20-10-10-2021
गुरूचा शब्द म्हणजे दुःखात धावून येणारा संकटमोचक!!
- मित्रांनो या संसार चक्रातून सुटण्यासाठी वेळात वेळ काढून सत्संगात जाणे तिथले प्रवचन ऐकणे आणि परमेश्वराची भक्ती करणे हाच एकमात्र उपाय आहे गुरु आपल्याला वारंवार प्रबोधन करीत असतात पण आपण नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे या म्हणीप्रमाणे ते निरूपण तिथेच ऐकून तिथेच सोडून दे तो अमलात आणण्याचा यत्किंचितही प्रयत्न करीत नाही. पण त्यामुळे आपले फार मोठे झालेले नुकसान आपल्या लवकर लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. तेव्हा पश्चाताप केल्याशिवाय काहीही उरत नाही.
- गुरूंचे एकेक वाक्य, गुरुंचे निरूपण, गुरूंचे प्रबोधन, आणि त्यानुसार वर्तने भगवंतांच्या भक्तीत लीन राहणे हे किती महत्त्वाचे आहे हे पुढील कथेतून आपल्या लक्षात येते.
एक श्रीमंत
व्यापारी बाहेरगावाहून व्यापार करून आपल्या गावी आला. तो बसमधून खाली
उतरला, त्याच्याजवळ बरेच सामान होते. त्याने आजूबाजूला कुणी
हमाल सापडतो का ते पाहिले तर त्याला एक हमाल दिसला.
व्यापाऱ्याने त्याला हाक मारली. शेठजीकडे पाहून तो आला. व्यापारी त्याला म्हणाला- ‘‘इथूनच जवळ माझे घर
आहे, हे सामान तिथे नेण्यासाठी तू किती
पैसे घेशील?’’
तो मालवाहक मनुष्य म्हणाला, ‘‘पैसे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढे द्यायचे तेवढे
द्या, पण माझी एक अट आहे.’’
‘‘कोणती अट?’’ शेठजींनी विचारले.
‘‘मी सामान उचलून तुमच्या घरी पोहचेपर्यंत तुम्हाला एकतर मला काही चांगल्या गोष्टी
सांगाव्या लागतील किंवा माझे भाषण ऐकून घ्यावे लागेल.’’
सेठने त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि
इतर हमालाचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण तिथे दुसरा कोणीही हमाल त्याला दिसत नव्हता.
शेवटी नाइलाजाने सेठने त्याच माणसाला बोलावले.
तो धावत आला आणि म्हणाला - ‘‘तुम्हाला माझी मान्य आहे का?’’
शेठने विचार केला, आपले काम होतंय तर हो म्हणायला काय हरकत आहे. आपल्याला काम
होण्याशी मतलब. म्हणून त्याने ‘‘होए मला तुझी अट मान्य आहे.’’
त्या व्यापाऱ्याचे घर सुमारे ५०० मीटर अंतरावर
होते. हमालाने सामान उचलले आणि चालु लागला. सेठ बरोबर होतेत.
मग तो हमाला त्यांना म्हणाला.
‘‘सेठजी, तुम्ही काही सांगाल की मी सांगू?’’
‘‘तुच सांग मी ऐकतो.’’ सेठ उत्तरले.
हमालाला आनंद झाला. तो म्हणाला- ‘‘माझे
प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक ऐका’’ असे म्हणत शेठजींचे
घर येईपर्यंत तो बोलत राहिले. दोघेही घरी पोहचले.
हमालाने व्यापाराच्या घराच्या बाहेरच्या व्हरांड्यात
सामान ठेवले, सेठने स्वखुशीने दिलेले पैसे
घेतले आणि निघतांना सेठला म्हणाला! ‘‘सेठजी,
तुम्ही माझे बोलणे लक्षपूर्वक ऐकले की नाही?’’
सेठ म्हणाला, ‘‘नाही! मी तुझ्या बोलण्याकडे
अजिबात लक्ष दिले नाही, मला माझे काम पूर्ण करण्याशी मलतब होते.’’
हमाल म्हणाला - ‘‘सेठजी! तुम्ही आयुष्यात
फार मोठी चूक केली आहे, उद्या सायंकाळी
सात वाजता तुमचा मृत्यू होणार आहे. तुमच्याकडे
फक्त चोविस तास राहिले आहेत.’’
हे ऐकून व्यापारी प्रचंड रागावला आणि म्हणाला, ‘‘आतापर्यंत मी तुझा खूप मूर्खपणा ऐकला आहे,
तुझे वायपट बोलणे बंद कर आणि चालता हो इथून! नाहीतर तु आता मार खाशील’’
हमाल म्हणाला, ‘‘शेठ मला मारा किंवा सोडून द्या, पण हे सत्य आहे की, तुम्हाला उद्या संध्याकाळी यमराजाचे बोलावणे येणार आहे,
अजूनही वेळ गेलेली नाही, माझे बोलणे लक्षपूर्वक
ऐका.’’
आता मात्र सेठ थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, ‘‘एक ना एक दिवस तर प्रत्येकाला मरायचेच आहे, मला जर उद्या संध्याकाळी मरण येत असेल तर ते माझ्या हाती नाही. याबद्दल मी काय करू शकतो?’’
हमाल रूपात असलेला तो सत्पुरुष म्हणाला, ‘‘अहो!
श्रीमान् म्हणूनच मी म्हणतोय की, आतातरी माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका.’’
व्यापाऱ्याचा राग आता पुर्ण उतरला होता. तो म्हणाला ‘‘सांग, मी
काळजीपूर्वक कान पसरून ऐकेन.’’
‘‘मनुष्य पाप आणि पुण्य दोन्ही करतो, म्हणून त्याचे फळ तुम्हाला भोगावेच लागेल.
तरीही जेव्हा तुम्ही मृत्यूनंतर यमपुरीत जाल, तेव्हा
तुम्हाला विचारले जाईल की ‘हे मनुष्या! तुला आधी पापांचे
फळ नरक भोगायचे आहेत की, पुण्यकर्माने मिळालेले फळं भोगायचे आहे?’ तेव्हा तुम्ही हे
उत्तर द्याल की, पापाचा परिणाम मी भोगण्यास तयार आहे, पण मला माझ्या
उघड्या डोळ्यांनी पुण्याचे फळ पहायचे आहे.’’
असे म्हणून हमालाला रूपात आलेला तो परमेश्वर भक्त तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी बरोबर सायंकाळी सात वाजता व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. यमदुतांनी
त्याला यमपुरीत नेऊन यमराजासमोर उभे केले. तेव्हा यमराजाने हमालाने सांगितलेलाच प्रश्न विचारला की ‘‘तू जन्मभर
पाप पुण्य दोन्ही केले आहेत, आधी तुला पापाची फळे
भोगायची किंवा पुण्याची फळे भोगायची आहेत’’
सेठ म्हणाला, ‘‘मी पापाची फळे भोगायला तयार
आहे, पण मी उभ्या आयुष्यात जे काही पुण्य
कर्म केले असेल, त्याचे फळ मला माझ्या उघड्या
डोळ्यांनी पाहायचे आहे.’’
यमराज म्हणाले- ‘‘आमच्याकडे
अशी काही तरतुद नाही. इथे दोघांचे फळ एकदाच दिले जात नाही. क्रमाक्रमाणे भोगवले जाते.’’
सेठ म्हणाला की, ‘‘मग मला काबरं विचारले? आणि आता
तुम्ही विचारलेच आहे तर आपले वचन पुर्ण करा. मी
पृथ्वीवर न्यायव्यवस्थेत अन्याय पाहिला आहे, मला वाटले
इथेतरी अन्याय नसेल, पण इथेही अन्याय आहेच.’’
यमराजाने विचार केला, ‘गोष्ट तर खरी आहे, हा
बरोबर म्हणत आहे. याला विनाकारण विचारले आणि स्वतःला शब्दात अडकवून
घेतले. आपल्याकडे तर या जीवाची इच्छा पूर्ण करण्याची
शक्ती नाही, मग कसं करावं?’
यमराजाने त्या सेठला ब्रह्मलोकात ब्रम्ह्याकडे नेले. आणि संपूर्ण कथा निवेदन केली.
ब्रह्माने आपले कर्मविपाकाचे पुस्तक काढले आणि त्यातली
सर्व पाने उलटली, परंतु त्यांना कायद्यामध्ये
त्या जीवाची इच्छा पुर्ण करू शकेल अशी कोणतीही तरतुद आढळली नाही.
ब्रह्मदेवही यमराज
आणि सेठ यांना सोबत घेतले आणि देवाकडे पोहोचले. आणि नमस्कार करून मागिल घटणा सांगितली आणि हे कोडं सोडवावं अशी विनंती
केली. भगवान श्रीकृष्ण यमराजाला आणि ब्रह्मदेवाला म्हणाले,‘‘तुम्ही जा, तुमचे काम पहा. मी बघतो याच्याकडे’’ ते दोघेही आपापल्या
लोकात निघून गेले.
भगवान श्रीकृष्ण सेठला म्हणाले- ‘‘आता सांग, तुला काय नेमके
काय म्हणायचे आहे?’’
सेठ म्हणाला- ‘‘हे प्रभो! मी सुरुवातीपासून फक्त एकच गोष्ट सांगत आहे की, मी पापाची
फळे भोगायला तयार आहे, पण मला पुण्याचे
फळ मात्र मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहायचे
आहे.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले- ‘‘धन्य तो तुझा सद्गुरू (हमाल) ज्याने शेवटच्या क्षणीदेखिल तुझे कल्याणच केले आहे, अरे मूर्खा!
तू माझ्यासमोर उभा आहेस ते त्याने सांगितलेल्या युक्तीमुळेच, तुला माझे दर्शन झाले हेच तुझ्या पुण्याचे फळ आहे. तुला या पेक्षा कोणते मोठे बक्षीस पाहिजे? माझ्या दर्शनाने तुझी सर्व पापं भस्मसात झाली आहेत.
तात्पर्य :- वाचक हो!! म्हणूनच आपल्याला लहानपणापासून हेच शिकवले जाते की, आपण आपल्या गुरुंचे प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक ऐकावे,
कारण गुरुंनी सांगितलेली कोणती गोष्टी कोणत्या संकटात उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.