भक्तीची खरी व्याख्या काय?
What is devotion&bhakti?
Mahanubhav panth dnyansarita
दंडवत...
आजच्या लेखनातून आपण भक्ती करताना नेमकी कशी व काय करावी... यावर नजर टाकण्याचा प्रयत्न... आजची भक्ती ही स्वार्थ पर भक्तीचे ओघळवाने प्रदर्शन मांडणारी भक्ती होत असल्याचे जागोजागी दिसत आहे...
कारण भक्त कसा असावा, भक्ती कशी असा यावर आपण जेव्हा चरित्राचे माध्यामा तून अनुभवलं आहे च, तरी अनेकांनी भक्तीचे नावाखाली भीतीचे ही लोळ उठवून अनेकांना अंधश्रद्धायुक्त भक्तीचे बाजारीकरण मांडून परमेश्वरीय श्रीमुखातील वचनाचा अर्थच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला असं म्हंट्यावर वावग ठरणार नाही. त्यासाठी भक्ती व भक्त कसा असावा यावर टाकलेली ही अल्पसी नजर...
भक्तांची व्यथा परमेश्वर जाणतात हे जर तुम्ही लीळाचरित्र लक्षपूर्वक अभ्यासल असेल तर नक्कीच लक्षात आले शिवाय राहणार... एक प्रसंग आपणास सांगायला आवडेल भक्त भांडारेकारबास हे मनोरथ करत होते मला ही श्रीचक्रधरप्रभूंच्या ठिकाणी पूजा अवसर करायला मिळावा...
आणि काय हो त्या प्रभूची लिळा अगाध ... त्यांनी दुसऱ्याच क्षणी त्यांचे ठिकाणी आलेल्या दुसऱ्या भक्तांची पूजा ही भांडारेकर यांच्या माध्यमातून पूर्ण करून घेतली... यावरून लक्षात घ्या परमेश्वर हा अतंरमनातून भक्ती जर करत तर तुम्हास मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाही...
कारण ...
खरा ज्ञानी, खरा भक्त त्यालाच म्हणावे. जो परमेश्वराच्या दृष्टीने योग्य गुणांच्या पातळीवर सिद्ध झाला तोच. स्वतःला परमेश्वराचा खरा, यथार्थ भक्त, खरा पंडित यथार्थ ज्ञानी म्हणवून घेणे हीपण स्वोक्तीयुक्त अन्यथाज्ञान ठरेल. स्वोक्तीला ज्ञानमार्गात जागा नाही. तरी ही आपल्या कडून स्वोक्ती युक्त आचरण होत राहते...
असा ही प्रश्न पडतो की का आसे व्हावे? ज्ञान आहे, देवाला काय अपेक्षित हे माहिती आहे तरी जीवा कडून अशा चुका होत राहतात. खरोखरच आत्मपरिक्षण करण्याची गोष्ट आहे. भक्तीच्या नावा खाली अतिशयोक्ती तर होत नाही ना आपल्या कडून हे आपणच आपल्या मनाला विचरावे...
प्राप्तीरूप ज्ञानाची कवाडे भक्तांसाठी सतत खुलवावीत हीच तर ती इच्छा परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींची... आणि त्यासाठी तर भक्ताला वाडोवाडी गिवसती आणि आपुले अस्तित्व साधती... भक्ताला ही आपल्या परमेश्वराची ओळख झाली की तो परमेश्वरा शिवाय काही च मागत नाही...
परमेश्वर प्राप्तीच्या इच्छेने केलेली भक्ती ही जीवाला विश्वास निर्माण करते की, माझ्या भक्तीने, माझ्या ज्ञान युक्त आचरणाने मी माझ्या देवाचे प्रेम मिळवू शकेन... परमेश्वरा वरील हा विश्वास आपल्या भक्ती मध्ये निपुनता येण्यासाठी खुप महत्वाचा आहे...
त्या भक्ती मध्ये इतका विश्वास श्रद्धा असते की परमेश्वर माझ्या भक्तीचा स्वीकार करतीलच. मनुष्य प्राणी हा विश्वासावर खुप अवलंबून राहतो. त्यांचे आयुष्यच इतरांच्या विश्वासावर चालत असते... एक वेळ स्वतः किती ही प्रामाणिक असला तरी समोरच्या वर इतका विश्वास असतो की स्वतः चुकीचे आहोत हे मान्य ही करायला मागेपुढे बघत नाही...
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. विश्वास आसावा पण अंधविश्वास नसावा. भक्ती असावी पण ज्ञान युक्त भक्ती असावी. ज्ञानाने डोळे उघडले जातात... योग्य अयोग्य काय याची डोळसपणे पाहता येते. आणि या डोळस दृष्टीने पाहताना आपल्या ती वृत्ती जोपासावी लागणार आहे...
सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नी आपल्या लिलाच्या माध्यमातून जे ज्ञानकार्य केलं त्यातून समाजातील जीवजातीच्या उद्धारासाठी जो मूलमंत्र दिला तो इतक्या सुक्ष्मतीलसूक्ष्म गोष्टीचा विचार करून सांगितला की, आपल्या ला मुगीं देखील रांड (विधवा) होऊ देऊ नका अस इतकं सांगून ठेवलं आहे हे सर्व असताना आपण आपल्या आचरणाचे माध्यमातून आपल्या कडून होईल तेव्हढं नक्कीच योग्य व प्रभूच्या वचनाचे पालन करण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहावयास हवाच...
ते सर्व करताना आपल्या कडून मिश्र भक्ती... विकल्प रूप क्रिया... गंडेदोरे.... भूतबाधेच्या नावाखाली होणारी बुवा-बाजी... लिंबु नारळ सारख्या नाटकी क्रिया... पांढरी मोहरी पिवळी मोहरी च्या माध्यमातून होणारी समाजाची लुबडणूक... अमुक खडा, तमुक खडा... जसे की, माणिक, पाचू, नवग्रह, पितृदोष सारखी फसवेगिरी करणारी काही दरोडेखोरांची टोळी ला नाहक बळी पडू नका...
हे सर्व तुम्हाला काही दुसरं कोणी नाही सांगू शकणार, यासाठी तुमचा परमेश्वरावर ठाम विश्वास व दृढ भाव असला तर हे शक्य आहे...
अन्यथा तुमची भावनिक पिळवणूक अटळ आहे त्यातून तुम्ही... धर्मावर विपरीत तत्व येईल च पुढं जाऊन परमेश्वरास देखील विसरून जाण्याचे मार्गाने वाटचाल होईल...
कारण ह्या सर्व गोष्टींचा बिमोड व्हावं म्हणून परमेश्वराने वाडोवाडी पायी फिरून जीवजातीच्या कल्याणासाठी ज्ञान सागितलं ते जे काही सागितलं ते केवळ समाजातील ह्या दृष्ट प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी च म्हणून यामाध्यमातून एकच सांगेल कोणत्याही वीकल्प जणीत गोष्टींचा विचार न करता फक्त परमेश्वराचे नासमस्मरण केलं तर तुम्हाला महारोग देखील होणार नाही हे लक्षात घ्या... कवी म्हणतात...
भक्ती भाव नसे हृदयात...!
त्यासी भेटेल का भगवंत...!!
देवाचे कधी नामच नाही...!
शुद्ध आचरण हे काहीच नाही...!!
बोले तैसा चालत नाही...!
मग तो असो किती मोठा संत...!!
त्यासी भेटेल का भगवंत...
त्यासाठीच भक्ती करताना अगदी नितळ व भावयुक्त असावी...
दंडवत माझा देव श्रीचक्रधर...SD
आपलाच प से सुरेश डोळसे, नाशिक