अहंकार सर्वनाशास कारण बनतो - Egotism Mahanubhav panth dnyansarita

अहंकार सर्वनाशास कारण बनतो - Egotism Mahanubhav panth dnyansarita

अहंकार सर्वनाशास कारण बनतो - 

Egotism  Mahanubhav panth dnyansarita 


धर्म बंधुंनो या लेखात आपण अहंकार माणसाला कसा नष्ट करतो, ते पाहणार आहोत, एकूण एक धर्मग्रंथ, एकूण एक धर्म अहंकाराचा त्याग करण्यासाठी सांगतो, प्रत्येक धर्मात प्रत्येक पंथात अहंकार हा त्याज्यच आहे. अहंकारामुळे, गर्वामुळे माणसाचे खुप नुकसान होते. या विषयी एक गोष्ट - 

एका गावात एक शिल्पकार (शिल्पकार) राहत होता.  तो फार सुंदर प्रतिमा बनवायचा. त्याने बनविलेल्या मूर्ती इतक्या सुंदर असायचा की, पाहून प्रत्येकाला मूर्ती जिवंत असल्याचा भ्रम व्हायचा. आजूबाजूच्या सर्व गावात पंचक्रोशीत तो प्रसिद्ध होता, त्याच्या शिल्पकलेची लोकांना खात्री होती. समाजात त्याला खूप आदर सन्मान होता. त्यामुळे त्या शिल्पकाराला आपल्या कलेचा खूप अभिमान, अहंकार होता.

त्याच्या शिल्पकलेने त्याला खूप श्रीमंत बनवले होते. पण प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्रवासात एक वेळ अशी येथेच, जेव्हा प्रत्येकाला वाटू लागके की आता आपण मरणार आहोत, आपण फार काळ जगू शकणार नाही. तो मुर्तीकारही याला अपवाद नव्हता. त्यालाही आपण लवकरच मरणार आहोत असे वाटल्याने तो चिंताक्रांत झाला. बराच विचार करून त्याने यमदूतांना गोंधळात टाकण्याची योजना आखली.  त्याने अगदी हुबेहुब आपल्या सारख्या दहा मूर्ती बनवल्या आणि स्वतः त्या मूर्तींमध्ये जाऊन बसला.

यमदूत जेव्हा त्याचा प्राण घ्यायला आले तेव्हा अकरा एकसारख्या आकृत्या पाहून ते थक्क झाले. त्या १० मूर्तींमधला खरा माणूस कोण हे त्यांना ओळखता येत नव्हते! “आता काय करायचे ते विचार करू लागले!”  मूर्तिकाराचा जीव घेतला नाही तर सृष्टीचा नियम मोडेल आणि त्या माणसाला शोधण्यासाठी मूर्ती तोडल्या तर कलेचा अवमान होईल.  

अचानक एका यमदूताला आठवले की, मानवी स्वभावातील सर्वात मोठा वाईट अवगुण म्हणजेच 'अहंकार'. यमदूताला अहंकाराची चाचणी करून त्या मनुष्याला ओळखण्याची कल्पना सुचली. मूर्तींकडे पाहून तो म्हणाला, “किती सुंदर मूर्ती बनवल्या आहेत. पण मूर्तींमध्ये एक दोष आहे! मूर्ती घडवणारा माझ्यासमोर असता तर मी त्याला मूर्ती घडवताना सांगितले असते.'' 

हे ऐकून मूर्तिकाराचा अहंकार जागृत झाला, त्याला वाटले, ''मी माझे संपूर्ण आयुष्य मूर्ती घडवण्यात वाहून घेतले आहे. माझ्या मूर्तींत काय चूक असू शकते, मी बनविलेल्या मूर्तित चुक असणे शक्यच नाही” अशाप्रकारे तो अहंकाराच्या अधिन होऊन म्हणाला “काय चूक आहे या मूर्तित? मी जन्मभर मूर्ति बनवलेल्या आहेत, या मूर्तिंमध्ये चुक असणे शक्यच नाही” 

हे ऐकताच यमदूत हसला व त्याला घाईघाईने पकडले आणि म्हणाला, “मूर्ख मनुष्या तू तुझ्या अहंकाराच्या अधिन झालास हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे, तुला शोधण्यासाठी मी ही युक्ती केली, तू त्यात फसलास, निर्जीव मूर्ती बोलत नाहीत…!!” एवढे बोलून यमदूतांनी क्षणात त्याचे प्राण हरण केले. 

मित्रांनो!! इतिहास साक्षी आहे, अहंकाराने माणसाला नेहमीच त्रास आणि दुःखाशिवाय काहीही दिले नाही..!! अती अहंकारामुळे रावण नष्ट झाला, दुर्योधन ही अती अहंकारामुळे नष्ट झाला, भूतकाळात असे शेकडो उदाहरणं सापडतील ज्यांनी अहंकारामुळे कुळासहित आपले प्राण गमावले. म्हणून अहंकारा पासून प्रत्येकाने दूर राहिले पाहिजे. नम्रता ही सर्व सुखांची किल्ली आहे. नम्रतेने प्रेमाने जग जिंकता येते. नम्रतेने वर्तन केले तर शत्रूही मित्र होतो. 

एक हिंदी कवि अहंकाराविषयी म्हणतो, 

मैं मैं बड़ी बलाय है, सकै तो निकसे भाग ।

कब लग राखौं रह सके, रूई लपेटी आग ।।

"मी मी" असा अहंकार हे फार मोठे संकट आहे. याच्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर निघावे. कारण अहंकार म्हणजे जणूकाही कापसाने गुंडाळलेला अग्निच होए. असा हा अहंकार रुपी अग्नी कधी आपल्या कापूस रुपी देहाला जाळून भस्म करेल सांगता येत नाही. 

अहंकाराचे निरसन करण्यासाठी काय विचार करावा यावर संत कबीर म्हणतात, 

कबीर गर्व न कीजिये, रंक न हंसिये कोय।

अजहूं नाव समुद्र में, ना जाने क्या होय ।।

हे भल्या मनुष्यांनो!! कधीही गर्व करू नका, आपला जवळ द्रव्य पैसाअडका आला तर गरिबांना पाहून हसू नका, कारण अजूनही आपली जीवनरुपी नाव या संसाररूपी समुद्रात भटकत आहे, अहंकारामुळे ती कधीही बुडू शकते. 

अजून अहंकाराबद्दल संत कबीर म्हणतात - 

मान बढाई जगत मे, कुत्ते की पहचान। 

प्यार कीया मुख चाटे, बैर कीया फाडे खाय ॥

ध्यानी, ज्ञानी, दाता घने रथी, महारथी मिले अनेक । 

कहे कबीर मान (अहंकार) विरहीत, लाखो में एक ॥

कबीर कहे गर्वियो, काल पकड़ी रखा है केस । 

ना जाने कहाँ मरसी, घर या परदेस ।। 


उंचा पानी ना टिके, नीचे ही ठहराये । 

नीचा होय तो भारी पिये, उंचा प्यासा रहे जाये ॥ 

( उंचा पाणी म्हणजे अहंकार आणि गर्व)

 सदैव आनंदित रहा

 जे मिळाले ते पुरेसे आहे.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post