यशस्वी होण्यासाठी व स्वत:ला बदलण्याविषयी हे १० विचार अवश्य वाचा - 10 Ideas for Success

यशस्वी होण्यासाठी व स्वत:ला बदलण्याविषयी हे १० विचार अवश्य वाचा - 10 Ideas for Success

 date :- 22-6-2022

यशस्वी होण्यासाठी व स्वत:ला बदलण्याविषयी हे १० विचार अवश्य वाचा - 10 Ideas for Success

) माणूस ईश्वराद्वारे रचित व ऋषी-मुनींद्वारे प्रसारित विद्यांच्या मदतीनेच पुढे जाऊ इच्छित असतो. बुद्धिमान, धनवान व बलवान बनू इच्छित असतो. ज्ञानाला सहायक बनवून मार्गावर पुढे जात राहावे. ध्येय नक्कीच तुमच्या स्वागतासाठी उभे आहे. पण सारेच जण ध्येयांपर्यंत जाऊ शकतात का? परमात्म्याने आपल्याला अगणित विद्या प्रदान केल्या आहेत. चालण्याचा पुरुषार्थ आपल्या स्वतःचा आहे. जिद्द व पुरुषार्थाअभावी वाट चुकली तर ध्येयापासून आपण दूर राहतो. तेथे कधीच पोहोचू शकत नाही.

) जर आपले जीवन अभावग्रस्त, गोंधळलेले व तणावात असेल तर या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावरही पडतो. मेंदू व शरीर एकच आहे. जर आज आपण आज दुःखी असू तर आपण दु:खाचाच संदेश देत राहतो. जर आपण आनंदी असू तर आनंदाचा संदेश देत राहतो. अर्थातच आपण आपल्या विचारानुसारच होत जात असतो.  विचारांमध्ये खूप ताकद असते. 'आपले विचार बदला, स्वत:ला बदला. ' मन सुदृढ तर तन सुदृढ जर आपले विचार योग्य नसतील तर संपूर्ण शरीरातही गड़बड राहील. यासाठी आपले विचार तपासण्याची गरज असते.

) आपले विचार, जाणून घेण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, आपला काम करण्याचा प्रकार, आपल्या चेहऱ्याची ठेवणच आपल्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उघड करीत असते. आपला चेहराच आपल्या मनाचे प्रतिबिंब आहे. आपल्या बोलण्याची पद्धत चांगली असो वा वाईट आपल्याविषयी व्यक्त करीत असते. यशस्वी व्यक्ती उत्तम विचार करून आपली ध्येये क्रमवार गाठत असतो. अशा व्यक्तीला कधी अपयश आले तरी तो त्वरित सावरत असतो आणि आपली चूक सुधारून वरच्या दिशेने जाऊ लागतो.

) यशस्वी व्यक्ती जास्तीत जास्त काम करते आणि इतरांना नेहमी मदत करीत असते. त्याचा मेंदू येईल ते भरणारे भंगाराचे दुकान नसते. यशस्वी व्यक्ती इतरांना महत्त्वाचे मानते त्यामुळे सारेजण त्याच्या संपर्कात राहू इच्छितात. तो नेहमी इतरांना हसून भेटतो आणि आनंदाच्या, प्रगतीच्या गोष्टी बोलतो. ज्याला प्रत्येकाविषयी आदर असतो तोच खरा यशस्वी. नुसत्या पैश्याच्या श्रीमंती असलेल्या माणसाला यशस्वी मनुष्य म्हणता येत नाही.

) यशस्वी व्यक्ती नेहमी वर्तमानात जगतो आणि हेच त्याच्या आनंदाचे सर्वांत मोठे रहस्य असते. तो नेहमी शिकण्याची इच्छा बाळगून असतो. जिथून जे काही शिकायला मिळेल ते शिकत जात असतो आणि यशाच्या पायऱ्या चढत जातो. तो नेहमी इतरांचे ऐकत असतो आणि कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. याउलट अपयशी आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न करतो व इतरांना बोलण्याची संधी देऊ इच्छित नसतो.

) एखादी व्यक्ती यशस्वी होते या मागे ८५ टक्के भाग त्याच्या दृष्टिकोनाचा असतो व फक्त १५ टक्के भागच त्याच्या ज्ञान वा हुशारीचा असतो. आपल्या जीवनात व्यवहार वा दृष्टिकोन महत्त्वाची भूमिका बजावतात. जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर, आजूबाजूच्या वातावरणावर आणि समाजावर सकारात्मकच होईल. सकारात्मक विचार दृष्टिकोन तयार करतात आणि असा दृष्टिकोनच माणसाच्या यशाची निर्मिती करतो.

) आपल्या मनातला इतरांबद्दलचा तिरस्कार हा एकतर मनाला पेटून उठवण्याचं कार्य तरी करू शकतो किंवा तो मनाला नकारात्मक बुद्धीने वागायला प्रवृत्त तरी करू शकतो ; प्रत्येक माणसाच्या वृत्तीत सारेच गुण सामावलेले असतात. तो कधीतरी चुकून गैरसमजाने एखाद्याचा तिरस्कार करू शकतो, करतोही पण आपण अयशस्वी असल्याने स्वतःचाच तिरस्कार का करत नाही? स्वतःच्या केलेल्या तिरस्कारातून आपणच इर्षेने पेटून नव्याने ध्येय गाठण्याची प्रेरणा स्वत:ला दिली पाहिजे.

) यशस्वी व्यक्ती नकारात्मक लोकांच्या प्रश्नांची कधीही उत्तरे देत बसत नाही. तो तडजोड करत स्वत:ला आणि इतरांना समजावत बसत नाही, वेळ ही अति महत्वाची असते. यशस्वी व्यक्ती अशा नकारात्मक विचारसरणीच्या लोकांना आपल्या यशाची गोडी चाखवूनच त्यांची उत्तरे त्यांना देते. कारण टिका होत असताना आपण शांतपणे आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेलं असणं अधिक महत्वाचं. महा क्रिकेट खेडाळु सचिन टेंडुलकर सर्वांना माहीतच आहे, त्यांनी कधीही ग्राऊंडवर टोमणे मारणाऱ्या खेडाळुंना शद्बाने उत्तर दिले नाही. बॅटने मोठमोठाल्या खेळी करून निंदकांची तोंडे बंद केली.

) तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट आत्मसात करणयासाठी प्रयत्न करायला सुरूवात करता तिथेच तुम्ही खरतरं जिंकता कारण या समाजात अनेक लोक असेही आहेत ज्यांना प्रयत्नही नको असतात. सगळं पी हळद हो गोरी झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. तुम्ही काहीतरी वेगळं करण्याचा पहिला प्रयत्न जिथे करता तिथे अनेक लोक तुमच्या चुकांची वाट शोधत टिंगलटवाळीसाठी विषय गोळा करत बसतात परंतु तुमचं लक्ष, पुढच्या वेळी नेमकी ती गोष्ट अधिक योग्य दिशेने कशी करता येईल याकडे लक्ष असलं पाहिजे. आणि अशा टींगल करणाऱ्या लोकांची कधीच प्रगती होत नाही. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देत बसू नये.

१०) कोणतेही काम सुरू करतांना किंवा सुरू केल्यावर मनावर एक प्रकारचा तणाव असतोच, तो तणावाला घाबरू नका. तणावपूर्ण वातावरण हळूहळू तुमच्या व्यक्तीमत्वाला अधिक खुलवत जातं. प्रथमदर्शनी प्रत्येकाला ताणतणाव नकोसाच असतो, सर्वांच्या बाबतीत हीच गोष्ट घडते. परंतु तणाव नकोच म्हणून एखाद्या दिशेची वाट न निवडणं हे कधीच योग्य असू शकत नाही. प्रत्येक विषयाचा अनुभव प्रथम असतो, दुसर्‍या वेळी आपण मनाची स्थिती थोडी अधिक घट्ट बनवतो. तिसऱ्या चवथ्या वेळेत तर आपण समोर येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोर जायचं? याची मनोमन खंबीर तयारी करून ठेवलेली असते. त्यामुळे अगदी निर्धास्तपणे नव्या दिशा, नव्या वाटा चालण्याचा प्रयत्न करावा. तणावाचा सामना कसा करावा? यावर एक छानशी गोष्ट -

            एक प्राध्यापक वर्गात शिरले. त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता. मुलांना दाखवत त्यांनी विचारले, हे काय आहे? विद्यार्थ्यांनी ‘पेलाऽऽ’ असे उत्तर दिले. प्रोफेसरने पुन्हा विचारले, "किती वजन असेल?" उत्तर आले, ‘अंदाजे 100-150 ग्रॅम. त्याने पुन्हा विचारले, ‘मी थोडा वेळ असाच धरून ठेवला तर?" विद्यार्थ्यांनी "काही नाही" असे उत्तर दिले.

"मी तासभर धरून ठेवलं तर?" प्राध्यापकांनी पुन्हा प्रश्न विचारला.

विद्यार्थ्यांनी उत्तर दिले, ‘‘तुमचा हात दुखायला लागेल.

त्याने पुन्हा विचारले, "दिवसभर धरून राहिलो तर?"

तेव्हा विद्यार्थी म्हणाले, ‘‘तुमच्या नसा ताणल्या जातील. नसा सुन्न होऊ शकतात. जे तुम्हाला पक्षाघात करू शकतात.’’

प्रोफेसर म्हणाले, ‘‘ठीक आहे. आता मला सांगा, या काळात या ग्लासच्या वजनात काही फरक पडेल का? उत्तर नाही आले.

            मग प्रोफेसर म्हणाले, "मित्रांनो! हाच नियम आपल्या जीवनालाही लागू होतो. जर आपण आपल्या मनात एखादी समस्या थोड्या काळासाठी ठेवली तर. त्यामुळे काही फरक पडत नाही. पण याचा बराच काळ विचार केला तर त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागतो. आपले काम आणि कौटुंबिक जीवन देखील प्रभावित होऊ लागेल. त्यामुळे सुखी जीवनासाठी हे आवश्यक आहे की समस्यांचे ओझे नेहमी डोक्यावर असू नये. विचार करून प्रश्न सुटत नाहीत. सर्व समस्याप्रधान विचार झोपण्यापूर्वी बाहेर टाकले पाहिजेत. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुम्ही सकाळी ताजेतवाने व्हाल. म्हणून मित्रांनो! समस्यांबद्दल जास्त काळजी करू नका.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post