यशस्वी होण्यासाठी १२ नियम. या नियमानुसार वागल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल!!

यशस्वी होण्यासाठी १२ नियम. या नियमानुसार वागल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल!!

 यशस्वी होण्यासाठी १२ नियम. या खालिल नियमानुसार वागल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल !! 



समोर येता संकट । असो कितीही विकट । 

तया पुढे होऊनि धीट । उभे राहावे ।।१।।


१) जेव्हा ही पाऊस पडण्यास सुरूवात होते. तेव्हा सर्व पक्षी आपापल्या घरट्यात धावतात. किंवा कुठेतरी आश्रय शोधतात. पण गरुड हा एकमेव पक्षी आहे जो उड्डाण करून ढगांच्याही वर जातो, पाऊस त्याचे काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून संकटापासून पळवाट काढू नका. संकटांना सामोरे जा. समस्या टाळण्यासाठी नाही तर समस्या सोडवण्यासाठी  काम करा. 

२) हे धावते जग त्यांचेच आहे, जे नेहमी आनंदी राहतात. जे दुःखी आणि संकटात आहेत त्यांचे मोबाईल नंबरही फोन मधून डिलिट केले जातात. म्हणून कोणत्याही परिस्थितीत कधीही स्वतःला विखुरू देऊ नका, या स्वार्थी लोकांचे काय?ते तर आपले पडलेले घर पुन्हा बांधू लागण्याऐवजी विखुरलेल्या विटाही घेऊन जातात. 

3) माणूस हा फार विचित्र प्राणी आहे, देवासाठी अगरबत्ती घेतो, त्याला पण सुगंध मात्र आपल्या आवडीचाच हवा असतो. म्हणून त्याच्या मनोवृत्तीचा जास्त विचार करू नये त्याच्या मनोवृत्तीत बऱ्याचदा विरुद्ध वर्तन दिसते. पण आपण जे योग्य वाटेल तेच ग्रहण करावं. जसं चाळणी खडे खडे बाजूला सारते आणि फक्त योग्य तेच गाळते त्या प्रमाणे. फक्त गुण ग्रहण करावे. 

4) एखाद्यावर प्रेम करणे ही त्याला दिलेली सर्वात मोठी भेट असते. आणि कोणाचे प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. 

5) आपल्या विरुद्ध चघळल्या जाणार्‍या गोष्टी आपल्या माघारी केली जाणारी निंदा शांतपणे ऐका! त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ नका. 

6) आपली मेहनत वाढवा तुमचे निर्भेळ यशच त्या निंदकांना खाली मान घालण्यास भाग पाडेल. संयम आणि सहनशीलता हा भित्रेपणा किंवा कमकुवतपणा नाही तर ही आंतरिक शक्ती आहे जी सर्वांमध्ये नसते.

7) जीवन पाखरांसारखं असावं त्यांच्या जगात ना खेद ना खंत, ना कसला पश्चाताप. अपघाताने पाखरं कधीच खचत नाहीत, जिद्दीनं जगतात. वार्‍याने घरटं मोडलं तरी पुन्हा काडी काडी जमा करून ते घरटे पूर्ववत बांधतात. आणि सकाळी उठल्या उठल्या कोणीही श्रोता नसताना एकटीच गात बसतात. वाट्याला आलेलं जिवन ती जसेच्या तसे पत्करतात, आणि आकाशात गिरक्या घेत गातात. त्यांचे जीवन मनुष्य पेक्षा कितीतरी पटीने दुःखमय आहे तरीही ते आहेत अशा चूक म्हणून झाडांची मधुर फळे बसून आनंदाने राहतात.

8) जर तुम्ही चुकलात तर ते प्रांजळ मनाने कबूल करा. मग ती चुक दाखवणारा आपल्यापेक्षा लहान असला तरी! 

9) जर तुम्ही गोंधळलेले असाल किंवा द्विधा मनस्थितीत असाल तर प्रश्न विचारून ती मनस्थिती सोडवण्याचा प्रयत्न करा मग ज्याला प्रश्न विचारायचा आहे तो लहान असो का मोठा हा विचार करू नका कदाचित तो आपल्यापेक्षा वयाने लहान असेल पण ज्ञानाने मोठा असेल. जर तुम्ही काही कारणाने अडकले असाल तर मदतीसाठी योग्य व्यक्ती शोधा.

10) तुम्ही जे काही शिकलात ते इतरांना सद्भावनेने शिकवा! कारण शिकवतांनाही आपल्याला बर्‍याच गोष्टी कळतात, लक्षात येतात. 

11) आपल्या गाडीच्या speedometer वर एक काटा असतो, जो आपल्याला आपल्या गतीची जाणीव करून देत असतो. आपण जास्त गती वाढवली की तो गती कमी करायला सांगतो. सुरवातीला आपण त्या काट्यावर अवलंबून असतो, नंतर मग आपल्याला गतीचा अंदाज यायला लागतो. एक दिवस तो काटा काम करणं बंद करतो, आपल्याला त्यामुळे काहीच फरक पडत नाही, आपण आपली गाडी आरामात संभाळून चालवत असतो.  जीवनाच्या गाडीविषयीही तसंच आहे. ह्या काट्या प्रमाणेच काही लोकं आपल्या आयुष्यात येतात. ज्यांच्या असण्याची आपल्याला आधी खूप सवय झाली असते, असे वाटायला लागते की हे नसतील तर कसे होईल. आपण त्यांच्यासोबत जुळवून घेतो किंवा प्रयत्न तरी करतो. पण हळू हळू काळाच्या ओघात काही लोकं आपल्या आयुष्यातून निघून जातात किंवा मागे पडतात. सुरवातीला आपल्याला फार त्रास होतो त्यांच्या नसण्याचा किंवा असून नसण्याचा. पण मग सवय होते त्यांच्या (असून) नसण्याची. आपण आपल्या आयुष्याचा पूर्ण कंट्रोल आपल्या हातात घेतो आणि आयुष्याची गती सांभाळत पुढे पुढे जात असतो.

12) जो दुसऱ्याचे हित पाहतो, विरुध्द करत नाही. त्याचे मन वश करुन घेतो. त्याला सुधारून त्यास परमार्थ साधून देतो. वायफळ बडबड करीत नाही, भांडण करत नाही तोच चतुर होय. संकटाचे आघात सहन करतो. अपशब्द गिळतो प्रसंग पाहून योग्य तेच बोलतो. जाणतेपणा आपल्याकडे घेत नाही, जेथे जातो तेथे लीन असतो, माणसे पारखून त्याचे गुण घेतो. शहाण्या माणसाशी स्नेह जोडतो. उगाच एके ठिकाणी बसत नाही. काहीतरी कार्य करीतच राहतो.  सावधपणाने विवेकाने परिस्थितीची माहिती घेऊन वागतो. ज्याला हवे ते त्याला देतो त्यामुळे श्रेष्ठपणा येतो तो खरा चतुर होय.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post