मैत्रीचे नाते.....
एकदा मी तात्कालिन श्रेणीतील मित्राचा पासपोर्ट घेण्यासाठी
पासपोर्ट कार्यालयात गेलो होतो.
पण आमचा नंबर येताच त्या ऑफिसर ने खिडकी बंद केली ‘आणि वेळ संपली, आता उद्या काम
होईल’ असे सांगितले. मी त्याला विनंती केली, ‘‘साहेब सकाळपासून मी इथे उभा आहे, आज तुम्ही माझा संपूर्ण दिवस वाया घालवला आहे आणि माझे फक्त फि जमा करून फॉर्म सबमीट करायचा
बाकी आहे, ५ मिनिटाचे काम आहे, कृपया फी जमा फॉर्म
सबमीट करून घ्या.’’
तो साहेब अचानक भडकला, क्रोधाने लाल झाला आणि म्हणाला- ‘‘तुझा दिवसभर तू इथे घालवलास
तर त्याला मी काय करू? मी जबाबदार आहे का?
इथे माणसं कमी आहेत, मी मी ही सकाळपासून कामच करतो आहे, एक तर सरकार अजून लोकांना भर्ती
करत नाही. वरून तू डोकं खातो आहे’’
त्याचे हे बोलणे ऐकून माझा मित्र खूप निराश झाला
आणि म्हणाला ‘चल उद्या येऊ.’
मी त्याला थांबवले, म्हणालो ‘‘थांब, मला अजून एकदा प्रयत्न करू दे. मी समजावतो
त्याला’’
तो साहेब बॅग घेऊन उठला होता. मी काहीच बोललो नाही, शांतपणे त्याच्या मागे मागे
गेलो.
तो एका कॅन्टीनमध्ये गेला, तिथे त्याने बॅगेतून जेवणाचा डबा काढला आणि हळू हळू एकटाच जेवू
लागला.
मी जाऊन त्याच्या समोरच्या बाकावर बसलो. मी म्हणालो की, साहेब माफ करा,
तुमच्यात मला माझा मित्र दिसतो आहे, एकेरी बोलतो आहे, ‘‘मित्रा! तुला
खूप काम आहे, तुला रोज अनेक नवीन नवीन लोक
भेटतात ना?’’
तो म्हणू लागला की ‘‘हो मी मोठमोठ्या अधिकाऱ्याना भेटतो.
अनेक आयएएस, आयपीएस, आमदार, खासदार येथे रोज येतात. माझ्या खुर्चीसमोर मोठे लोक थांबतात.’’ तो फुशारकीने सांगू लागला.
मग मी त्याला विचारले की, ‘‘मला पण भुक लागली आहे, मी तुझ्या ताटातली
पोळी खाऊ का?’’
तो ‘हो’ म्हणाला.
मी त्याच्या ताटातून एक चपाती उचलली आणि भाजीबरोबर खायला लागलो.
मी त्याच्या जेवणाचे कौतुक केले आणि म्हणालो की तुझी बायको खूप छान चविष्ट जेवण बनवते.
त्यावर त्याने काहीच उत्तर दिले नाही. एव्हाना तो बराच शांत
झाला होता.
मी त्याला म्हणालो की तू एका महत्त्वाच्या सीटवर बसला आहेस. मोठी माणसे तुझ्याकडे येतात. म्हणून तू तुझ्या खुर्चीचा
मान ठेवतो का? तू खूप नशीबवान आहेस,
तुला इतकी महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे,
पण तु तुझ्या पदाचा आदर का करत नाही?
त्यांनी मला विचारले की, ‘‘तू हे असे- कसे बोलतोयेस? ’’
मी म्हणालो की, ‘‘ तुला जे काम दिले आहे त्याबद्दल तुला आदर असता तर तू असा वागला नसता, चिडचिड
केली नसती, बघ,
तुला कोणी मित्रही नाहीत. तु ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये एकटेच जेवत
आहेस, खुर्चीतही निराश होऊन बसला होता, लोकांची
कामे पूर्ण करण्याऐवजी अडकवण्याचा प्रयत्न करत होतास. सकाळपासून त्रस्त असलेल्या लोकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष्य करून तु म्हणतोस,
‘सरकारला सांगा अजून लोकांना भर्ती करायला. एकट्याला एवढे काम होत नाही’ म्हणून त्यांच्यावर चिडचिड करतोस अरे,
भल्या माणसा! जर जास्त लोक बहाल केले
तर तुझे महत्व कमी होईल.
कदाचित हे काम तुझ्याकडूनच करवुन घेतले जाऊ शकते. असा विचार तु का
करत नाहीस? देवाने तुला चांगले नाते निर्माण करण्याची
संधी दिली आहे, समाजात तुला प्रतिष्ठीत होण्याचा चान्स दिला आहे,पण तुझे दुर्दैव बघ,
त्याचा फायदा घेण्याऐवजी तू लोकांचे मनं दुखावून नाते बिघडवत आहे. माझे
काय, माझे काम आहे म्हणून मी उद्या ना परवा येईनच. पण तुला लोकप्रिय बनवण्याची संधी आहे, ती तू
गमावत आहेस, तू चुकतो आहेस, तु या नोकरी कडे फक्त नोकरी म्हणून पाहू नकोस, ही नोकरी म्हणजे तुझ्यासाठी
समाजात प्रतिष्ठा, नाव कमावण्याची सूवर्ण संधी आहे.’’
तो शांतपणे
ऐकत होता.
पुढे मी म्हणालो की ‘‘तू खूप पैसे कमावशील,
पण चांगली माणसं, जेष्ठांचे
आशिर्वाद कमावले नाही तर सगळं व्यर्थ आहे. नुसत्या पैशाचे काय करणार? अनेक करोडपती आहेत जे शेवटी मरताना एकटेच
मरण पावले, शेजाऱ्यांनाही कळले नाही, हा कधी मेला. घरातून वास सुटला तेव्हा कळले. म्हणून
जर तू तुझी वागणूक योग्य ठेवली नाही, तर तुझे कुटुंबीयही तुझ्यावर नाराज होतील,
मित्र तर आधीच नाहीयेत.
माझे बोलणे ऐकून त्याचे डोळे पाणावले. तो म्हणाला की, ‘‘सर तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी एकटाच आहे. बायको भांडून
माहेरी गेली आहे. मुलांनाही मी आवडत नाही.
आई आहे, ती सुद्धा
फारशी माझ्याशी बोलत नाही. सकाळी ती चार-पाच पोळ्या करते आणि ताट वाढून ठेवते, मी एकटाच बसून जेवतो. मला रात्री घरी जावेसेही वाटत नाही.
समजत नाही नेमकं चूकते कुठे आहे?’’
मी हळूवारपणे स्वतःला सांगितले की, ‘‘लोकांशी संपर्क साधण्याचा
प्रयत्न कर, जर तु एखाद्याला मदत करू शकत असशील
तर नक्की कर. हे बघ, मी इथे माझ्या मित्राच्या पासपोर्टसाठी आलो आहे.
माझ्याकडे पासपोर्ट आहे. मी तुला निःस्वार्थपणे मित्रासाठी विनवणी
केली होती.. मित्रांशी मी निःस्वार्थपणे वागतो
म्हणूनच माझे मित्र आहेत, तुही तसं कर पहा जीवनात अत्यंत सुखी समाधानी होशील’’
तो उठला आणि मला माझ्या कॉन्टरजवळ येण्यास सांगितले. मी आजच फॉर्म
सबमिट करेन म्हणून त्याने ते काम लगेच केले.
मग त्याने माझा फोन नंबरही मागितला, मी दिला.
पुढे अनेक वर्षे गेली...
या दिवाळीत त्याचा ध्यानी मनी नसताना अचानक फोन आला.
‘‘रवींद्रकुमार चौधरी बोलत आहेत सर!!’’
खूप वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये एका मित्राच्या पासपोर्टसाठी आला होतास आणि माझ्यासोबत जेवनही केले
होते. त्याच्या बोलण्यावरून तो खुप आनंदी आहे असे वाटत होते. पुढे तो
म्हणाला - साहेब तुम्ही त्यादिवशी निघून गेलात,
मग मी खूप विचार करत राहिलो. मला जाणवले की खरंच आपण
पैसा खुप कमावतो, पण सोबत जेवायला कोणीच नाही. माझी चुक मला जाणवली. साहेब मी दुसऱ्याच दिवशी पत्नीच्या माहेरच्या घरी गेलो,
खूप विनवणी करून, तिची
क्षमा मागूनल तिला घरी आणले, ती यायला अजिबात तयान नव्हती,
तिच्या घरचेही मान्य करत नव्हते.
पण मी खुप रडून तिला जेव्हा म्हणालो, ‘मला खरंच तुझी खुप गरज आहे’ तेव्हा तीला पाझर
फुटला, आणि ती माझ्यासोबत आली. मुलेही
त्यांची इच्छा नसताना आली.
घरी आल्यावर
तिने स्वयंपाक केला, ती जेवायला बसली तेव्हा मी तिच्या ताटातून एक पोळी उचलली, आणि म्हणालो की, ‘‘मला खायला भरवशील का?
आपण सोबत जेवण करू, प्लीज’’
माझे बोलणे ऐकून ती आश्चर्यचकित झाली, रडू लागली. माझ्यातला
हा बदल तिला अनपेक्षित होता. तिचे आनंदाश्रु गालावरून ओघळत होते.
सर!! आता मी पैसेच कमवत नाही तर नातीही कमावतो. जे
मिळेल ते काम करतो. सर्वांचे काम करतो, वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेतो. तेव्हापासून
जीवन अगदी आनंदीत झाले आहे.
सर,
आज मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आहे.
पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचे लग्न आहे. तुम्ही माझ्या मुलीला आशीर्वाद द्यायला या. आज माझ्या जीवनातला आनंद फक्त तुमच्यामुळेच आहे, नक्की या सर!’’
मी जाणारच होतो.
मला कधीच असे वाटले नव्हते की, आयुष्यात पैशापेक्षा
नाते वरचढ ठरेल.
मित्रांनो!! मला माहीत नाही मी चांगला मित्र आहे की नाही!!
परंतु
मला खात्री आहे की मी ज्यांच्याशी मैत्री करतो...
ते माझे मित्र नक्कीच चांगले आहेत.
सर्वांना जय श्रीकृष्णा