लेखा जोखा... काढोनी चष्मा डोळ्याचा...

लेखा जोखा... काढोनी चष्मा डोळ्याचा...

 लेखा जोखा...

                 काढोनी चष्मा डोळ्याचा...

दंडवत...

सर्व अच्युतगोत्रीयांना सादर दंडवत तीन दिवसांपूर्वी एक दिनदर्शिका भिंतीवरील खाली उतरवली...

                  कारण...           

       जगाच्या नियमाप्रमाणे काल गणक नियमाला अनुसरून तस करणं ही गरजेचे म्हणून गेल्या शुक्रवारी २०२१ या सरलेल्या वर्षाचा शेवटचा दिवस पूर्ण होऊन शुक्रवारी मध्यान रात्री शनिवार च्या शुभारंभी नवं वर्षारंभ अर्थातच २०२२ ह्या वर्षाची सुरवात झाली...

                    पण...

          नविन वर्षाचे अप्रूप असे काही विशेष नसते. काही अपवाद वगळता. रोजचा दिवस जसा उगवणार तसाच नविन वर्षातही उगवणार...त्याततर बदल काही होणार नाही...

                   रोजच्या रूंटींग मध्ये काडीचा फरक पडत नाही."येरे माझ्या मागल्या" हे असे चालूच असते.

                    तरी ही नविन वर्ष, नविन वर्ष म्हणून समुहामध्ये स्वागतासाठी आपणही सज्ज असतो. तसे पाहता काय नविन नी काय जुने... काय पाहिले आपण या वर्षात काय अनुभवले.

                    हे मनात सुरू असतानाच या नवीन वर्षात विशेष अस काय अनुभवणार आहोत... सहज विचार आला की, आपण आपल्या डोळ्यावरचा चष्मा थोडा दूर करून पहावा...

                    नेमकं काय दिसते, अंधूक दृष्टी... अज्ञानाचा पगडा त्याने अंध झालेले डोळे... कर्मकांडाच्या मागे लागलेले आपलेच पंथीय... आणि त्या धूसर अज्ञानामुळे आपलाच घेतलेला बळी...

                   आपल्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी घेतलेल्या अज्ञानाच्या कुबड्या... त्या इतक्या अंपग बनवत गेल्या की, आपले पायच निकामी झाले...

                    तर उभा तरी कसा राहू अशी अवस्था करून घेतलेली...

                    डोळ्यावरच्या चष्माच्या स्पष्ट अशा नजरेतून पाहत गेलो तर खूप अशा घटना आपल्याला सत्य जाणून घेण्यास प्रेरित करतात... आणि त्या स्पष्ट दिसणाऱ्या प्रतिकृतीला, जे स्पष्टपणे वचन रूपी ज्ञान श्रीप्रभुंनी आपल्या समोर ठेवले ते ज्ञान आपला आदर्श बनवण्याचे धाडस अंगी आले. हा या स्पष्ट दिसणाऱ्या डोळ्यावरच्या ज्ञानरुपी चष्माचा फायदा नक्कीच झाला...

                    ज्ञान असून अज्ञानाची पाठराखन करणाऱ्या समुहाला हा आपल्या कृतीतून दिलेला एक आदर्शवंत सुदंरसा सेल्फीच... पण काहींना तो ही विरोधकच वाटला हे ही तितकंच खरं...

                      कारण ...

         मी तो सेल्फी हा आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने... सेवादास्यच्या भावनेने घेतलेला... पंथीय हित डोळ्या समोर ठेऊन घेतलेला आपल्या मनाचा सेल्फी स्वतः काढलेला तो एक फोटो...

      तो कसाही पहा, कसाही त्याला निरखा, कितीही दोषारोप करा पण तो नितळच दिसणार... तो स्पष्टच असणार कारण तो सत्याच्या मार्गाचा सेल्फी, ज्ञानाच्या मार्गाचा सेल्फी...

          आपल्याला नजरेलाकमजोरी आली की डोळ्याला ताण जाणवू लागला की चष्म्याची गरज असते. त्याशिवाय आपल्याला दिसत नाही.

                     परंतु असे ही अनुभवले की डोळ्यावरचा चष्मा बाजूला करून थोड तरी पहावे. त्या चष्म्यामुळे आपण जवळचे स्पष्ट पाहू शकत नाही. कधी कधी त्यासाठी थोडा चष्मा बाजूला केला की सत्य परिस्थिती...नेमकी प्रतिमा नजरे समोर येते...

         आपले अज्ञान हेच की आपल्या जवळ ज्ञानाचा चष्मा असतो. आणि आपण गावभर शोधतो अज्ञानामुळे...

           कारण हेच की आपल्या आजूबाजूचे असे काही असतात की ते ज्ञान तुमच्याकडे आहे हे त्यांना समजते पण तुम्हाला मुर्ख बनवण्यात आपले ज्ञान वापरतात...

                     नविन वर्षाचे अनेक लोक भरपूर संकल्प करतात. पण ते फक्त एक दिवसासाठी आणि ते ही डायरी पुरते मर्यादित असतात हे मात्र इतकंच खरं...

                     अर्थात आपण ही त्यातीलच एक आहोत बरं...

          या माध्यमातून एकच सांगेन की चष्मा जरूर वापरा पण तो कसा... आपल्या स्वतः बरोबर पंथाच्या उज्वल भवितव्याचा...

                   चष्मा जरूर बाजूला सारा त्यावरील मळभ दूर करा ज्ञान पाहण्यासाठी...

                  चष्माचा वापर अज्ञान दूर करण्यासाठी करा...

                   चष्माचा वापर इतरांचे डोळे उघडण्यासाठी करा...

        आपले वेगळे अस्थित्व इतरांच्या दृष्टीस पडून त्यांची दृष्टी सुधारावी यासाठी सतकर्माचा चष्मा सतत डोळ्यावर ठेवा...

             आणि त्या डोळस दृष्टीने प्रेमाचा उपाय जोडा...

        आपण किती मोठे महान आहोत हे जगाला दाखवून परिस्थिती नका दाखवू...

आपल्या अचरणाशी बांधील असलेल्या कृतीतून परमेश्वराने स्वतः करून दाखवलेल्या आचरणाचे महत्व पटवून दाखवा...

           प्रभूच्या प्रत्येक वचनाची आठवण ही निवळ पाठांतरावर खूप पगडा असलेल्या भावनेतून किंवा खुप प्रभावी भाषणातून नव्हे तर तुमच्या कृतिशील आचरणातून समाजाला दिसू द्या...

                  ज्या दिवशी समाज तुमच्या भाषणाला, रडण्याला किंवा बडेजावास नव्हे तर तुमच्या परमेश्वराने सांगितले त्याप्रमाणे नित्य सुरू असलेल्या आचरण करतात हे बघून समाज बघेल त्या दिवशी तुम्ही परमेश्वराशी परिपूर्ण बांधील आहात याची जाणीव होईल...

           तो खरा हा परमेश्वर मार्गाचा प्रचार व प्रसार असेल...

       कारण... 

सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभुजी म्हणतात किंवा त्यांनी जे काही समाजसाठी लीळाचरित्र, सुत्रपाठ, इतर ग्रंथाचे माध्यमातून आपण जे वाचलं ते त्यांनी स्वतः अगोदर करून दाखवलं व इतरांना सूत्र समजून घेण्यासाठी इच्छा निर्माण केली तेव्हा ते आपल्या पूर्वजांच्या कृतीतून दिसलं...

        त्या कृतीतून स्मृतिस्थळ सारखा महनीय ग्रंथ सागर निर्माण झाला हेही तितकंच महत्वाचे लक्षात घ्यायला विसरू नका...

      म्हणून...

        प्रभूच्या सर्वच वचनाना जरी आठवता आचरता आलं तरी... एक दोन तरी परिपूर्ण आचार विचाराचे वचनाची आठवण सतत जगण्याची दिशा बनवा...

       तुमच्या आयुष्यात नवं पर्व असेल तोच तुमचा खरा वर्षारंभ असेल... त्यातूनच तुम्हास कैवल्य गडावर जाण्याचा मार्ग दिसेल...

       म्हणून च त्या प्रभूच्या वचनाशी इतके समरस व्हा की, आपल्या कडे कुणीच वक्र नजरेतून बघण्याची वेळच येणार नाही... त्यासाठी च आचरे तयाचा धर्म हे ब्रम्हवाणी लक्षात असू द्या...

दंडवत माझा देव श्रीचक्रधर...

सुरेश भाऊ डोळसे नाशिक

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post