श्रीकृष्णांनी युधिष्ठिरास सांगितले की, महाभारताचे युद्ध का झाले?
महाभारताचे महायुद्ध संपल्यानंतर हस्तिनापुरात पांडवांच्या राज्याभिषेकानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत जाऊ लागले. तेव्हा धर्मराजा युधिष्ठिर आपल्या रथावर स्वार झाला आणि त्यांना सोडण्यासाठी काही अंतरापर्यंत गेला. भगवान श्रीकृष्णांनी पाहिले की, धर्मराजाच्या चेहऱ्यावर दुःख होते. भगवंतांनी हसून विचारले, "काय झालं भ्राता? आता राज्याभिषेक झालेला आहे, या संपूर्ण पृथ्वीचा तू राजा आहेस तरी तू अजून खुश नाहीस?"
यावर धर्मराजा म्हणाला' " हे मधुसूदना ! आनंदी होण्याचा अधिकार आहे का मला? या महाभारत युद्धात मी जिंकूनही हरलो आहे, हे केशवा ! जे झालं ते सर्व ठीक होतं का?" सत्त्वशील राजा युधिष्ठिराचे उत्तर अतिशय हृदयस्पर्शी होते.
यावर भगवान श्रीकृष्ण हसले. आणि म्हणाले, "काय झालं भ्राता! तू का गोंधळात पडलायेस? किंकर्तव्यमूढ होण्याचे कारण काय? "
यावर युधिष्ठिर म्हणाला, " हे मनोहर हास्य असणाऱ्या श्रीकृष्णा! हसून विषय टाळू नकोस, किंवा विषय बदलू नकोस, माझ्या विजयासाठी या महायुद्धात तुम्ही जी काही कामे केलीत ते योग्य होते का? पितामह भीष्मांचा वध करणे, निशस्त्र कर्णाचा वध करणे, द्रोणाचार्याचा वध करणे, अर्जुनाचे रक्षण करण्यासाठी भीमाचा पुत्र घटोत्कचाला करणाच्या वासवदत्ता शक्ती समोर करणे, हे सर्व ठीक होते का? तुम्हाला याबद्दल खेद वाटत नाही का? आम्हा पांडवांच्या व मजसारख्या मोठ्या भावाच्या मोहामुळे तुम्ही जे करायला नको होते ते केले?" धर्मराज युधिष्ठिराने मोठ्या भावाच्या अधिकारवाणीने असला कठीण प्रश्न विचारत होता.
भगवान श्रीकृष्ण गंभीर झाले. ते म्हणाले, "हे भ्राता गोंधळात तू पडू करू नकोस, भावा! हे युद्ध तुझ्या राज्याभिषेकासाठी लढले गेले होते का? नाही! तुझ्या राज्याभिषेकासाठी हे युद्ध मुळीच लढले गेलेले नाही जर तू असे मानत असशील तर तू हे डोक्यातून काढून टाक. कारण सांप्रतच्या काळातील पृथ्वीवरच्या करोडो लोकांमध्ये तू फक्त एक सामान्य माणूस आहेस. जरी तू स्वत:ला राजा समजत असला, तरीसुद्धा या जगात असंख्य राजे आहेत आणि असंख्य पुढे होणारच आहेत. मग जगातल्या इतक्या लोकांच्या गर्दीत मी फक्त तुझ्या एकट्यासाठी युद्ध का करू?
भगवंतांचे हे बोलणे ऐकून राजा युधिष्ठिराला धक्काच बसला. व तो क्षीण आवाजात म्हणाला, मग? मग हे महाभारत का घडले? इतके असंख्य युद्ध का मारले गेले, माझे पाचही पुत्र मारले गेले, द्रौपदीचा भाऊ मारला गेला, अभिमन्यू मारला गेला, हे सर्व का झाले? दुर्योधना सहित सर्व शंभर चुलत भाऊ मारले गेले, पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य संपूर्ण इत्यादी सर्व श्रेष्ठ पुरुषांसह संपूर्ण वंशच नष्ट झाला? हे सर्व काबरं झाले?
असे युधिष्ठिर अधीर होऊन एका मागे एक प्रश्न करत होता आणि भगवंत स्मित हास्य करत त्याचे बोलणे ऐकत होते, धर्मराजाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
भगवंत म्हणाले, "हे युद्ध तुझ्या राज्य स्थापनेसाठी नाही तर धर्माच्या स्थापनेसाठी लढले गेले आहे. हे भविष्यकाळ डोळ्यासमोर ठेवून जीवनसंघर्षाचे, धर्मरूप जीवन जगण्याचे नवे नियम प्रस्थापित करण्यासाठी लढले गेले आहे.
भविष्यातील भारताला विजय हाच धर्म आहे हे समजावे म्हणून महाभारत घडले आहे. आणि शेवटी धर्माचाच विजय होतो हे सांगण्यासाठी हे युद्ध लढले गेले आहे. कितीही प्रयत्न केला तरी अधर्मी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही हे सर्वांना दाखवण्यासाठी हे युद्ध लढले गेलेले आहे. स्वार्थापोटी लोभापायी धर्म सोडू नये हे पुढच्या भारताला दाखवण्यासाठी हे युद्ध लढले गेलेले आहे.
आणि हे धर्मराजा हे शेवटचे धर्मयुद्ध आहे! कारण धर्माच्या छत्रछायेखाली झालेले हे शेवटचे युद्ध आहे. भविष्यकाळातील भारतावर अशा दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे आक्रमण होईल की ते केवळ सैनिकांवरच नव्हे तर निष्पाप नागरिक, अबला स्त्रिया, लहान मुलांनाही त्यांचे रानटी हल्ले सहन करावे लागणार आहेत. ते असभ्य असंस्कृत लोक भारतातील प्राचिन सभ्यतेवर आणि संस्कृतीवरही हल्ला करतील.
त्या युद्धांमध्ये भारतातले राजे बरोबर की चूक योग्य की अयोग्य या भ्रमात पडून जर मानसिक दृष्ट्या कमकुवत झाले आणि त्या युद्धांमध्ये पराभूत केले गेले, तर त्याची शिक्षा संपूर्ण भारतीय संस्कृतीला पुढील युगानुयुगे भोगावी लागेल.
आश्चर्यचकित होऊन राजा युधिष्ठिर शांतपणे भगवान श्रीकृष्णांकडे पाहतच राहिले. पुढे श्रीकृष्ण भगवंत म्हणाले, " नंतर सर्व अर्थाने पराभूत झालेल्या भारत देशाला आपली संस्कृती वाचविण्यासाठी आपल्या मुलांमध्ये संस्कार रूजवावे लागतील, हे धर्मराजा! मानवता आणि धर्माच्या रक्षणासाठी मुलांचे योग्य संगोपन आणि मुलांना धार्मिक शिक्षण देणे हाच एकमेव पर्याय आहे.
या जगात एकच आर्य परंपरा, हिंदू संस्कृती आहे जी सर्व प्राण्यांवर दया कशी करावी? हे जाणते, जर ती संस्कृती जर संपली तर. त्यामुळे दुर्बलांची प्रतिष्ठाही वाचणार नाही, आणि जीवही वाचणार नाही. म्हणून मुलांना धर्माचे शिक्षण देणे सहानुभूती दया प्रेम स्नेह शमा या सर्वांविषयी चे यथा योग्य संस्कार मुलांच्या ठिकाणी रुजवणे हेच समाजातील प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य असले पाहिजे. म्हणून हे युद्ध हा धर्माचा नाश करून धर्माची संस्थापना करण्यासाठी लढले गेलेले आहे तुझ्या एकट्यासाठी लढले गेलेले नाही म्हणून तू निष्कारण चिंता करू नकोस तू या युद्धाचा निमित्तमात्र होतास.
युधिष्ठिर स्तब्ध झाला, श्रीकृष्णाने त्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, "प्रत्येक माणूस त्याच्या काळातील घटनांचा साक्षीदार असतो. आणि आणि आपल्या प्रत्येक पाप रूप पुण्य रूप कर्मांचा तो जिम्मेदार असतो. म्हणून प्रत्येक पापाचा भोग त्याला जसाच्या तसा भोगावा लागतो. धृतराष्ट्राचे शंभर ही पुत्र अधर्मी होते. त्यांनी जी पापा केली ती त्यांना भोगावी लागली. आणि या काळाने त्यांना यथायोग्य शिक्षा दिली ते त्याच शिक्षेच्या लायक होते. ते जर जिवंत राहिले असते तर जगात हा धर्मच फोफावला असता आणि पितामह भीष्म गुरु द्रोणाचार्य हेही या धर्माच्याच पक्षात लढत होते किंवा अधर्म पाहूनही मौन होते म्हणून तेही त्या पापाचे भागीदार होते त्यांनाही त्याची शिक्षा मिळाली”
इतके बोलून भगवंत मौन झाले थोडे पुढे गेल्यावर रथ थांबला युधिष्ठिर रथातून उतरला भगवान श्रीकृष्णांना घट्ट आलिंगन देऊन आपल्या रथात बसला. व हस्तिनापुर कडे निघाला त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती मनातील चिंतेचे मळभ निघून गेले होते. त्याचा चिंतित चेहरा आता शांत झाला होता. यथायोग्य राज्य चालवण्यासाठी पुढील धार्मिक शिक्षण केंद्रे गुरुकुल यांची निर्मिती कशी करता येईल याबद्दल विचार करत करत तो हस्तिनापूरला पोहोचला.