परब्रह्म परमेश्वर व त्याचे सगुण निर्गुण स्वरूप

परब्रह्म परमेश्वर व त्याचे सगुण निर्गुण स्वरूप

  

परब्रह्म परमेश्वर व त्याचे सगुण निर्गुण स्वरूप

        फुलांतील सुगंध साखरेतील गोडी आकाशातील शब्द पाण्यांतील ओलेपणा ही आम्हाला डोळ्यांनी पहावयाची आहेत असा कोणी हट्ट घेतला तर त्याला कोणी झाला तरी कसा दाखवू शकेलज्या इन्द्रियाचा जो विषय तो त्या इन्द्रियानेच अनुभविला जाणे शक्य आहे इतरांनी नव्हे. तसे शक्यच असते तर मानवाला पंचेन्द्रिय न मिळता फक्त डोळेच मिळाले असते व त्याने डोळ्यांनी सर्व व्यवहार चालविला असतापण अशक्य गोष्ट शक्य कशी होईल. याप्रमाणे इन्द्रियाचे विषयज्याचा मानव प्रत्येक क्षणाला अनुभव करतो त्याची जर ही स्थिती आहे तर मग त्या पाची इन्द्रियापेक्षा सूक्ष्म व चंचल मन जे क्षणार्धात अखिल विश्वाचे भ्रमण करून येते व त्यापेक्षाहि खोल शिरणारी बुद्धि आणि त्यापेक्षाहि सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मा परमात्मा वस्तु ती चक्षु इन्द्रियाने कशी प्रत्यक्ष दिसेल हा विचार करण्यासारखा विषय आहे. भगवान गीतेत म्हणतात

       अशा इन्द्रियातीत बुद्धिलाहि पूर्णपणे कलन न होणाऱ्या सूक्ष्म वस्तुच्या अनुभवाकरता आमच्या पूर्वजांनी थोर थोर महानुभावांनी एकान्तात बसून मन इन्द्रियावर विजय मिळवून त्या वस्तुच्या साक्षात्काराचा प्रयत्न केला व त्यांतहि निःसहायतने यश आले नाही म्हणून अन्तःकरणाचे पाणी पाणी करणाऱ्या प्रेम भक्तीची सहायता घेतली तेव्हां कुठे त्यांना साक्षात्कार झाला व तोहि मुक्याने खाल्लेल्या गुळाप्रमाणे इतरांना सांगण्याच्या स्थितीत न उरता आला. म्हणून हा विषय नेहमीसाठी गूढातिगूढच राहिला अशा गहन विषयाचा ज्या दिशेने जाऊन साक्षात्कार करावयाचा ती दिशा सोडून विरुद्ध दिशेनें जाऊन साक्षात्कार करूं पहाणाऱ्या आजकालच्या सुविद्याना उलट अनुभव येऊन त्या परमात्मा वस्तुला कसे बरे गवसू शकतील. ते त्यांना कदापि शक्य होणार नाही.

        अजून वैज्ञानिकांना अधिभौतिक त्रिगुणात्मक शक्तिचाच पूर्ण थांग लागला नाहीं प्रतिदिन नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन अनुभव येत आहेत मग त्यापेक्षा अनंतपट शक्तिशाली सूक्ष्मातिसक्ष्म परमात्मा वस्तुचा थांग कसा लागेल ज्या विषयी म्हटले आहे यतो वाचा निवर्तन्त अप्राप्य मनसा ह  तै० उपनिषद ज्या विषयी विचार करीत असतां मन सहित वाचा आदि इन्द्रिये त्याचा थांग न लावताच परत फिरताततो एव्हांशीच कुठे हाती लागेलअनन्त काळपर्यंत अनंत प्रयोग करून दमल्यावर सुविद्य मानव त्याची फक्त सत्ता कबूल करावयाला तयार होईल. ही स्थिति सुविद्य लोकांची आहे मग अविद्य अज्ञान जनांची याविषयी किती अनुकंपनीय स्थिती असेल हे सांगावयासच नको. पण त्यांची घेण्यासारखी गोष्ट एवढीच कीते कोणावर विश्वास तरी करतात व विश्वासाच्या बळावर आपली नांव पैलतीराला लावतात मात्र या विश्वासांतहि धोका आहेतो असा कीत्यापेक्षा थोडे अधिक जाणणारे आणि तेहि शब्द पंडित चालाखीने आपल्या स्वार्थसिद्धिकरता या अज्ञ जीवांना धोका देतात. याकरता निव्वळ अज्ञान राहूनहि उपयोग होत नाही. म्हणून शक्यतोवर सज्ञान व्हावे सत् शास्त्र पहावे पण ज्या ठिकाणी बुद्धि स्तिमित होते त्याठिकाणी नास्तिक न होता विश्वास पण करावा.

नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेघया न बहुना श्रुतेन ॥

यमेवैष वृणुते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनु स्वाम् ॥

कठउपनिषद द्वितीयवल्ली मंत्र २२

        या आत्म्याविषयी मोठाले व्याख्यान दिले बुद्धिने खोल विचार केला किंवा पुष्कळसे शास्त्र श्रवण केले तर या आत्म्याचे ज्ञान होईल असे मुळीच नाही. तर केवळ भक्तिमय अंतःकरणाने आपण त्याला जवळ केले तरच त्याचे ज्ञान होते.

        या परमात्मा तत्वाच्या महत्वाविषयीं गीताउपनिषद वेद यांतून बरेच वर्णन येते.

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ॥

ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥ गी. अ. १३ श्लो. १७

सर्व प्रकाशकांचा तो प्रकाश अज्ञानाच्या पलीकडे आहे. अथवा मायेच्या पलीकडे आहे. तो ज्ञानमयजाणण्यायोग्य फक्त ज्ञानानेच तो प्राप्त करण्यायोग्य आहे.

यस्मादर्वाक्संवत्सरोहोभिः परिवर्तते ॥

द्देवा ज्योतिषां ज्योतिरायुर्होवासतेमृतम् ॥ बृ० उ०-४-४-१६

संवत्सर दिवसादि काल खण्ड ज्यात काही विकृति उप्तन्न करू शकत नाहीत. सर्व प्रकाशांना जो प्रकाश देणारा आहे तो उज्वल नित्यमुक्त परमेश्वर आहे. असे त्या परमेश्वराबद्दल पुष्कळच वर्णने येतात. त्या सर्वांचा या अल्पशा लेखांत समावेश होणे कठीण आहे.

        असा तो परमेश्वर निराकार साकार (अव्यक्तव्यक्त) त्यापैकी निराकार असूनहि सगुण-निर्गुण परस्परविरुद्ध धर्मानी युक्त असा आहे. सगुण निर्गुण व उभयविध इत्यादि बदल गीता उपनिषद व वेद यातील काही प्रमाण दिले जात आहेत स्याविषयी वाचकांनी विचार करावा.

अव्यक्तं व्यक्ति मापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः ।।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् । अ. ७ श्लो.२४

मी अव्यक्त असूनहि माझ्या अव्यय व अनुत्तम पर भावाला न जाणून अज्ञजन मला व्यक्त मानतात.

अशरीर शरीरेष्वनवस्थेष्ववस्थितम् ।

महान्तं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति ॥ कठ २-२१

जो देहधारी नाही नसून देह नसतांनाहि जो राहतो. जो महान व्यापक आत्मा आहे त्याला जाणून धीर पुरुष शोक करीत नाहीया उपनिषत श्रुतित आणि मागच्या गीतेच्या श्लोकाने परमेश्वराला अव्यक्त मानलेले आहे. आता व्यक्ता बद्दल पाहू.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ अ. १ श्लो. ७

जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते व अधर्माचा उठाव होतो त्या त्या वेळेला मी अवतार धारण करतो.

अवजानन्ति मा मूढा मानुषी तनुमाश्रितम् ।

परं भावमजान्तो मम भूतमहेश्वरम् ॥ अ.९ श्लोक ११

मी मनुष्यरूप धारण केले आहे म्हणून माझी मूर्ख लोक अवज्ञा करतात. परंतु मी सर्व प्राण्याचा महेश्वर आहे ह्या माझ्या पर भावाला हे लोक जाणत नाहीतया ठिकाणी ईश्वर व्यक्त साकारास म्हटलेले आहे. आमच्या इतर काही बंधूचे म्हणणे असे आहे कीईश्वर व्यक्त होतच नाही. वेदांत ईश्वराला अव्यक्तच मानलेले आहे. पण त्यांचे हे म्हणणे फार काळ टिकत नाही. वेद उपनिषद गीता सर्वत्र ईश्वराच्या निराकार साकार दोन्ही अवस्था मानल्या आहेत.

        दोन गीता वचने दाखविली आहेत. याशिवाय सर्व गीता व्यक्त व सगुण वर्णनाने भरली आहे. ते जाणणाऱ्या पासून लपले नाही. आता वेदोपनिषदाच्या श्रुति पहा

एषोहदेवः प्रदिशोनुसर्वाः पूर्वोहजातः सउगर्भे अन्तः ।

स एवजातः स जनिष्यमाणः प्रत्यङ् जनास्त्रिष्ठति सर्वतोमुखः ।। यजु . ३२ मं. ४

जो परमात्मा दिशा आणि उपदिशा सर्वत्र व्यापक आहे तो पूर्वी गर्भात प्रकट झाला होता. तोच आतां उप्तन्न झाला आहे. तोच सर्वांना उप्तन्न करणारा आहे. तोच सर्वतोमुख आहे. या ठिकाणी गर्भात आला हे स्पष्ट आहे तेव्हा व्यक्त साकार होतो यात संशय उरत नाही.

अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव ।

तथाह्ययं सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बभूव ॥ कठ. उबल्ली ५ मं.१०

ज्याप्रमाणे लाकडांत असलेला अग्नि निरनिराळी रूपे धारण करतो तसा सर्व जगात व्यापक असलेला परमात्मा निरनिराळी रूपे धारण करतो.

प्रजापतिश्चरति गर्भे अन्तरजायमानो बहुधा विजायते ।

तस्य योनिं परिपश्यन्तिधीरास्तस्मिन्हतस्थुर्भुवनानि विश्वा ॥ यजु. ३१।१९

जो कधी उत्पन्न झाला नाही असा परमेश्वर गर्भात येतो व अनेक प्रकाराने प्रकट होतो. त्याच्या स्वरुपाला ज्ञानी लोक चहुकडे पहातात. त्यात सर्व स्थित आहेत.

 

ततः स्वयंभूर्भगवान्नव्यक्तोव्यज्जयन्निदम् ।

महाभूतादिवृत्तौजाः प्रादुरासीत्तमोनुदः ॥ मनु १ श्लो. ६

        प्रलयानंतर स्वयं शरीर धारण करणारा ज्याचे सृष्टी रचण्याचे सामर्थ्य कधी समाप्त होत नाही. प्रलयाचा नाश करणारी अव्यक्त-अप्रकट महाभूत प्रसवण्याला कारण आहे तो परमात्मा या विश्वाला प्रकट करून स्वयं प्रकट होतो.

योसावतीन्द्रियो ग्राह्यः सूक्ष्मोव्यक्तः सनातनः ।

सर्वभूतमयोचिन्त्यः स एव स्वयमुद्वभौ ॥ मनु१ श्लोक ७

        इन्द्रियांना अगोचर आहेसूक्ष्म आहेअव्यक्त आहेसनातन आहेजो सर्व भूतमय म्हणजे सर्व प्राण्यांचा जीवनाधार आहे. असा अचिन्त्य परमेश्वर स्वयं उप्तन्न झाला.

        याप्रमाणे गीताउपनिषदवेदमनुस्मृति सर्व सत् शास्त्र ईश्वराच्या साकार रूपाचे वर्णन करतात. या ठिकाणी एवढे लक्षात असू द्यावे कीईश्वर साकार झाला म्हणजे सर्वत्र साकार झाला असे मुळीच नाही. ज्याप्रमाणे सर्वत्र असलेले आकाश घटांत घटाकाशमठांत मठाकाश म्हणविते त्याप्रमाणे ईश्वराचे साकार रूप जेव्हां व्यक्त होते तेव्हा ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्यावर एकाधा बुडबुडा यावा तसे असते. म्हणजे घटाकाश मठाकाश वेगळे आकाश शिल्लक असते. बुडबुड्या वेगळे पाणी शिल्लक असते. तसे साकार होवूनहि निराकार स्वरूप अनन्तपट जसे तसेच शिल्लक राहते.

आता थोडे सगुण निर्गुणाचे विवेचन करूं.

न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्दैवैस्तपसा कर्मणा वा ।

ज्ञान प्रसादेन विशुद्धसत्वस्ततस्तुतं पश्यते निष्कलं ध्यायमानः ॥

कठ उपनिषद मंत्र ज्याचे ज्ञान डोळ्यानेवाचेनेसर्व देवतांनी किंवा सुकर्माने होत नाही. विशुद्ध सत्वस्थ होऊन ध्यान करावे म्हणजे त्याचे ज्ञान होते अर्थात् अनुभव होतो तो परब्रम्ह होय,

        तसेच 'अदृश्यम् अग्राह्यम्' ‘यतो वाचा निवर्तन्ते असे कितीतरी उपनिषत् स्मृत्या सगुणत्व वर्णन करतात. आणखी

अशब्दमस्पर्शमरुपमन्यं तथा पुरस नित्यमगन्धवच्च यत् ।

अनाद्यनन्तं महतः ध्रुवं निचाय्य तन्मृत्युमुखाप्रमुच्यते ॥ क० ३-१५

ते ब्रम्ह शब्द स्पर्शरुपरस व गंध वर्जित आहे. अव्यय अनादि अनंत आहे अशा परमेश्वराच्या ध्यानाने जन्म मृत्यु पासून सुटका होते. आणि सगुणाचे वर्णन तर गीतेत उपनिषदात जागोजाग येते.

आता निर्गुण सगुण अशा उभयविध वर्णन गीतेच्या १३ व्या अध्यायांत येते. श्लोक १२ ते १७ हे विशुद्ध गुणाचेच म्हटले आहे.

        निर्गुण गुणभोक्ताच तो निर्गुण असून गुणाचा भोक्ता आहे.

अणोरणीयान् महतो महियान् (कठ उपनिषद २-२०)

तो प्रमाणुपेक्षा सूक्ष्म महान् पेक्षा महान् आहे.

तदेजति तन्नेजति तद दूरे तद्वदन्तिके ( ईशावास्तोव निषद )

ते हालते ते हालत नाही ते दूर आहे जवळ आहे.

 

सर्वेन्द्रियै गुणाभासं । सन्द्रियैर्विवार्जितम् (श्वेताश्वतार उपनिषद)।

अपाणिपादो जवनोग्रहीता पश्यत्यचक्षुसशृणोत्यकर्ण ॥

        डोळे नसून पहाणारा, कान नसून ऐकणारा आहे. यावरून दिसून येईल त्या परब्रम्ह परमेश्वरात विरुद्ध धर्म आहेत. ज्याच्या ठिकाणी एक दुसऱ्याच्या विरुद्ध धर्मांचा समावेश आहे. त्याचे वर्णन विरुद्ध धर्मानेच करावे लागते. याप्रमाणे हे अव्यक्त व्यक्तसगुण निर्गुणउभयविध ब्रम्हाच वर्णन शास्त्रातून आढळते.'

        हे एका जिज्ञासु सद्भक्ताच्या आग्रहावरून केले आहे. कोणावर कटाक्ष किंवा मन दुखविण्याकरता नव्हे.

लेखक - श्रीकृष्णदास महानुभाव

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post