीयांनी आधीपेक्षा जास्तच दागिने घालायला सुरुवात केली. व चोरीचे प्रमाण आणखीनच वाढले. शेवटी राजा वैतागला राजाने सभा बोलावली. सभेत सर्वांना यावर तोडगा विचारला. राजगुरूंनाही बोलावण्यात आले. राजगुरूंना राजाने विनम्रतेने विचारले यावर उपाय सांगावा. राजगुरूंनी उपाय सांगितला व दुसऱ्या दिवशी पुन्हा राजाकडून संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली गेली. राज्यातल्या स्त्रियांना दागिने घालण्यास बंदी आहे फक्त वेश्या सोडून, वेश्या दागिने घालू शकतात. आणि काय आश्चर्य दोनच दिवसात राज्यातल्या स्त्रियांनी दागिने घालण्याचे बंद केले. सहाजिकच स्त्रीयांनी आपली तुलना वेश्यशी होऊ नये याची दक्षता घेतली.

तात्पर्य :- जे नाही सांगितले तेच मुद्दामहून करण्याची वृत्ती प्रत्येक माणसाची असते. सरकारने कित्येकही वेळा दारूबंदी केली असेल, पण ज्या राज्यात दारूबंदी आहे त्याच राज्यात जास्त प्रमाणात दारू विकली जाते हे कटू सत्य आहे.


नक्कल करण्यालाही अक्कल लागते असे म्हणतात.

आपल्या धर्मशास्त्रामध्ये निषिद्ध आहेत. सप्त दुर्व्यसने, दारू पिणे, मांस खाणे, चोरी करणे, शिकार करणे, परस्त्रीगमण, वेशागमण, जुगार खेळणे. इत्यादी दूर व्यसने व्यवहार बाह्य असून असामाजिक असूनही आवर्जून विचारले जातात किंबहुना वाईन घेणे ही उच्चभ्रू लोकांची फॅशन आहे असे मानले जाते. येथपर्यंत माणसाची बौद्धिक पातळीची घसरण झालेली आहे.

 दारुमुळे पैशाचा चुराडा होतो, आणि बुद्धी भ्रष्ट होते, समाजात अप्रतिष्ठा होते, घरात दारिद्र्य येते, पत्नी मुलांच्या दृष्टीतून तो मनुष्य पूर्णपणे उतरतो, मुलांनाही तशा सवयी लागतात हे सर्व माहीत असूनही मनुष्य सद्वर्तनाकडे वळत नाही. सदाचरण करीत नाही. शेवटी त्याचा अधःपात होतो मरण समयीही त्याला नाना रोगांनी ग्रासलेले असते. म्हणून समाज रूढी धर्म रूढीप्रमाणे वर्तन करणे कधीही चांगले. त्यामुळे माणसाचे पारलौकिक जीवन सुखकर होते. 

सामान्य मध्यमवर्गीय (middle class) माणसाने उच्चभ्रू लोकांची कधीही नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्या गोष्टींचा माज करता येतो पण पैशांचा माज करता येत नाही या अर्थाची म्हण मराठी भाषेत रूढ आहे. 

एका पर्वताच्या उंच शिखरावर एक गरुड राहत होता. त्या डोंगराच्या दरीमध्ये एक विशाल वृक्ष होता. त्यावर एक कावळा घरटे बनवून राहत होता. डोंगराच्या पायथ्याशी बकरके बकऱ्या चारण्यासाठी येत असत. सोबत कोकरु(बकरीचे पिल्लू) ही असायचे. तो गरुड रोज एखादे कोकरू उचलून घेऊन जायचा व त्याला आपले भक्ष्य बनवायचा. गरुड हा पक्षी इतर सर्व पक्षांपेक्षा अधिक शक्तिशाली व बलवान असतो म्हणून तेच सहजतेने तो करू शकतो. गरुड पक्षाचा हा रोजचा नित्यक्रम होता कावळा ते रोज पाहत असेल एक दिवशी कावळ्याला ही वाटले की गरूडासारखे आपणही बकरीच्या पिल्लांना उचलून आपले भक्ष्य बनवू. म्हणून त्याने गरुडाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी त्याने पाळत ठेवली. बकऱ्या चालणारे आले त्यातले त्यांनी एका लहान पिल्लाला झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. पण भक्ष्य पकडल्यानंतर वेगाने हवेत उडण्याचा अभ्यास नसल्यामुळे तो एका मोठ्या दगडाला जाऊन आदळला आणि तिथेच त्याचे डोके फुटले, चोच तुटली आणि काही वेळातच तो मृत्युमुखी पडला.

तात्पर्य:- आपली क्षमता आपली परिस्थिती आपली कुवत याचा सारासार विचार न करता दुसऱ्याची नक्कल करणारे नेहमीच दुःखी होतात त्यांना भयंकर संकटांना सामोरे जावे लागते म्हणून आपण आपल्या योग्यतेत राहूनच सदाचरण करावे.



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post