सुखी व संतुलित जीवनाचे ११ नियम अवश्य वाचा - 11 rules for a happy and balanced life
तुमचे विचार बदला, तुमच्या ऊर्जेची दिशा बदलेल
लक्ष जाते त्या दिशेने ऊर्जेचा प्रवाह वळतो. आपल्या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेच्या रूपात आहे. आपण मनुष्यप्राणी देखील ऊर्जेच्या रूपात आहोत. त्यामुळे आपल्यातून ऊर्जेचा प्रवाह कसा बाहेर पडतो आणि त्याचा आपल्या जगण्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
जेव्हा तुम्ही म्हणता, मला युद्ध नको, त्या वेळी तुमचे लक्ष युद्धाकडे असते आणि तुम्ही जिकडे लक्ष देता तिकडे तुमची ऊर्जा वाहते. तुमची ऊर्जा युद्धाच्या दिशेने जाते. आकर्षणाचा नियम ऊर्जेला लागू होतो. ऊर्जेची अनुभूती आपल्याला त्रिमितीमध्ये येत असते. त्यामुळे मला युद्ध नको म्हणण्याऐवजी तुम्ही असे म्हटले पाहिजे की, मला शांती हवी आहे. मग तुमचे लक्ष शांततेवर केंद्रित होते आणि आकर्षणाच्या नियमानुसार तुमची ऊर्जा आणि शांती एकत्र येतात आणि तुमच्या आयुष्यात शांती येथे. हे जग लहरींच्या शक्तीवर चालते. त्यानुसार तुमच्या बोलण्यात बदल करा.
१) मला अपयशाचे तोंड बघायचे नाही, असे म्हणण्यापेक्षा मला जिंकायचे आहे असे म्हणा.
२) मला स्थूलपणा कमी करायचा आहे असे म्हणण्यापेक्षा, मला सडपातळ व्हायचे आहे असे म्हणा.
३) नोकरीत सतत संघर्ष करावा लागतो, असे म्हणण्यापेक्षा मी माझ्या नोकरीत आनंदी आणि उत्साही आहे असे म्हणा.
४) " माझ्या पतीसोबत मला वाद करायचा नाही, असे म्हणण्यापेक्षा मला पतीसोबत खुप आनंदी आणि सुखकारक काळजीवाहू नाते हवे आहे, असे म्हणा.
आपल्या विचारांमध्ये मोठी शक्ती असते. कारण आपल्या विचारांमधून ऊर्जा वाहत असते. जर तुम्हाला नको आहे ते तुम्ही बोलाल तर नको असलेल्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित व्हाल. जे नको आहे स्याविषयी बोलायचे आणि विचार करायचे तुम्ही थांबवाल आणि तुमच्या शब्दप्रयोगांमध्ये बदल करून जे हवे आहे त्याविषयी बोलू लागाल, तर तुम्हाला जे नको आहे ते तुमच्या आयुष्यातून आपोआप निघून जाईल.
मला विश्वास आहे की, तुम्हाला नको असलेल्या गोष्टींविषयी बोलणे आणि विचार करणे तुम्ही आजपासून थांबवाल. त्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातून पुढील काही शब्द वगळावेत.
हे शब्द याप्रमाणे आहेत: नैराश्य, द्वेष, अपयश, आजारपण, व्याधी, युद्ध, भांडणे, चिंता, संघर्ष, कर्ज, शत्रु, भीषण अपघात अशा शब्दांचा वापर शक्य तितका टाळावा.
तुमची विचार करण्याची पद्धत बदलल्याने तुमच्यातील ऊर्जा आणि तुमचे आयुष्य बदलून जाईल. तुम्ही हा प्रयोग अगदी आजपासूनही स्वतःवर करू शकता. या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये जाणवतील.
दर्जा सांभाळला की त्याची शोभा वाढते...
५) एखाद्या गोष्टीची शोभा कशामुळे वाढते..? तर ती फक्त देखावा करून, सजावट करून, आतषबाजी करून किंवा रोषणाई करून वाढत नसते. तर, त्या त्या गोष्टीला तो दर्जा प्रदान करणे आणि त्या गोष्टीचा दर्जा सांभाळून केलेल्या कोणत्याही कृतीमुळे शोभा वाढत असते. सोने हे चकाकत असतेच. पण, त्याचा चांगला दागिना केला तरच त्याला अधिक शोभा येते. हिरा हा कितीही मौल्यवान वाटत असला तरीही त्याला खरी शोभा ही पैलू पाडल्यानंतर आणि योग्य कोंदणात तो बसवल्यानंतरच येत असते.
याप्रमाणेच आयुष्यातील इतरही अनेक गोष्टींना त्या दर्जाची वागणूक देता आली तरच शोभा वाढते.
६) शारीरिक सौंदर्य जरी चांगले असले तरीही त्या व्यक्तीच्या अंगी चांगले गुण असतील तर शोभा अधिक येते. आपला स्वभाव आणि आपले घराणे या दोन्हीलाही आपले चांगले शील, आपले वर्तन हे हे शोभा देत असते. आपल्याला
७) जितकी जास्त सिद्धी मिळत जाते, तितकी आपण मिळवलेल्या ज्ञानाची, विद्येची शोभा वाढते. तसेच, योग्य पद्धतीने उपभोग घेता आला तरच आपल्याकडे असलेल्या संपत्तीची शोभा वाढते. एका अर्थी असेही म्हणता येते की, अनेकजण श्रीमंत असतात. पण, त्या एकेका पैशाचा सन्मान ठेवून, रसिकतेने आणि सौंदर्यदृष्टीसह जो त्याचा उपभोग घेतो, तोच खरा 'रईस' ठरत असतो. बाकीचे फक्त उधळपट्टी करतात. पण, ज्याला आपल्याकडील संपत्तीला शोभा द्यायची असते, तो त्याचा उपभोग घेतो.
८) जीवनातील यश हे परीक्षेतील गुणांवर अवलंबून नसते शाळेतून किंवा कॉलेजमधून बाहेर पडताच शिकवणी वर्गाकडे वळावे लागते. विद्यार्थी नेहमी चिमटीत किंवा कात्रीत असतो. तो स्वतःचा असा वेगळा विचार करू शकत नाही.
९) ज्याला पोहणे शिकायचे असते, त्याला आपले हातपाय स्वतःच हलवावे लागतात. सायकल ही स्वतः चालवून पाहायची असते..
१०) जगातील अनेक मोठी माणसे कोणत्याही शिक्षण संस्थेचा आश्रय न घेता शिकली. पुढचे ज्ञान त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून मिळवले. आता मुलांना शिकवले जाते. भरभरून भरवले जाते.लमुलीने स्वतः प्रयत्न करून स्वयंपाक शिकायचा असतो. ज्यात आपली गुंतवणूक नाही ते करण्याचे कौशल्य अंगी येत नाही. अलीकडे हाताने लिहिणे कमी झाले आहे, डोळ्यांनी वाचणे कमी झाले आहे. अवघड गणित कॅल्क्युलेटरशिवाय बेरीज-वजाबाकी करणे जमत नाही. जवळ डिक्शरी ठेवून शब्दार्थ शोधणे आवडत नाही. प्रत्येकाला भरपूर गुण हवेत, टक्केवारी हवी.
वरचा क्रमांक किंवा पहिला हवा; पण विषयाचे संपूर्ण मूल्यज्ञान माहिती मिळेपर्यंत थांबण्याची अजिबात तयारी नाही. पूर्वी नावापुढे पदव्या नव्हत्या. गावोगावी महाविद्यालये नव्हती. एमए होणे अवघड होते. परीक्षेत घवघवीत यश कधी मिळाले नाही. तरीही अनेक थोर व्यक्तींना आयुष्यात अलौकिक कर्तृत्व करून दाखवलं. याचे कारण त्यांनी जे काही केले, अनुभवले, वाचले, लिहिले त्यात आपले स्वत्व ओतले. अलीकडे आयते कपडे, आयते पदार्थ, आयती उत्तरे या गोष्टींकडेच लोकांचा कल जास्त आहे. खरे जीवन हे स्वयंभू व स्वयंसिद्ध असते. ते गुणांवर अवलंबून असत नाही. त्यात स्वतः केलेल्या श्रमाचा व तपाचा भाग मोठा असतो.
११) प्रेम आणि आदर म्हणजे कुटुंबाचे ऐक्य
परस्परांबद्दल आदर, प्रेम आणि जाणीव हा कुटुंबाच्या ऐक्याचा पाया आहे. बोलण्याला विरोध, निष्कारण वादविवाद आणि वायपट टीका न केल्याने अशा कुटुंबातील सर्व सदस्य सुखावतात आणि आपलेसे होतात व त्यामुळे घरातील वातावरण बदलून जाते. व आनंदोत्सव नेहमी साजरा होतो. भारतीय परंपरेत लग्नसंस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. विवाह म्हणजे आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो. भारतीय जीवनपद्धतीत हिंदू धर्मात लग्न हा करार नसून, ते पवित्र बंधन आहे असे मानले जाते. भले दोन व्यक्ती वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातून आलेल्या असतील, पण त्या दोघांमध्ये लग्नानंतर एक छान नाते तयार होते. लग्नबंधनात पदार्पण करताच त्या दोन व्यक्तींमध्ये एक नवाच स्नेहबंध तयार होतो.
मुलींनी सासर-माहेरच्या व्यक्तींचे मन जिंकून घेणे आणि त्यांच्यात मिसळून जाण्याचे कौशल्य नवविवाहित जोडप्याकडे असेल तर त्यांना फारशी अडचण येत नाही. अनेकदा नव्या सुनेबद्दल तक्रार केली जाते, की ती नीट वागत नाही. पण अशा तक्रारी करण्याच्या आधी आपण कसे वागतो आहोत, याचीही थोडी परीक्षा घ्यावी. एखादी गोष्ट चुकली, नीट झाली नाही तर रागावण्याच्या ऐवजी थोडेसे समजून घेऊन नीट सांगितले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. घरात आलेल्या नव्या सुनेनेही मोठ्यांचा मान राखायला हवा हेही तितकेच खरे आहे. लक्षात ठेवा, की सासरचे लोक तुमचे स्पर्धक नाहीत. विरोधकही नाहीत, स्पर्धा करायचीच असेल तर ती त्यांच्या चांगले वागण्याची, त्यांचे गुण अंगी बाणवण्याची करायला हवी.