आमची धार्मिक कर्तव्ये

आमची धार्मिक कर्तव्ये

  आमची धार्मिक कर्तव्ये



        आमच्या धार्मिक कर्तव्याची जाणीव अथवा माहिती फारच थोड्यांना झालेली असते आणि अशीच माणसें चमकून उठतात व इतरांचे जीवन प्रवाह निर्मळ आणि स्वच्छ करतात.

        हल्लीच्या शिक्षण पद्धतीमुळे व पंथिय परंपरा सोडून ब्रम्हविद्या शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे व परमेश्वर विहित आचार न केल्यामुळे आम्ही आज धार्मिक कर्तव्यापासून पुष्कळच दुर जात आहोत. धार्मिक कर्तव्ये व सदाचार याचा विसर व्हावा ही गोष्टच आजच्या आमच्या अधःपाताला खरी जबाबदार आहे. अशीच परिस्थिती वाढत गेली तर आपण गौरवाने जे उदात्त सर्वश्रेष्ठ महानुभाव पंथ म्हणून टेंभा मिरतो त्याची भ्रष्ट स्वरुपात प्रसिद्धी होईल. गृहस्थाश्रमीयांच्या व पंथातील भ्रष्ट रूढींच्या अनुकरणाने आजहि आम्हीं शतमुखाने अधोगतीला चाललोच आहे म्हणून हे बदलले पाहिजे. निदान या विरुद्ध आवाज उठवणे हे तरी सांप्रतचे प्राप्त कर्तव्य खासच आहे.

        आमच्यातील उणीवास्वकर्तव्याची बेफीकरीनिष्काळजीपणा हे दुर्गण घालवण्याकरता पंथधुरीणांनी कळकळीने प्रयत्न केले पाहिजे.

        पंथ धुरिणांनी पंथीय उपदेशी, नामधारकांना नुसत्या कोरड्या विचारपर ज्ञानाचे निरूपण न करून वासनिक धर्माचे, वेधवंत धर्माचे, अनन्यभक्तीचे निरूपण केले पाहिजे. त्यांना निष्कामभक्ती शिकवली पाहिजे. सकाम भक्ती करण्याबद्दल परावृत्त केले पाहिजे.

        धर्मकट्टरता, अध्यात्म विकाससामान्यांतील सामान्य नामधारकाचे पारमार्थिक जीवन कसें सुधारेल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. वासनिकांनीही आपल्या संपर्कात असलेल्या उपदेशी बंधुंना अनन्यभक्तीचे यथार्थ ज्ञान केले पाहिजे.

        रोजच्या दैनंदिन सांसारिक कर्मात आपण किती वेळ परमेश्वर भक्तिसाठी देतो, याचा प्रामाणिकपणानें विचार करावा. आपण आपले परखडपणाने आत्मपरीक्षण आणि आत्मसंशोधन केले पाहिजे. म्हणजे आपली विसरलेली कर्तव्याची स्मृति जागी होईल. आपल्या जीवनात अत्यंत आवश्यक असा एक धर्मच आहे. आज दुर्दैवाने सर्वांत जास्त धर्माचीच विटंबना चालली आहे. खऱ्या धर्माचे, यथार्थ ज्ञानाचे स्वरुप लोपत जात आहे. आम्ही नुसता धर्माचा दंभच आज वापरत आहोतधर्माचे स्वरुप ओजस्वी भाषेतहृदयाला स्पर्श करून ते सर्वांच्या जीवनात मंगलमय आणि उत्साहवर्धक कसे वाढीस लागेलही चिंता पंथातील साधुसंत, नामधारक, वासनिक सर्वांनीच वाहिली पाहिजे. नूत उपदेश घेतलेले नामधारक हे अज्ञच असतात म्हणून त्याची अवहेलना अथवा हेटाळणी करून त्यांना आपल्या कर्तव्याचे मरण करून देणे हे सर्वांत महापाप आहे. आपला महानुभाव पंथ सर्वश्रेष्ठ आहे. आपण आपल्या पंथातील सर्वांशीच समान भुमिकेनेंउदात्त चारित्र्याने सर्वांच्या सुखाकरता झटणे याहून धर्माचे सोज्वळ स्वरुप दुसरे ते काय?

        आम्ही आमची धार्मिक कर्तव्ये हल्ली विसरत चाललो आहोत, महानुभावपंथाचे विशालत्व आणि सहिष्णुत्व यांचा केव्हांहि विसर पडू देऊ नका. सर्वांत अति प्राचीन आणि सनातनपणाने जगाला महान अध्यात्म तत्वज्ञानाचा उपदेश कथन करणारा आणि श्रीचक्रधरप्रभुंनी स्थापन केलेला व श्रीनागदेवाचार्य म्हाईंभट इत्यादि महान संतांनी आचरणांत आणलेला हा श्रेष्ठ धर्म आज दुःखांत आणि विस्कळीत का दिसतोयाचे एकच कारण मला वाटते तें म्हणजे आदर शून्यता ! परमप्रितीचा अभावच याला कारणीभूत आहे.

        एक दिवस आपण हे 'आपले सारे सोडून जाणार आहोत म्हणूनच आपल्या जीवनाचे सोने कसे होईल हे पाहिले पाहिजे. “ याच साठी केला अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावाही संताची थोर शिकवण म्हणजेच धर्माचरण, पंथाची सेवा, स्थानाची सेवा, साधुसंतांची सेवा, वाणीत संयम आणि आचरणात सत्य विचाराचेच प्रतिबिंब दिसून आले पाहिजे तरच धार्मिक दृष्टया आपण काहीतरी वागत आहोत. आजपर्यंत आम्ही नुसती व्रत-वैकल्ये केली आणि विसरलोहि परंतु खऱ्या धर्माची कास धरल्याविना जीवनात शांती मुळीच मिळणार नाही हे पक्के लक्षात ठेवा म्हणूनच खरा परमेश्वरीय धर्म समजून घेतला पाहिजे. म्हणून आपला जीवनधर्म समजून आपली वर्तणूक अव्याहत राखण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. धर्म हा जीवनाला उजाळा देणारात्यात माधुरी णणारासौंदर्य निर्माण करणारा किमयागर आहे. मातीतून सोने मानवातून देवत्वाकडे जाण्याचा रस्ता हा धर्माच्या प्रांगणातूनच गेला आहे. धर्महीन जीवन म्हणजे भ्रष्टता आणि दुःखांची अनर्थकारक परंपरा याचा जर तिटकारा आला असेल तर परमेश्वराला शरण जाणे असेच धर्म सांगतो. जन्माआधी दुधाची सोय करून ठेवणाराहवा आणि पाणी मुक्त हस्ताने मानवाला उपलब्ध करून देणारा परम कृपाळू परमेश्वर आहे हे एक चिरंतन सत्य आहे याची सतत आठवण करून देईल तोच धर्म.

        पंथिय चालरिती आणि परमेश्वर सूत्रसंमत विचारांचा आज काही ठिकाणी अभाव दिसतो. प्रतिपक्षावर गाली प्रदान करण्यांत काहींना धन्यता वाटते. दुसऱ्याच्या दोषांचे धुणे धुण्यापेक्षा त्यांतील मौलीकवैचारिक गुणांचा स्वीकार केला तर आपले जीवन सुंगधीतपणाने बहरणार नाही का?

        वैयक्तिक हेवेदावेस्वार्थांधता अहंकार आणि निष्क्रीयता हे महाशत्रूच होत. याचे उच्चाटन करणेयापासून जास्तीत जास्त लवकर परावृत्त होण हे अग्रतत्वाचे सामाजिक कर्तव्य नाही का?

        महानुभाव पंथाची मांगल्यपूर्ण सेवा अखेरचा श्वास घेईपर्यंत मी करीन व सर्वांचे सेवेकरतां टेन ही प्रतिज्ञाच आपली सब कर्तव्ये समजून वागू लागलों तर या संसारसागरातून मुक्त होण्यास वेळ लागेल कामुळीच नाहीअसे आनंदाचेसुखावह भाग्याचे सुयोग आपणा सर्वांना लाभावेत ही मनोमय इच्छा सातत्याने वाढवली पाहिजे. आमची धार्मिक कर्तव्यांची रुपरेखा आपणासच अधिक कळू शकेल. मात्र या करता आत्मचिन्तन आणि संशोधन केले पाहिजे. स्वतःचे हृदय तपासले पाहिजे तेथूनच यशाची खरी सुरवात आहे. प्रस्तुत लेखकाला स्वत:च्या दोषांची जाणीव आहे. विषय जिव्हाळ्याचा आहे तो मांडतांना विस्कळीतपणारटाळपणा जरी झाला असला तरी त्याचा स्वाद-सौंर्ह्यं सहानुभुतीने विचारार्ह मानून घ्या कमी अधिक शब्द असेल तर हंसक्षीर न्यायाने यातील चांगलेच तेवढे स्विकारा,

        आपण आपल्या कर्तव्याचा केव्हाही विसर पडू देऊ नकाकसलीहि कितीही संकटे कोसळोत आपण आपले ध्येय मंदीर गाठूच गाठू मात्र नम्रतेनंचगर्वाने आणि मिजाशीने नव्हे. 

        परमेश्वराचे उपकार आपल्यावर कल्पनातीत आहे याचा विसर क्षणमात्र पडू देऊ नकाउशीर खुपच झाला आहे. देवाचे अनंत उपकार आपण कधीच फेडू शकत नाही तथापि या उपकांराची अंशतः तरी फेड आपण धर्माचरण करून कर करावी असा सुविचार तुम्हा आम्हास त्वरीत यावा हीच इच्छा आणि प्रार्थना.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post