इतरांच्या मृत्यूने आनंद साजरा करणारा मनुष्य
स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या या धूर्त माणसाला स्वतःच्या
मरणाची भीती वाटते. आणि गोडीने चव घेऊन मांसाहार करणारा माणूस इतर प्राण्यांच्या
मृत्यूचा आनंद साजरा करतो. इतरांच्या मरणाची चव चाखणारा मनुष्य....
माफ करा थोडे कठोर लिहतो आहे. पण मनात आले म्हणून व्यक्त होतो आहे.
माणसाला स्वतःचा मृत्यू आवडत नाही, पण तोच माणूस इतरांच्या मृत्यूची चव घेतो आहे.
स्वतः मृत्यूला तयार नसणारा हा धूर्त मनुष्य इतरांना
स्वतःच्या जीभेचे चोलले पुरविण्यासाठी मारतो.
इतरांना मारणे हे जणुकाही कर्तव्यच, हक्कच समजतो. शेळी, तितर,
कोंबडी, गौ, हरीण,
मासे इत्यादि असंख्य प्राण्यांचा मारून त्यांच्या मांसाचा आस्वाद घेणारा
हा राक्षसच नाही का!!
पुर्विच्या काळी राक्षस लोक सामान्य माणसांना मारून
त्यांचे मांस भक्षण करायचे. एकचक्रा नगरीतल्या बकासुर नावाच्या
राक्षसाला गाडीभर अन्न आणि एक जिवंत धष्टपुष्ट मनुष्य खाण्यासाठी लागला. तेव्हा भीमाने त्याचा वध करून त्याचे हे दुष्कर्म बंद केले. तसेच आताही काळीरूपी भीम कधीना कधी येऊन आपले दुष्कर्म
बंद करतोच.
आपण आतापर्यंत मृत्यूची कितीतरी चव चाखली आहे.
या चवीने
व्यवसायाचे मृत्यूमध्ये रूपांतर केले. कुक्कुटपालन, मत्स्यपालन,
शेळीपालन, कुक्कुटपालन.
या व्यवसायांना ‘पालन’ हे गोंडस नाव देण्यात आले आहे. नाव ‘पालन’
आणि हेतू ‘खुन’ आहे. कत्तलखानेही उघडले
गेले, तेही अधिकृत, सरकारमान्य. नॉनव्हेज
रेस्टॉरंट रस्त्यावर उघडले आहे, हा मृत्यूचा धंदा नाही तर
दुसरं काय? मृत्यूला घाबरणारा माणूस मुक्या जीवांच्या
मृत्यूचा व्यवसाय करतोय.
तो असहाय जीव (प्राणी) स्वतःच्या मनातले व्यक्त करू शकत नाही, स्वतःचे संरक्षणही करू शकत नाही, आणि अशा किव करण्यायोग्य प्राण्यांची असाहयता हीच माणसाने आपली ताकद मानली आहे.
त्यांना भावना
नाहीत का?
तेही उसासे टाकत नाहीत का!!
पण त्या आपल्याला कळतील कशा? कारण माणूसच भावनाहिन झाला की त्याच्याकडून
कसलीही किवेची अपेक्षा करता येत नाही.
जेवणाच्या डायनिंग टेबलावर
लेगपिस ताव मारून बाप मुलांना शिकवतो की, बेटा, कधी कोणाचं मन दुखवू नकोस. कोणाचाही तळतळाट घेऊ नकोस! आपल्यामुळे
कोणाच्याही डोळ्यात अश्रू येऊ नयेत. असे आपण वागावे.
व्वा रे हुश्शार ! आपल्या मुलांमध्ये असले
कोरडे शब्द, खोटे संस्कार रुजवणाऱ्या बापाला आपल्या हातातील ते
चिकनलेगपिस दिसत नाही, तो बाप हा विचार करत नाही की, हातातील
चिकन हे आधी शरीर होते, त्यातही आत्मा होता,
त्या जीवाला मारून त्याच्या देहाच्या मांसावर ताव मारून तो म्हणतो की, कोणालाही दुखवू
नये?
आता पशु पक्षांचे मांस खाताना आपल्याला त्यांचे आक्रोश ऐकू येत
नाही, तसे यमदूतच माणसाला नरक भोगवतात आक्रोश करतो, ओरडतो...
पण ऐकायला कोणी नसते. यमदूत हसतात आणि याला उभा कापतात.
कोराना आल्यापासून पक्षी किलबिलाट वाढला आहे. या पृथ्वीतलावर त्यांनी पहिल्यांदाच स्वतःचे जीवन हक्काने उपभोगत आहेत. झाडे, झुडपं, वेलींना जणु नवजीवन मिळाले आहे. पृथ्वीला श्वास घेणेही सोपे झाले आहे.
विश्वाच्या निर्मात्याने निर्माण केलेल्या
करोडो आजारांपैकी एक असलेल्या कोरोनाने आपली स्थिती बिघडवली. माणसाची घरात घुसून मारहाण करून हत्या केली. आणि
आपण त्याचे काहीही बिघडवू शकत नाही.
आता मात्र
मात्र माणसाला देव आठवतोय..?
माणसे मरत आहेत, मृत्यूचे भय आहे म्हणून देवासमोर घंटा वाजवत आहे, प्रार्थना करत आहे, आणि आम्हाला वाचवण्याची, रक्षण करण्याची याचना करत आहे. अशा माणसांना पशुंचे प्राण घेतांना देव आठवत नाही.
काहीतर देवाला दोष देत आहेत, ‘‘देवाने असा आचार का निर्माण केले.
माणसं मरत आहेत, देवाला किव कशी येत नाही, याचा अर्थ देव नाही.’’ भितीने इत्यादि बरळत
आहे. प्राण्यांचे प्राण घेताना हे का आठवत नाही. करावे तसे भरावे. कर्माचे फळ व्याजासहीत
मिळते. तसुभरही कमी होत नाही.
मासांहाराचा पुरस्कार करणाऱ्या एका अज्ञान माणसाचा अन्यथा युक्तीवाद असा की, फळे आणि
भाज्यांमध्येही जीव असतो मग ते काबरं खाता? तेही मांसच
आहे.
त्याला उत्तर असे की, फळे आणि भाजीपाला
जंतुसंसर्ग करत नाहीत आणि कोणत्याही जीवाला जन्म देत नाहीत. त्यामुळे त्यांचा आहार
योग्य असतो. तो मांसाहार नाही. शाकाहार आहे.
देवाने फक्त माणसालाच बुद्धी दिली. जेणेकरून सर्व योनींमध्ये भटकल्यानंतर तुम्हाला मनुष्य योनीतील
जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. पण ही मनुष्य जन्म मिळताच
हा माणूस स्वतःलाच देव समजायला लागतो.
आज मृत्यू कोरोना, कॅन्सर, इत्यादि भयानक
रोगांच्या रूपाने आपल्यासमोर उभा आहे.
आपण निसर्गाला जे
देतो, निसर्गही तेच
आपल्याला परत करेल. आपण निसर्गाला मरण दिले
आहे, म्हणून निसर्गही त्याची परतफेड केल्याशिवाय राहणार नाही.
शाकाहारी आणि सात्विक आहार घेणाऱ्या मनुष्याचे ऐहीक पारलौकीक दोन्ही
जन्म सुखी होतात.