गडगडाट

गडगडाट

 गडगडाट


दंडवत...


आजच्या लेखनातून सध्याच्या परिस्थितीत आपल्या च सभोवताली सुरू असलेले वास्तव आपल्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहे...


                       तुमच्या लक्षात आल्यास नक्कीच त्यास लक्षात घ्या...

                       दुःखावर फुंकर मारताना काही कशी आयजीच्या जीवावर बायजी उद्धार करून घेतात अस काहीस चित्र तुमच्या लक्षात येईल...


कारण...

                आपण दैनिक व्यवहारात ह्या गोष्टींचा नेहमीच अनुभवलं जसे...


"नाणी" ही नेहमी मोठा आवाज करत असतात...


तर


"नोटा ह्या अतिशय शांत असतात...


कारण ...


ज्याला "जास्त किंमत" असते...

ते कधीच "ओरडून सांगत" नाही...


मात्र


ज्यांना "फारशी किंमत" नसते...

तेच "मोठ मोठ्याने ओरडून ...

आपलं महत्व" सांगत असतात...


हे वाक्य काही माझं नाही बरं...


                        तर हे बहुमोल व प्रेरणादायी बोल आहेत जेष्ठ संत विचारवन्त अध्यात्मिक गुरू स्वामी विवेकानंद यांची ...


                        समजून घ्या असेच काही लोकांच्या बाबतीत घडतंय रोजच आपल्या कधी तरी केलेल्या मदतीच्या किंवा आपल्या बांधवांच्या आजरपणातील मदतीला इतकं जाहिरात करून मिरवले जातंय की बस ...


व लोकांना सांगत सुटायचं हे आम्ही केलं आमची संस्था अशी आहे... यासाठी अमुक पोस्ट बघा... 


                      मला तर असे सांगायच त्याना तुम्ही केलं असेल तर ते कार्य तुम्ही एकदा समाजास सांगितलं हो...

                      तेच तेच पोस्टर सतत सतत समाजास दाखवण्याची गरज का पडावी...

                      तुम्ही ज्याचे साठी ती मदत केली, ज्यांचे दुःखात धावले ते तुम्हांस उचलून धरतील, ते समाजाला सांगतील...

                      आम्हास अमुक समूहाचे मदतीचा लाभ भेटला...

                      पण इथं चित्र मात्र वेगळंच हो...


                      याचा अर्थ काय समजावा हे कोडं तर उलगडण्या पलीकडेच ...

                      या विदारक चित्रातून मलाच काय तर अनेकांना हेच दिसलं की,

                     यांना समाज स्वीकार करेल की नाही याचीच खात्री नाही ...

                      मी तर त्याही पलीकडे जाऊन सांगेल समाज सज्ञान आहे अज्ञान नाही त्यास चांगलं वाईट यातील फरक चांगला समजतो...

                     माणसाने कार्य करून बाजूला व्हायच असतं, ज्यांचे साठी केलं ना ते त्यांच्या तोंडून ते ऐकायला मिळायला हवं, ते सत्य व वास्तव असतं...

                     त्याही पलीकडे जाऊन एक त्याच माध्यमातून घडलेला प्रसंग नक्कीच सांगायचा कारण काही ना न केलेल्या कामाची कशी संधी लुटता येते तेच बघा...

                     कोरोनाच्या काळात एक साधक कोरोनाच्या आजारात देह सोडून गेले होते...

                    दुसरी लाट किती भयानक होती हे तुम्ही सर्वांनी अनुभवलं...

                   परंतु समाज इतकाही अद्यापही निष्ठुर नाही किंवा कधी कोणती मदतीला जायला हवं याचं ही भान नक्कीच ठेवून आहेत...

                    काही महाशयांनी तर कहर च केला होता हो...

                    त्या देह सोडून गेलेल्या साधकाच्या मृत शरीराची अंतिम सेवा काही अच्युतगोत्रीय करत असताना एक महाशय तोंडावर उपरणे बांधून पाच फुटावरून डायरेक्शन देण्याच काम करत होते व ज्यावेळी त्या साधकांना खाली खड्यात ठेवण्यात आलं त्यावेळी हेच हातावर हात ठेवून उभे असलेले एक व्यक्ती च्या माध्यमातून त्या खड्यात ठेवलेल्या साधकांच्या मृत शरिराबरोबर फोटो काढण्यात व्यस्त होते... 

                      कहर च आणखीन पुढं आहे हो...

                      त्या साधकाला मूठमाती देतोय न देतो तोच ह्या महाशयाची फेसबुकवर व्हाटसपला पोस्ट ही व्हायरल...

                     आताच अमुक अमुक साधकांची अंतिम सुश्रुषा करून आलो व त्या मृत साधकाच्या सोबतच्या सेल्फी व फोटो चा वर्षाव ग्रुपवर करून समाज मान्यता सुरू करण्याचा गडगडाट सुरू होतो याला काय समजावं...

                      याचा अर्थ काही ना मेलेल्या व्यक्तीचा ही कसा उपयोग करायचा यांची मोठी संधी चा फायदा घ्यायचा हे च ना...

                      अहो समाजात हे लपत नसतं...

                      त्याही पलीकडे तो परब्रम्ह परमेश्वर सगळं बघत असतो याचं कधी तरी विचार करा...


                      मला आजच्या ह्या सत्य घटनेतून तुम्हाला आजच्या या लेखनातून एकच सांगायच आहे...

                       तुम्ही कोणत्याही प्रकारची सेवा करा. तुम्ही केली हे सत्य असेल तर तुम्हास सांगायची गरज पडत नाही ती समाज बघत असतो त्याही पलीकडे ज्याचे साठी केली किंवा त्याचे जवळची सांगत असतात. तुम्हास त्याच जाहिरात बाजी करण्यासाठी धावाधाव करण्याची आवश्यकता नसावी...


कारण एक लक्षात घ्या...


"इतरांना मदत करणे" आणि "चांगले सुष्ट कर्म" ते आवाज, गाजा वाजा न करता निर्हेतूक बुद्धीने केले तर, त्यातून निर्माण होणारे "माधुर्य" सुख श्रेय श्रुंघार आणि "स्वस्थता समाधान" अतुलनीय, अनिर्वचनीय असते...


                   त्यावेळेस मिळणार समाधान व त्यातून मिळणार फळ याची गणना ही तुम्ही करुच शकत नाही...

                    तो देणारा परमेश्वर योग्य वेळी इतकं भरभरून देतो की त्याच स्वीकार करण्यासाठी आपलं गोदाम कमी पडेल...

                     ते असतं कैवल्य धाम, साधन दात्याचे प्रेम...

                      म्हणून च आजच्या या लेखनातून मी जे वास्तव आपल्या समोर मांडले आहे असं कधीच घडू देऊ नका...

                      कर्म अस करा की, ते परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानास अनुसरून असेल त्यात चांगलं वाईट यातील फरक कळलेला असेल...

                      परमेश्वराने सांगून ठेवलेलं आहे... कर्म करत रहा... फळाची अपेक्षा करू नका...

                       तुम्ही जेव्हा अश्या पद्धतीने आपलं कर्म करत रहाल त्यावेळी तुमचा हा प्रवास कैवल्याची शिडीवर चढणारा असेल...

दंडवत... माझा देव श्रीचक्रधर... sd

आपलाच... प से सुरेश डोळसे नाशिक

========

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post