संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit knowledge pandit
धन द्रव्य प्रशंसा
पूज्यते यदपूज्योऽपि यदगम्योऽपि गम्यते ।
वन्द्यते यदवन्द्योऽपि स प्रभावो धनस्य च ॥१०-३६॥
अर्थ - अपूज्य व्यक्तीची पूजा
केली जाते, जे जाणता येण्यासारखे नसते ते जाणले जाते, जो वंदनीय नाही ते वंद्य
मानले जाते हा सर्व धनाचा प्रभाव आहे.
अशनादिन्द्रियाणि स्यु: कार्याण्यखिलान्यपि ।
एतस्मात्कारणाद्वित्तं सर्वसाधनमुच्यते ॥१०-३७॥
अर्थ - भोजनामुळे
इंद्रिये तयार होतात (सशक्त होतात) व व सर्व कार्ये केली जातात (भोजन जसे सर्व
कार्यांचे साधन मानले जाते) त्याचप्रमाणे धन हे (सर्व गोष्टी साध्य करून देणारे)
साधन समजले जाते.
अर्थार्थी जीवलोकोऽयं श्मशानमपि सेवते ।
त्यक्त्वा जनयितारं स्वं नि:स्वं गच्छति दूरत: ॥१०-३८॥
अर्थ - हा
लोक धनाची इच्छा करणारा आहे. तो (त्यासाठी) स्मशानात सुद्धा रहातो. स्वत:च्या
वडिलांचा त्याग करून दरिद्री माणसापासून दूर जातो.
गतवयसामपि पुंसां येषामर्था भवन्ति ते तरुणा: ।
अर्थेन तु हीना ये वृद्धास्ते यौवनेऽपि स्यु: ॥१०-३९॥
अर्थ - ज्या
मनुष्यांचे वय झाले आहे (म्हातारे झाले आहेत) त्यांच्याकडे जर धन असेल तर त्यांना
तरुण समजले जाते व ज्यांच्याकडे धन नसेल ते तारुण्यात सुद्धा वृद्ध होतात.
टका धर्म: टका कर्म टका हि परमं तप: ।
यस्य गेहे टका नास्ति हा टका टकटकायते ॥१०-४०॥
अर्थ - रुपया
हाच धर्म, रुपया हेच कर्म व रुपया हेच श्रेष्ठ तप आहे. ज्याच्या घरी रुपया नसतो
अरेरे तो टकटक करतो.
यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन: स: पण्डित: स: श्रुतवान् गुणज्ञ: ।
स एव वक्ता स च दर्शनीय: सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ति ॥१०-१॥ (नी.श.)
अर्थ - ज्याच्याजवळ
धन.
द्रव्य, संपत्ती असते तो मनुष्य घरंदाज, कुलीन, पंडित, विद्वान, शास्त्रज्ञ, जाणता, काव्यरसिक, साहित्याचार्य वाक्पटु चातुर्यसंपन्न व सुंदर रूपवान
ही समजला जातो. कारण सर्व गुण द्रव्यावर अवलंबून असतात.
बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितै काव्यरसं न पीयते ।
न च्छन्दसा केनचिद्धुतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणा: ॥१०-२॥
अर्थ - भूक
लागलेल्यांकडून व्याकरण खाल्ले जात नाही. तहानेने व्याकुळ झालेल्यांकडून काव्यरस
प्यायला जात नाही. छंदाच्या अभ्यासाने कोणाचे घराणे उद्धरले जात नाही. म्हणून तू
सोने (पैसा) मिळव. (केवळ) गुण निरर्थक होत.
माता निन्दति नाभिनन्दति पिता भ्राता न सम्भाषते
भृत्य: कुप्यति नानुगच्छति सुत: कान्ता च नालिङ्गते।
अर्थप्रार्थनशङ्कया न कुरुते संभाषणं वै सुहृत्
तस्माद् द्रव्यमुपार्जयस्व सुमते द्रव्येन सर्वा वशा: ॥१०-३॥
अर्थ - (धन नसेल तर) आई निंदा
करते, पिता आदर करत नाही, भाऊ संभाषण करत नाही, सेवक कुपित होतो, मुलगा आज्ञा पाळत
नाही तर पत्नी आलिंगन देत नाही. द्रव्याची याचना करील या भीतीने मित्र संभाषण करत
नाहीत. म्हणून हे सुमते, द्रव्य मिळव, कारण द्रव्यानेच सारे वश होतात.
धनमर्जय काकुस्थ धनमूलमिदं जगत् ।
अन्तरं नैव पश्यामि निर्धनस्य मृतस्य च ॥१०-४॥
अर्थ - हे
काकुस्थकुलोत्पन्ना रामचंद्रा, धन मिळव, कारण या जगाच्या मुळाशी धन आहे. निर्धन
मनुष्य व मृत मनुष्य यात मला काहीही फरक दिसत नाही.
वाणी दरिद्रस्य शुभाहितापि ह्यर्थेन शब्देन च सम्प्रयुक्ता ।
न शोभते वित्तवत: समीपे भेरीनिनादोपहतेव वीणा ॥१०-५॥
अर्थ
- दरिद्री माणसाची वाणी कितीही शुभदायक,
हितकारक, (गर्भित) अर्थाने व (प्रगल्भ) शब्दांनी संपृक्त असली तरी ज्याप्रमाणे
ढोलाच्या (कर्णकर्कश्य) आवाजासमोर जशी (मधुर स्वरमय) वीणा निष्प्रभ ठरते
त्याप्रमाणे ती श्रीमंत मनुष्यासमोर फिकी पडते. ।।