Susangati parinam सुसंगतीचा सुष्ट परिणाम आणि कुसंगतीमुळे होणारा अधःपात

Susangati parinam सुसंगतीचा सुष्ट परिणाम आणि कुसंगतीमुळे होणारा अधःपात

सुसंगतीचा सुष्ट परिणाम 

आणि कुसंगतीमुळे होणारा अधःपात


सर्व पंथिय बंधु आणि भगिनींना दंडवत प्रणाम....

आज सहजच वाचन करत असताना एक सुंदर मेसेज वाचायला मिळाला त्यातूनच आजच्या लेखाची निर्मिती झाली...

     विषय व आशय हे नेहमी हितकारक असावेत असं विद्वानांनी सांगितलेलं असं ऐकण्यात येत असत...

    अगदी तसाच विषय आजच्या लेखात आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत...

    कारण ही तसेच आहे आपण दरवर्षी कसल्या तरी शुभ दिवसाचं म्हणावं किंवा एखाद्या वडीलधाऱ्यांना निमित्त करून आपण काही तरी वचनाची कबुली देऊन आपलं पुढील टार्गेट देण्याचा प्रयत्न करतो...

    पण कधी तरी विचारात घेतलं का ? आपण नेमकं काय करतो आहे व आपल्या ला करायचं काय आहे...

   कारण ही तसेंच आहे आपल्याला या कलियुगात जन्माला यायला जे भाग्य लाभलं ते त्या साधनदात्याचे परम उपकार आहेत...

   कधी तरी त्यावर चिंतन केलं...? कधी तरी त्या विधात्याने केलेली उपकाराची आठवण केली... आपल्या तर ते कधीच सुचतच नाही...

    कारण आपणांस रोजच चिंता असते ती आपल्या संसारात असलेल्या दुःख कसं दूर होईल याची... फक्त त्याचीच खरंच हो...

हो तसेच आहे...

  परंतु मनुष्यालाच काय तर सर्वच जीवांना ह्या देहात जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत आपणास वेगवेगळ्या सोबतीचा सहवास लाभत असतो...

   त्याच विषयावर थोडंस मनोगत मांडण्याचा हा प्रपंच करत आहे...

संगतीचा चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम किती प्रमाणात व कसा होऊ शकतो. याविषयी एक श्लोक रचला आहे. भर्तुहरीच्या नितीशतकातील संस्कृत श्लोकाचे ते मराठी रूपांतर होय.  वामनपंडित म्हणतात की,

तोयाचे परि नावंही न उरते संतप्त लोहावरी ।

ते भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी ।

ते स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके ।

जाणा उत्तममध्यमाधमदशा संसर्ग योगे टिके ।।६७।। (नितीशतक)

आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो... मात्र तोच पाण्याचा थेंब गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही... आणि तोच थेबं जर अग्निने अत्यंत तप्त, गरम झालेल्या लोखंडावर किंवा धातुवर पडला तर तो पाण्याचा थेंब निमिषार्धात भस्मसात होतो.

            पण तोच पावसाचा थेंब जर कमळाच्या नैसर्गिक मेन असलेल्या पानावर पडला तर तो जणुकाही असली मोत्यासारखा चमकदार दिसतो. आणि तोच पावसाचा थेंब जर स्वाति नक्षत्रात शिंपल्यात पडला तर काही दिवसांनी त्या थेंबाचा खरे मोतीच बनतो.

            एकच पाण्याचा थेंब पण तो कुणाच्या संगतीत येणार, कुसंगतीत येणार की सुसंगतीत येणार यावर त्याचे अस्तित्व आणि प्रतिष्ठा ठरते. संगतिच्या योगाने उत्तम मध्यम मनिष्ठ गुण मनुष्याला प्राप्त होतात.

अगदी तसेच मनुष्याचे जीवन देखील त्याच कारणाने जडत घडत असतं...

            मात्र काही जीव हे जन्मताच अधिकारी असतात हे ही तितकं जरी खरं असलं तरी त्या अधिकारी जीवास आपलं भवीतव्य टिकवून ठेवायला योग्य मार्गदर्शक नक्कीच भेटायला हवा असतो...

            तशी ती त्या जीवाची तळमळ ही असायला हवी असते...

            म्हणून आपण आपल्या जीवनाचा गाडा योग्य मार्गाने हकलण्यासाठी योग्य व्यक्तीचा सहवास घेण्यासाठी प्रयत्न करत राहाव, त्यांचे मार्गदर्शन घेऊन परमेश्वराने सांगितलेल्या आचार विचाराची शिदोरीतील मेजवानी चाखत चाखत आपल्या परमेश्वर प्राप्तीची भूक भागवण्यासाठी प्रयत्न करत राहावं...

            ज्यावेळी आपण परमेश्वराने दिलेल्या आचार विचाराची शिदोरीतील पंचपक्वान्न घेऊन आपली भूक भागवण्यासाठी धडपडत राहू त्यावेळीच ते शक्य असेल हे मात्र तितकंच खरं...

            मात्र हे सर्व घडण्यासाठी योग्य मार्गदर्शक निवडणं त्यांचे कडून परमेश्वराने सांगितलेल्या ब्रह्मविद्या सार जाणुन घेण्याची तळमळ खूप गरजेची आहे...

            ती तळमळ च तुम्हास त्या कैवल्याची वाट दाखवण्यात मार्गदर्शक ठरणार आहे...

   म्हणूनच एक म्हण नेहमीच आपण ऐकत असतो...

              पाणी पिना छान के गुरू करना पहचान के

            कारण रथाची चाक कितीही दणकट असली तरी किंवा त्यास कितीही चपळ अश्व जोडलेली असलेली तरी...

            त्या रथाचे सारथ्य करणारा सारथी हा हुशार व अचरणाशी बांधील असावा...

            त्याचे सहवासातून आपल्या जीवनाचा प्रवास हितकारक व सार्थक होण्यासाठी योग्य अध्यानातून आपलं जीवन घडलं पाहिजे हे फार महत्त्वाचे आहे...

            त्यावेळी आपल्या ला जो सहवास लाभला किंवा आपण ज्याचे कुणाचे सहवासात राहत आहोत त्याकडून मिळणार ज्ञान हे आपलं सारथ्य करण्याइतकं ज्ञान देण्याची त्यात क्षमता असायला हवी हे ही तितकंच महत्वाचे आहे...

            म्हणून आपलं जीवन रथ परमेश्वराचे राजमहाली अर्थातच कैवल्य गडावर पोहचवण्यासाठी योग्य सारथी निवडा त्यातून आपलं ते शिखरावर पोहचणे गरजेचं आहे...

सहवास तुझाची घडावा देवा...!

प्रसाद हा मज द्यावा...!!

निशिदीन तव हे नाम स्मरावें...!

विसर कधी न पडावा देवा...!!

श्रीचक्रधर हे नाम स्मरावे...!

जन्म मृत्यू चुकवावा देवा...!!

अगदी हाच सहवास मिळवण्यासाठी त्या परमेश्वराने सांगितलेलं अचरणाशी बांधील रहा. त्याचे नित्यविधी निमित्य विधी पालन करा...

             कारण परमेश्वराने स्पष्टपणे सांगितलं आहे...

            जो आचरण करील त्याचा हा धर्म व जो अनुसरेल त्याचाच देव आहे...

            निमित्त सहवास तर योग्य निवडा च परंतु नित्य सहवास त्या साधनदात्याचा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करा...

संगत करे बडे की तो बढते बढते जाए ।

संगत करे गधे की तो दो दो लाता खाए ।।


माझ्या कडून व आमच्या श्रीप्रभु प्रतिष्ठान, नाशिक या संघटनेच्या सर्व टीमकडून तुम्हास सरत्या वर्षात घडलेल्या चुकांची माफी व येणाऱ्या वर्षांत तुमचीच अध्यात्मिक योग्य दिशेने होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा...

दंडवत माझा देव श्रीचक्रधर...

आपलाच... प से सुरेश डोळसे, नाशिक

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post