अपेक्षा केली नाही तर तक्रार करण्याचा प्रश्नच उरणार नाही

अपेक्षा केली नाही तर तक्रार करण्याचा प्रश्नच उरणार नाही

 अपेक्षा केली नाही तर तक्रार करण्याचा प्रश्नच उरणार नाही

मित्रांनो ! इतरांकडून अपेक्षा ठेवणे हे सर्व दुःखांना कारणीभूत आहे आपण समाजाकडून नातेवाईकांकडून बहिणीकडून भावाकडून आई कडून वडिलांकडून नाना प्रकारच्या अपेक्षा करीत असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत किंवा आपल्या अपेक्षा अतिशय उच्च प्रतीच्या असल्यामुळे पुढील व्यक्ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे आपल्याला खूप दुःख होते. त्या दुःखाचा परिणाम नात्यात कटुता निर्माण होते आणि हसत्या खेळत्या घराला सुरूंग लागतो. 

म्हणून अपेक्षा फक्त परमेश्वराकडूनच ठेवावी. इतरांकडून अपेक्षा ठेवणे हे व्यर्थ होय. इतःपर आपली अपेक्षा पूर्ण झालीच तरी अपेक्षा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडून काहीतरी हवे असते पोळीला चोळी अशाप्रकारे वागणारे हे जग कोणतीही क्रिया निर्हेतुक करत नाही फक्त परमेश्वरच असे आहेत जय जीवाला निर्हेतुकपणे साह्य करतात जीवाने मागितले ते देतात म्हणून भगवंत गीतेत म्हणतात

तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्दच ।

मय्यर्पित मनोबुध्दीर्मामे वैष्यस्य संशयः ।।अ. ८/७ 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुन! तुला नेहमी माझ्याच रुपाचे चिंतन केले पाहिजे, सोबत युध्द करण्याचे कर्तव्यहि पूर्ण केले पाहिजेस. आपल्या कर्माला मला समर्पित करून आपले मन व बुद्धि माझ्यात स्थिर करून तू निश्चितच मला प्राप्त करू शकशील. घरात राहायचे परंतु हिमालयात असल्याची जाणीव व्हावयास हवी. काम, धंदा सुरळीत ठेवायचा आहे. दुकान, शेती, नोकरी करायची आहे. पण आठवण सतत परमात्म्याची ठेवायची आहे. निसर्ग हा मदतगार ईश्वर आमचा पिता आहे. आम्ही त्याची लेकरे आहोत. लेकरांना माता-पित्यावर विश्वास ठेवावा लागतो. तेच आमचे मदतगार व मार्गदर्शक आहेत. जीवनात अनेक अडचणी व अडथळे येतात. अडथळे खऱ्या अर्थाने अडथळे नसतातच. कारण जे कांही जीवनांत घडते ते चांगल्याकरिताच घडत असते. हे अनुभवाने सांगता येईल. निसर्ग हा आमचा मित्र आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी ती आपत्ती आपल्याला आव्हानच असते. नैसर्गिक अडथळे हे अडथळे नसतातच. आपण बी पेरतो. त्यावरचा मातीचा थर पाहून मनात सहज असा भाव येतो की, बिचारे बीज या मातीच्या ओझ्याखाली दबलं गेल आहे. पण खरे पाहता मातीखाली दबलं गेल्यामुळेच ते अंकुरित होते. मातीच्या ओझ्यामुळेच बीजाला अंकुरित होण्यास मदत होते. श्रीकृष्ण सांगतात माझ्या चिंतनात मग्न राहून येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे, हा कल्याणाचा स्त्रोत आहे. बीजावर माती म्हणजे बीजावर ओझे नसून अंकुरित होण्याकरिता ते उपकारक आहे. 

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयौ ।

ततो युध्दाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।अ. २/३८

सुख व दुःख, लाभ व हानि, जय व पराजय यांना समान जाणून युध्द केलस तर तुला पाप लागणार नाही. कृष्णाचा हा महामंत्र मोठाच निर्णायक आहे. सुखी जीवनाचा सार आहे. पृथ्वीतलावरच माणुस खोट्यासाठी खोटं बोलत नाही, तर फायद्यासाठी खोट बोलत असतो. हानिपासून बचाव व्हावा एवढ्याच उद्देशाने तो खोट्या मार्गाचा अवलंब करीत असतो आणि मौज अशी की ह्याचमुळे त्याची आत्मिक शक्ती क्षीण होऊन त्याला परमेश्वर कोणी चीज आहे. ह्याची जीवनभरही पुसटशी कल्पना येत नाही. त्याचे जीवन व्यर्थ जाते. “आला तसा गेला, मातीत मिळाला।”

नीति-अनीतीच्या मूळाशी लाभ-हानि दडली आहे. प्रत्येकाला केवळ लाभ झालेलाच आवडतो आणि ही अपेक्षाच मुळी दुःखाला कारणीभूत आहे. एखादा माणूस दारू पिऊन रस्त्यानं चालला असतांना गटारात पडाव हे स्वाभाविक आहे. केवळ लाभच व्हावा, असे वाटणे, ही एक नशा आहे. लहान मूल स्वाभाविकताच निष्कलंक असते. त्याला लाभ हानिचे कांही एक करायचे नसते. सुशिक्षितता जेवढी वाढेल तितकी अनैतिकता वाढेल. पण हे खरे शिक्षण नव्हे. खरे शिक्षण श्रीकृष्णाला केवळ माणून चालणारे नाही तर त्यांनी गीतेत सांगितलेल्या उपदेशाचे तंतोतंत पालन करूनच मिळणारे आहे. फुलं मुळांशिवाय येऊ शकत नाहीत. मुळं मात्र फुलाशिवाय असू शकतात. तेव्हा मुळातंच परमेश्वरीय शाश्वत बीज असणे आवश्यक आहे. तेथे सुगंधित टवटवीत फुले नक्कीच येतील. जीवनाला बहर येईल. संतजणांची निर्मिती अशीच होत असते. समाजाला सात्विक मुळांची आवश्यकता आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात की, तुला जे दिसताहेत ते आधीही होते, पुढेही असतील, ज्यांना मारायला तू घाबरतो आहेस त्यांना मारणं अशक्य आहे. आत्मा अमर आहे, त्याचा जन्मही नाही किंवा मृत्यूही नाही. तूं आपले कर्म अपेक्षारहित होऊन कर. निष्काम कर्म

निष्काम कर्माचे कोणतेही पाऊल व्यर्थ ठरत नाही. निष्काम याचा अर्थ अपेक्षारहित. कृष्ण म्हणतात - सकाम कर्मीच दुःखाला प्राप्त होतात. तेव्हा अपेक्षाच पुसून टाका. ही फार मोठी गोष्ट आहे. निष्कामकर्मी कधीही दुःखाला प्राप्त होत नाही. केवळ सकामकर्मीच दुःख भोगतो आहे. सकामकर्म म्हणजे अपेक्षा ठेवणे. फार मजेशीर गोष्ट आहे की, गरीब कधीच काळजीत नसतो. सुदामा श्रीकृष्णदेवाचे परमभक्त व परममित्र होते. त्यांचे संपूर्ण जीवन हालअपेष्टेत गेले. सुदामजींनी श्रीकृष्णदेवाचे भेटीस येतांना मुठभर पोह्याची पुरचुंडी बांधून आणली होती. ते पोहे नसून निष्काम प्रेम होते. ह्या निष्काम प्रेमापोटी श्रीकृष्णदेवाला सुदामाचे पाय चेपावे लागले, आपल्या भक्ताची सेवा करावी लागली. सुंदर महाल बांधून द्यावा लागला. हे च श्रीकृष्णदेवाचे आपल्या निस्सीम भक्तावर असलेले निस्सिम प्रेम होय. निष्काम कर्माचे ह्यापेक्षा सुंदर उदाहरण पृथ्वीतलावर सापडणे कठीण आहे. क अधिक लालसा, गरजेपेक्षा जास्त मागणी सात्विकतेला मारक आहे. वास्तविक हा भगवद्गीतेचा अपमान आहे,

न मांगे मिले मोती मांगे मिले ना कोय ।'

हा महामंत्र आहे. सुदामजी निष्काम कर्माचे आदर्श आहेत.






Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post